✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

ब — बॅटमॅन, Sun, 02/28/2016 - 14:16
नमस्कार लोकहो, मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो: || बिर्याणीस्तोत्रम् || अथ ध्यानम्| ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्| स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1|| एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः | तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2|| कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि | अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3|| जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः| सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4|| अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: | शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5|| बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते | विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6|| उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: | तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7|| तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः| सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8|| नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् | यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9|| द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४] चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10|| ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते | खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11|| अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि | स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12|| असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति | पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13|| ||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्|| टीपा: [१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी. [२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी) [३] लखनौ. [४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी. =====================================================

मराठी भाषांतर

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13|| ===============================================

प्रतिक्रिया द्या
22665 वाचन

💬 प्रतिसाद (136)

बॅट्मना

तिमा
Sun, 02/28/2016 - 14:29 नवीन
साष्टांग नमस्कार. तो इंद्र धावत येणार आता वरुन!
  • Log in or register to post comments

आगागा

प्रदीप साळुंखे
Sun, 02/28/2016 - 14:30 नवीन
काय लिवलयं;-)
  • Log in or register to post comments

क्या बात क्या बात....!!!

प्रचेतस
Sun, 02/28/2016 - 14:36 नवीन
क्या बात क्या बात....!!! आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण द्या ना गडे.
  • Log in or register to post comments

आम्हालाही. त्यासाठी आम्ही

सतिश गावडे
Sun, 02/28/2016 - 14:41 नवीन
आम्हालाही. त्यासाठी आम्ही हैदराबादी हाऊसमधल्या चिकन/मटण बिर्यानीची गुरुदक्षिणाही द्यायला तयार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओ आम्हालापण!

बोका-ए-आझम
Sun, 02/28/2016 - 16:18 नवीन
नागपुरी वडाभाताची शपथ आहे तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही स्थान

नाखु
Mon, 02/29/2016 - 08:35 नवीन
द्याल न द्याल आम्ही एकलव्यासारखे (जुन्या) आप्ले चाहते आहेत आणि राहूही. अतिअवांतर : लेखन उपास सोडल्याबद्दल सुजाता मस्ताने देणेत येईल ( फक्त चिंचव्डात) अतिदुर्गम अवांतर : काय देऊ म्हटल्याने बॅट्या चिंचवड कट्ट्याला येईल.(मनोबा+अन्याचा वशीला लावावा काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अगागागा

अभ्या..
Sun, 02/28/2016 - 14:43 नवीन
अगागागा काय ती प्रतिभा, काय ते भाषाप्रभुत्व. बट्टमणा दंडवत घे रे बाबा.
  • Log in or register to post comments

एक नंबर !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/28/2016 - 14:43 नवीन
एक नंबर ! या निमित्त बट्टमण लिहिता झाला, याचा अत्यानंद झाला आहे ! आता एक बिर्यानी-कट्टा करायला पाहिजे !
  • Log in or register to post comments

ठरवा. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/28/2016 - 15:03 नवीन
ठरवा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

घ्या पुढाकार आणि त्याच्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/01/2016 - 14:45 नवीन
घ्या पुढाकार आणि त्याच्या आवडीच्या बिर्यानीहाउसमध्ये हौस पुरी करायला कट्ट्याचा धागा टाका. रविवार निवडल्यास जास्त मिपाकर येतील असा अनुभव आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त आहे स्त्रोत्र

जेपी
Sun, 02/28/2016 - 14:57 नवीन
मस्त आहे स्त्रोत्र
  • Log in or register to post comments

सर्वांचे अनेक धन्यवाद!

बॅटमॅन
Sun, 02/28/2016 - 15:03 नवीन
सर्वांचे अनेक धन्यवाद! डॉक- एका पायावर अन एका हातावर तयार हौत. बिर्याणी कट्टा झालाच पायजे. प्रचेतस अन गावडे सर- अहो तुम्हांला कुठे स्थान देऊ, फ्यान तर आम्ही हाओत तुमचे.
  • Log in or register to post comments

हा आपला विनय आहे.

प्रचेतस
Sun, 02/28/2016 - 16:19 नवीन
हा आपला विनय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बऱ्याच दिवसांनी दिसलात बँटभौ

DEADPOOL
Sun, 02/28/2016 - 15:05 नवीन
बऱ्याच दिवसांनी दिसलात बँटभौ
  • Log in or register to post comments

एषा:

एस
Sun, 02/28/2016 - 15:06 नवीन
भूकनिवारकम् बिरियाणीम्स्तोत्रम् अतीव रुच्यते! तस्य गीर्वाणभाष्येन कैच्याकै बोली: आमी प्रतिसाद लिवतसे! ;-) तस्मात् आता भूक लागतसे. _/\_
  • Log in or register to post comments

व्वा.. काय भारी लिवलय.

