Skip to main content

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 15/02/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का? कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि. किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल. एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल . - कळावे आणि कळ्वावे मी शान्तिप्रिय! (प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17878
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

In reply to by सूड

तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!! एकदम खरी गोष्ट... उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच. कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही. बाद्वे, नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही. डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.

In reply to by मुक्त विहारि

उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत? घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P

In reply to by मुक्त विहारि

आणि इतकं छान छान ते नंदी पॅलेस असूनसुद्धा तुम्ही शेवटी त्या "श्रीखंडाच्या पाण्याचीच" आठवण काढता की नै?

In reply to by यशोधरा

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत. अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच. वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने. पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो... तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.

In reply to by मुक्त विहारि

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील! तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.

In reply to by यशोधरा

आणि मागून उग्गाच गळे काढतील! होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.) "हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही." काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)

In reply to by मुक्त विहारि

त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या... पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.

In reply to by मुक्त विहारि

अगदी खरंय मुविकाका. आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))

In reply to by प्रचेतस

पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन. या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?

In reply to by पैसा

सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!

In reply to by यशोधरा

तुम्हीही या की पिंचिकरांच्या पार्टीला. उगीच पिंचि पुण्याजवळ आहे म्हणून वयं पञ्चाधिकं शतम् करु नका.

In reply to by गवि

आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!

In reply to by मुक्त विहारि

पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे पितात हेच यातुन सिद्ध झाले. श्रीखंड पुण्यात वेगळे मिळते. त्यात केशर वेलदोडा नसेल तर ते आम्ही गोड दही म्हणुन खातो. असो. एक धागा काढलाय मागेच. सारखे सारखे एवढे मोट्ठाले धागे नाही हो काढता येत. तुम्ही या एकदा पुण्याला, तुम्हाला तुमच्या त्या डोंबिलीपेक्षा उत्तम खायला घालतो (पैसे तुम्ही द्यायचे हो. पुणेकर स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी (देखील) पदरच्या पैशाला तोशीष देत नाही हो)

In reply to by मृत्युन्जय

ये कुछ बात नाही हुई. मुंबईला या. कट्टा करू. खर्च हि आम्ही देऊ. मित्रांसाठी काहीही. हा का ना का.

मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे प्रवास वगैरे ठिकाणी भेटलेल्या नवीन लोकांशी बोलायला फार आवडते.काला घोड्याला एक नवीन ओळख झाली.हॅाटेलकेंद्रित कट्टा आवडत नाही हे स्पष्ट मत. छंदकेंद्रीत आवडतो.

In reply to by कंजूस

आम्ही मिपाकरांना भेटायला जातो. हॉटेल तर फक्त भेटण्याचे ठिकाण आहे. कुणाला हॉटेल मध्ये साग्रसंगीत कट्टा आवडतो, तर कुणाला रमत गमत केलेला काळा घोडा कट्टा.तर कुणाला बागेत, तर कुणाला लेणी बघत. कट्ट्याच्या उत्सवमुर्तीला, जे ठिकाण आवडते, तिथे जमायचे. आम्हाला लेण्यांपासून ते समुद्र किनार्‍या पर्यंत कुठलेही ठिकाण चालून जाते. शक्यतो घरी नको, बंधने जास्त येतात.बोलतांना विषयाला धरून बोलल्या जातेच असे नाही आणि विषय जर "विषयाकडे" वळला तर, भलतीच पंचाईत होते.

पियुष म्हणजे तेच का ते श्रीखंडाचा ड्बा धुतलेले पाणी कि काय असते असे म्हणतात तेच ना ?

नेहमीप्रमाणे धागा भरकटल्यामुळे मला पण एक पिंक टाकायचा मोह आवरत नाही :) का हो, शान्तिप्रिय, ओम शांती ओम मधील शांतीप्रिया (दिपिका) तुमची नक्की कोण म्हणायची? ह.घ्या.हे.वे.सां.न.ला (ओम शांती ओम बघितलेला) ट्रुमन

कट्ट्यांबद्दल धागे काढणे वैकल्पिक असावे. त्या त्या भागातिल मिपाकरांनी एक्मेकांना व्यनि पाठवून किंवा/आणि फोन वगैरे करुन कट्टा यशस्वी करुन मिपावर फोटोसहित व्रुत्तांत द्यावा. हे बरे.

In reply to by सूड

सुडोबा धागाकर्त्याने (आय्डी) नावाबद्दल्चा अभिप्रेत अर्थ सोदाहरण स्पष्ट केला आणि मिपाकरांची गम्मत केलेली दिसतेय !!!

In reply to by शान्तिप्रिय

त्या त्या भागातिल मिपाकरांनी एक्मेकांना व्यनि पाठवून किंवा/आणि फोन वगैरे करुन कट्टा यशस्वी करुन मिपावर फोटोसहित व्रुत्तांत द्यावा. हे बरे. सर कोण आहे तुमच्या भागात ;) करा बॉ मग कट्टा यशस्वि.

१००

तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. मिया खत का मज्मुन भाप लेते है हुम लिफाफा देखकर :) तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद आलेला दिस्तोय :) एन्जोय द कट्टा..

हात त्येजा.... जल्ल्या येवड्या प्रतिक्रिया आनि ठरला कायच नाय. येवड्यात दोन कट्टे करुन झोपलो असतो. काय ता ठरवा ठरवा