आम्हाला इंग्लिश येतंय

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
23 Feb 2016 - 12:59 pm

ब्लॉग दुवा हा

मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे. २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस आहे; या निमित्ताने आज बहुतेक लोकांची मराठी बद्दलची भावना, आणि त्याबद्दल माझी भावना, काहीशी अशी आहे...

आम्हाला इंग्लिश येतंय

कशाला थयथय करतोस मित्रा
लक्ष कोण देतंय?
अरे आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

गुडमॉर्निंग, हाव आर यू?
कॉन्व्हरसेशन जमतंय
कमॉन, धिस इज द फ्यूचर ज्यात
आमचं मन रमतंय
गुढीपाडव्याला मेसेजमधे
"हॅपी न्यू इयर" येतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

चॉकलेटचे बंगले रिकामे झाले
भोलानाथ बोलत नाही
ट्विंकल ट्विंकल स्टरशिवाय
आम्हाला झोपच येत नाही
पाढ्यांची झाली टेबल्स
आणि चित्र ड्रॉइंगसारखं होतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

किंग शिवाजी वाचतात मुलं
शिवराय कसे कळणार
आणि मोठं होऊन न्यायासाठी
कुठल्या मुठी वळणार
स्वातंत्र्याच्या संग्रामाला
फ्रीडम अळणी करतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

जगाची भाषा इंग्लिश तर
राष्ट्रभाषा हिंदी आहे
खरं सांगतो मित्रा आता
मराठीला मंदी आहे
असं सगळं बोलायला
हे तोंड कसं चालतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

रेस्टॉरंट मधे डिनर होतायत
फेस्टिव्हलसाठी शॉपिंग
ट्रॅव्हल होतंय वर्क साठी
हेल्थ साठी जॉगिंग
कुठे नेली रे भाषा आपली
हे काय कानी पडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

जन्मला की 'न्यू अरायवल'
मेला म्हणजे 'आरआयपी'
जो बघावं मोबाईलमधे
इंग्लिश लेटरंच टायपी
मग नाव मराठीत लिहितानाही
अक्षर अक्षर अडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

करायचंय काय मराठी?
ते जुनं झालंय आता
स्कूल इंग्लिश, बाकी हिंदी
मराठीचं काय सांगता?
साडी, झब्बा सोयीस्करपणे
ट्रॅडिशनल वस्त्र ठरतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

कधीतरी कळेल महत्व
आशिर्वादाचं, ब्लेसिंग पुढे
कधीतरी जाणवेल ओल
अश्रूंमधली, टिअर्स पुढे
शेवटी 'साल्या' म्हणण्यातलं प्रेम सुद्धा
'डूड' म्हणून थोडंच कळतंय?
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

- अपूर्व ओक -----------------------------------

फ्री स्टाइलशांतरसकविताभाषा

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

23 Feb 2016 - 8:53 pm | उपयोजक

पयला मी!
छान आहे कविता!
खरंच मराठी न आल्यामुळे अडेल असं भरपूर काहीतरी घडायला हवं

एकप्रवासी's picture

23 Feb 2016 - 9:03 pm | एकप्रवासी

वास्तववादी आहे कविता, खूप सुंदर …. !

बहुगुणी's picture

23 Feb 2016 - 10:06 pm | बहुगुणी

आवडली!

खटपट्या's picture

23 Feb 2016 - 10:08 pm | खटपट्या

खूप छान कविता.
तुमच्या नावासहीत दुसरीकडे प्रसारीत केली तर चालेल का ते कळवा...

वेल्लाभट's picture

24 Feb 2016 - 8:17 am | वेल्लाभट

हो हो नक्की चालेल.

छान कविता! चांगली कोपरखळी!

चांदणे संदीप's picture

23 Feb 2016 - 11:05 pm | चांदणे संदीप

आवडली कविता!

Sandy

निशांत_खाडे's picture

23 Feb 2016 - 11:46 pm | निशांत_खाडे

मस्त जमलय. छान

रातराणी's picture

24 Feb 2016 - 12:35 am | रातराणी

छान!

