✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

स
सनईचौघडा यांनी
Wed, 02/17/2016 - 13:19  ·  लेख
लेख
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
97858 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

काकू किसको बोली पियुडी...

विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 17:25 नवीन
काकू किसको बोली पियुडी... केजी का अभ्यास कर पेहेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

स.चौ. तुम्ही मला विसरलात पण

त्रिवेणी
Wed, 02/17/2016 - 17:04 नवीन
स.चौ. तुम्ही मला विसरलात पण मीच देते ओळख करुन- मी त्रिवेणी(वय-२५ वर्ष) सध्या राहणार-पुणे.
  • Log in or register to post comments

येणे प्रकारे

इरसाल
Wed, 02/17/2016 - 17:05 नवीन
वर प्रतिसादात आलेल्या यच्चयावत इस्त्री आयडीज ह्या फक्त आणि फक्त ५०+ इतुके वयवर्ष अस्लेल्या आहेत.........हुकुमावरुन ( मला हे माहित आहे खात्रीशीर रित्या)
  • Log in or register to post comments

त्रीवेणी न मी एकाच केजीत

पियुशा
Wed, 02/17/2016 - 17:07 नवीन
त्रीवेणी न मी एकाच केजीत शिकलोय ;)
  • Log in or register to post comments

पियुडे तुम्ही अजुन केजीतच

विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 17:08 नवीन
पियुडे तुम्ही अजुन केजीतच आहात की काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

नाही ग विश.. ती आता दुशली ब

मीता
Wed, 02/17/2016 - 17:10 नवीन
नाही ग विश.. ती आता दुशली ब ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

अय्यो पास झाल्या पण केजी ;)

विशाखा राऊत
Wed, 02/17/2016 - 17:26 नवीन
अय्यो पास झाल्या पण केजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

@ इरसाल : चुकताय तुम्ही.. ६०+

मीता
Wed, 02/17/2016 - 17:08 नवीन
@ इरसाल : चुकताय तुम्ही.. ६०++ असं पाहिजे आहे ते ...
  • Log in or register to post comments

आयाम

इरसाल
Wed, 02/17/2016 - 17:19 नवीन
आयाम भेरी भेरी सारी मिता तै !!!! ६०+ तर ६०+ काय जाते ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

काय ती हौस लोकांना अंदाज

स्वामी संकेतानंद
Wed, 02/17/2016 - 17:16 नवीन
काय ती हौस लोकांना अंदाज बांधण्याची!! नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा मेरी कमेंट ही मेरी पह्चान है, गर समझ आए
  • Log in or register to post comments

तुम्ही...

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 17:20 नवीन
तुम्ही... उंच.. बारिक.. चष्मा.. रंग उजळ.. मिश्किल भाव असलेला चेहरा.. थोडा गबाळा अवतार.. केस वाढलेले (हिप्पी नाही, पण अगदी चापुन चोपुन टाईप पण नाही..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

नशीब वयाचा अंदाज नाही मांडला!

स्वामी संकेतानंद
Wed, 02/17/2016 - 17:37 नवीन
नशीब वयाचा अंदाज नाही मांडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिरे तु जवळ्जवळ खर वर्णन

प्रीत-मोहर
Tue, 06/21/2016 - 15:37 नवीन
पिरे तु जवळ्जवळ खर वर्णन दिलय्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अंगावर भगवी कफनी,

महासंग्राम
Tue, 06/21/2016 - 15:27 नवीन
अंगावर भगवी कफनी, बारीक केलेलं केस, डोळ्यांवर बारीक गोल काड्यांचा चष्मा एका हातात रुद्राक्षाची माळ , तर दुसर्या हातात अँड्रॉईड वर मिपा सुरू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

आजवर भेटलेले आणि फोटोत दिसलेल्या

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 17:17 नवीन
मिपाकरांपैकी एकही अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. अजया, अत्रंगी पाऊस, स्पार्टाकस, आनंद मोरे, प्रास, विमे, मृत्युंजय, मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे एवढ्या मिपाकरांना प्रत्यक्षात भेटलोय. फोनवर क्लिंटन (आता गॅरी ट्रूमन), विजुभाऊ, नाद खुळा, विशाल कुलकर्णी, मुक्त विहारी, सुबोध खरे, उमा@मिपा आणि विशाखा पाटील एवढ्यांशी बोललोय. रामदासना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही पण एका सेमिनारमध्ये प्रेक्षक म्हणून होतो. फोटो ब-याच जणांचे पाहिलेत. अगदी शंभर टक्के अपेक्षेप्रमाणे असलेले म्हणजे बॅटमॅन आणि कॅप्टन जॅक स्पॅरो.
  • Log in or register to post comments

तुमचे वय ४०, कायदे पन्डीत

कविता१९७८
Wed, 02/17/2016 - 21:57 नवीन
तुमचे वय ४०, कायदे पन्डीत असावेत असा अन्दाज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

