✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

स
सनईचौघडा यांनी
Wed, 02/17/2016 - 13:19  ·  लेख
लेख
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
97858 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

:))

मितान
गुरुवार, 02/18/2016 - 07:30 नवीन
:))
  • Log in or register to post comments

हैला, हा धागा असल्याचे माहितच

रेवती
गुरुवार, 02/18/2016 - 08:49 नवीन
हैला, हा धागा असल्याचे माहितच नव्हते. सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत. महादंगा झालाय हितं. सचौ, एकदाच भेटा! बघतेच आम्हालाला कोण पन्नाशीचं समजतय. अहो, आमची लग्नं विशीत झालियेत म्हणून संसाराची वर्षं जास्त वाटतात. शिवाय मिपा बायकांचं वय कायम सोळा असं एकदा दोनदा नव्हे तब्बल सव्वादोनवेळा सांगून झालय. भारतीय पेहेरावाला दिवाळी आणि दसर्‍याशिवाय हात लागत नाही. भारतात येताना आपण अज्जून कित्ती कित्ती भार्तीय आहोत हे लोकान्ला कळावे म्हणून पेहराव भारतीय असतो. हामेरिकेत जीन्स, शर्ट हा राष्ट्रीय पेहराव आहे. ;) चला, आता काशीला जाणे आले, पण त्याआधी उरलेले प्रतिसाद वाचून घेते. तरीही धन्यवाद. माझं वय किती? कुठं रहात असेल? कशी दिसत असेल? पेहराव कोणता असेल? असा विचार कोणी करेल हे अज्याबात एक्सपेक्टेड नव्हते. अगदी अर्धा टक्काही नाही. तरीही उल्लेख केल्याबद्दल खुदकन हसू आले हे मान्य करते.
  • Log in or register to post comments

पिरा => कळकट्ट..मळकट्ट.

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/18/2016 - 10:46 नवीन
पिरा => कळकट्ट..मळकट्ट..कामाला बळकट्ट =))
  • Log in or register to post comments

अगागागा =)) =)) =))

बॅटमॅन
गुरुवार, 02/18/2016 - 12:01 नवीन
अगागागा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी बोलेन.. पण मग आता एक माणुस

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/18/2016 - 12:14 नवीन
मी बोलेन.. पण मग आता एक माणुस चिडायला लागलय विषय काढला की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यू मीन आता?

पैसा
गुरुवार, 02/18/2016 - 12:27 नवीन
तो मिपावर येतानाच फ्रस्ट्रेटेड आहे हे लक्षात घेऊन जरातरी कनवाळुपणा दाखव! अगदीच बै हार्टलेस तुम्ही लोक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

=))

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/18/2016 - 12:30 नवीन
=)) लोक लई हळवे झालेत बै आजकाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बोला की...ओपन च्यायलेंज

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/18/2016 - 12:49 नवीन
बोला की...ओपन च्यायलेंज दिलेले भिडायला...भीतो का काय ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हड हड हड....

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/18/2016 - 13:14 नवीन
हड हड हड....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हडळ हडळ हडळ....

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/18/2016 - 13:20 नवीन
हडळ हडळ हडळ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जरा दया दाखव ग बाई ! आधीच हळव

इशा१२३
गुरुवार, 02/18/2016 - 13:13 नवीन
जरा दया दाखव ग बाई ! आधीच हळव मन झालय.लग्गेच कोनाडा मागायचे गळा काढायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

द्याच बै काय तो कोनाडा...

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/18/2016 - 13:15 नवीन
द्याच बै काय तो कोनाडा... खरंच बरं होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

किती निर्दय ग बै

पैसा
गुरुवार, 02/18/2016 - 13:23 नवीन
लहान पोरगं चिडून लाथा झाडायला लागलं की त्याला "अलेले शोन्या" म्हणतेस का "जा बस त्या कोपऱ्यात" म्हणतेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बस कोपर्‍यात नाही.. हड हड

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/18/2016 - 13:28 नवीन
बस कोपर्‍यात नाही.. हड हड म्हणतात आमच्यात.. फाजील लाड खपवुन घेतच नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मरतयं आता.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 02/18/2016 - 12:27 नवीन
मरतयं आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मजेदार

मूखदूर्बळ
गुरुवार, 02/18/2016 - 11:13 नवीन
मजेदार :)
  • Log in or register to post comments

आपण यांना पाहिलंत का?

