विचारमथनाचा स्त्रोत : http://www.misalpav.com/node/35035
गेली ५ दशके मी या ना त्या रुपात भाषेचा वापर करतो.गुजरात, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांव्यतिरिक्त थोडे दिवस गल्फमध्ये पण पाट्या टाकत होतो.(पैसे मिळवायला जे काम करतो ते पाट्या टाकणे आणि मनाला समाधान करणारे काम करणे, म्हणजे कार्य करणे.ह्या विचारमंथनाचा काथ्याकूट परत कधी तरी....)
इकडे-तिकडे भटकतांना आलेले काही अनुभव.
सन १९७५ मी आणि किराणामाल वाला.दुकानदार मारवाडी आहे.दुकान नेहमीसारखेच अस्ताव्यस्त.
मी : दादा, २ किलो साखर आणि एक नारळ पाहिजे.
दुकानदार : खात्यावर टाकू की पैसे देणार?
मी : आईने पैसे दिले आहेत.
दुकानदार त्याच्या नोकराला मराठीत सांगतो आणि मला बिलाचे पैसे पण मराठीतच सांगतो.
==============================
सन २०१५, तेच दुकान आणि तोच दुकानदार.दुकान टापटीप.अगदी ६-सिग्माच्या प्रमाणे.
मी : १ किलो शेंगदाणे.
दुकानदार, शेंगदाण्याची १ किलोची पिशवी हातात ठेवतो आणि म्हणतो, "साब,ये देखो नया चावल आया है.सालभर भरनेका है तो बोलो.पैसा बाद में दो."
मी तांदूळाच्या गोणीची मागणी नोंदवतो.
दुकानदार नोकराला मारवाडी भाषेत, माझा पत्ता आणि किती वाजता घेवून जायचे.इत्यादी माहिती देतो.
१९७५ ते २०१५ पर्यंत ग्राहक आणि दुकानदार ह्यांच्यात काय फरक पडला ते सुज्ञांना सांगायला नकोच.
==================================================
१९७५ मी भाजी-बाजारात, आई बरोबर.
आई भाजीवाल्यांकडून भाजी घेतांना मराठीत बोलत होती.
------
सन २०१५ त्याच भाजी बाजारात , बायको बरोबर.
बायको भाजी वाल्याकडून हिंदीत बोलत होती.भाजीवाले बदलले.
=================================================
१९७५ ते २०१५ ह्या कालावधीत, रोजचा व्यवहार हिंदी भाषेत जास्त होतो आणि तो पण महाराष्ट्राच्या राजधानीत.मग तो बस प्रवास असो, किंवा रिक्षावाले, किंवा रेल्वे प्रवास.
तीच गत अन्न आणि औषधे पुरवणार्या दुकानांबाबतीत.
======================================
गुजरात, तामिळनाडू इथे मात्र अद्यापही रोजचे व्यवहार त्यांच्याच बोलीभाषेत होतात.
गल्फमधील प्रत्येक सेवा देणार्या लोकांना अरबी येत असतेच.अरबी लिहिता-वाचता येत नसले तरी.
माझे निरिक्षण : मराठीचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा सार्वजनिक वापर, सेवा पुरवणार्या लोकांकडून जास्त होतो.आपण जर मराठीतच बोललो तर दुकानदार पण मराठीतच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
असो,
बरेच दिवस ह्या विषयी मिपाकरांशी बोलायचे होते, म्हणून बोललो.मनांतले शल्य आपल्याच माणसांबरोबर बोलले की, मन पण जरा हलके होते.
वरील लेख वैयक्तिक वाटल्यास किंवा इतर भाषांचा अनादर करणारा वाटला, तर मी क्षमा मागतो.
वाचने
7340
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे.
+१
In reply to सहमत आहे. by एस
:)
वरील समस्या कदाचीत महानगरात
जेपीशी सहमत!
+१
In reply to जेपीशी सहमत! by अजया
भाषा हे संवादाचे माध्यम आहे.
+१
In reply to भाषा हे संवादाचे माध्यम आहे. by सतिश गावडे
सतीसभौंशी सहमत!
काहीतरीच काय!
असं चार प्रतिसादात नाही
निदान
टंकनचूक असेल हो. एव्हढं काय
In reply to निदान by आजानुकर्ण
स्त्रोत की स्रोत?
