Skip to main content

स्यूडो सेक्यूलर्स अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 25/02/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच. सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही. १. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा. २. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात. ३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा. ४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला. ५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्‍या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्‍यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला. ६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले. ८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली. ९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात. १०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.

वाचने 32188
प्रतिक्रिया 200

प्रतिक्रिया

लेख अतिशय आवडला. माझ्या लेखामुळे मिपावरचा विचारसागर ढवळून निघाला आणि त्यातून ही दहा मोत्ये बाहेर आली त्यामुळे अभिमानही वाटला. नीट मोजणी केली तर दहाऐवजी खरीतर दोनतीनच मोत्ये सापडतील, कारण तेच तेच मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत, असं काही जण म्हणतील पण 'आम खावेत की, पेड कशाला गिनावेत?' असं मी म्हणेन. हा धागाही हजारी होवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

In reply to by राजेश घासकडवी

हा हा हा. मी गुर्जींच्या मूळ लेखाशी सहमत नाही. पण हे विंडंबन अगदीच टुकार आहे.

सणसणीत चपराक बरोबर लागली... दिसतेय... म्हणून तर चडफडाट... हिंदु धर्माविषयी घाणेरडी भावना बाळगणार्याना चांगलीच वाजवलीत गुरूजी... बघा तर कसे तडफडताहेत...

जोशुआ रिडल यांच्या संस्थळावरील आणि जॉन हॉकीन्स यांनी लिहीलेले "The 12 Unspoken Rules For Being A Liberal" वाचनीय, चिंतनीय आणि मननीय आहेत. (टिपः ह्या दोन्ही व्यक्ती मला कोण आहेत माहीत नाही. पण जरा इंग्रजी नावे असल्याने, बरे वाटले. शिवाय हॉकीन्स हे डॉकीन्सशी साधर्म्य असलेले आहे. म्हणून म्हणलं, ते बहुदा बरोबरच बोलत असावेत.)

The 12 Unspoken Rules For Being A Liberal

12 unspoken.. तुर्तास इंग्रजीतच देतो 1) You justify your beliefs about yourself by your status as a liberal, not your deeds. 2) You exempt yourself from your attacks on America 3) What liberals like should be mandatory and what they don't like should be banned 4) The past is always inferior to the present 5) Liberalism is a jealous god and no other God may come before it 6) Liberals believe in indiscriminateness for thought 7) Intentions are much more important than results 8) The only real sins are helping conservatism or harming liberalism 9) All solutions must be government-oriented 10) You must be absolutely close minded 11) Feelings are more important than logic 12) Tribal affiliation is more important than individual action असो.

In reply to by तर्राट जोकर

थोडे मिरर केलं तर कम्युनल थिंकिंग काही वेगळी असते असे नाही वाटत. थोडं कशाला अगदी १००% नाहीतर २००% करा की! कम्युनल थिंकींगला आदर्श कोण म्हणतयं इथं? पण जर तुम्ही आमच्यासारखे विचार करणारे नसाल तर तुम्ही कम्युनल असे म्हणणे योग्य आहे का? भाषणस्वातंत्र्याची भाषा करायची आणि स्मृती इराणी बोलायला लागल्या की राज्यसभा बंद पाडायची! मला सांगा यात कम्युनल कोण आहे? थोडक्यात कम्युनल हे लेबल अतिरेकी विचारसरणीच्या कंपूला लावायचे ठरवले तर दुर्दैवाने ते सध्या भारतात स्वयंघोषित लिबरल्सना आणि त्यांना भुलणार्‍यांना लावावे लागेल असे वाटते.

In reply to by विकास

पार गोल गोल फिरवता विकासराव. गरज नै ब्वा. वरल्या १२ लक्षणाच्या विरूद्ध कोणती लक्षणं आहेत आणि ती कुठल्या विचारसरणीत, पक्षात, समुदायात आढळतात ते सांगा. तुमच्यामते आदर्श विचारसरणी बाळगणारे पक्ष, समुदाय, लोक कोणते?

In reply to by तर्राट जोकर

माझ्या मते आदर्श हे एक ध्येय असते. ते देखील असे असायला हवे जे गाठण्या पेक्षा त्या मार्गावर सतत पुढे जाणारेच मिळायला हवेत. गणिती भाषेत बोलायचे तर asymptotic अथवा asymptote सारखे - ever approaches but never reaches. :) नाहीतर एकदा ध्येय मिळाले की मग काय, "थांबला तो संपला" होते. आता अशा मार्गावर कोण आहेत या पेक्षा कोण नाहीत हे नक्की सांगू शकतो - भारतीय डावे म्हणजे समाजवादी-कम्युनिस्ट. त्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही. मार्गावर असण्याचा विचार केलात तर भाजपा किमान वरकरणी तर आहे असे वाटते. पण या सरकारची किमान साडेचार वर्षे पूर्ण होऊंदेत. तो पर्यंत ज्या काही सकारात्मक गोष्टी चाललेल्या आहेत त्या होण्यात आणि तशा होण्यातल्या वेगात वाढ झाली तर म्हणेन की ते वाटले तसेच या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. नाहीतर मार्गावर नुसतेच बोलण्यापुरते आहेत... गांधी घराणे वजा करून उद्या काँग्रेस सत्तेवर आली तर कदाचीत काँग्रेस देखील त्यांच्या विचारसरणीने काहीतरी आदर्श मार्गावर जाण्याचा प्रयत्न करू शकेल असे वाटते. पण आत्ताच्या परीस्थितीत एकूण सगळे (काँग्रेस साठी) अवघडच आहे असे वाटते... आज प्रभु यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करत असताना गौतम बुध्दाचे एक वाक्य सांगितले ते या संदर्भात सांगतो: "whenever one contemplates a journey, there are two mistakes one can make: not starting and not going all the way. "We have already started the journey and I intend to go all the way and we will not rest till we take Bhartiya Rail to a destination called samridhi or success," त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला (तुम्हाला-मला) पटोत अथवा न पटोत, पण आज हे सरकार किमान स्वस्थ बसून आहे असे वाटत नाही. आता ते किती पुढे जाणार ते पहावे लागेल.