स्मिता.
गुरुवार, 02/18/2016 - 13:37 नवीन
सगळे प्रतिसाद तर नाही वाचले पण अर्धे वाचताना 'आपण यांना पहिलंत का?' ची आठवण आली.
  • Log in or register to post comments

२५०

स्मिता.
गुरुवार, 02/18/2016 - 13:39 नवीन
माझा आधीचा प्रतिसाद २५०वा असल्याचं लक्षात आल्याने हा २५१वा खास माझ्या अभिनंदनाचा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे

मिंटी
गुरुवार, 02/18/2016 - 14:33 नवीन
यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. =)) =)) =)) मैय्या आता तुमा निलम ताईच म्हणणार..... ;)
  • Log in or register to post comments

फटके खाशील हां मिंटे =)) =))

यशोधरा
गुरुवार, 02/18/2016 - 14:53 नवीन
फटके खाशील हां मिंटे =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

खळ्ळं खट्याक!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 02/18/2016 - 15:37 नवीन
खळ्ळं खट्याक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=)) =)) =))

मिंटी
गुरुवार, 02/18/2016 - 15:49 नवीन
=)) =)) =)) धम्या आणि दामुला पण सांगते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

साडेसात वर्षे जुना आय्डी

तुषार काळभोर
गुरुवार, 02/18/2016 - 16:30 नवीन
२००९ नंतर पहिल्यांदा लेखन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

उल्लेख केलेली नावं बघता ताई

सूड
गुरुवार, 02/18/2016 - 16:48 नवीन
उल्लेख केलेली नावं बघता ताई जुन्या कंपूतल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हो. २००९ नंतर मिपापासुन लांब

मिंटी
गुरुवार, 02/18/2016 - 17:06 नवीन
हो. २००९ नंतर मिपापासुन लांब होते...म्हणजे प्रतिसाद वगैरे देत नव्हते... फक्त वाचनमात्र होते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपण तर आपली ओळख स्वत: करून

विवेकपटाईत
Fri, 02/19/2016 - 18:47 नवीन
आपण तर आपली ओळख स्वत: करून देतो, आमचे वय मानसिक अजूनही १०-१५ वर्षांचे आहे, आज हि वर्षातून एकदा तरी चिड़ियाघर बघायला जातो. (आत्ताच जाऊन आलो, उंदीर मांजरीची गोष्टीची प्रेरणा तिथलीच). टोम जेरी आणि शेरखान आपल्याला बुआ भारीच आवडतात.
  • Log in or register to post comments

बुआ इथे सर्वांनाच आवडतात हो.

प्रचेतस
Fri, 02/19/2016 - 19:02 नवीन
बुआ इथे सर्वांनाच आवडतात हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बुआ फुलांचि रांगोळि तर फार्रच छान काढतात ;))

होबासराव
Fri, 02/19/2016 - 19:05 नवीन
;)
  • Log in or register to post comments

बुवा भाजी पण खूप छान आणतात.

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 19:05 नवीन
बुवा भाजी पण खूप छान आणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

बुवा कविता पण खूप छान करतात,

प्रचेतस
Fri, 02/19/2016 - 19:11 नवीन
बुवा कविता पण खूप छान करतात, नव्हे बुवांना कविता खूप छान होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुआ यमकं पण फार छान जुळवतात.

सूड
Fri, 02/19/2016 - 19:18 नवीन
बुआ यमकं पण फार छान जुळवतात. त्यांचं इसवीसनपूर्व दुसर्‍या शतकात सातारा येथे केलंलं एक यमक तर फारच प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवांकडे कविलोकांसारखी एक

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 19:19 नवीन
बुवांकडे कविलोकांसारखी एक शबनम पिशवी आहे. एक लेदरची सॅक पण आहे. त्या सॅकचे बुवांना खूप कौतुक आहे. बुवांकडे दोन दोन स्मार्ट फोन आहेत. एकातून ते फक्त स्मायल्या टाकतात. बुवांची आल्टो ग्यासवर चालते.' ते कधी कधी पंपावर पण जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

क्काय बुवाबाजी लाव्लीये

टवाळ कार्टा
Fri, 02/19/2016 - 19:29 नवीन
क्काय बुवाबाजी लाव्लीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बरं झालं, तू आला, आता टकाबाजी

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 19:38 नवीन
बरं झालं, तू आला, आता टकाबाजी. टक्या कडे आधी एक अ‍ॅव्हेंजर होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्याला टक्कूमक्कूशोनू असेही

सूड
Fri, 02/19/2016 - 20:42 नवीन
त्याला टक्कूमक्कूशोनू असेही एक नाव होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तो एका ग्यांगमध्ये डॉन बनायला

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 20:45 नवीन
तो एका ग्यांगमध्ये डॉन बनायला गेला. रेस्ट इज हिस्ट्री म्यान....................जस्स्स्स फर्गेटिट यार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बुवांची आल्टो ग्यासवर चालते.'