संजय पाटिल
Sun, 02/28/2016 - 15:34 नवीन
व्वा.. काय भारी लिवलय. मनात..(डोके खाजवनारि स्मायलि) आयला, काय समज्ले नै ब्वा..
  • Log in or register to post comments

ते (सु) संस्क्रूत लोकांसाठी

पीके
Mon, 02/29/2016 - 00:02 नवीन
ते (सु) संस्क्रूत लोकांसाठी आहे, तुम्हाला नाही कळणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

कं लिवलंय कं लिवलंय! _/\_

अजया
Sun, 02/28/2016 - 16:14 नवीन
कं लिवलंय कं लिवलंय! _/\_ असंस्कृत लोकांना अर्थ कळु द्या की ;)
  • Log in or register to post comments

साधु! साधु!!

नगरीनिरंजन
Sun, 02/28/2016 - 16:28 नवीन
साधु! साधु!! इति श्री बट्ट्मण्ण रचितं बिर्याणीस्तोत्रं पठित्वा जठराग्नी प्रदीप्तं!
  • Log in or register to post comments

वा! मजा आली वाचताना.

आतिवास
Sun, 02/28/2016 - 16:31 नवीन
वा! मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

हे अफाट आहे!!

स्वामी संकेतानंद
Sun, 02/28/2016 - 16:52 नवीन
हे अफाट आहे!!
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Sun, 02/28/2016 - 18:00 नवीन
सॉलिड लिहिलं आहेस रे बॅट्या.. स्वाती
  • Log in or register to post comments

झकास!

पैसा
Sun, 02/28/2016 - 18:29 नवीन
आईची कहाणी सांगताना मावशी आणि आजीला वेगळे काढता येत नाही. तसेच मराठीबद्दल बोलताना संस्कृत आले म्हणून काही बिघडत नाही. मराठी दिनाला संस्कृत पुष्प(च्छ)दिल्याबद्दल धन्यवाद! मस्त झालंय स्तोत्र!
  • Log in or register to post comments

भो बट्टमणा,नमस्कारम् करोमि.

नूतन सावंत
Sun, 02/28/2016 - 19:31 नवीन
भो बट्टमणा,नमस्कारम् करोमि.
  • Log in or register to post comments

अरे वाह, मस्तं!

पद्मावति
Mon, 02/29/2016 - 01:01 नवीन
अरे वाह, मस्तं!
  • Log in or register to post comments

बिर्याणी स्तोत्र झाले,मिसळ

कंजूस
Mon, 02/29/2016 - 07:18 नवीन
बिर्याणी स्तोत्र झाले,मिसळ आणि वड्याच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त स्तोत्र

मित्रहो
Mon, 02/29/2016 - 07:31 नवीन
आम्ही संस्कृत फक्त पाठच केल्यामुळे अर्थ कळला नाही.
  • Log in or register to post comments

__/\___

प्रीत-मोहर
Mon, 02/29/2016 - 07:37 नवीन
__/\___
  • Log in or register to post comments

बॅटमॅन भाई

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 02/29/2016 - 07:52 नवीन
"काहीही झाले तरी मी सामिष भोजन सोडणार नाही" म्हणणारे याज्ञवल्क्यमुनी आठवले अंमळ :D अवांतर :- आम्हास संस्कृतात गती नसते म्हणे जमेल तसे अर्थ पोचला (अथर्वशीर्ष समजते तितपत) जमल्यास एक अनुवाद मराठीत करा बिर्याणीस्तोत्राचा आपल्या सोई ने! (गोत्र चिकन बिर्याणी) बाप्या
  • Log in or register to post comments

मस्तच!!

सुनील
Mon, 02/29/2016 - 08:29 नवीन
फर्मास!!
द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:|
पैकी द्राविडी वगळता अन्य बिरियाणी चाखून पाहिल्या आहेत. अतिअवांतर - काहीही म्हणा, पण त्या निकम वकिलांच्या "खयाली बिर्याणी"ची सर बाकी कश्शालाच नाही!!
  • Log in or register to post comments

अतिअतिअवांतर - निकम सरांनी

अन्या दातार
Mon, 02/29/2016 - 10:40 नवीन
अतिअतिअवांतर - निकम सरांनी नसलेल्या बिर्याणीचा पुरावा कोर्टात सादर केला यावरुनच ते किती पोचलेले वकिल आहेत हे दिसले नाही का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

खयाली बिर्याणीबद्दल तहे दिलसे

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 12:04 नवीन
खयाली बिर्याणीबद्दल तहे दिलसे सहमत!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अनेक धन्यवाद लोक्स. अता या

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 11:04 नवीन
अनेक धन्यवाद लोक्स. अता या स्तोत्राचे भाषांतर करून संपादक मंडळींना ते धाग्यातच अ‍ॅडवायला सांगतो.
  • Log in or register to post comments

वा वा!

