मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रश्श्याचे नामकरण

भिंगरी · · काथ्याकूट
आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला. अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'अंगापुरता रस्सा' 'थपथपित 'दाटसर' 'जाडसर' असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

वाचने 13412 वाचनखूण प्रतिक्रिया 37

प्रभाकर पेठकर Wed, 07/23/2014 - 01:41
कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य. अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 07/23/2014 - 12:18
ठीके. पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

अधिराज Wed, 07/23/2014 - 10:14
धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

In reply to by पक्या

वामन देशमुख Wed, 07/23/2014 - 11:40
आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.
दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

सुबोध खरे गुरुवार, 07/24/2014 - 09:54
अरेच्च्या, मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

राही Fri, 07/25/2014 - 14:22
दाटसर, जाडसर पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......