होबासराव
Fri, 02/19/2016 - 20:05 नवीन
बुवांची आल्टो ग्यासवर चालते.' ते कधी कधी पंपावर पण जातात. बाकि वेळेस आल्टो कशावर चालते मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ग्यासवर

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 20:07 नवीन
ग्यासवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

बुवा त्यालाच सीएनजी खेचर

प्रचेतस
Fri, 02/19/2016 - 20:26 नवीन
बुवा त्यालाच सीएनजी खेचर असेही म्हणतात आणि ग्यासच्या लैनीतच त्यांना चारोळ्या पण सुचतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुवानि मध्यंतरि ति काहि तरी तांब्या चळवळ सुद्धा सुरु केलि होति

होबासराव
Fri, 02/19/2016 - 20:38 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

योग्य अनुयायी न मिळाल्याने

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 20:41 नवीन
योग्य अनुयायी न मिळाल्याने त्यांनी गुंडाळली ती चळवळ. आता फुलपात्र चळवळ. बॅनर आलेत प्रिंटिंगला माझ्याकडे. "डोन्ट बी मेष्पात्र, बी अ फुल्पात्र" अशी स्लोगन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

मुद्रा राक्षस विनोद चालणार नाही!

नाखु
Sat, 02/20/2016 - 09:16 नवीन
"डोन्ट बी मेष्पात्र, बी अ फुल्पात्र" अशी स्लोगन आहे.
फुल्पात्र" शब्द एकत्र लिहिणे कारण याचे विंग्लेश भाषांतर केलेले बॅनर सन होजे आणी ग्वाटे मारू येथे देणे आहेत. शिवाय इतरांना (वारंवार) शिका येतात तश्या बुवांना यमक्या येतात हा मुलभूत फरक लक्श्यात घेणे.
योग्य अनुयायी न मिळाल्याने त्यांनी गुंडाळली ती चळवळ.
काहींनी बुवांचाच तांब्याच पळवायचा प्रयत्न केल्याने बुवांची "पंचाईत" झाली म्हणून ती चळवळ बंद झाली अशीही जालीय वर्तुळात काही व्यक्ती आणी वल्लींच मत आहे. खखो बुवा आणी परम शिष्य जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुवा अ‍ॅक्टिवा मांडी घालुन चालवतात

होबासराव
Fri, 02/19/2016 - 19:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments

बुवा आल्टो पण मांडी घालून

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 19:14 नवीन
बुवा आल्टो पण मांडी घालून चालवतात. फक्त लोकांना दिसत नै मांडी घातलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

आणि डोळ्यांनी क्लच दाबतात?

आदूबाळ
Fri, 02/19/2016 - 19:44 नवीन
आणि डोळ्यांनी क्लच दाबतात? (अखियों से गोली मारे टैप?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोणाच्या डोळ्यांनी?

सूड
Fri, 02/19/2016 - 20:48 नवीन
कोणाच्या डोळ्यांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार,

गवि
Sat, 02/20/2016 - 10:04 नवीन
शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, पापभीरु, मनमिळाऊ, कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा बुवांचे अनेक दुष्टात्म्यांनी मार्केट स्टँड अप केलेले पाहून अगदी शेमच वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/20/2016 - 10:32 नवीन
शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, पापभीरु, मनमिळाऊ, कोणाच्या अध्यात ना मध्यात
नक्की आपल्याचं बुवांबद्दलचं बोलताय ना तुम्ही? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अता काय बरे बोलावे यावर..?!

गवि
Sat, 02/20/2016 - 10:41 नवीन
अता काय बरे बोलावे यावर..?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अता ते मी कसे सांगणार ब्रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/20/2016 - 10:46 नवीन
अता ते मी कसे सांगणार ब्रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा