नमस्कार लोकहो,
मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो:
|| बिर्याणीस्तोत्रम् ||
अथ ध्यानम्|
ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||
एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||
कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||
जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः|
सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4||
अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: |
शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5||
बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते |
विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6||
उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: |
तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7||
तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः|
सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8||
नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् |
यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9||
द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४]
चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10||
ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते |
खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11||
अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि |
स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12||
असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13||
||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||
टीपा:
[१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी.
[२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी)
[३] लखनौ.
[४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी.
=====================================================

मराठी भाषांतर
आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13|| ===============================================
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22841
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा !
धन्स :)
In reply to आहा ! by सस्नेह
भट्टमान्य.
स्तोत्र
भाषाप्रभुत्त्वाला प्रणाम !__/
__/\__
धागा प्रतीसाद
सत्कार झाला का नाही पाहण्या
In reply to धागा प्रतीसाद by नाखु
अलिकडे तुमचं सत्कार कमिटीकडे
In reply to सत्कार झाला का नाही पाहण्या by जेपी
बिरयानी खाण्यात मशगूल
In reply to सत्कार झाला का नाही पाहण्या by जेपी
कं लिवलंय कं लिवलंय!!
मस्त
पार्सल घ्यायला जात आहे.
बिर्याणी कट्ट्याला जोरदार
बिर्याणी कट्ट्याला जोरदार अनुमोदन.
रच्याकने काय लिहीलय . खल्लास !ভিশন সুন্দর!
অনেক ধন্যবাদ নূলকর কাকু।
In reply to ভিশন সুন্দর! by सुधांशुनूलकर
जावक धनादाळ हलकट काकू
जावक धनादाळ हलकट काकू लोल
In reply to जावक धनादाळ हलकट काकू by अभ्या..
जावक धनादाळ हलकट काकू
In reply to जावक धनादाळ हलकट काकू by अभ्या..
असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं
हा हा हा
In reply to असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं by अत्रुप्त आत्मा
ठ्ठो =)) =)) =))
In reply to असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं by अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या ह्या!!!!
In reply to ठ्ठो =)) =)) =)) by बॅटमॅन
सम्भाळा, ट्राय अॅट युवर ओण
In reply to ह्या ह्या ह्या ह्या!!!! by अत्रुप्त आत्मा
आता हे स्वर लाऊन पाठ करतो...
In reply to असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं by अत्रुप्त आत्मा
आता हे स्वर लाऊन पाठ करतो... आणी आमच्या भटुकात कामात म्हणतो.. बघू रांडिचं कुण्णाला काय कळतं का ते!करा करा, प्रयोग करा (आपल्या जबाबदारीवर ) :) ;) =))लै भारी!
__/\___
हा.हा.हा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anariबत्तमानशास्त्री थोर आहेत!
काय भारी लिहलायस.खरच दंडवत
___/\___ अतीच भारी आहे!
हायला! लय भारी
_/\_
आवडले !
शेवटच्या ओळी गधेगाळ आहे.
अररारारा....
९८...
१००
बॅटमॅन भाई
अगागागागा लैच =)) =)) =)) =))
In reply to बॅटमॅन भाई by कैलासवासी सोन्याबापु
घालीन लोटांगण
जबरी!
बॅटमॅन
एकदम झकास…समजण्यासाठी अर्थात
हे
बिर्याणी बिर्याणी बिर्याणी
आठवले. :)
In reply to बिर्याणी बिर्याणी बिर्याणी by भरत्_पलुसकर
तसं नाय
In reply to आठवले. :) by बॅटमॅन
अगदी.
In reply to तसं नाय by भरत्_पलुसकर
कुर्बानी बिर्यानी
In reply to आठवले. :) by बॅटमॅन
बॅटमॅन - भारीच लिहिलं आहे
+१
In reply to बॅटमॅन - भारीच लिहिलं आहे by सुचिकांत
+११
In reply to +१ by नाखु
एक फोटू टाकू म्हंजी धागा
अत्ताच फटूही दिसला. धन्यवाद
In reply to फोटो आहे धाग्यात. माझ्या एका by नाव आडनाव
आहा!!!
In reply to एक फोटू टाकू म्हंजी धागा by नाव आडनाव
__/\__ मस्त (बिर्याणीची) भूक
मिसळपावचे वाचक नसलेल्या
आवर्जून इतर मित्रमैत्रिणींना
In reply to मिसळपावचे वाचक नसलेल्या by आतिवास
क लिवलय
काय लेख आहे राव. एक लंबर!!!!
In reply to क लिवलय by श्रीरंग_जोशी
'दम'दार
मस्त...वाचतानाच तोंडाला पाणी सुटले
मस्त लिहिलय..हे अस लिहायला
दोन वर्षांपुर्वी तुम्हाला व्य
_/\_ महान!