चांदणे संदीप
Mon, 02/29/2016 - 11:45 नवीन
गरीबांची सोय लावल्यामुळे आपले जाहीर आभार मानून मी आपले दोन शब्द वगैरे.... Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कोंबडी

मन१
Mon, 02/29/2016 - 11:41 नवीन
कोंबडी जाते जिवानिशी आणि खाणारं म्हणतय वृत्तात बसवायचय. :) आख्ख्या धाग्याला "प्रणम्यं शिरसा देवम् गौरी पुत्रम् विनायकम्" श्लोकाची चाल्/वृत्त चपखल बसतय. अख्खं संस्कृतात ??? ( संस्कृत समजत नै. ते व्याकरण सांभाळून व्रुत्तात बसवलं असशील तर महान आहेस.)
  • Log in or register to post comments

भाषांतर

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 11:47 नवीन
आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13||
  • Log in or register to post comments

अहाहाहाहाहा.

अभ्या..
Mon, 02/29/2016 - 11:54 नवीन
अहाहाहाहाहा. हा काळा भातही आवडला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जशी

नाखु
Mon, 02/29/2016 - 12:02 नवीन
चित्रांनी पाककृती आण्खी फर्मास वाटते तसे अगदी या भाषांतराने केलेय. बॅट्या मस्तानीचे पक्के आहे आणि अभ्याला पण (सोलापुराच्या बाहेर १०० किमी गेला की पोलींसाना खबर पोचते का काञ अभ्या बाबत असे वाटून राहीलेय मला) अर्था कळाल्याने जास्ती बिर्याणीग्रस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चला तर मग भागानगर भवनात? मौजे

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 12:11 नवीन
चला तर मग भागानगर भवनात? मौजे हिंजवडी इथे आहे असे गावडे सरांकडून कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काळा भात, म्म्म! च्यायला भात

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 12:06 नवीन
काळा भात, म्म्म! च्यायला भात हाच इतका जब्राट पदार्थ आहे की काय वदावे त्याजपुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जियो!!!!

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 02/29/2016 - 12:04 नवीन
जियो!!!! एकदा मुर्शिदाबादी मीन बिरयानी वर आपल्याशी चर्चा करावी म्हणतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

:)

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 12:09 नवीन
बिर्याणीत कुक्कुट किंवा मेषादिंचे मांसच अतीव रुचकर लागते अशी आमची तूर्त समजूत आहे. त्यामुळे परमेश्वराचा प्रथमावतार त्यासोबत कसा लागेल याची अंमळ शंका वाटते आहे. तरी एकदा खाऊन बघण्यात येईल!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अजशावकबिर्याणी विशेष रुचकर

नगरीनिरंजन
Mon, 02/29/2016 - 18:29 नवीन
अजशावकबिर्याणी विशेष रुचकर लागते असा अनुभव आणि मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्ही कुक्कुटबिर्याणीचे विशेष

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 18:33 नवीन
आम्ही कुक्कुटबिर्याणीचे विशेष फ्यान हाओत. अजशावकबिर्याणी उत्तम करणे सगळ्यांना जमतेच असे नाही, तुलनेने कुक्कुट प्रोसेसावयास सोप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अजशावक ज़रा वातड लागतं असं

प्रचेतस
Mon, 02/29/2016 - 18:38 नवीन
अजशावक ज़रा वातड लागतं असं हल्लीच कुणी यानात सांगत होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुठल्या अंतराळयानात का ;)

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 18:41 नवीन
कुठल्या अंतराळयानात का ;) लुसलुशीत अजशावक करणे येरागबाळाचे काम नोहे. आजवर खाल्लेल्यापैकी क्वचितच कुठेशीक नॉनवातड होते. एक सणसणीत अपवाद म्हणजे वडकी गावात जत्रेचे आमन्त्रण होते तिथे मेंढी कापलेली पाव्हण्यांसाठी. फक्त दोन डिशेस. एक म्हणजे मटण करी अन एक ड्राय मटन- फक्त तेल-मीठ लावून फ्राय केलेले. आणि सोबत भाकर्‍यांची चळत. अन सोबत आग्रह करू करू वाढणारे यजमान लोक्स. अगागागागा, काय वडलो मटन तेच्यायला.....लैच खाल्लो. तेवढं मटन किंवा चिकन कधी एका वेळेस खाल्लं असेलसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी.

प्रचेतस
Mon, 02/29/2016 - 18:45 नवीन
खी खी खी. बाकी आम्ही घासफ़ूसवाल्यांनी मागच्या अठवड्यात एका ठिकाणी (यानात नव्हे) पनीर खाल्ले ते पण भलतेच वातड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्यामुळेच चांगल्या पंजाबी

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 18:47 नवीन
त्यामुळेच चांगल्या पंजाबी जेवणाचा एक निकष म्हणजे नॉनवातड पनीर असाही आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
Mon, 02/29/2016 - 18:49 नवीन
अगदी अगदी. अता पनीरबिर्याणी खाणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पनीर बिर्याणी ळॉळ =)) व्हेज

बॅटमॅन
Mon, 02/29/2016 - 18:52 नवीन
पनीर बिर्याणी ळॉळ =)) व्हेज बिर्याणीमध्ये अजून बरेच चांगले ऑप्शन्स असावेत की बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा