कधीमधी पाऊस यायचा. मग जरा अडचणच व्हायची. लाकडं पेटत नसायची. पत्र्याचं शेडपण गळकं. वाऱ्याच्या झोतानं पाऊस आत यायचा आन पाण्याचा फवारा शिपडून जायचा. येवढी मेहनत करुन पेटवलेली लाकडं मग विझायची. राकेलचा आख्खा ड्रम मग उपडा करावा लागायचा. रातभर तसंच बसून राहावं लागायचं. पाऊस उघडला की मग पुन्हा सुकी लाकडं आणून पेटावायला लागायची. रात गेली तरी चालंल पण मढं समदं जळलं पाहीजे. त्याशिवाय सुट्टी न्हाय. थंडीवाऱ्यानं हाडं खिळखीळ करायची. मग गांज्या मारावा लागायच्या. त्याच्या नशेत सगळं स्मशान डोक्यात घुमत राहायचं. अनंतकाळ.
येरवाळी बरं असायचं. राती नऊ-दहालाच सराण पेटवून देऊन खोपट्यात निवांत पडायला मिळायचं. आख्खी संत्रा नीट मारुन रात झिंगून जायची. आम्लेट पावाशिवाय तिथं खायला बी काय मिळायचं न्हाय. न्हाय म्हनायला एक घोंगडं पांघरलेला माणूस तिथं येऊन मक्याची कणसं विकायचा. या वैरान जागी मी एकटाच त्याचं गिऱ्हाईक होतो. पण तरीही यायचा.
कित्येक रात्री तशा शांतच असायच्या. प्रेताची धग घेऊन गुरफटून जायच्या. कुणी आलाच एखादा नातलग तर त्याच्या गगणभेदी आक्रोशाला सलाम ठोकायच्या. मुक्कामाच्या गावाला जाता जाता मला मात्र त्या आपल्याच वाटायच्या.
त्यादिवशी मी सकाळी उठलो. ऊन जास्तच होतं. नेहमीच असतं. सुर्य उगवायच्या आत मला एकदा ऊठून बघायचयं. पहाटेचा गारठा डोळ्यात साठवायचाय. तांबूस किरणांची रांगोळी मी कधी बघितली नाही. पण कितीबी वेळा जाग आली तरी ऊठणं झालं नाही.
लिंबाच्या दोन-चार काड्या तोंडात टाकून नदीकडं गेलो. आंघोळ केली. गार पाण्यात रातीची ऊतरती. पापंसुद्धा. सोन्यानाण्याचं किडूकमिडूक काढून घेणं हिच आमची पापं. त्या पापात आम्ही जगणं शोधतो. मरणाला चार दिवस पुढं ढकलतो. हे अखंड बेवारशी मृत्यू आमच्या जगण्याचं साधन आहे.
पोलिस कधीमधी शे-दोनशे देतात. ती मजूरी आहे.
आंघोळ करुन टेरिकोट चा डगला घातला. कोस दोन कोस चालत जाऊन महुदाच्या टपरीवर एक कप चहा कसाबसा पोटात ढकलला. आणि माझा दिवस सुरु केला. मग डांबरीवरच्या फळकुटावर ऊगंच बसून राहिलो. या आडवळणाच्या जाग्यावर म्हटलं तर वर्दळ तशी नव्हतीच. सकाळपासून भरतीसाठी थांबलेलं एक जिपडं निघायच्या तयारीत ऊभं होतं. काय मनात आलं आन मी पण जाऊन बसलो. डायवर म्हणाला, " काय रे बेवड्या, लय कमाई झालीय वाटतं तुझी?"
मी गप बसून राहिलो. धातूरीला आधनंमधनं चक्कर व्हायची पण आजकाल जरा कमीच. ह्या डायवरनं मला बरोब्बर वळाखलं हुतं. पंधरादिवसाखाली याच्यासारखाच एकजण आला होता तिकडे. त्याची बायली हमसून हमसून रडत होती. मोठ्या पोरानं जेव्हा अग्नी दिला तेव्हा त्याची दातखिळ बसली होती. समदी निघून गेल्यावर राखेत काळवंडलेलं बदाम मी शोधून काढलं होतं. तेव्हा या डायवरनं बघितलं होतं.
कधीकधी काहीतरी अतर्क्य घडतं. माणसाला कळतच नाही की तो मेलाय. हा डायवर ही यातलाच असावा. पंधरादिवसाखाली यालाच अग्नी दिला होता. मात्र हा अजुनही भटकतोय. अगदी माणसासारखा राहतोय. हा माझा भ्रम आहे की मनातले गोधळलेले विचार. असे विचार मी लगेच झटकून टाकतो. नाहितर मी वेडा होऊन जाईन.
धातूरीला ऊतरुन किडूकमडूक विकलं. पाचशे आलं. खिशातले शंभर. म्हणजे सहाशेची बेरीज लागली. बऱ्याच दिवसांनी खिसा फुगल्यासारखा वाटला.
मग आण्णाच्या खानावळीत जाऊन वशाड खाल्लं. दारु मात्र पिलो नाही. येताळबाबाच्या पाठीमागं मग झाडाखाली आंग टाकून दिलं. पार ऊन्हं उतरोस्तर झोपलो. पैसं आलं की जीवाची चैन होते.
जेव्हा जाग आली तेव्हा आकाशात तांबूस किरणांची रांगोळी दिसली. पहाटेची नाही किमान संध्याकाळची तरी पाहिली.
येता येता बाजारात फिरुन पावशेर तंबाकू आन दोन बिंडेल बीड्या घेतल्या. दारुतर महूदातबी मिळंल. गांजा शिल्लक होता.
परत यायला जरा ऊशीरंच झाला. बरीच रात झाली होती. त्यात पाऊस सुरु झाला. पाऊस आला की जरा अडचणच होते. लाकडं भिजून जातात. मढ लवकर जळत नाही. मग रात टाकावी लागते. भुतं दिसायला लागतात. त्यात त्या ताज्या प्रेताचं भुत मानकुटीवरच बसलेलं असतं. मग गांज्याशिवाय झोप लागत नाही.
पाय ऊचलत घाईघाईनं खोपट्यात शिरलो. कधीही एखादं प्रेत इथं येऊ शकतं. लाकडं फारीनं झाकून ठेवायला लागतील. कसंबसं माचीस शोधलं अन दिवा पेटवला. अन बघतोय तर काय एक म्हातारा कुडाला लागून अस्ताव्यस्त पडलाय. माझ्याच पोतडीवर. गतप्राण.
मी हताश होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. पुढे काय आणि कसं करावं हेच मला कळेना. त्याच्या अंगात टेरिकोटचा डगला होता.
ही रात जीवेघेणी. त्यात पाऊस आलेला. आन लाकडंही भिजलेली....
मिसळपाव
प्रतिक्रिया
जव्हेरटच जव्हेरटच तो हाच !
जव्हेरटच जव्हेरटच तो हाच ! आवडली कथा . शेवटच्या धक्का तंत्राची गरज नव्हती . रच्याकने अण्णा भाऊ साठे यांचा भीमा आठवला.
ड्रायव्हर आणि म्हातारा,
ड्रायव्हर आणि म्हातारा, दोघंही!
खल्लास लिहिलंय. असा ट्विस्ट अपेक्षितच होता असं वाटलं पण.
खल्लासच , ट्विस्ट कळलेलाच
खल्लासच , ट्विस्ट कळलेलाच
पण गोष्ट खुलवण्याची हातोटी क्या बात
दंडवत घ्या जव्हेरभाव
काय पण म्हणा जव्हेरभाव.
काय पण म्हणा जव्हेरभाव.
नाद केल्यास बाद केले जाईल असल्या कथा असतेत तुमच्या. पार डोस्कं कामातून जातंय. च्यायला काय दुनिया बघितली तुम्ही आन शब्दात काय उतरवली तुम्ही. ख त र ना क.
आइच्यान सांगतो. फिदा भौ तुमच्या लेखणीवर आपण. जियो. लिखते रहो.
+१
In reply to काय पण म्हणा जव्हेरभाव. by अभ्या..
हेच म्हणतो.
जव्हेरभाऊंचा नादच खुळा.
दंडवत
In reply to +१ by प्रचेतस
लेखणी जोरदार आणी टोकदार ही!
_/\_
+१
In reply to दंडवत by नाखु
डायरेक्ट तितं पोचवलतं की ओ !
वा!
जव्हेरभौ लै दिसानी काय तरी झक्कास वाचाय मिळालं.
जाम आवडली कथा.
कसदार कथा
.
ज ब रा ट
ज ब रा ट
आवडली.
आवडली.
खत्तरनाक प्रतिमासृष्टी...
खत्तरनाक प्रतिमासृष्टी...
अफाट कल्पनाशक्ती...
जव्हेरभौ __/\__
मध्येच एकदा शंका आली होती पण
मध्येच एकदा शंका आली होती पण कथेचा वेग भारी असल्यानं वाचतच गेले. लेखनशैली आवडली.
मस्त
मस्त कथा फारच आवडली.
पैजारबुवा,
हत्ती एकदाच येतो अन् धुराळा करून जातो!
जियो जव्हेरभाऊ!
कथा आवडली..
कथा आवडली..
जव्हेरदस्तं लिहिलिये जव्हेरभौ
जव्हेरदस्तं लिहिलिये जव्हेरभौ.
कडक
कडक
वो मामा
मायला येक नंबर किती येळला देऊ? जव्हेर भौ एकदा भेटाचं.
____/\____
माणसाला कळतच नाही की तो मेलाय
हे चर्र करणारं वाक्य आहे जव्हेरभौ! जबरदस्त! _/\_
आवडली
.
जव्हेरगंज भौ...खल्लास लिहीलय.
जव्हेरगंज भौ...खल्लास लिहीलय...
मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय....
जबरदस्त कथा!
जबरदस्त कथा!
भन्नाट !
भन्नाट !
मस्त लिखाण!
आण्णा भाऊ साठे-बाबा कदम-सुहास शिरवळकर-जव्हेरगंज!
___/\___ घ्या!
Sandy
+१०००
In reply to मस्त लिखाण! by चांदणे संदीप
+१०००
एक नंबर कथा!
एक नंबर कथा!
जबरी
मस्त जव्हेरभाऊ.
भारी.
भारी.
!
_/\_
...
चित्र उपलब्ध नाही
जरा निरखून बघत होतो हाताकडे,
In reply to ... by जव्हेरगंज
जरा निरखून बघत होतो हाताकडे, हालल्यासारखे वाटले हो. अगदी तुमच्या कथेप्रमाणे.
आणि मजा पाहा की, हेच चित्र ९० डिग्रीला फिरवले की आकाशाच्या आरशावर ठेवलेल्या हाताचे प्रतिबिंब वाटतेय.
तुमच्या कथांचा येडा फॅन हायच मी. व्हिज्युअलायझेशन बद्दल परत एकदा त्रिवार दंडवत.
लिखते रहो जव्हेरभौ, तुमच्या कथा म्हणजे जवाहिरांनी रचलेली गंज हाय.
+१
In reply to जरा निरखून बघत होतो हाताकडे, by अभ्या..
शेम आरसाच!!
वर सगळ्यांनी जी प्रशंसा केली
वर सगळ्यांनी जी प्रशंसा केली आहे, त्याच्याशी सहमत आहेच पण आता थोडे काही वेगळे येऊ द्या की भौ. मला आता तुमच्याकडून काही वेगळ्या विषयावरील कथा वाचायची आहे.
मला जव्हेरभाऊंच्या शीतलीच्या
In reply to वर सगळ्यांनी जी प्रशंसा केली by यशोधरा
मला जव्हेरभाऊंच्या शीतलीच्या कथा वाचायच्यात. ;)
शीतलीच्या म्हणजे?
In reply to मला जव्हेरभाऊंच्या शीतलीच्या by अभ्या..
शीतलीच्या म्हणजे?
भा.रा.भागवतांचा कसा बनेश फेणे
In reply to शीतलीच्या म्हणजे? by यशोधरा
भा.रा.भागवतांचा कसा बनेश फेणे, तशी जव्हेरभौंची शीतली/शीतल. कुनाची ओ? धायगुडे का पायगुडेची ना?
तर असो. ते कॅरेक्ट्रर लै बेणे हाय. त्याच्या कथा.
सुरुवातीला एकदोन उडाल्या पण भौतेक.......... ;)
वोक्के.
In reply to भा.रा.भागवतांचा कसा बनेश फेणे by अभ्या..
वोक्के.
क्या बात! दमच घेऊ देत नाही
क्या बात! दमच घेऊ देत नाही वाचताना.. मस्तच! तुमच्या छोटेखानी वाक्यांचा बाज सुंदर!
मस्त.... अगदि एक नंबर कथा!!!!
मस्त.... अगदि एक नंबर कथा!!!!
बाकी लेख आवडला.
आयुष्याला खूप जवळून बघितलय तुम्ही अस वाटत…. ! तुमच्या लेखावरून शाळेतल्या पुस्तकातील धडा आठवला '' स्मशानातील सोन '', बाकी लेख आवडला.