Skip to main content

रश्श्याचे नामकरण

लेखक भिंगरी यांनी बुधवार, 23/07/2014 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला. अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'अंगापुरता रस्सा' 'थपथपित 'दाटसर' 'जाडसर' असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

वाचने 13440
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य. अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

In reply to by प्यारे१

@पळीसांड>>>. *ROFL* अरे काय चाल्लय काय !? शब्दांची अशी हेळसांड योग्य नव्हे! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

ठीके. पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

In reply to by टवाळ कार्टा

नो पर्सनल सजेशन्स प्लिज. बा द वे तुम्ही येणार का 'जॉईन' व्हायला? ;) -टवाळाशी टवाळ ;)

सरभरीत रस्सा, असं माझी आई म्हणते, बाकी लबलबित म्हणजे ओवरकुक्ड वांगे, चिकन इत्यादी इत्यादी.

धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

In reply to by पक्या

आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.
दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

रस्स्स्स्स्स्स्स्स्स्सा किती पातळ आहे त्यावरुन मधील स वाढवत जावा

अरेच्च्या, मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

In reply to by श्रीगुरुजी

या रश्श्याला "थुलथुलीत" हे नाम कसे वाटते? >>> अंहं ...थुलथुलीत हा शब्द ठेरीलाच शोभुन दिसतो *biggrin*

दाटसर, जाडसर पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......