Skip to main content

तर भाषणस्वातंत्र्याच्या या कथेतले ढोंगी कोण ? हंस की बगळा ??

Published on शुक्रवार, 26/02/2016
"एक बदक, एका मोराला 'कबुतर' म्हणाला" असे हंसाने बगळ्याला सांगितले; तर मोराला 'कबुतर' म्हणावयाची चूक कोणी केली? बदकाने का हंसाने ? कोणताही शहाणा माणूस चूक (असलीतर) बदकाची आहे म्हणेल, हंस बगळ्याला जे घडले आहे ते सांगतो आहे पण बगळा हंसाशी उलटा कसा भांडतो बघा बदकाचा संवाद माझ्या समोर कुणी म्हटला हंसाने म्हटला म्हणजे बदक नव्हे तर हंसच दोषी आहे. असा विचीत्र न्याय लावून, आज राज्यसभेत काँग्रेसच्या आनन्द (??) शर्मा (?) नामक नेत्याने कमाल करून दाखविल्याचे येत असलेल्या बातम्यांवरुन दिसते (संदर्भ: एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा २६/२.१६ दुपारी दिडवाजता जसा दिसला) राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरीष्ठ सभागृह आहे. उर्वरीत भारतात आणिबाणी असेल तेव्हासुद्धा संसद सदस्यांचे संसद सभागृहातील म्हणजे लोकसभा अथवा राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य अबाधित असते. संदर्भ (सभागृहाने बनवलेल्या निती नुसार एखादा उल्लेख फारतर कामकाजातून वगळता येऊ शकतो) उद्देश सरळ आहे संसद सदस्यांना त्यांची जी काही बाजू असेल ती कोणत्याही आडकाठी शिवाय मांडता आली पाहीजे. JNU मध्ये पौराणिक देवता दुर्गेच्या महिषासूरमर्दीनी रुपाचा काही विद्यार्थ्यांकडून अनमान केला जात होता असा उल्लेख राज्यसभेत मंत्रि स्मृती इराणींनी घेतला. JNUच्या 'त्या' डॉकुमेंटात जे काही आहे ते राज्यसभेत स्मृती इराणींनी वाचून दाखवले. एनडीटीव्ही डॉटकॉमवर बातमीतील ७वा मुद्दा बरोबर असेल तर आता हे आनंद शर्मा तुम्ही राज्यसभेत वाचूनच कसे दाखवले म्हणून स्मृती इराणींच्या नावाने गहबज करत आहेत. म्हणजे त्यांना (की काँग्रेसला ?) राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य मान्य नाही, JNUती विद्यार्थ्यांनी भाषणस्वातंत्र्याचा अनावश्यक वापर केला तो मात्र मान्य आहे असा हा विचीत्र न्याय आहे. राज्यसभेतील भाषण स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे ते हिरावून घेणे कुणाच्याही बसची बात नाही पण असे विचीत्र बादरायण संबंध दाखवून सर्वसामान्य जनतेला येडा का खुळा नेमके काय समजण्याचा प्रयत्न हि मंडळी करत आहेत ? संसदेच्या ज्येष्ठ सभागृहात काहीतरी गुणात्मक चर्चा कराना देशाचा पैसा का वाया घालवतात ते आकलना पलिकडे आहे.

वाचन संख्या 4389
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

त्यापुढचा प्रकार ऐका. तृणमूल काँग्रेसने दुर्गादेवीचा स्मृतीने अपमान केला असे काहीतरी स्टेटमेंट दिले आहे. कपाळाला हात लावण्यापलिकडे आपण काय करणार? लोक हल्ली भाषणानेच खूश होतात असे काहीतरी काल वाचले, पण स्मृती इराणीच्याइतकी चंगली मुद्देसूद भाषणे पण ऐकायला मिळत नाहीत हो आजकाल! कैच्या कै बोलतात आनंद शर्मासारखे लोक.

In reply to by पैसा

महात्मा गांधींची काँग्रेस गुंडाळण्याची इच्छा होती कदाचित बरोबर होती का काय वाटते, सत्तेत खूपवर्षे राहीले की फक्त 'लिप सर्वीस' (लिप सर्वीस साठी समर्पक मराठी शब्द हवा आहे) देऊन हुजरेगिरी करणार्‍यांची फौज जमा होते. तर्कसुसंगत नसलेले तात्पुरते खपवता येते पण लाँगटर्म मध्ये लोकांच्या लक्षात येते. ज्या ज्या काँग्रेस समर्थकांचे काँग्रेसवर प्रेम आहे त्यांनी दुसर्‍या पक्षांचे दाखले न देता स्वपक्षातील घराणे शाहीचा नायनाट केला पाहीजे, शंभर कोटी लोकातून सव्वाशे वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसला घराण्या बाहेरचा क्रेडीबल बोलणारा नेता मिळू शकत नाही ? दुसरे अनुनयवाद बंद करून जो काही सेक्युलॅरीझम आणावा, ढोंगी पणामुळे खरा सेक्युलॅरीझमचे नुकसान होते हे जमिनीवरचा काँग्रेस समर्थक लक्षात घेऊन ढोंग्याना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवेल तेव्हाच हे शक्य होईल अन्यथा आज ना उद्या गांधीजी आणि नमोंची इच्छा पुर्ण झाल्यास आश्चर्य नाही.

In reply to by माहितगार

ही काँग्रेस महात्मा गांधींची किंवा for that matter जवाहरलाल नेहरुंची पण नाहीये. १९६९ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडली. तेव्हा काँग्रेसचं जुनं गायवासरू हे चिन्हही त्यांना सोडावं लागलं आणि हात हे नवीन चिन्ह घ्यावं लागलं. त्यामुळे ही काँग्रेस स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारी काँग्रेस नव्हे. ही इंदिरा काँग्रेस आहे. INC मध्ये I हा इंदिरा म्हणून आलेला आहे. देवकांत बरुआ नामक महान सत्पुरूषाने Indira is India and India is Indira हे म्हणून त्यावर शिक्कामोर्तब पण केलं होतं. आता काँग्रेस जरी स्वतःला Indian National Congress म्हणवत असली तरी हा इतिहास ते लपवू शकत नाहीत. जसे ते भाजपला गोध्रा आणि बाबरीची आठवण देत असतात, तशीच आठवण त्यांनाही त्यांच्या अशा कृत्यांबद्दल द्यायला पाहिजे.

In reply to by बोका-ए-आझम

थोडी सुधारणा - १९६९ साली काँग्रेस फुटल्यावर मोरारजी देसाई इ. नी बाहेर पडून संघटना काँग्रेस नावाचा नवीन पक्ष काढला. जुन्या काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी असे होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला जुने चिन्ह गोठविल्यामुळे गायवासरू हे नवीन चिन्ह मिळाले. १९७८ साली ती काँग्रेस देखील फुटली. त्याचा एक तुकडा ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राहिला (यालाचा चड्डी कॉंग्रेस असे म्हटले गेले) व दुसरा तुकडा इंदिरा कॉंग्रेस या नावाने अस्तित्वात आला. या पक्षाला हात हे चिन्ह मिळाले.

In reply to by बोका-ए-आझम

१९७७ मधील पराभवाची जबाबदारी घेऊन इंदिरा गांंधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे अशी चव्हाण, रेड्डी इ. ची मागणी होती. इंदिरा गांधींनी अध्यक्षपद सोडायला नकार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. असे बोलले जाते की जनता पक्षाने (म्हणजे त्यातील मोरारजी देसाईंच्या संघटना काँग्रेस म्हणजे पूर्वीच्या कॉंग्रेसमधील सिंडिकेट गटाने) यशवंतराव चव्हाणांना जनता पक्षात यायची ऑफर दिली होती व त्या बदल्यात त्यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर होती. इंदिरा गांधींच्या हुकुमशाही वर्तनामुळे नाराज असलेल्यांनी व सत्तेपासून दूर राहण्याची सवय नसलेल्यांनी काँग्रेस फोडली. नंतर हाच चव्हाण गट जनता पक्षाच्या फुटीनंतर जगजीवनरामांबरोबर युती करून त्यांनी ३ आठवडे सत्ता भोगली होती. त्यात यशवंतराव चव्हाणांकडे औटघटकेचे उपपंतप्रधानपद आले होते. बेसिकली जनता पक्षातील जनसंघाच्या ९० खासदारांना दूर करून त्यांच्या बदल्यात काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण गटाचा पाठिंबा मिळविणे हे जनता पक्षातील समाजवादी व संघटना काँग्रेसवाल्यांचे स्वप्न होते. पण इंदिरा गांधींनी चातुर्याने दोघांचीही शिकार केली.

भाजपाकडे बोट दाखवुन त्यांना उगाच बळीचा बकरा बनवण्याचे काम चालु आहे हेच यातुन सिद्ध होते. शिवाय धर्माच्या नावाने अभद्र बोलणारे भलतेच असुनही भाजपा नेत्याला धर्माच्या नावाखाली बळीचा बकरा बनवला जात आहे. स्मृती इराणी एक महिला असल्याने त्या सॉफ्ट टारगेत आहेत असे समजुन आनंद शर्मा हा जो किळसवाणा प्रकार करत आहेत त्यात स्त्री शक्तीला कमी लेखण्याची चुक ते करत आहेत अस्से दिसते. स्मृती इराणींसारख्या एका कलावंताला तुच्छ ठरवण्याचा कट यामागे शिजतो आहे काय?