In reply to by विकास

प्रतिसाद विचारलेल्या मुद्द्यावर नाही. इथे विद्यमान सरकारचे गुणगान अपेक्षित नाही. उपरोक्त बारा लक्षणे मी जर कम्युनिस्ट असेल तर मला संघात दिसतील, भाजपेयी असेल काँग्रेसमधे दिसतील, काँग्रेसी असेल तर तेच, भाजपात दिसतील. एखाद्या पक्षीय विचारसरणीविरूद्ध आपले व्यवच्छेदक रुप उभे करायचे तर आपण कसे चांगले, ते कसे वाईट हे करावेच लागते. तुम्ही दिलेली उपरोक्त लक्षणे जर त्याचाच प्रयत्न असेल तर त्याला प्रोपागंडाशिवाय अधिक महत्त्व का द्यावे? आदर्श कोण नाही हे सांगू शकतो, म्हणजेच आदर्श कोणीतरी असलेच पाहिजे. आदर्श असे काही बेन्चमार्क नसेल तर आदर्श ही एक इम्प्रॅक्टिकल, रोम्यांटीक आयडीया आहे असे समजले पाहिजे. मग आम्ही त्यांच्यापेक्षा जरा जास्त आदर्श, ते आमच्यापेक्षा कमी ह्याला अर्थच नाही. प्रत्येक पक्ष इथे दुसर्‍याचे तोंड काळे कसे हेच दाखवत असेल तर अशा कुठल्याही लक्षणांना काहीच आधार नाही. ती सगळी सारखीच आहेत. नथिंग व्यवच्छेदक अ‍ॅज घासुगुर्जी सेड.

In reply to by तर्राट जोकर

इथे विद्यमान सरकारचे गुणगान अपेक्षित नाही. मला तसे म्हणायचेच नाही. इथल्या विषयाला धरून उदाहरण दिले. आदर्श असे काही बेन्चमार्क नसेल तर आदर्श ही एक इम्प्रॅक्टिकल, रोम्यांटीक आयडीया आहे असे समजले पाहिजे. मग आम्ही त्यांच्यापेक्षा जरा जास्त आदर्श, ते आमच्यापेक्षा कमी ह्याला अर्थच नाही. असहमत. आदर्श हा बेंचमार्क/ध्येय/डेस्टीनेशन आहेच, असायलाच हवे, असेच वर म्हणले आहे. पण ते इतके अवघड असायला हवे की त्यामार्गावर जात असताना सतत काहीतरी चांगले करतच जावे लागेल. उदा. "कृण्वन्तो विश्वम आर्यम" म्हणजे "We will make the world noble" असे उद्दीष्ट ठेवले तर ते म्हणले तर एका काय सात जन्मात पुर्ण करायचे असले तरी अवघड आहे. पण त्या दिशेने जाण्यासाठी वन अ‍ॅट ए टाईम काम करणे, आणि माईलस्टोन ठेवणे, अवघड नसते. पण तशी इच्छा लागते. ते आमच्यापेक्षा कमी ह्याला अर्थच नाही. तसे कोणी बोलले तर चूकच असते अर्थात राजकीय सत्तास्पर्धेच्या पक्षि: निवडणुकांच्या काळात आणि "काही अंशीच" राजकारणात त्याला सूट द्यावी असे वाटते. आता त्या त्या क्षणाला आदर्श नसलेली आणि असलेली एक-दोन उदाहरणे देतो...(मुद्दामून यात भाजपा आणि संघाची नाहीत, पण हवी असली तर अनेक आदर्श उदाहरणे देऊ शकेन. ) बॉस्टनच्या एम आय टी मधे एकेकाळी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे फेमिनिस्ट-कम्युनिस्ट गौरी चौधरी नामक व्यक्ती आली होती. ती अमेरीकेत न्युयॉर्कला कुठल्यातरी कार्यक्रमासाठी आली होती. प्रत्यक्ष होते का माहीत नाही पण भारतीय एन जी ओ कडून आलेली असल्याने सरकारी पैशाने आली होती. पण असल्या लोकांना एकदा बॉस्टनला ते पण हार्वर्ड-एम आय टीत जाऊन आल्यानंतर सार्थक वाटते. एम आय टी मधील भारतीय लेफ्टीस्ट मुलांनी (हे भांडवलशाही अमेरीकेत काय करत होते ते विचारू नका!) तीचा कार्यक्रम ठेवला. भाषण कशावर ठोकले? काश्मीरमधे मुसलमानांवर कसा अत्याचार होतोय आणि त्यामुळे काश्मीर देऊन टाकणे कसे योग्य आहे! - आदर्श काल ज्या खासदाराची स्मृती इराणींनी बिनपाण्याने केली, ते बॉस्टनच्या टफ्ट्स आणि हार्वर्ड विद्यापिठात प्राध्यापक होते. (मला वाटते अजूनही अर्थातच संलग्न आहेत. भारतात जमले नाही तर काय घ्या!) . परत स्थळ एम आय टी. विषय रामजन्मभूमी... मला त्या आणि इतरही कुठल्या प्रकरणात कोणाचे विरुद्ध मत असण्यास हरकत नाही. विषयाला धरून बोलले म्हणून काहीच बिघडत नाही. पण हे महाशय काय बोलले असावेत? - (आठवणीतून) - कसला हा हिंदू धर्म, एक राम बायकोला सोडतो आणि दुसरा (परशू)राम आईला मारतो! मला सांगा, भले तुम्ही नास्तिक असाल, तरी ते योग्य आहे का? याच माणसाने शिवाजीच्या काळावर एका student कडून संशोधन करवून घेतले - त्याकाळातल्या जातीपद्धतीवर - विचार आणि उद्देश आदर्श आहेत का? राव पंतप्रधान असताना त्यांना पोखरण#२ करता आले नाही कारण अमेरीकन स्पाय उपग्रहांच्या ते लक्षात आले होते. हार्वर्डला राव आले तेंव्हा अनेक प्रश्न विचारले. त्यात त्यांनी केलेल नॉन प्रॉलीफिरेशन ट्रीटीवर सही न करण्याचे जे उत्तर दिले ते खूप चपखल होते. सगळ्यांना संयमीतपणे गप्प केले. - आदर्श मनमोहन सिंग यांनी मोदींना व्हिसा नाकारण्यावरून अमेरीकेचा वकीलातीतर्फे अधिकृत निषेध केला होता - आदर्श (बाहेर असताना वयंपचाधिकं शतम) कधीकाळी मृणाल गोरे, अहील्या रांगणेकर आदी डाव्या बाजूच्या महीलांनी केलेली सामाजीक कामे - आदर्श नंतर याच मृणाल गोरे पवारांना कंस काय म्हणतात आणि ते त्यांना पुतना काय म्हणतात - आदर्श पोरकट! मधू दंडवत्यांबद्दल मला खूप आदर होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. पण, "मुसलमान हे हिंदूंपेक्षा भारताशी अधिक इमान राखतात, कारण मेल्यानंतरही मातीत रहातात" हे असले विधान आणि त्यामुळे नकळत नकोत्या वैचारीक विभाजनाला खतपाणी घालणे - आदर्श ridiculous वनवासी/आदीवासी भागात काम करून त्यांना हालअपेष्टांमधून बाहेर काढण्याऐवजी, त्यांच्यात आहे तसेच राहायला लावून असंतोष पसरवत नक्षलवाद पसरवणे आदर्श अक्षम्य! असो.