In reply to निदान by आजानुकर्ण
स्रोत हे बरोबर. सृ धातू असावा
In reply to स्त्रोत की स्रोत? by अमित खोजे
+१
In reply to स्रोत हे बरोबर. सृ धातू असावा by तर्राट जोकर
हे मराठीचे फार जुने दुखणे आहे
+१
In reply to हे मराठीचे फार जुने दुखणे आहे by डॉ सुहास म्हात्रे
पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि
+१
In reply to पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि by गरिब चिमणा
त्याचं एक कारण
In reply to पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि by गरिब चिमणा
पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि
पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि मराठीची गळचेपी होतेय अशी ओरड करायची सध्या फॅशन आली आहे.या मतात किंचित अर्थ आहे पण ते पूर्णसत्य नाही हे स्वानुभवावरून सांगू शकेन. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर माझे मराठीत लिहिणे-शिकणे व काम करणे बंदच झाले. व्यवसायानुरूप घर सोडून इतर ठिकाणी मराठी वापरणे बंद झाले. तेव्हापासून, अनेक दशकांनी, चार एक वर्षांपूर्वी मिपावर लिहायला लागलो तेव्हा मी मराठीत सलग चार वाक्ये (अक्षरशः सलग चार वाक्ये) पहिल्यांदा लिहिली ! माझ्या मुलाचे बालवाडी ते उच्च्च शिक्षणापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिक्षण परदेशी आणि अर्थातच इंग्लिशमधे झाले आहे. त्याला मराठी हा विषय शाळा-कॉलेजात कधीच नव्हता. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने माझा मुलगा अस्खलित मराठी बोलतो हे मी अभिमानाने सांगून शकतो. पुल त्याचे आवडते लेखक आहेत. मराठी नाटक सिनेमांना तो नाक मुरडत नाही. किंबहुना, "बालगंधर्व" हा सिनेमा बघायला आवर्जून घेऊन जावून त्याने मला जरासा आश्चर्याचा धक्का दिला होता ! त्याच्या बोलण्यावरून, शाळा-कॉलेजात त्याला मराठी विषय कधीच नव्हता, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. विशेषतः शास्त्रिय विषयावर चर्चा चाललेली नसली तर आमच्याकडून इंग्लिश व इंग्राजळेली मराठी विचार न करता "स्वाभाविकपणे" टाळली जाते. आजही दोन वेगवेगळ्या देशांतून एकमेकाशी बोलताना "आमची मराठी"च सहजपणे वापरली जाते. मराठीत शिकलेल्या अनेक पालकांच्या (त्यात माझे अनेक नातेवाईकही आलेच) मुलांना "आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा. ते टायगरचं पिक्चर घेतलंस ना मिसना शो करायला? टिफिन एंप्टी करून आणायचा हां." असं बोलताना ऐकली की हसू का वैषम्य वाटून घेऊ असा प्रश्न पडतो :(मराठीत शिकलेल्या अनेक
In reply to पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि by डॉ सुहास म्हात्रे
...आणि हो, त्याला पाश्च्यात्य
In reply to पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि by डॉ सुहास म्हात्रे
मी तुमच्या feelings समजू शकतो
लेखाशी प्रचंड सहमत ! आपण ज्या
काल विडीओकॉन डी२एच ला काही
+१००००
In reply to काल विडीओकॉन डी२एच ला काही by असंका
अनुभव
In reply to काल विडीओकॉन डी२एच ला काही by असंका
व्हिडीऑकोनचे मारवाडी संस्थापक
In reply to काल विडीओकॉन डी२एच ला काही by असंका
आयला !
In reply to व्हिडीऑकोनचे मारवाडी संस्थापक by मृत्युन्जय
लेख आवडला
गळचेपी, हत्या हे शब्द वाचून
हा हा हा
In reply to गळचेपी, हत्या हे शब्द वाचून by रेवती
शब. नव्हे शब्दाची म्हणायचं होतं.
In reply to हा हा हा by सुबक ठेंगणी
मराठी असे मायबोली.
गरीब चिमणा आणि राही यांच्या
दणकून सहमती.
In reply to गरीब चिमणा आणि राही यांच्या by आजानुकर्ण
माझीसुद्धा!
In reply to दणकून सहमती. by राही
आजकाल चर्चा करत नाही या
अनेक मराठी लोकांनाच मराठीतून बोलणे कमीपणाचे वाटत असेल
मुविकाकांनी चघळायला विषय देऊन
मराठी माध्यम मागतेय इच्छामरण
पांडू मोड ऑन
हे आधीही कधी लिहिलं असेल,
तुमचे अनुभव बर्यापैकी
In reply to हे आधीही कधी लिहिलं असेल, by आदूबाळ
मासे खिलावतो ना? मग जावदे.
In reply to तुमचे अनुभव बर्यापैकी by बॅटमॅन
डॉ. ली श्लेसिंगर - हे
ली श्लेसिंगर बोलतात चांगले,
In reply to डॉ. ली श्लेसिंगर - हे by अमेरिकन त्रिशंकू
ळ आणि ण
In reply to ली श्लेसिंगर बोलतात चांगले, by बॅटमॅन
ज चे दोन्ही उच्चार करता येणे
In reply to ळ आणि ण by सुनील
मराठी लोकच एकमेकांशी मराठीत
आईस अँड राईस