Skip to main content

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 28/02/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो: || बिर्याणीस्तोत्रम् || अथ ध्यानम्| ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्| स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1|| एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः | तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2|| कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि | अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3|| जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः| सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4|| अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: | शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5|| बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते | विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6|| उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: | तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7|| तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः| सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8|| नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् | यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9|| द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४] चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10|| ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते | खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11|| अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि | स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12|| असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति | पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13|| ||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्|| टीपा: [१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी. [२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी) [३] लखनौ. [४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी. =====================================================

मराठी भाषांतर

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13|| ===============================================
लेखनविषय:

वाचने 22887
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

अति-रुचकर स्त्रोत्र !
जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही.
...हे भारी ! बाकी, सचित्र बिर्याणी आणखी मजा आणून गेली असती !

In reply to by सस्नेह

सचित्र बिर्याणी टाकल्यास सुट्टी टाकून बिर्याणी खावयास पळावे लागले असते. :)

भट्टमान्य, वाचूनच तृप्तीप्रत पावल्या गेले आहे. लेखनसन्याससन्यस्तीमुळे आनंदित.

स्तोत्र रोज पठण करुन त्याचे आचरण करण्यात येइल. बाकि मस्त जमलेय! सोबात मराठितही लिहिल्याने आम्हा असंस्कृतांची सोय झालि! :)

हे असलं काही पूर्ण संस्कृतमध्ये लिहायचं म्हणजे (बिर्याणी) खायचं काम नव्हे :)

पन्नास पुर्ती निमीत्त खवय्ये मिपाकर ज्या भागात असतील तेथील किमान १० बिर्याणी आमंत्रणे,बिर्याणीचे १०१ प्रकार ही पाक पुस्तीका आणी जे पी लिखित जाल सन्यास : शाप की वरदान ही ५०० पानी छोटेखानी पुस्तीका देऊन बॅट्टमण यांचा सत्कार करणेत येत आहे. अखिल मिपा सत्कार महासंघ्,आद्य बिर्याणी प्रेमी रूचीरा मित्र मंडळ्,आणि हटेला चिमणची वल्ली संचालीत टल्ली नसलेली गँग.

In reply to by जेपी

अलिकडे तुमचं सत्कार कमिटीकडे लक्ष नाही बर्र का जेपीभौ ! ;)

In reply to by जेपी

बिरयानी खाण्यात मशगूल असल्याने उशीर झाला काय ?

কিটি সুন্দর লিখতে তুমি! আপনি আমার নমস্কার!! _/\_ बिर्याणी कट्ट्याला जोरदार अनुमोदन.

असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति | पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13|| ||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||
http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif धन्य रे खाटुका.. __/\__ धन्य तुझी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif काय मेल्याची बुद्धी चालते तरी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif आता हे स्वर लाऊन पाठ करतो... आणी आमच्या भटुकात कामात म्हणतो.. बघू रांडिचं कुण्णाला काय कळतं का ते! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

ठ्ठो =)) =)) =)) म्हणाच आत्मूस हे. "प्रणम्य शिरसा देवम्" किंवा "भीमरूपी" ची चाल बसते याला. म्हणा अन कळवा!

In reply to by बॅटमॅन

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif ह्या ह्या ह्या ह्या!!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif श्राद्धाच्या भोजनाला बसताना(जेवण वाढले जात असताना..) अन्नसूक्त म्हणातात.. त्याच्या जागी हे चित्रान्न सूक्त म्हणतो..आणि पकडलनीत कुणी तर सांगेन मेल्ल्यांना.. की "हराम्यांन्नो प्रत्यक्ष श्राद्धान्न हेच मांस समान मानणारे टनाटनी तुम्ही..आणि मग मी त्याजागी आणलेल्या उडीदवड्यांना स्मरून हे सूक्त म्हटले..तर ते तुमच्याच टनाटन फ्राय धर्माला सु-संगत नै का होणार!? http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif मग मात्र दातखीळ बसेल मेल्यांची! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

आता हे स्वर लाऊन पाठ करतो... आणी आमच्या भटुकात कामात म्हणतो.. बघू रांडिचं कुण्णाला काय कळतं का ते! करा करा, प्रयोग करा (आपल्या जबाबदारीवर ) :) ;) =))

काय ते स्त्रोत! एक शब्द एका दमात बोलेन तर शप्पथ! ते मेलं स्त्रोत म्हणताना आमच्या जिभेचं इकडं तुकडं पडलंन! :(

वडकी गावात जत्रेचे आमन्त्रण होते तिथे मेंढी कापलेली पाव्हण्यांसाठी. फक्त दोन डिशेस. एक म्हणजे मटण करी अन एक ड्राय मटन- फक्त तेल-मीठ लावून फ्राय केलेले. आणि सोबत भाकर्‍यांची चळत. अन सोबत आग्रह करू करू वाढणारे यजमान लोक्स एक किस्सा आठवला,आमच्या एका मित्राला पुतण्या झाला म्हणून कळवण-सटाणा (जिल्हा नाशिक) मधे गावी बोलवले होते आम्हाला, बोकड़ कापुन गावजेवण वगैरे होते, तिकडे एक पद्धत होती, तेल मीठ लावुन फ्राय केलेले पीस वेगळे अन रस्सा (हाडे घालुन) वेगळा शिजवलेला. वाढताना एक गड़ी द्रोणात काही बोट्या घाली मागून एक दूसरा गड़ी बादली मधे रस्सा घेऊन त्या बोट्यांवर रस्सा ओतत पुढे जाई. तर आम्ही एकंदरित ५ पोरे पंगतीत बसलेलो होतो मी उजवीकडून शेवटला अन माझ्या शेजारी एक म्हातारा बसला होता. प्रथम द्रोण आले मग बोटी वाला गड़ी मुठ मुठ बोट्या वाढून गेला तेव्हा त्या म्हाताऱ्याने त्या पोराला बोलवुन एक मुठ बोट्या अजुन घेतल्या. आता साहजिक आहे की त्याला बोट्या जास्त प्रिय असणार तर त्याने त्या द्रोणातुन काढून पत्रावळीवर ठेवल्या त्या बोट्या कारण त्याला बहुदा रश्यात भिजवुन बोट्या खायच्या नव्हत्या. तितक्यात रस्सा वाढणारा पोर्या आला रस्सा वाढत त्याने म्हाताऱ्याची कामगिरी पाहिली अन त्याला वाटले बोटीवाल्याने घाई केली का काय त्याने म्हाताऱ्याला रस्सा वाढला, बोट्या काढून ठेवलेल्या पाहून त्याला वाटले असेल की त्या म्हाताऱ्याला चावायच्या नाहीत तेव्हा ,त्याने ओरडून बोटी वाल्याला थांबवले मग भास्सकन म्हाताऱ्याच्या पानातल्या बोट्या उचलल्या अन धावत जाऊन परत बोटीच्या ट्रे मधे टाकून परत आपला रस्सा वाढायला निघुन गेला! म्हाताऱ्याला बोलता ही येइना अन न बोलावता राहिना!! अन शेजारी आम्ही पोरे आडवी होऊन ठो ठो हसतं बसलो होतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अगागागागा लैच =)) =)) =)) =)) हे असे होते म्हातारे झाले की. =)) =)) यावरून विनोबाजींचा किस्सा आठवला. गांधीजींच्या शेजारी ते जेवायला बसले. त्यांना कार्ल्याची भाजी आजिबात आवडत नसे. त्यामुळे ताटात ती पाहताच प्रथम फस्त केली. गांधीजींना नेमकं उलटं वाटलं आणि त्यांनी अजून कार्लाभाजी वाढायला सांगितली. =)) =)) =))

बॅटमॅन च्यायला काय लिहिलंय _/\_ राजे.. जेव्हा कधी परत भेटाल तेव्हा आधी पाय धरीन तुमचे या स्तोत्रासाठी :D

असले स्तोत्र टाकुन अत्याचार केल्याबद्द्ल बॅट्याकडुन मला एक बिर्याणी लागु .

बिर्याणी बिर्याणी बिर्याणी बॅटमन को प्यारी है बिर्याणी! भात काय इशेश आवडत नाय तवा माजी बी बिर्याणी तुलाच घे भावा.

In reply to by बॅटमॅन

या वरून मला पण आठवले . इंदिरा गांधी यांनी टी. अन्जैया यांना १९८०-८२ या काळात आंध्रचा मुख्य मंत्री केले होते . त्याच काळात हा सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यावरून हैद्राबाद मध्ये- बिर्यानी बिर्यानी बिर्यानी अन्जयाको प्यारी है बिर्यानी- असे विडम्बन प्रचलित झाले होते

In reply to by नाव आडनाव

अत्ताच फटूही दिसला. धन्यवाद संपादक लोक्स. अता लौकरच बिर्याणी हदडणे आले.

मिसळपावचे वाचक नसलेल्या माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना हा दुवा पाठवला. त्या सर्वांना हे स्तोत्र आवडले, त्यांची दाद तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा प्रतिसाद.

In reply to by आतिवास

आवर्जून इतर मित्रमैत्रिणींना दुवा पाठवल्याबद्दल आमचा येक दुवा घ्यावा. अनेक धन्यवाद :

वाल्गुदशास्त्री तुम्हाला मन:पूर्वक दंडवत. काय लिवलय काय लिवलय. पैजाराबुवा,

मस्त लिहिलय..हे अस लिहायला खूप प्रतिभा लागते... आम्ही बान्द्रा च्या "लकी चिकन बिर्यानी" चे फ्यान आहोत..आठवणीनेच तोंडाला पाणी सुटल..यम्मी : )

दोन वर्षांपुर्वी तुम्हाला व्य.नि. केला होता आम्ही आठवतंय का? तुमचे चरण कुठे आहेत साहेब ? ||अतः बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं प्रातःकाली स्मरंणम् ||