कविता आवडली. लाईक करण्यात येत आहे. ;)
महाराष्ट्रात सगळीकडे मराठी बोलली जातीये अशी कल्पना करायला छान वाटतेय.

रेवती रातराणी निशांत संदीप खप सटक बहुगुणी एप्र केअशु,
अनेक आभार :)

सतिश गावडे's picture

24 Feb 2016 - 8:33 am | सतिश गावडे

असं वाटलं की माझ्याच मनाची व्यथा मांडली आहे.
ज्या इंग्रजी शब्दांना मराठीत सोपे प्रतिशब्द नाहीत तिथे काहीतरी अवघड मराठी प्रतिशब्द वापरण्यापेक्षा इंग्रजी शब्द वापरणं समजण्यासारखं आहे.

मात्र आई आणि बाबांच्या ऐवजी आज सर्रास ममी/ममा आणि पपा/डॅड/डॅडी हे शब्द ऐकायला मिळतात. वाईट वाटते.

नाखु's picture

24 Feb 2016 - 9:35 am | नाखु

बरेचदा आपल्याला इंग्रजी येतेय (हे दाखविण्याच्या) अट्टाहासापायी/हौसेपायी असे वापरताना दिसतात.सहज शक्य असलेले वापरातले शब्द जाणीपुर्वक इंग्रजी वापरले जातात आणि मग आवर्जून मराठी शब्द शिकवणार्/शिकणार कधी ?

१.तुला भूक लागलीय एक अ‍ॅपल देऊ का?
२.ममानी दिलेला टीफीन फिनीश करायचा बर का !
३.कित्येक अमराठी लोकांना जितके अस्सल मराठी (अगदी कुठल्याही बोलीतले -कोकणी,वर्‍हाडी,खान्देशी ई.) शिकण्याची/सम्जण्याची इच्छा असते तितकी मराठी माणसांमध्ये नाही असे रोचक निरिक्षण आहे

पे"रेंट" न झालेला पालक नाखु

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 9:40 am | प्रचेतस

खुद्द वेल्लाभटांच्या प्रतिसादांतूनही बरेच वेळा इंग्रजी शब्द टपकलेले दिसून येतेत. :)

भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे; उलट इंग्लिश आलंच पाहिजे हा आग्रह आहे. पण मराठीचा गळा दाबून इंग्लिशचा सूर लागतो ना; ते चूक आहे.

बाकी मराठी प्रतिसादातून इंग्लिश शब्द टपकतात हे मान्य आहे मला. एवढंच काय वाक्यच्या वाक्य इंग्लिशमधे लिहिलेली आहेत अनेकदा प्रतिसादात. त्याकडे लक्ष देईन पण इतकंच म्हणेन की मराठीतला शब्द माहित नाही म्हणून लिहिलेले ते इंग्लिश शब्द नसतात; ते तिथे चपखल बसतात म्हणून समजून लिहिलेले असतात.

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 11:29 am | प्रचेतस

:)

सतिश गावडे's picture

24 Feb 2016 - 9:54 am | सतिश गावडे

पे"रेंट" न झालेला पालक नाखु

कारण तुम्ही तुमच्या मुलांच्या स्कुलमधील पेरेंट्स मीटना जात नसाल. ;)

अजया's picture

24 Feb 2016 - 9:39 am | अजया

कविता आवडली.

भीमराव's picture

24 Feb 2016 - 10:07 am | भीमराव

वेल्लाभाऊ तुमच्या नावासकट चेपु आणि कस्काय वर घेऊन जातो बघा ही कविता आता,

वेल्लाभट's picture

24 Feb 2016 - 10:55 am | वेल्लाभट

अगदी खुशाल. धन्यवाद. :)

भीडस्त's picture

24 Feb 2016 - 10:30 am | भीडस्त

पोएटने महाराष्ट्रीयन पीपलची हायपोक्रसी ईफे़क्टीवली एक्सप्रेस केली असं माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे.

पैसा's picture

24 Feb 2016 - 1:27 pm | पैसा

:)

भीडस्त's picture

24 Feb 2016 - 1:32 pm | भीडस्त

:)

क्रेझी's picture

24 Feb 2016 - 3:59 pm | क्रेझी

+१ :)

वेल्लाभट's picture

24 Feb 2016 - 10:56 am | वेल्लाभट

धन्यवाद सगळ्यांचे

असंका's picture

24 Feb 2016 - 11:09 am | असंका

चांगली जमलीये.

धन्यवाद...
(ही कविता वॉट्सअ‍ॅपवरून येइल हे नक्की. पण आपल्या नावासहित येइल याबाबत जरा साशंक आहे.. )

असंका's picture

28 Feb 2016 - 8:57 am | असंका

काल आली...नाव नाहीच!! काय लोकांना गंमत वाटते श्रेय काढून घेण्यात ?

शान्तिप्रिय's picture

24 Feb 2016 - 11:18 am | शान्तिप्रिय

मस्त कविता

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Feb 2016 - 12:00 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

हे मराठी कलाकारांना सांगा कुणीतरी!
मराठीच्या नावाने गळे काढतात,आणि एकमेकांशी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हिंदीत बोलतात(मी ऐकलयं) आणि लाज नै ते वर मनसेच्या व्यासपीठावर हजेरी लावतात.आणि परत लाज नै ते ↓ या आशयाचे चित्रपट बनवतात.

-मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
-स्वराज्य
-जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा
-अर्जुन
-बाळकडू
-संभा:आजचा छावा

पैसा's picture

24 Feb 2016 - 1:28 pm | पैसा

कविता आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2016 - 1:57 pm | अत्रुप्त आत्मा

कशाला हयगय करतोस मित्रा
भक्ष्य कोण देतंय?
अरे आमचं पोर सायन्स'ला आहे
पैशे सायन्स'(च)च देतंय! (असं आम्हाला वाटतंय. ;) )

To be continued... ;)

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 2:14 pm | तर्राट जोकर

वेल्लाभट दगडं! (आयमीन रॉ़क्स!) :-)

उत्तम कांबळेचं मम्मी ह्या शब्दाचं निरुपण आवडलेलं. आई म्हणजे गावंढळ, मागास, अशिक्षित अशी प्रतिमा असलेली बाई, पण खरोखर तशाच असलेल्या बाईला मम्मी म्हटलं की आपणही जाहिरातीतल्या सुशिक्षित, श्रीमंत, प्रगत, हुच्च मम्म्यांसारखी असल्याचा हुरुप येतो. सांस्कृतीक फरक आहे. पैशाचा प्रभाव भावनांवर, जगण्यावर.

वामन देशमुख's picture

24 Feb 2016 - 4:21 pm | वामन देशमुख

कविता आवडली.

>>राष्ट्रभाषा हिंदी आहे.

हे खरे नाही. दुवा

There is no national language as declared by the Constitution of India.

वेल्लाभट's picture

24 Feb 2016 - 5:34 pm | वेल्लाभट

हो मला माहिती आहे हे.

पण एक तर कवितेसाठी व दुसरं म्हणजे वास्तव परिस्थिती म्हणून असं लिहिलं

सतिश गावडे's picture

25 Feb 2016 - 11:33 pm | सतिश गावडे

आज माझ्या एका किंचित मिपाकर मित्राकडून ही कविता मला व्हाट्सपवर आली. अर्थात त्यात तुमचे नाव नाही. :)

वेल्लाभट's picture

26 Feb 2016 - 12:08 am | वेल्लाभट

ते अपेक्षितच होतं :)

मला पण आज तुमची कविता कसंकाय? वर मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावासकट आहे :)

वेल्लाभट's picture

26 Feb 2016 - 3:19 pm | वेल्लाभट

:) अरेवा ! हे उत्तमच की. :)माहितीबद्दल धन्यवाद :)

बहुगुणी's picture

27 Feb 2016 - 6:35 pm | बहुगुणी

अभिनंदन!

असंका's picture

28 Feb 2016 - 8:56 am | असंका

+१

नाव नाही...

मुक्त विहारि's picture

28 Feb 2016 - 9:56 am | मुक्त विहारि

व्यथा पण समजली.

संजय पाटिल's picture

28 Feb 2016 - 12:00 pm | संजय पाटिल

व्यथा पण समजली.... असेच म्हणतो..