In reply to by विकास

विस्तृत उत्तरासाठी व किश्शांसाठी धन्यवाद! मूळ मुद्द्याशी संबंधीत हा परिच्छेद घेतो. आदर्श हा बेंचमार्क/ध्येय/डेस्टीनेशन आहेच, असायलाच हवे, असेच वर म्हणले आहे. >> आदर्श काय आहे हेच ठरलेले नाही तर ते बेंचमार्क/ध्येय/डेस्टीनेशन कसे असेल? ध्येय म्हटले तरी ते स्पष्ट असायला हवे. भले पोचणे, मिळवणे अवघड असु देत. पण त्याची संकल्पना स्पष्ट हवी. कुठे जायचे, काय करायचे, कशासाठी करायचे ते नक्की हवे की नको? आदर्शांची अशी स्पष्ट संकल्पना प्रत्येकाची वेगळी असेल आणि दुसर्‍याला ती आदर्श नसेल वाटत तर...? पण ते इतके अवघड असायला हवे की त्यामार्गावर जात असताना सतत काहीतरी चांगले करतच जावे लागेल. >> चांगले कार्य ह्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. पाणीटंचाईवर एखाद्या पक्षाला धरणे बांधणे, कालवे काढणे चांगला मार्ग वाटु शकतो, दुसर्‍याला जलयुक्त शिवार, पाण्याचे नियोजन हा मार्ग चांगला वाटू शकतो. अंतिम ध्येय जर जनतेचे भलेच आहे तर चांगले कार्य कसे ठरवायचे? एरवीही मला हा प्रश्न पडतो, जर सर्वच पक्षांना जनतेचे भलेच करायचे आहे तर इतके पक्ष कशाला हवेत? अर्थात त्याचे उत्तर वेगळे आहे, तो इथे विषयही नाही. उदा. "कृण्वन्तो विश्वम आर्यम" म्हणजे "We will make the world noble" असे उद्दीष्ट ठेवले तर ते म्हणले तर एका काय सात जन्मात पुर्ण करायचे असले तरी अवघड आहे. पण त्या दिशेने जाण्यासाठी वन अ‍ॅट ए टाईम काम करणे, आणि माईलस्टोन ठेवणे, अवघड नसते. पण तशी इच्छा लागते. >> आदर्शांची व्याख्या करतांना प्रश्न इच्छेचा नाही तर मार्गांचा आहे. कुठल्याच प्रकारच्या राज्यव्यवस्थेत सगळ्यांना सर्वकाळ, सर्वोच्च, सर्वंकष समाधान देईल अशी सोय असूच शकत नाही. एका समुदायाने स्विकारलेली व्यवस्था हा त्याच्या समोरचा त्याला वाटणारा आदर्श पर्याय असतो. तो कोणत्या तरी दुसर्‍या पर्यायाला कम-आदर्श ठरवून स्विकारलेला असतो. सगळे पर्याय "कृण्वन्तो विश्वम आर्यम" कडेच जाणारे आहेत, कारण इच्छा. त्यातल्या त्यात कोणता तत्क्षणी आदर्श वाटतो तो स्विकारला जातो. अपेक्षित ध्येयाकडे मार्गक्रमण होत नाही हे लक्षात येताच परत पर्यायांची चाचपणी सुरु होऊन त्यातल्या त्यात आदर्श पर्याय निवडला जातो. आता काही उदाहरणे (मुद्दाम भाजपची घेतली आहेत): १. भाववाढविरोधी आंदोलने भाजपाने युपिये काळात केली. पण तशी आंदोलने आताच्या सरकारविरुद्ध झालीत तर ती आदर्श वाटतील का? २. विद्यमान पंतप्रधान परदेशात जाऊन 'आधी तुम्हाला भारतीय म्हणवून घेण्यात शरम वाटत होती, पण आता गर्व वाटतो आमचे सरकार आल्यापासून' हे वक्तव्य आदर्श वाटते का? (बाहेर असताना वयंपचाधिकं शतम चे काय झालं?) ३. ज्या स्मृती इराणींच तुम्ही कौतुक केलं त्यांनी महिषासुराचे पूजन करणार्‍या समुदायांच्या हक्कांचा दुसर्‍या समुदायांच्या हक्कांचा दाखला देऊन संकोच केला. ते आदर्श वाटते का? ४. "जर भाजप बिहारमध्ये हरला तर पाकिस्तानात फटाके फुटतील" असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा म्हणतात तेव्हा ते जाणून-बुजून, कळून सवरुन वैचारिक विभाजनाला खतपाणी घालत नाहीत असे वाटते का? विचारसरणींचे फरक ठळकपणे दाखवण्यासाठी ह्या बारा लक्षणांच्या गमतीजमती केल्या जातात असा दावा असला तरी त्या दुसर्याला आपल्यापेक्षा कम-अस्सल, चुकीचे दाखवण्यसाठी केल्या जाणारा प्रोपगंडा आहे. ज्यांना आपली विचारसरणी परिपूर्ण वाटते ते इतरांची कशी कम-अस्सल, बिन-आदर्श हे दाखवत नाहीत. पण अशी विचारसरणी युटोपिया आहे. तुम्ही दुय्यम मानत असलेल्या विचारसरणीविरूद्ध पर्याय काय म्हटले की स्पष्ट समाधानकारक उत्तरं नसतात. शब्दांची फिरवाफिरवी, भुलभुलैय्या, और क्या, और क्या! खालच्या लिन्कवर लिबरल विरुद्ध कन्झर्वेटीव यांचे फरक स्पष्ट करा छान दिलंय. https://www.studentnewsdaily.com/conservative-vs-liberal-beliefs/ असो.