In reply to by मृत्युन्जय

स्मृती इराणींसारख्या एका कलावंताला तुच्छ ठरवण्याचा कट यामागे शिजतो आहे काय? फॅसीझमचे व्यवच्छेदक लक्षण नंबर ११

In reply to by मृत्युन्जय

उगाच हळहळु नका भाजपसाठी. सारे पक्ष एकाच माळेचे मनी.भाजपा धर्माच राजकारण करतो, कोन्ग्रेस धर्मनिरपेक्षतेचे तर इतर पक्ष जातिचे.खरे बळीचे बकरे आपण आहोत.बजेटमध्ये किती कापतायत बघायच.

स्वतःला मुलनिवासी समजणारे दुर्गादेवीचा अपमान झाला म्हणून चडफडत आहेत,नवल वाटत आहे. प्रतिवाद करायला मुद्दे नसले कि अशी थेरं सुचतात.

In reply to by चेक आणि मेट

भारतीय देवता काळ्यावर्णाचे असले तरी पुजा करतात त्यात कृष्णही आहे आणि भारतभर काली म्हणून ओळखली जाणारी देवी महाराष्ट्रात काली आणि काळूबाई या दोन्ही नावांनी पुजा केली जाते. युरोपियन स्वरुपाचा वर्णवाद भारतात राहीलेला नाही. चुकीची दिशाभूल करणे नकारात्मक प्रचार हे उलटत असतात हे विद्यापीठातील लोकांना समजू नये म्हणजे प्राध्यापकांचे प्राध्यापक कोण होते त्यांच्या डिग्र्या रद्द करावयास हव्यात ;)

ते पत्र वाचून दाखविण्याआधी स्मृती इराणी यांनी असे विधान केले होते की May my god forgive me for reading this". खांग्रेसी आणि डाव्यांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघडकीला आणण्यासाठी आपल्याला नाईलाजाने हे वाचून दाखवावे लागत आहे या भावनेतून आधी देवाची क्षमा मागून मग ते पत्र त्यांनी वाचून दाखविले. अशा वेळी ते वाचून दाखविल्याबद्दल त्यांनाच माफी मागायला सांगणे म्हणजे खांग्रेसींच्या उलट्या निधर्मी बोंबा!

In reply to by बोका-ए-आझम

किमान स्वरुपाची तर्कसुसंगतता शिकविली नसेल तर, त्यांच्या नेत्यांच्या प्राध्यापकांचे प्राध्यापकांच्या डिग्रा रद्द करावयास हव्यात.

In reply to by बोका-ए-आझम

त्याच्या आधी मला राहुल गांधीच्या सल्लागाराचे नांव हवे आहे. ..तो सल्लागार राम माधव किंवा सुब्रमण्यम स्वामींचा नातेवाईक असावा अशी दाट शंका आहे.

In reply to by मोदक

राहुलबाबाला आणि पक्ष श्रेष्ठींना सज्जड दम दिलाय की आम्ही रा गांचे सल्लागार असल्याचे कुणालाही सांगू नका !!! (फटके काय फक्त बाहेरूनच पडतात ????)

त्यांचा मुद्दा काहीसा असा आहे कि अन्य धर्मांच्या देव / प्रेषित यांबद्दल देखील असे अपमानास्पद उल्लेख झालेले आहेत, पण त्या गोष्टीचा उल्लेख संसदेत झाला नव्हता. अशा गोष्टी संसदेत आणणे / उल्लेखणे योग्य नाही. पण हा मुद्दा सोयीस्करपणे विसरला जातोय कि पत्रकात महिषासुराला दलित वर्गाचा (नेटिव) प्रतिनिधी व दुर्गा देवीला सवर्णांचा (आर्य) प्रतीनिधी "दाखवून" सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि ते पत्रक वाचण्याचा हाही उद्देश आहे, केवळ हे लोक देवी देवतांचा अपमान कसा करतात हे दाखवणे नाही.

In reply to by sagarpdy

त्या गोष्टीचा उल्लेख संसदेत झाला नव्हता.
ती भाषणबाजी वाचूनच हा धागा लेख लिहिला. भारतातील भाषण स्वातंत्र्याचे सर्वोच्चपिठ भारतीय संसद आहे आणि भारतीय संसदेतील भाषण स्वातंत्र्य अमर्यादीत असणे अभिप्रेत आहे आणि आनंद शर्मा नेमकी उलटी भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करून भारतीय संसदेच्या सर्वोच्च स्थानाला धक्का पोहोचवताहेत, वृत्तात दिसते आहे तसे त्यांनी विधान केले असेल तर भारतीय राज्यघटनेचे आणि संसदीय महत्वाचे प्रॅक्टीकली नुकसान करत आहेत.

हल्ली हेच राजकारण चाललेय आनंद शर्मा हे सरळ सरळ स्मृती इराणींच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनाच गोत्यात आणत आहेत. मागेही मोदींना नितीश, लालू जोडगळीने बिहार निवडणुकीत DNA च्या विधानावरून असेच गोत्यात आणले होते. मोदी खर तर दुसर्या अर्थाने बोलले पण त्या अर्थाचा अनर्थ करण्याचे काम नितीश, लालू जोडगळीने केले. मोदिसारखा कसलेल्या नेत्यालाही नंतर मी दलित आहे असे विधान करावे लागले होते.मोदींना अक्षरशः त्यांची काहीही चुकी नसताना backfoot वर ढकलून देण्यात आले होते. हल्लीच्या राजकारणात कोण कोणाला कसा शब्दात पकडतो त्यावर सारे अवलंबून असते.

कँटिन मध्ये कुठले तरि चिंधि न्युज चॅनेल सुरु होते आत्ता तर त्यावर बातमि अशि कि ''कुठलातरि समाज आता महिषासुर शहादत दिन साजरा करणार आहे'' महिषासुर त्यांच्या समाजाचा होता आणि तो त्यांचा हिरो होता. आता आरतित महिषासुर मर्दिनि म्हणताना विचार कराल. जाम धुरळा उडवुन दिलाय च्यामारि, मोदि फुल्ल मेजॉरिटि ने सत्तेत काय आले लोक आता पौराणिक राक्षसांना सुद्धा हिरो म्हणतायत.

अहो, ते आधिपासुनच आहे.ब्राम्हणी समाजव्यवस्थेने आपल्यावर हे सर्व थोपले.आदर्श राजांना असुर म्हणुन हिणवले.असे बरेच जण मत मांडतात.मि कधी असल्या ग्रुपमध्ये असलो कि गंमत बघत बसतो.

रावणावर महात्मा रावण पुस्तक आहे. बळी, महिषासुर यांचीही गौरवपर पुस्तके आहेत, हिरण्यकश्यपुचेही गुणगाण आहे. मोदी यायच्या आधिपासुन अशा विचारधारा आहेत

In reply to by प्रतापराव

ब्राम्हणी समाजव्यवस्थेने आपल्यावर हे सर्व थोपले.आदर्श राजांना असुर म्हणुन हिणवले. रावणावर महात्मा रावण पुस्तक आहे. बळी, महिषासुर यांचीही गौरवपर पुस्तके आहेत, हिरण्यकश्यपुचेही गुणगाण आहे. मोदी यायच्या आधिपासुन अशा विचारधारा आहेत अहो पण मुळात रावण ब्राह्मण होता आणि अटलबिहारी वाजपेयी ज्या वंशाचे आहेत (कान्यकुब्जवंशीय कनौजी ब्राह्मण) ते लोक नियमीतपणे रावणाची पुजा करतात. :))

अहो ते वाचले आहे मी तुम्हाला फक्त चर्चेची गंमत सांगितली हाच प्रश्न मि चर्चेत विचारला तर एकाने उत्तर दिले राक्षसही होता नि ब्राम्हणही होता हे कसे शक्य आहे?माझा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि मी कुठल्याही विचारसरणीच्या बाजुनेही नसतो आणि विरोधातही नसतो.फक्त गंमत बघायची. धर्म, पुराणे ह्या काल्पनिक गोष्टिंवरुन होणारे वाद पाहुन मनोरंजन होते.

In reply to by प्रतापराव

मी कुठल्याही विचारसरणीच्या बाजुनेही नसतो आणि विरोधातही नसतो.
चला आमच्यासारखे मिपावर कुणि भेटले बरे वाटले.

In reply to by प्रतापराव

मनोरंजन होते हे खरे पण या वादांचा वापर समाजात दरी निर्माण करण्यास वा वाढवण्यास होत असेल तर "चर्चेची गम्मत" वा "फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन" म्हणून पाहत बसायचे का ?

In reply to by sagarpdy

मुळात हे वादच मनोरंजक असतात.आता आपल्याला आपले पणजोबा माहित नसतात तर हजारो वर्षापुर्वि झालेल्या किंवा न झालेल्या व्यक्तिमत्वांसाठी कोण डोक्याला त्रास करून घेणार. त्यापेक्षा मस्तपैकि भांडण एन्जोय करतो.अति झाल कि सरळ आपले पुस्तक वाचायचे नाहितर गाणि एकायची.