वय बरोबर आहे, कायदेपंडित

बोका-ए-आझम
Wed, 02/17/2016 - 23:13 नवीन
वय बरोबर आहे, कायदेपंडित नाहीये पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

|||मिपाकरांपैकी एकही

Anand More
गुरुवार, 02/18/2016 - 14:50 नवीन
|||मिपाकरांपैकी एकही अपेक्षेप्रमाणे दिसत नाही.||| अश्या अपेक्षा तरी काय आहेत तुमच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सचौ, सद्ध्याच्या धुमाळीवाल्या

यशोधरा
Wed, 02/17/2016 - 17:24 नवीन
सचौ, सद्ध्याच्या धुमाळीवाल्या धाग्यांमधून हा एक हसायला लावणारा धागा काढल्याबद्दल थ्यांक्यूच थ्यांकू!
  • Log in or register to post comments

हा ना. मल्टीप्लेक्सातल्या

अभ्या..
Wed, 02/17/2016 - 17:27 नवीन
हा ना. मल्टीप्लेक्सातल्या नुसत्या एका बटनावर टनाटना उडणार्‍या पापकारणाची आठवन झाली. आजकाल मज्जा येते ब्वा. एक बटन आणि टनाटना लाह्या, धागे भरुन खरडफळाभर पसरतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=)) काय त्या उपमा! भारीये!

यशोधरा
Wed, 02/17/2016 - 17:32 नवीन
=)) काय त्या उपमा! भारीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त धागा!

भाते
Wed, 02/17/2016 - 17:42 नवीन
दोन वर्षांपुर्वी पैसाताईने एका धाग्यावर प्रतिसादात सांगितले होते कि 'एक सोडून बाकी सगळ्या मिपा बायका तिशीच्या आतल्या आहेत.' आता ती एक कोण ते विचारू नका. दोन वर्षांपुर्वी तीस म्हणजे आता… जाऊ दे. खखोदेजा.
  • Log in or register to post comments

आँ?

एस
Wed, 02/17/2016 - 17:49 नवीन
म्हणजे 'मिपा बायका' हा शब्द दोन वर्षांपूर्वीच शोधला गेलाय? आणि तोही लाटकरांकडून नाही? काय सांगता काय? बुडाली बघा संस्कृती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

अशी कशी बुडते मेली सारखी,

सूड
Wed, 02/17/2016 - 18:09 नवीन
अशी कशी बुडते मेली सारखी, पोहायला शिकवा ना तिला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 17:53 नवीन
सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन "वणवा" पेटवलेला आहे... ;) का कुणास ठावुक हा आयडी कुठल्या कट्ट्यात भेटलाय का ? बाकी पिरा आरती मध्ये दंबुक शब्द वापरलेला पाहुन गडी पार मुरलेला वाचक आहे हे मात्र अगदी खात्रीने सांगु शकतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
  • Log in or register to post comments

सचौ म्हणजे पम्या हो...

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 18:01 नवीन
सचौ म्हणजे पम्या हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सचौ म्हणजे पम्या हो...

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 18:08 नवीन
सचौ म्हणजे पम्या हो... अरे हो... च्यामारी हे आयडी बदलली मंडळी ओळखणे कठीण होत चाललयं हल्ली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

महा लोल धागा =))

बॅटमॅन
Wed, 02/17/2016 - 18:02 नवीन
महा लोल धागा =)) बाकी
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
ठ्ठो =)) =)) =)) अगदीच अ‍ॅक्युरेट बरं का =))
  • Log in or register to post comments

हो हो.. तुला वाटणारच!!

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 18:06 नवीन
हो हो.. तुला वाटणारच!! पण मी तुझ्यापेक्षा सुद्धा लहान आहे ह्याचा लिखीत पुरावा आहे माझ्याकडे..!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शारीरिक वय काही असो, माणशिक

बॅटमॅन
Wed, 02/17/2016 - 18:11 नवीन
शारीरिक वय काही असो, माणशिक वय काकूबाईइतकेच आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 18:22 नवीन
हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ तरुण हं..! अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, हसतमुख, मिश्किल, एझी गोईंग, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला तरूण... जा खुश रहा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी एव्हरग्रीन, फ्रेश,

बॅटमॅन
Wed, 02/17/2016 - 18:25 नवीन
अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, हसतमुख, मिश्किल, एझी गोईंग, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला तरूण...
सत्य वर्णन केल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

निरागस पण अ‍ॅडवा मग!

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 18:28 नवीन
निरागस पण अ‍ॅडवा मग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

बॅटमॅन
Wed, 02/17/2016 - 21:14 नवीन
अगदी अगदी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/17/2016 - 22:02 नवीन
पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट खोट्ट का होईना एकमत झालेलं पाहुन ड्वॉळे पाणावले, उर भरुन आला, नाक सुर्सु...असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुझं वय १२, काम : आईने दिलेला

स्रुजा
Wed, 02/17/2016 - 22:07 नवीन
तुझं वय १२, काम : आईने दिलेला रुमाल घेऊन न जाणे आणि मग नाक सुंसुं करत बसणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

३८ वर्षांनी ल्हाने

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/17/2016 - 23:48 नवीन
३८ वर्षांनी ल्हाने तुझ्यापेक्षा =)) दॅट काउंट्स =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

तुम्ही टोर्टूगारिष्ट घ्या बघू

बॅटमॅन
गुरुवार, 02/18/2016 - 12:00 नवीन
तुम्ही टोर्टूगारिष्ट घ्या बघू कप्तानसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या धागाकर्त्याचे मनपुर्वक आभार

एक एकटा एकटाच
Wed, 02/17/2016 - 18:07 नवीन
सगळ्या मिपाकरांची ही आगळी वेगळी "अंदाज ओळख" आवडली. इतरांचे वयाचे अंदाज काहीही असोत पण मनाने मात्र सगळे मिपाकर हे अजुनही अवखळ तारुण्यातच आहेत. ही गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी. एका चटपटीत मिसळी प्रमाणेच काहीसे आंबट गोड तिखट झणझणीत सगळ्या मिपांकराना माझ्या शुभेच्छा जियो मिपाकर
  • Log in or register to post comments

Swara collegegirl

प्रीत-मोहर
Wed, 02/17/2016 - 18:37 नवीन
Swara collegegirl Swami ६५ cha mhatara
  • Log in or register to post comments

अरेरे ....

शान्तिप्रिय
Wed, 02/17/2016 - 18:43 नवीन
अरेरे .... या अवखळपणापासून वाचलो मी. बरे झाले फोटो देउन टाकला दोन धाग्यात. त्या फोटो देण्याच्या घट्नेमुळेच हे महाभारत घडले असावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

अरे काय हे! एका दिवसात २००

शब्दबम्बाळ
Wed, 02/17/2016 - 19:17 नवीन
अरे काय हे! एका दिवसात २०० कडे वाटचाल... हल्ली डबल सेन्चुरी पण सहज होऊ लागलीये... एक से एक फलंदाज फोर्म मध्ये आहेत! :)
  • Log in or register to post comments

श्रीगुरुजी : ३५-४० वय, कपाळी

sagarpdy
Wed, 02/17/2016 - 20:32 नवीन
श्रीगुरुजी : ३५-४० वय, कपाळी केशरी टिळा, पांढरा शर्ट, खाकी पँट, दुचाकीवर स्वार आणि डोक्यावर हेल्मेट नाही.
  • Log in or register to post comments

२०० झाले !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/17/2016 - 20:36 नवीन
२०० झाले ! सनईचौघडा वाजवा रे वाजवा !
  • Log in or register to post comments

हा हा हा..खूप भारी वर्णने.

पिशी अबोली
Wed, 02/17/2016 - 20:51 नवीन
हा हा हा..खूप भारी वर्णने. सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले.. सनईचौघडा हे डोक्यावर पांढरी टोपी घालून गाल फुगलेले काळ्या वर्णाचे दिसत असतील असं वाटून गेलं.. ;)
  • Log in or register to post comments

आणि तोंडात बिडी... नाय, नाय,

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/17/2016 - 21:02 नवीन
आणि तोंडात बिडी... नाय, नाय, आपले ते... सनई, नै का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

चांगलंय !!

खटपट्या
Wed, 02/17/2016 - 22:07 नवीन
चांगलंय !! अशीच मापं काढत फीरा पम्याभौ !!
  • Log in or register to post comments

लेखात नाव नं टाकल्याबद्दल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/17/2016 - 22:08 नवीन
लेखात नाव नं टाकल्याबद्दल कचकुण णीषेध.
  • Log in or register to post comments

आयडी झाले,

एस
Wed, 02/17/2016 - 23:17 नवीन
आता डुआयडींची वर्णने करा!
  • Log in or register to post comments

मोगा,

भंकस बाबा
गुरुवार, 02/18/2016 - 00:17 नवीन
सडपातळ, केस उडालेले, टिपिकल मध्यमवर्गीय , नेहमी फॉर्मलमधे, अगदी डिट्टो दिलीप प्रभावळकरसारखे, पण हो रस्त्याने चालताना मागून कोणीतरी गचांडी धरील असा भाव तोंडावर बाळगणारे.४५ ते ५० वय संदीप डांगे, स्थूलपणाकडे झुकणारे, चश्मा तो पण चन्देरी किंवा सोनेरी काडयाच्या , हाफ शर्ट जीन्स पैन्ट, ३५ ते ४० वय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा