आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा,
आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा .
कधी ना पुसे ठसे आठवांचे,
ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे.
कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या,
नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या
नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात,
आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1344
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
《》
धन्यवाद :)
In reply to 《》 by खालीमुंडी पाताळधुंडी
चांगला प्रयत्न
धन्यवाद
In reply to चांगला प्रयत्न by पैसा