In reply to by तर्राट जोकर

आदर्शांची अशी स्पष्ट संकल्पना प्रत्येकाची वेगळी असेल आणि दुसर्‍याला ती आदर्श नसेल वाटत तर...? तसे होतेच आणि लोकशाहीत तर नक्कीच होते. अमेरीकेत तर कायम होते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण देशाचे तुकडे होणार नाहीत ना, अस्थिरता येणार नाही ना हे पहाणे महत्वाचे असते. रिपब्लीकन्स आणि डेमोक्रॅट्स हे धोरणांच्या बाबतीत टोकाचे असतील, पण जेंव्हा राष्ट्रीय सुऱक्षेचा मुद्दा येतो तेंव्हा टोप्या एकत्र पडतात. व्यक्तीगत काही वेगळे जाऊ शकतील. उदाहरणच घेयचे झाले तर ९/११ नंतरच्या इराक युद्धाचे घेता येईल. सर्व एकत्र आले. भले ओबामाने सिनेटर म्हणून विरोध केला असेल पण एकदा का राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्याच्या इतके द्रोण आणि इतर पध्दतीने हल्ले उजव्या विचारसरणीच्या नेत्याने पण केले नसतील असे म्हणावे लागेल. तेच इंमिग्रंट्सच्या बाबतीत. त्याच्या काळात सर्वाधिकांना हद्दपार केले गेले आहे. पर्यावरणाच्या बाबतीत निर्णय रिपब्लिकन्सपेक्षा एकदम वेगळे दिसतील. पण बाहेरच्या राष्ट्रांशी व्यापार करताना राष्ट्रीय स्वार्थच पाहीला जातो. तसे जेंव्हा आपल्याकडे होईल तेंव्हा बरेच वेगळे दृश्य दिसेल. तुम्ही दिलेल्या उदाहरणाबाबत माझी उत्तरे: भाववाढविरोधी आंदोलने भाजपाने युपिये काळात केली. पण तशी आंदोलने आताच्या सरकारविरुद्ध झालीत तर ती आदर्श वाटतील का? भाववाढच का अजूनही योग्य आणि खरे कारण असले तर आंदोलने आवश्य करावीत. पण दुर्दैवाने काँग्रेस, डावे आणि माध्यमे त्यापेक्षा सोपा मार्ग अवलंबवत आहेतः खोटेनाटे पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे... ते मात्र अक्षम्य आहे. विद्यमान पंतप्रधान परदेशात जाऊन 'आधी तुम्हाला भारतीय म्हणवून घेण्यात शरम वाटत होती, पण आता गर्व वाटतो आमचे सरकार आल्यापासून' हे वक्तव्य आदर्श वाटते का? (बाहेर असताना वयंपचाधिकं शतम चे काय झालं?) विद्यमान पंतप्रधान हे परदेशात भारतीयांच्या घोळक्यात जे काय म्हणले ते म्हणले. ते काही परदेशी नेत्यांशी अथवा पत्रकारांशी बोलताना असे बोललेले नाहीत. त्या उलट मोदींना (मला वाटते पंतप्रधान झाल्यावरही) व्हिसा नाकारावात म्हणून काँग्रेस आणि डाव्या खासदारांनी ओबामाला लिहिलेले पत्राबद्दल काय वाटते असे विचारले असते तर योग्य झाले असते. मोदींचा केवळ एनआरआय वाला कार्यक्रम पाहीला आहे. त्याव्यतिरीक्त जर ते बाहेर बोलले असले तर ते योग्य नाही. पण तसे तुम्हाला माहीत असले तर सांगा. माझ्यामाहितीत तरी तसे नाही. भाजपाच्या काही नेत्यांचा नुसताच जाहीर (म्हणजे देशी-परदेशी सर्व असलेला) कार्यक्रम ते सत्तेत नसताना देखील पाहीला आहे. त्यांनी कधीही कुणाबद्दलही उलट सुलट वाक्य वापरले नाही. किंबहूना या संदर्भात ९०च्या दशकात, बॉस्टन मधे घडलेली एक घटना सांगतो, विहींपचे तत्कालीन अध्यक्ष अशोकजी सिंघल एका कार्यक्रमात बोलत होते. त्यासुमारास कोणी एका अनिवासी भारतीयाने अशोकजींना पोकळ काळजीने प्रश्न विचारला की, (या अर्थी हिंदीत पण मी मराठीत लिहीतोय), "भारताची अवस्था पाहून वाईट वाटते, आम्ही लांब असतो, इथून भारतीयांसाठी काय करू शकू?" त्यावर त्यांनी खूप मार्मिक पण कडक उत्तर दिले होते, "भारतमातेसाठी जे काही करायचे आहे, ते सर्वच विचारांचे भारतीय त्यांच्या त्यांच्या पध्दतीने भारतात करत आहेत. त्याची काळजी तुम्ही करू नका. राहता राहीले तुम्हा अनिभांनी भारतासाठी काय करावे हा प्रश्न - ज्या दिवशी भारतमातेला चांगले दिवस येतील त्या दिवशी तुम्हाला देश बरोबर आठवेल आणि परत याल." अर्थात यात ज्यापद्धतीने नक्राश्रू गाळत प्रश्न विचारला होता, त्याला शेवटचा भाग उपरोध म्हणून होता. पण त्यातील मुख्य भाग होता तो म्हणजे कोणाच्याही कामाला कमी न लेखणे...असो. ३. ज्या स्मृती इराणींच तुम्ही कौतुक केलं त्यांनी महिषासुराचे पूजन करणार्‍या समुदायांच्या हक्कांचा दुसर्‍या समुदायांच्या हक्कांचा दाखला देऊन संकोच केला. ते आदर्श वाटते का? हे महीषासुराचे पुजन करणे पण टिपिकल डाव्यांनी पेटवलेले प्रकरण दिसतयं... तुम्हीच दिलेल्या दुव्यामधे असे म्हणले आहे: "The first Mahishasur Diwas, according to the Indian Express newspaper, was held at JNU sometime in 2011." जी प्रथा कुठल्याच समुदायात नव्हती ती नक्की कुठल्या समुदायाचा हक्क झाली? का डावे पण आता अल्पसंख्य होऊ लागलेत म्हणून त्यांना देखील स्पेश्शल ट्रीटमेंट? म्हणजे एकदा महीषासुराला मारले म्हणून रडारड मग अफझलला मारले म्हणून रडारड... काय वाट्टेल ते करून देशाची वाटच लावायचा विडा या जेएनयुने उचललाय. तुम्ही असल्यांच्या मागे लागू नका बरंका! उगाचे ब्रेनवॉशिंग होईल. ;) "जर भाजप बिहारमध्ये हरला तर पाकिस्तानात फटाके फुटतील" असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा म्हणतात तेव्हा ते जाणून-बुजून, कळून सवरुन वैचारिक विभाजनाला खतपाणी घालत नाहीत असे वाटते का? ते एक निवडणुकीच्या रणधुमाळीतील राजकीय वाक्य होते. तसले ऐकून मनावर घेण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी नाही आहे. आणि ते त्याच निवडणुकीत सिद्ध देखील झाले नाही का? पण एखाद्या नेत्याला आणि विद्यमान मुख्यमंत्र्याला "मौत का सौदागर" म्हणणे हे नक्की कुठल्या संस्कृतीत बसते? विचारसरणींचे फरक ठळकपणे दाखवण्यासाठी ह्या बारा लक्षणांच्या गमतीजमती केल्या जातात असा दावा कोण म्हणतयं असा दावा आहे म्हणून. अजिबात नाही. हा प्रोपोगंडाच आहे. पण जितका फॅसिस्टांची १४ लक्षणे दाखवत स्वतःचे घोडे पुढे दामटवण्याचा प्रोपोगंडा आहे तितकाच आहे. किंबहूना अमेरीकन संदर्भात ही १२ लक्षणे रिअ‍ॅक्शनरी देखील आहेत. अमेरीकन संदर्भात मी कुठल्याच पक्षाचा समर्थक नाही. पण असलो तर डेमोक्रॅट्स पक्षि डाव्यांच्याच जवळचा आहे. पण इथले डावे हे कम्युनिस्ट नाहीत. (आता इथले भारतीय डॉक्टर्स बहुतांशी रिपब्लिकन्स असतात हे तुम्हाला माहीत असेलच). क्लिंटन डावाच होता ज्याच्या काळात/धोरणाने अमेरीकेचे कर्ज संपत आले होते तर बुशच्या काळात ते वाढले. परत ओबामाच्या काळात इकॉनॉमी चांगली झाली आहे. भले क्लिंटन आणि ओबामांची सर्व मते पटली नाहीत तरी त्यांचे काम नक्कीच पटणारे ठरले आहे. हे बोलायचा उद्देश इतकाच की असे अनेक आहेत. पण जे चळवळे डावे आहेत ते स्वतःला फार शहाणे समजणारे आहेत आणि मग "तुम्ही आमच्या सारखे नसलात, तर तुम्हाला काय बी कळत नायं!" म्हणणार. बरं गंमत अशी की ही लोकं जबरदस्त श्रीमंत असतात... साधीरहाणी वगैरे फक्त फुटसोल्जर्स साठी... (त्यामानाने आपल्याकडे आधीच्या काळातले समाजवादी पहा कसे साधे असायचे). अशी लोकं जेंव्हा सगळ्याच रिपब्लीकन्सना रॅडीकल समजू लागतात, धार्मिक म्हणजे कमी समजू लागतात, स्पष्टपणे न बोलता पण अप्रत्यक्षपणे बुद्दू समजतात तेंव्हा ते अनेकांच्या डोक्यात जाणारच. त्यातून मग असले सरसकट फॅसिस्ट म्हणणार्‍या जिलब्या पडल्या की कोण शहाणा माणूस ऐकून घेणार आहे? शहाण्या माणसाच्या ऐकण्यावरून एक आठवण (९०च्या काळातली): एम आय टी च्या आवारात एकदा एक (मराठी) मुलगी माझ्याशी आणि माझ्या मित्राशी तावातावाने बोलत होती. भाजपाच्या नेत्यांचा उद्धार करणे चालू होते. काश्मिरी पंडीतांच्या हलाकीचा विषय होता. त्याच्या काही वर्षेच आधी त्यांना बेघर व्हावे लागले होते, अत्याचार सहन करावे लागले होते. ही बया म्हणत होती, इतकं काय झालं म्हणून उगाच हे नेते आरडाओरडा करत आहेत. थोडक्यात काश्मीरी पंडीतांवरील अन्यायामुळे आरडाओरड करायची गरज नाही. हा मुद्दा तावातावाने आणि परतपरत मांडणे चालू होते. ती हिंसेच्या विरोधात होती आणि तिच्या दृष्टीने भाजपामुळे काश्मिरप्रश्न तापत होता... मी मधेच तिला थांबवले आणि अगदी शांतपणे विचारले, "--- तुझ्या कानाखाली आत्ता आवाज काढला, तर काय करशील?" तिने तात्काळ उत्तर दिले की, "मी तुला मारेन" (कमी नाही, डायरेक्ट हत्याच. "मारेन" हा येथे मी सभ्य शब्द वापरत आहे.) म्हणलं, "मला उत्तर आवडले कारण त्यात तुझा स्ट्राँग आत्मसन्मान दिसतोय! पण मग त्या पंडीतांचे काय ज्यांची घरंदारं गेली आणि बायकांना देखील त्रास झाला ते?" उत्तर अर्थातच मिळाले नाही... :( असो.

In reply to by तर्राट जोकर

१. भाववाढविरोधी आंदोलने भाजपाने युपिये काळात केली. पण तशी आंदोलने आताच्या सरकारविरुद्ध झालीत तर ती आदर्श वाटतील का?
नक्कीच. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात काहीही चूक नाही.
२. विद्यमान पंतप्रधान परदेशात जाऊन 'आधी तुम्हाला भारतीय म्हणवून घेण्यात शरम वाटत होती, पण आता गर्व वाटतो आमचे सरकार आल्यापासून' हे वक्तव्य आदर्श वाटते का? (बाहेर असताना वयंपचाधिकं शतम चे काय झालं?)
याविषयी विकास यांच्या प्रतिसादात काही मुद्दे आले आहेतच. अजून एक वेगळा मुद्दा लिहितो. भारताविषयी लाज वाटणारे नक्कीच काही भारतीय आहेत. अशा काही जणांशी बोलणे झाले आहे. अशांना आम्ही निवासी अभारतीय म्हणतो. काही तरूणांना "क्या रखा हे तुम्हारे इंडियामे?" असे बोलताना प्रत्यक्ष ऐकले आहे. एकदा अमेरिकेहून परत येताना सिंगापूरमध्ये ६-७ तासांचा हॉल्ट होता. तिथून मुंबई जाणारे १२-१३ भारतीय विमानतळावरच थांबले होते. त्यांच्यात एक पुण्याचे अंदाजे ६० च्या आसपास वय असलेले जोडपे होते. अमेरिकेत जन्मलेली भारतीय वंशाची एक २२-२३ वर्षांची मुलगी सुद्धा होती. तिला भारतात येऊन काहीतरी समाजसेवा करण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने ती इतरांना अशी मदत कशी करता येईल हे विचारत होती. हे जोडपे वगळता उरलेले सर्वजण त्यांच्यापरीने तिला माहिती देत होते. हे जोडपे मात्र सुरवातीपासून अखंड भारताला शिव्या घालत होते. या देशात काहीही अर्थ नाही, सर्वत्र भ्रष्टाचार आहे, इथे अजिबात मदत वगैरे द्यायला येऊ नका, हा देश नालायकांचा आहे असे ते तिला सतत सांगून पूर्ण नकारात्मक विचार मांडून तिला परावृत्त करीत होते. त्यामुळे "तुम्हाला भारतीय म्हणवून घेण्यात शरम वाटत होती" या वाक्यात काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे.

In reply to by तर्राट जोकर

फक्त त्याची कम्युनिटी धर्माऐवजी विचारसरणीवर आधारित असते.कम्युनिस्ट रशियात धर्म ही समाजाची अफू आहे वगैरे विचार सर्वमान्य असल्यामुळे (कारण मार्क्स तसं म्हणतो) नास्तिकतेचा प्रभाव होता. पण लेनिनचं शव त्याच्या स्मारकात जपून ठेवलेलं होतं. देशोदेशीचे कम्युनिस्ट तिथे जायचे. समग्र लेनिन साहित्य प्रत्येक कार्यालयात असलंच पाहिजे असा दंडक होता. हे एखाद्या कर्मकांडापेक्षा कमी थोडंच आहे?

पुरोगामी दुटप्पीपणाची काही उदाहरणे. १. रश्दीचे सॅटॅनिक व्हर्सेस विरुद्ध रामायण रिडल्स २. रामजन्मभूमी विरुद्ध शाहबानो केस ३. तलाक तलाक तलाक (नाव बदलून निकाह) हा चित्रपट विरुद्ध पीके हा चित्रपट ४. दादरीचा खून विरुद्ध माल्दातील दंगल ५. शनी शिंगणापूर विरुद्ध हाजीअली ६. म फि हुसेनची चित्रे विरुद्ध लोकमतमधे छापलेले आयसिसची टिंगल करणरे व्यंगचित्र भारतातील पुरोगाम्यांच्या व्यवच्छेदक लक्षणात एक समान धागा म्हणजे अल्पसंख्यांकांचा तो बाळ्या आणि बहुसंख्यांकाचे मात्र कार्टे.

In reply to by हुप्प्या

हे दोन्हीही भिकार होते आणि चोप्रांनी बनवले होते (अनुक्रमे बी.आर.चोप्रा आणि विधू विनोद चोप्रा) हा एक योगायोग. बाकी पुरोगामी दुटप्पीपणाशी सहमत.

In reply to by तर्राट जोकर

काही शब्द फक्त बदलले तर हिंदुत्ववादी धर्मांधाची व्यवच्छेदक लक्षणे असा लेख सहज होईल.
लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. आणि भाजपच्या जातीयवादी राजकारणावर लेख लिहिणार होतात तो कितपत पूर्ण झालाय?

हिन्दु असल्याचा अभिमान वगरे काही नाही पण त्यातील स्वात्रंत्र्य हे आकर्षित करते . सबब कोणी पृथिवी दिली तरी दुसरा धर्म स्वीकारणार नाही. असा आपला फंडा आहे. त्यापेक्षाही जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा प्रेम कवतिक करमणूक वहातुक शिक्षण व आरोग्य यांची गरज असून. देश धर्म भाषा,राज्य घटना , ध्वज ,प्रशासन ही साधने आहेत साध्ये नव्हेत.असे मी मानतो.सबब त्यांच्या विषयी उगीचच अभिमान गर्व वगैरे आपण काही मानत नाही. कारण साधनांचे महत्व साधन म्हणूनच असावे. सिरिन्ज महत्बाची पण त्यापेक्षाही डोक्टर मह्त्वाचे त्यापेक्षाही रोग्याचे आरोग्य महत्वाचे.

In reply to by चौकटराजा

बहुसंख्य हिन्दू धर्मियाना कर्मकांडाचे अवडम्बर माजवणे आवड़त नाही. त्यातलेच आम्ही!पण उगाच्च कोणी माझ्या धर्मावर शिंतोड़े उडवत असेल तर ते पण सहन केले जाणार नाही.

काश्मीरमधे मुसलमानांवर कसा अत्याचार होतोय आणि त्यामुळे काश्मीर देऊन टाकणे कसे योग्य आहे!
याबाबत एक क्लॅरिफिकेशन सरकारनं करणं गरजेचं होतं. जरी शेवटचा काश्मिरी मारावा लागला तरी चालेल, पण काश्मीर दिला जाणार नाही. त्यांना स्वातंत्र्य वगैरे काही हवं असेल तर ते मेल्यावरच मिळवावं लागेल.

In reply to by काळा पहाड

माफ करा पण सरकारने असे प्रत्येक गोष्टीवर क्लॅरीफिकेशन देणे चुकीचे आहे असे मला वाटते. किती ठिकाणी किती प्रकारचे लोक आपआपली मते मांडत असतात. आपण ज्या देशात राहतो किंवा ज्या देशाचे प्रातिनिधित्व करतो त्या देशाच्या धोरणांशी विसंगत / चुकीचे बोलत आहोत हे कळत असूनही अनेकदा रेटून खोटा प्रचार केला जातोच. अशा वेळी "सरकारचे अधिकृत प्रातिनिधित्व न करणार्‍या" व्यक्तीच्या कोणत्याही मतावर सरकारने का क्लॅरीफिकेशन द्यावे? ...आणि या विचारजंती लोकांचे एक बरे असते, "गिरे तो भी टांग लाल" अशा वृत्तीने सरकारने दुर्लक्ष केले तर आणखी बरळत सुटतात आणि क्लॅरीफिकेशन दिलेच तर सरकार आपल्याला महत्व देते आहे असे म्हणून कॉलर ताठ करून आणखी अपप्रचार करतात.

In reply to by काळा पहाड

याबाबत एक क्लॅरिफिकेशन सरकारनं करणं गरजेचं होतं. जरी शेवटचा काश्मिरी मारावा लागला तरी चालेल, पण काश्मीर दिला जाणार नाही. त्यांना स्वातंत्र्य वगैरे काही हवं असेल तर ते मेल्यावरच मिळवावं लागेल.
हे भारत सरकारने फार पूर्वीच वेगळ्या सौम्य शब्दात अनेकवेळा सांगितले आहे. काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात येणार नाही हे अनेकवेळा अधिकृतपणे सांगून झाले आहे. जम्मू-काश्मिर हे राज्य भारताचा अविभाज्य भाग हा ठरावही संसदेत सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन अधिकृतरित्या मंजूर केलेला आहे. काश्मिर पाकिस्तानला दिले जाणार नाही, तिथे सार्वमत घेतले जाणार नाही, स्वातंत्र्य वगैरे मिळणार नाही हे सर्व यामध्ये अंतर्भूत आहे.

श्रीगुरुजी - घासु गुर्जी ने वाईट हेतू ने काढलेल्या धाग्यावर त्यांची आणि त्यांच्या ऊद्देशाची यथेच्छ धुलाई झाली होती. तुम्ही हा धागा काढायला नको होता. तुम्ही लिहीले की, उगाचच घासुंसारख्या प्रवृत्तींना काहीतरी लिहायला संधी मिळते. त्या लोकांचे पितळ चांगले उघडे पडले आहे. तुम्ही लिहुन त्यांना संधी देऊ नका. आपुलकी आहे म्हणुन सांगतोय. पटले तर बघा.

In reply to by प्रसाद१९७१

खोडसाळ हेतू मनात ठेवून काढलेल्या धाग्याला तिथेच उत्तर द्यायची गरज वाटली नाही कारण अनेकांनी धाग्यामागचा मूळ हेतू उघड करून त्या धाग्याची व त्यामागच्या हेतूची व्यवस्थित चिरफाड केली आहे. परंतु हा धागा काढावासा वाटला कारण या मंडळींना कायम एक्सपोझ करणे आवश्यक आहे. उगाच कोणातरी काहीतरी लिहील म्हणून आपण गप्प राहणे व त्यांचा प्रोपागंडा ऐकून घेणे हे पटत नाही.

श्रीगुरुजी - कोळसा काळा आहे हे सारखे सारखे दाखवून द्यायची गरज नाही. त्यापेक्षा मदनबाणांनी जसा सकारात्मक बदल दाखवणारा धागा काढला तश्या बातम्या लिहुन धागे काढा.

मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी
उपहासात्मक ( की व्यक्तिगत हल्ला होउ नये म्हणून प्रयत्नपूर्वक संयमित) सुरुवात .. पण नंतर मात्र टिपिकल शब्द्दांचा वापर करण्याचा मोह अनावर झालाय :-)

लेख अतिशयोक्तीपूर्ण वाटला.आपल्या देशात ८० ते ८५ टक्के हिंदूच असावेत मग हिंदू धर्माविषयी घृणा बाळगणारे कोण?

आपल्या इथे निधर्मी जे गणले जातात त्यात काही नास्तिक असावेत ते हिंदू धर्मावर टीका करत नाहीत आपल्याच मस्तीत असतात. दुसरे अंधश्रद्धानिर्मुलन वाले ह्यांचे बरेचसे काम हे समाज उपयोगी असते असते मात्र धर्मात ते हस्तक्षेप करतात त्यामुळे ज्यांचा स्वार्थ दुखावतो ती मंडळी हे धर्मद्रोही आहे म्हणून प्रचार करतात.आपला धर्म हा जाती प्रधान आहे. पूर्वीच्या काळी उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचाराबद्दल त्यांची घृणा करणारे त्या जातींचा निषेध करतात परंतु त्या उच्चवर्णीय जाती हा संपूर्ण धर्माचा अपमान म्हणून प्रोजेक्ट करतात असे वाटते. हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहे

In reply to by प्रतापराव

प्रतापराव,
>> आपला धर्म हा जाती प्रधान आहे.
जातीप्रधान म्हणजे नक्की काय? इथे एक ओबीसी चायवाला पंतप्रधान होऊ शकतो. कोणी धर्ममार्तंडाने यास आक्षेप घेतल्याचं ऐकिवात नाही. कसली जात आणि कसलं काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लोकांचे धर्मापेक्षा जातीवर जास्त प्रेम असते.म्हणुन तर धर्म एकच असुन सगळे गुद्दागुद्दी करतात.

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, भांडतात ते राजकारणी. भांडण करणे हेच त्यांचं काम आहे. पण मोदींसारखा योग्य नेता असेल तर तो बहुमताने निवडला जातो हेही सत्य आहे. अशा वेळेस सामान्य लोकं म्हणजे जनता जातपात बघंत नाही. योग्य वेळेस एकवटणे हीच हिंदूंची शक्ती आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजकारणाच सोडा मला मोदिही पटत नाही कि तुमचे कोन्ग्रेसही पटत नाही.पण सर्वसामान्य हिंदु मनाने जवळ आहे हा तुमचा भ्रम आहे.मि जवळपास सर्व प्रकारच्या विचारधारा असलेल्या लोकांबरोबर राहिलोय.जातिवाद प्रचंड प्रमाणात आहे.संभाजि ब्रिगेडची माणसे ही सुध्दा हिदु आहेत त्यांच्यावर टिका का होते? आरएसएस बद्दल तर हिंदुंचि संघटना असुनही अत्यंत खालच्या पातळीवर टिका करणारेही हिंदुच आहेत.जोपर्यत जातिच्या घाणितुन बाहेर येत नाहि तोपर्यत धर्म नावालाच राहिल जातिचेच वर्चस्व असेल.

In reply to by प्रतापराव

तीव्र सहमत. काही लोकांना प्रत्येक चर्चा 'मोदी' इथेच नेऊन मूळ मुद्द्याला बगल द्यायची असते. जणू काही भारतात मोदींशिवाय काही उरलेच नाही, नव्हते, नसणार.

In reply to by तर्राट जोकर

काही लोकांना प्रत्येक चर्चा 'मोदी' इथेच नेऊन मूळ मुद्द्याला बगल द्यायची असते. जणू काही भारतात मोदींशिवाय काही उरलेच नाही, नव्हते, नसणार.
आता त्यात काही समतोल विचार करणारे मिपाकरही सामील होऊ लागले आहेत. ही लोकं रबरी शिक्के घेवून बसली आहेत, समोरचाच्या कपाळावर स्युडो, **द्वेष्टे सारखे शिक्के मारायला.

In reply to by प्रतापराव

प्रतापराव, ज्यांना जात प्रिय आहे त्यांना तशी ती असू द्या. जातीभेद नसला म्हणजे झालं. महाराष्ट्रातल्या संतांनी जातीभेद कसा संपवायचा ते दाखवून दिलंय. संतांची शिकवण आचरणात आणणे हा खरा उपाय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ज्यांना जात प्रिय आहे त्यांना तशी ती असू द्या. जातीभेद नसला म्हणजे झालं >> विरोधाभास कळतोय का संतगामापैलवानमहाराज?

In reply to by तर्राट जोकर

तजो, जात आणि जातीभेद यांतला फरक मला ठाऊक आहे. एक जन्मावरून ठरतं तर दुसरं कर्मावर अवलंबून आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रतापराव

प्रतिसादाशी सहमत आहे. खरेखुरे निधर्मी, नास्तिक (शाकाहार/मांसाहार, स्त्रीपुरूष समानता वाले वगैरे वगैरे) टीका करण्यात वेळ घालवत बसत नाहीत - किंवा संस्थळांवरही सतत आरडाओरडा करत नाहीत. आपली चळवळ / विचार संस्थळापलीकडच्या खर्‍याखुर्‍या गरजू समजापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कामामध्ये ते मश्गुल असतात. हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहे संख्येने कमी असतात परंतु कोणताही मुद्दा कितीही ताणून कोठेही जोडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे असते. त्यासोबत या कॉम्रेड्सनी "सेल्फ व्हिक्टीमायझेशन" ची झूल पांघरलेली असते. त्यामुळे सहानुभुती गोळा करण्यास मदत होते. एक शंका. आपला धर्म हा जाती प्रधान आहे. तुम्हाला समाज हा जातीप्रधान आहे असे म्हणायचे आहे का?

In reply to by मोदक

समाज आणि धर्मात काय फरक आहे? धर्म म्हणजे नियम.उदा.माणुस मरतो, हिंदु मेल्यावर जाळतात, मुस्लिम पुरतात इतर धर्मातल्यांचे काहि अलग नियम असतात.थोडक्यात काय प्रेत नष्ट करायचे असते.जो तो आपापल्या धर्मानुसार ते नष्ट करतो. नियम वेगवेगळे असले तरी मुळ उद्देश एकच असतो नष्ट करुन विल्हेवाट लावणे.हिंदुंना संकष्टिला उपवास करुन पुण्य लागेल असे वाटते तर मुस्लिमांना रोझे धरुन.अर्थात काय फायदा होतो कि नाही हे सोडुन द्या वांझोटे समाधान तर मिळते.नियमांसाठी लढणे माझे नियम चांगले कि तुझे ह्यावरून दंगली माजवणे हे खेदजनक असले तरी बिनडोकपणाचे मनोरंजनात्मख मुल्य त्यात असतेच.

In reply to by प्रतापराव

हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहे
+१

In reply to by श्रीगुरुजी

हे हे गुरुजी, घाई घाईत वाचत जाउ नये, फजित होते. नीट वाचा वाक्य. तुम्हाला हवा तो अर्थ नाही त्यात, अगदी उलट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काय उलट आहे?
काहीही उलट नाही. तुम्ही प्रोजेक्टरच्या 'योग्य' बाजूला बसला आहात.

घासकडवींच्या लेखाला उत्तर म्हणून हा लेख लिहिला आहे,पण एकच मुद्दा फिरुन फिरुन लिहला आहे.काय तर म्हणे सेक्युलर लोक हिंदु धर्मावर् टिका करतात.सेक्युलर हे कधीच छद्म नसतात ,ते नेहमी योग्य व्यक्तीची, समाजाची बाजू उचलतात.आता आमचे श्रीगुरुजी ठरले भगवे धर्मांध ,त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? , पण घासू गुर्जींचा लेख दुसर्या गुर्जींना फारच झोंबलेला दिसतोय..

In reply to by गरिब चिमणा

नानासाहेब/काकासाहेब/ग्रेटथिंकर/फुलथ्राॅटल जिनियस/ टाॅपगिअर्ड फिलाॅसाॅफर/पोटे/हितेश/..... पण भाषा कधी बदलणार? असो. आता हा आयडी किती दिवस?

नानासाहेब/काकासाहेब/ग्रेटथिंकर/फुलथ्राॅटल जिनियस/ टाॅपगिअर्ड फिलाॅसाॅफर/पोटे/हितेश/..... बोका भौ हेच लिहायला आलो होतो..

खरतर निधर्मी अशी कोणती विचारधारा अस्तित्वात नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्मात जन्माला येते. ( सध्यातरी ज्यांना कोणत्या धर्मात बसवायचे हे प्रश्न बाजुला ठेऊ उदा. जंगलनिवासी , मुलनिवासी इ. ) मग त्याच्यावर त्या त्या धर्माचे संस्कार होतात. समजत वय झाल किंवा म्हातारपण आल की त्यांना आपल्याला कोण विचारत नाही याची जाणिव होते. मग ते आपल्या धर्मातील समजुती / श्रध्दा यावर प्रहार करायला लागतात. त्यांना हळु हळु प्रसिध्दी मिळायला लागते. हे हिंदु धर्मात भारतात जास्त पहायला मिळत याची दोन कारणे आहेत. १. हिंदु धर्म एक ग्रंथ आणि एक धर्मनिर्माता याने बांधलेला नाही. धर्माने स्विकारलेली तत्वज्ञाने सहा आहेत. २. धर्माचे बंधन घट्ट नाही. फतवा निघत नाही आणि निघाला तरी तो कोणी मानत नाही. सबब धर्मावर आघात केले तर प्रसिध्दीच मिळते. सलमान रश्दी किंवा बांग्लादेशी लेखिका यांच्यासारखे परागंदा व्हावे लागत नाही. अकबर थोर नव्हताच या पुस्तकात लेखक पु. ना ओक म्हणतात की अकबराला निधर्मी म्हणण्याची प्रथा पडली कारण त्याने सर्व धर्माच्या लोकांना बोलावुन चर्चा करण्याचा प्रघात पाडला. हे खोटे आहे कारण लेखक पुढे म्हणतात अकबर निधर्मी नव्हताच कारण त्याच्या काळात हिंदुंवर जिझीया कर लादला गेला. हिंदुंवर विषिष्ठ रंगाच्या कपड्याचे बंधन आले. ही सर्व नाटके अकबर मुल्ला मौलवी यांच्या प्रस्थाला विरोध करण्यासाठी करत तसेच त्यांचे वर्चस्व मोडुन खलिफा किंवा तत्सम धर्मावर आधारीत बगावत होऊ नये म्हणुन होत. इतर धर्मांविषयी प्रेम होते म्हणुन अकबराने ती चर्चा सुरु केली नव्हती तर त्याच्यावर मुसलमानी बंधने येऊ नयेत म्हणुन ती होती. काँग्रेसच्या काळात हेच धोरण राबवले गेले. हिंदु संस्था आणि धर्म यावर आक्रमणे करण्यासाठी हे विचारवंत पुढे केले गेले. त्यांना मिडीया उपलब्ध करुन दिला गेला. ज्यामुळे त्यांची प्रसिध्दी वाढली. परिणामी १९९२ नंतर हिंदु जन आंदोलनांनी जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळाली ती ताकद अनेक वर्षे त्यांना मिळु नये हा डाव होता.

In reply to by नितीनचंद्र

भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये मुळात काही फरकच नाहिये.कोन्ग्रेसचे जितके पिएम झाले हिंदुच होते, महत्वाची पदे भुषवणारेही हिंदुच होते.आणि हे सर्व नेते आस्तिकही होते, धार्मिकही होते. कुठलाही कोन्ग्रेस नेता कधिही धर्मावर टिका करत नाही. मात्र राजकारण, मतांच्या बेगमीसाठी त्यांनी सर्वधर्मसमभावाचे घोंगडे पांघरले.आम्हि सर्वधर्मसमभावि आहोत हे प्रोजेक्ट करण्यात ते यशस्वि झाले इतर जमातिंना त्यांचा आधार वाटु लागला.इतर धर्मियांना खुश ठेवताना त्यांनि स्वताचा धर्मही जपला. भाजपने आपण हिंदुंचे रक्षणकर्ते आहोत असा आव आणला.मुळात हिंदु ८०% आहेत त्यांना इतर अल्पसंख्यांकांची भिती घालण्यात ते यशस्वि झाले. आणि मोदींनी निवडणुकित विकासाचा प्रचार केला त्यामुळे धर्मासारख्या गोष्टिंना अतिमहत्व न देणारे आमच्यासारखे लोकही त्यात फसले. शेवटि विकास महत्वाचा मग तो मोदी करो वा राहुल.जर तो न करता धर्मासारख्या निरर्थक गोष्टिंवरुन वाद घातले जात असतिल.तर दोन्हि पक्षांना घरचा रस्ता दाखवण्याइतके मतदार प्रभल्ग व्हायला हवेत.