✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते...

स
सटक यांनी
Tue, 02/23/2016 - 03:14  ·  लेख
लेख
शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता. लहान चणीचा तो तरूण आपल्याच विचारात हरवून वेशीपर्यंत पोहोचला. त्याच्या लहानपणी चांगली धडधाकट असणारी वेस आता मोडकळीला आली होती. पण अजून होती. वाटेतल्या बर्‍याच गावातल्या वेशींसारखी पार पुसली गेली नव्हती. त्याने शांतपणे जवळच्या थैलीतून राख काढली आणि वेस बांधून घेतली. मग त्या राखेचे दोन फटकारे दोन दिशांना मारून तो तेथून निघाला. अजून बरेच अंतर कापायचे होते. तो आल्याची वर्दी गावात जायच्या आत. दक्षिणेतला भुत्याचा टिळा, उत्तरेतली वाघजाईची गुहा आणि पश्चिमेतली जाईची कोंड अशीच बांधून घेतल्यावर तो गावात प्रवेश करता झाला. तो पारावर पोहोचला तेव्हा चंद्र हातभर वर आला होता. पारावर चार नेहमीची तोंडे सोडली तर गावात फक्त भांड्यांचे आवाज आणि गायी म्हशींचे हंबरणे ऐकू येत होते. मध्येच कुठेतरी नांगराच्या फाळाची ठोकाठोक. चुलींवर धगधगत्या कालवणांच्या वासांचे अर्थ लावत तो त्याच्या मोडकळीला आलेल्या घरात तसाच बसून राहिला. अन्नपाण्याची शुद्ध आली तेव्हा लक्षात आले की आता त्यालाच काहीतरी करावे लागेल. अकाली कॅप्लाटा झालेल्या त्याला दिमतीला कुणी नसायची सवयचं नव्हती. त्याच्या दिमतीला नेहमीच झाँबी असायचे. आता मात्र तो उठून स्मशानाकडे चालू लागला. तिथे आज कुणीच नव्हते. पण तो पोचता पोचता त्याला एक चुकार कुत्रे दिसले. त्याने झटक्यात त्याच्या पोतडीतून पुन्हा राख काढली आणि त्या कुत्र्यावर टाकली. कुत्रे निमूट बसले...त्याने बाजूनी लाकडे रचून ते भाजेपर्यंत! दुसर्‍या दिवशी सकाळी तो चावडीवर गेला. रात्री त्याला भेटलेल्यांनी तो आल्याची वर्दी फिरवलेलीच होती. चार वाकड्या तोंडांशिवाय त्याला काही पहायला मिळणारही नव्हते. पण तिथे त्याने सांगितले की तो आजपासून माळावर जाऊन रहाणार आहे. येवढे गावात सांगणे त्याला बास होते. भर दुपारी तो माळावर पोचला तेव्हा ऊन चांगले तापले होते. पायातल्या सावलीकडे क्षणभर बघत त्याने माळाच्या मधोमध खड्डा खणायला सुरुवात केली. ३ फूट खडडा खणून झाल्यावर तो तिथे जाऊन बसला. मग त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली.. पक्षी अचानक किंचाळून उडाले. टिटव्यांनी ओरडायला सुरुवात केली. दूर..जंगलात भर दुपारी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. माकडे बुभु:कार करू लागली. पडलेल्या वार्‍याने अचानक जोर धरला. येवढा की त्या वार्‍याच्या आवाजात सगळे बुडून गेले. आणि अचानक, एक क्षण तिथे सगळीकडे भयाण शांतता पसरली...क्षणभरच..आसमंत सगळा अंधारून आला..गवताची पाती तशीच लवलेली थांबली होती..पाण्यावरच्या लहरीसुद्धा... ते आलं होतं.......... त्यानी बोलावल्याप्रमाणे. आदिम, प्राचीन! आपल्या मितीतलं नसलेलं. त्याच्या हाकेला ओ देऊन स्वतःची आणि त्याची रक्ताची तहान भागवायला. पहिला बळी नेहमी बोलावणार्‍याचा अशी रीत असणार्‍या त्या विखारी अस्तित्वापासून स्वतःचे संरक्षण करायचे म्हणूनच त्याने स्वतःचे स्थान सुरक्षित करून घेतले होते. रोंरावत, घोंघावत तो हिडीस आकार सगळ्या गावकुसाला धडका देऊन आला. पण सर्व दिशा त्याने आधीच बांधून ठेवल्या होत्या. आता ते त्याच्यासमोर उभं राहिलं...त्याच्या आदेशाची वाट बघत! त्याने शांतपणे त्याच्या स्वतःच्या रक्ताची वाटी समोर केली..एक कानाच्या पडद्यांवर ओरखडे आणणारा मिटक्या मारण्याचा आवाज करून ते त्या वाटीवर झेपावलं. त्याच्या मंत्रचक्षूंना जरी ते दिसत असलं तरी तो सतत काही त्या स्थितीत राहू शकत नव्हता. त्याने त्याला पहिली आज्ञा केली...रूप घे! त्याच्यासमोर एक मत्त गवा उभा राहिला..पण तो गवा साधा नव्हता! त्याच्या आकारात सतत बदलणारे असे काहीतरी होते..त्याच्या सीमा जणू प्रकाश शोषणार्‍या अंधाराने बनल्या होत्या. हे बघूनच कळत होते की हा आकार फसवा आहे. नजर ठरू न देणारा आहे. धडकी भरवणारा आहे. ठीक! असे त्याने म्हणताक्षणी त्या माळरानावर अचानक एक आगीचा डोंब उसळला. सर्व दिशा थोड्याश्या अंधारल्या. गावातल्या देवळाचा पहिला पायरीचा दगड तडकला! सगळे शांत झाले तरी वादळात सापडल्या प्रमाणे आसमंत धुमसायला लागले. अचानक त्याच्या लहान, पण काळजाचे पाणी पाणी करणार्‍या हास्याची एक किनरी लकेर उमटली! तो जिंकला होता. आता त्याला कुणीच थांबवू शकणार नव्हते! नरांजोच्या तावडीतून कुणीचं सुटत नसे! ध्यानात मग्न असलेल्या परशुरामशास्त्र्यांचे डोळे खाडकन उघडले.. ते घामाघूम झाले होते! कपाळावरची शीर ताड ताड उडत होती! अंग घामाने डंवरून आले होते..येणारा काळ बरेच अमंगळ घेऊन येणार आहे ह्या जाणिवेने ते अस्वस्थ झाले होते.. क्रमशः
  • ते... (तेवीस वर्षांपूर्वी!) भाग-२
  • ते...(पुढे सुरू!) भाग ३

Book traversal links for ते...

  • ते... (तेवीस वर्षांपूर्वी!) भाग-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
9296 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मस्त, पुढचे लवकर लवकर लिहा :-

विद्यार्थी
Tue, 02/23/2016 - 04:13 नवीन
मस्त, पुढचे लवकर लवकर लिहा :-)
  • Log in or register to post comments

मस्त वातावरण निर्मिती। लवकर टाका पुढचा भाग

जगप्रवासी
Tue, 02/23/2016 - 14:16 नवीन
मस्त वातावरण निर्मिती। लवकर टाका पुढचा भाग
  • Log in or register to post comments

काहितरी भन्नाट वाचायला मिळणार

उगा काहितरीच
Tue, 02/23/2016 - 14:34 नवीन
काहितरी भन्नाट वाचायला मिळणार तर ! सुरूवात तर अगदीच झकास झालीए. आता पुभाप्र ... काही प्रश्न ... १)सर्व भाग आधी लिहून झालेत की लिहायचेत ? २) अंदाजे किती भागाची मालिका असणार आहे ? ३) याआधी कुठे प्रकाशीत झाली आहे का ?
  • Log in or register to post comments

आवडले. पुढला भाग लवकर लिहा.

प्राची अश्विनी
Tue, 02/23/2016 - 14:39 नवीन
आवडले. पुढला भाग लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

पांडू कथा उत्तरार्ध!

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/23/2016 - 14:44 नवीन
पांडू कथा उत्तरार्ध!
  • Log in or register to post comments

सुरुवात जबराट झाल्याली आहे .

अद्द्या
Tue, 02/23/2016 - 14:49 नवीन
सुरुवात जबराट झाल्याली आहे . लवकर टाका पुढचे भाग आता
  • Log in or register to post comments

पुभाप्र.

एस
Tue, 02/23/2016 - 15:11 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

जबराट . सुष्ट आणि दुष्ट

राजाभाउ
Tue, 02/23/2016 - 16:41 नवीन
जबराट . सुष्ट आणि दुष्ट शक्तिंचे प्रतिनिधी आलेले आहेत. होउन जाउद्यात
  • Log in or register to post comments

सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार

सटक
Tue, 02/23/2016 - 19:11 नवीन
सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार! उगा काहीतरीच.. भाग आधी लिहिलेले नाहीत. आराखडे तयार आहेत. आत्ता ४ भाग डोक्यात आहेत. पूर्वप्रकाशित नाही. खरे तर दीर्घकथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. आपण सगळे सांभाळून घ्याल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! आणी शुभेच्छा !

उगा काहितरीच
Tue, 02/23/2016 - 20:47 नवीन
धन्यवाद ! आणी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक

खतरनाक!!!!!

विजय पुरोहित
Tue, 02/23/2016 - 20:51 नवीन
खतरनाक!!!!! लिहा हो लिहा पुढचा भाग!!!!
  • Log in or register to post comments

स्पाचा नवीन अवतार का??

टवाळ कार्टा
Tue, 02/23/2016 - 21:49 नवीन
स्पाचा नवीन अवतार का?? स्पालापण त्याचे "ते" पूर्ण करायला लावा कोणीतरी
  • Log in or register to post comments

जबराट! पुभाप्र!

बोका-ए-आझम
Tue, 02/23/2016 - 21:54 नवीन
छान वातावरण निर्मिती!
  • Log in or register to post comments

मस्त!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/23/2016 - 21:58 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

पहिलाच भाग जोरदार...

मुक्त विहारि
Tue, 02/23/2016 - 21:58 नवीन
रोचक सुरुवात
  • Log in or register to post comments

वा!

आनंद कांबीकर
Tue, 02/23/2016 - 23:21 नवीन
आवडले. पुढचे भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

खुपच छान

दिपुडी
Wed, 02/24/2016 - 11:31 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

जबरा

नाखु
Wed, 02/24/2016 - 11:45 नवीन
सुरुवात .. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. सरकट्लेल्या धाग्यांपेक्षा सटक कथा वाच्नोत्सुक नाखु
  • Log in or register to post comments

कथा आवडली

पैसा
Wed, 02/24/2016 - 13:25 नवीन
कथा आवडली. लिहा पटापट!
  • Log in or register to post comments

लवकर टाका पुढचा भाग

मीनादि
गुरुवार, 02/25/2016 - 15:38 नवीन
मस्त वातावरण निर्मिती।
  • Log in or register to post comments

जबराट !

सस्नेह
Tue, 03/01/2016 - 22:17 नवीन
जबराट !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा