Skip to main content

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

लेखक चेक आणि मेट यांनी गुरुवार, 11/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59636
प्रतिक्रिया 331

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

स्वतंत्र काश्मीरची मागणी सर्वप्रथम करणारे शेख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्स चे संस्थापक. राजा हरिसिंग काश्मीर वाचवा म्हणुन दाती तृण धरुन आलेले असताना केवळ शेख अब्दुल्लांची भारताबरोबर विलीनकरणाची तयारी नाही म्हणुन नेहरुंनी काश्मीर च्या विलीनकरणावर निर्णय घ्यायला उशीर केला. शेवटी शेख अब्दुल्लह नी नेहरुंवर उपकार केल्यासारखे एका चिटोर्‍यावर सशर्त सहमती दर्शवल्यावरच विलीनकरण मान्य झाले आणि काश्मीरला सैन्य गेले. या प्रकारात एक तृतीयांश काश्मीर कायमचा हातुन गेला. या नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती करावी का मग? दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीर मध्ये पीडीपी किंवा एनसी यांना वगळुन सरकारच बनवता येत नसेल तर इतर सर्व पक्षांनी मूग गिळुन गप्प बसावे का ? भाजपा च कशाला, कॉम्ग्रेसने देखील त्यांना हाताशी धरलेले नाही का? एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही. आज काश्मीरचे दुर्दैव असे की फुटीरतावाद्यांना चुचकारायला लागत आहे. हे लोण इतर देशामध्ये पोचण्याआधी आणि इतर सर्व देशात हीच परिस्थिती उद्भवण्याअधी इतरत्र असल्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जे करणे गरजेच आहे ते सर्व करावे. अन्यथा काश्मीरसारखे भारत विरोधी आणि पाकिस्तानसमर्थक झेंडे सगळ्या देशात दिसु लागतील. जे काश्मीरमध्ये करता येत नाही ते देशात इतरत्र पण करु नये असे म्हणण्यात काहिच हशील नाही (तुम्ही असे म्हणत आहात असे मी म्हणत नाही आहे)

In reply to by मृत्युन्जय

एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही.

In reply to by मृत्युन्जय

एक अपरिहार्यता म्हणुन दुर्दैवाने त्या दोन पक्षांना हाताशी धरावे लागत असेल तर तसे करण्यामुळे ते त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासारखे होत नाही. कोणती अपरिहार्यता? जे देशात करु शकतो ते कश्मिरमधे का नाही हाच सवाल आहे. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला. कुठवर त्यांची मढी काढकाढून आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालणार आहोत आपण? कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान. आधीच्यांच्या बोटचेपे धोरणाला कंटाळून आम्ही भाजपाला निवडुन आणलं, यांनीही तेच केलं तर मग पार्टी विथ डिफरंस व एक के बदले दस सर चं काय झालं?

In reply to by तर्राट जोकर

अपरिहार्यता ती हीच की काश्मिरात विष खोलवर पसरले आहे. जर शरीरात विष पसरायची सुरुवात असेल तर एखादे बोट कापुन समजा काम होणार असेल तर काश्मीर मध्ये ते विष नसानसात भिनते आहे. किती जणांना आत टाकणार? तिकडे ही कारवाई करायची हे एवढे सरळ काम असले असते तर मोदी सरकारने एव्हाना केले असते. दुसरी गोष्ट म्हणजे मला नाही वाटत की काश्मीर मध्ये केंद्र सरकार आणीबाणी लागू करु शकते. आणीबाणीसदृश्य परिस्थिती तर तिथे १९९० पासुन आहेच. अब्दुल्ला, चाचा जाऊन जमाना झाला खरे पण त्यांची पापे अजुनही फेडायला लागत आहेत. कलम ३७० रद्द करायची इच्छा भाजपाला नक्की आहे पण सध्याच्या सामाजिक परिस्थितीत एका सकाळी उठले आणि कलम ३७० रद्द केले इतकी सोप्पे गोष्ट नाही ती. हळु हळु करतीलच. ते केले जरी तरी लोकांच्या मनातील विष असे सहजासहजी नाही काढुन टाकता येणार. कश्मिरी पंडितांना पळवले ना त्यांनी, मग त्यांना पळवा, जमिनित गाडा, भिरकावुन द्या आकाशात. करा संपुर्ण स्वच्छता अभियान. याला थोडीशी जेनोसाइड ची झाक येते आहे का? कारण इतका घाऊक संहार केला तर त्याला वांशिक संहाराचे लेबल लावण्यात येइल. जितक्य्या शांतपणे हा घाऊक ब्रेन वॉश झाला आहे तितक्याच शांतपणे मतपरिवर्तन करावे लागेल. थोडाफार बडगा उगारता येइल पण अचानकपणे अशी घाऊक कारवाई करण्याची तिथली परिस्थिती नाही. एक के बदले दस सर चं काय झालं? हे धोरण तर ठेवावेच. पण एक के बदले दस सर करताना आपण चुकुन निरपराधांचा बळी घेत नाही ना हे देखील बघायला हवे. त्यामुळेच काश्मीरमध्ये हे सरसकट करता येत नाही. तसेही भारताची राज्यघटना नागरिकांचे शिरकाण करायाला परवानगी देत नाही. कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे. कोणती अपरिहार्यता? सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे. आता कं क्रवे ब्रे?

In reply to by मृत्युन्जय

हीच खरी ज्ञानबाची मेख आहे आमच्या मते, साधारण एक वर्ष अगोदर पर्यटनासाठी कश्मीर फिरणे झाले आहे तिथे आमची खेचरे वळणारा पोऱ्या हा चक्क सिम्बायोसिस मधुन व्यवस्थापन स्नातकोत्तर पदविका घेतलेला होता! त्याला खेचरे वळण्या संबंधी विचारता म्हणाला 'यहाँ स्पेशल रह सकते है जनाब कौन रॅट रेस में शामिल होगा' सामान्य कश्मीरीची मानसिकता दर्शवणारे वाक्य आहे ते! लवकरात लवकर रद्द व्हावे अन ते पहायला आम्ही जिवंत असावे अशी एक आस आहे मनात

In reply to by मृत्युन्जय

कायद्याची चौकट पाळावी लागते जशी ती जे एन यु च्या केस मध्ये देखील पाळावी कागेल, लागते आहे आणि पाळली जात आहे. >> वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. सगळ्या पक्षांच्या खासदारांच्या संख्या बघा तिथे. कुठले पर्म्युटेशन काँबिनेशन चालु शकेल सांगा ब्रे. >> गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही.

In reply to by तर्राट जोकर

वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला. देशातले सगळे अतिरेकी डाव्यांनी पोसलेले गुंड आहेत किंवा सगळे मुसलमान अत्तिरेकी आहेत या वाक्यांना जितका अर्थ आहे त्याहुन कमी अर्थ आहे तुमच्या बोलण्याला. त्यामुळे त्याची फारतर गंमत वाटु शकते. त्याहुन या प्रतिसादाला फार किंमत नाही. गुड. मग इतरांच्या कोअलिशनला शय्यासोबत म्हणण्याचा अधिकार उरत नाही. डिपेंड्स. परिस्थितीवर अवलंबुन आहे ते. भाजपाच्या राष्ट्रवादीच्या संबंधांना आम्ही शय्यासोबतच म्हणतो. काय आहे ना आम्ही आंधळा द्वेष किंवा आंधळी भक्ती जोपासु शकत नाही. लालू - नितीश - रागा ही एक अशीच (त्याहुन घाणेरडी) शैय्यासोबत आहे.

In reply to by मृत्युन्जय

वकिलांच्या वेषातले भाजपचे गुंड कोर्टाच्या आवारात कायद्याची चौकट पाळतांना बघत आहोत. असा कुठलाही पुरावा समोर आलेला नसताना असे म्ह्णणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा झाला. >> मृत्यूंजय सर. आपल्या विधानाचा अर्थ काय घ्यावा? शब्दफोड करुन सांगा. नेमक्या कुठल्या शब्दाबद्दल आपण खोटारडेपणाचा आरोप केला आहे? आपण बातम्या बघतच असाल.

In reply to by तर्राट जोकर

वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?

In reply to by मृत्युन्जय

अजूनही कळले नाही तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे. खालील कुठले वाक्य तुम्हाला खोटारडेपणा वाटते. १. वकिलांनी कन्हयाकुमारला कोर्टाच्या आवारात मारपीट केली. २. मारपीट करणारे हे वकिल भाजपचे कार्यकर्ते आहेत. ३. कायदा हातात घेणार्‍यांना गुंड म्हटले जाते. असो. त्याच वकिलांचा कबुलीजबाबही बघून घ्या. ते स्वतःचा थापा मारत आहेत असे म्हणू नका म्हणजे झाले. आपल्या आवडत्या पक्षाला कुठपर्यंत सांभाळाल, सर? http://aajtak.intoday.in/story/sting-operation-patiala-house-accused-la…

In reply to by तर्राट जोकर

वकीलांनी हल्ला केला ही बातमी आणि ते भाजपाचे गुंड होते ही थापेबाजी. आता या थापेबाजीबद्दल कं क्रवे ब्रे?

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही सग्ळे म्हणजे कोण? साचा म्हणजे काय? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय" हा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत नाही काय? नाही कारण काही दिवसांपुर्वी "काही मतिमंद आयडी" असे जनरल विधान केलेले असताना (आणी ते कुणालाही स्पेसिफिक उद्देशुन लिहिलेले नसताना) ते तुम्हाला वैयक्तिक आणि सकलमिपाकरापमानकारक वाटले होते म्हणुन विचारतो.

In reply to by मृत्युन्जय

ज्या पद्धतीने उत्तर आलं आहे त्याला म्हणलो. मिपावर आपल्या आवडत्या पक्षाची खिंड लढवणारे सगळेच. तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही नसाल तर ते विधान तुम्हाला लागू नाही. वैयक्तिक तर अजिबात नाही. तसे वाटत असल्यास गैरसमज करुन घेऊ नये. तुम्ही सग्ळे असेच काड्यासारु आणि बेजाबदार ट्रोल्स आहात काय?

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी मोड? तुम्ही सगळे एकाच साच्यातून काढलेले असता काय?
आता हे काय नवीन? म्हणजे मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे आतापर्यंत इतरांना शोध लागले. पण माझ्या नावाचा एक मोड आहे हे आजच कळले.

In reply to by तर्राट जोकर

काश्मिरात "पाकिस्तान झिंदाबाद"च्या घोषणा किंवा आयसिसचे झेंडे बघून/ऐकून सवय आहे.JNU दिल्लीत आहे,आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो,दिल्ली भारताची राजधानी आहे,ज्या संसदेवर अफजलने हल्ला केला होता तीच संसद दिल्लीत आहे. आणि दिल्लीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा म्हणजे संपलं कि राव कि सगळं!! म्हणून दिल्ली आणि काश्मिर ही तुलना योग्य नाही.

In reply to by चेक आणि मेट

एका भूतपुर्व पंतप्रधानांचे फेमस वाक्य आठवले. -तिथे तर गवताचे पातेही उगवत नाही- असो.

In reply to by होबासराव

काश्मीरचे तीन भाग आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख. यापैकी काश्मीर खोर्यातून हिंदू लोकांचे पद्धतशीर शिरकाण करून किंवा त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले गेलेले आहे. यात सवतासुभा ठेवण्याच्या नादात काश्मिरी पंडितांनी पण आपले विशेष अधिकार सोडून देण्यास नकार दिला होता हे लक्षात घेतले पाहिजे. पण आता त्यांना काश्मीर खोर्यातून हाकलले गेल्यावर त्यांचे डोळे उघडले असले तरीही आपले विशेष अधिकार सोडून देण्यास ते आजही तयार नाहीत. काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे. पक्षीय दृष्टीकोनातून याचा विचार होऊ नये. (१९८४ ते १९८९ मध्ये श्री जगमोहन हे राज्यपाल कॉंग्रेस सरकारनेच नेमलेले होते ज्यांनी तेथे भरीव कार्य केले होते.) पी डी पी किंवा नैशनल कॉन्फरन्सचि सरकारे हि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असलेली असतात हि गोष्ट लपून राहिलेली नाही. जर आपले सरकार( युती असली तरीही) असेल विशेषतः त्यात गृह खाते हातात असेल तर गुप्त बातम्या, दहशतवादी लोकांच्या कारवाया याबद्दलची बित्तंबातमी तुमच्या कडे असू शकते आणि मग त्यामाहितीचा उपयोग केंद्र सरकार बरोबर चर्चा करून दहशतवादी कारवायाना आळा घालण्यासाठी उपयोग होतो. सरकार "त्यांचे" (पाक धार्जिणे) असेल तर पकडलेल्या दहशतवाद्याना न्यायालयात उभे करताना ढिसाळ चौकशी पुरावे देऊन ते सुटतील अशी "व्यवस्था करता येते/ केली जाते. काही वेळेस पोलिस किंवा इतर सरकारी खात्यातील लोक त्यांना धार्जिणे झाले तर त्यांची उचलबांगडी करावी लागते.आणि आपली "विश्वासू" माणसे अशा महत्त्वाच्या जागी असणे आवश्यक असते. म्हणून सरकार मध्ये सहभाग असेल तर त्याचा उपयोग होतो. यासाठी जरी तह करावा लागला तरीही हरकत नाही. साधनशुचिता आणि राष्ट्र कार्य यात काय महत्त्वाचे ते आपण ठरवणे आवश्यक असते. विषय फार मोठा गहन आहे आणि माझी त्याबद्दलची समज फारच तोकडी आहे म्हणून येथे थांबतो

In reply to by सुबोध खरे

अ‍ॅटलिस्ट मला तरी असे नाहि वाटत. कारण आपण मुद्दे अगदि योग्य तर्‍हेने मांडलेयत.

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे, उत्तम प्रतिसाद! परंतु खालील वाक्याविषयी पूर्ण सहमत नाही.
काश्मीर मध्ये "आपले"सरकार असणे का आवश्यक आहे हे मी विशद करतो आहे. आपले म्हणजे भारतीय "राष्ट्रवादी" पाकधार्जिणे नव्हे. मग ते कॉंग्रेस चे असो किंवा भाजप चे.
कॉंग्रेस तेथील सरकारमध्ये असेल तर तुम्ही ठेवता तशी अपेक्षा दहशतवाद्यांवरील कारवाईच्या बाबतीत ठेवता येत नाही. यापूर्वी २००२-२००८ या काळात काँग्रेस+पीडीपी या युतीचे सरकार होते व नंतर २००८-२०१४ या काळात काँग्रेसच्या पाठिंब्याने नॅकॉचे सरकार होते. या काळात दहशतवाद्यावरील कारवाईबाबत काँग्रेसचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. २००५-२००८ या ३ वर्षात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असूनदेखील दहशतवाद्यांविषयी फारशी कठोर कारवाई नव्हती. परंतु फेब्रुवारी २०१५ पासून भाजप+पीडीपी चे संयुक्त सरकार आहे. त्यात सभापतीपद व उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजपच्या सहभागामुळे पीडीपी पक्ष कसा नियंत्रणात राहिला याचे खालील लेखात वर्णन आले आहे. भाजपऐवजी कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर पीडीपीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसते व काँग्रेसने पीडीपीच्या कोणत्याच कृतींना विरोध केला नसता. भाजप व पीडीपीचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यावर सर्वांना प्रचंड धक्का बसला. दोन पूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेले पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले अशी टीका होऊ लागली. पीडीपी हा काहीसा पाकिस्तानकडे झुकलेला, भारतविरोधी, दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असलेला पक्ष तर भाजपची भूमिका याच्या बरोबर उलटी. परंतु जम्मू-काश्मिर राज्यातील सरकारमध्ये भाजप असणे हे पीडीपीवर म्हणजे पर्यायाने विभाजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळेच स्वतःच्या अटींवरच भाजप सरकारमध्ये सामील झाला. या लेखातील काही परिच्छेद - ________________________________________________________________ This time, Mufti started on the same lines and ordered the release of separatist leader Masarat Alam. Within a month, not only was the government forced to rearrest Alam, there was a stricter watch on separatists with the Public Safety Act invoked against more and more separatists and even minor protesters. _________________________________________________________________ The agenda of alliance said the partners would not rake up controversial issues — such as Article 370, and a separate state flag for Jammu and Kashmir. BJP leader Farooq Khan, in fact, challenged a J&K High Court decision that all constitutional authorities must respect and hoist the state flag. After the Mufti government issued a circular asking constitutional authorities to hoist the state flag on official cars and buildings, it had to retract within 24 hours. __________________________________________________________________ After the Muftis formed the PDP in 1999, Mehbooba was key to the rise that took the party to power within three years of its inception. She used a clever mix of mainstream and separatist politics, turning up among mourners for slain militants wearing a green abbaya, voicing her concern on human rights violations and seeking a resolution to the Kashmir issue through dialogue. The party advocated self-rule. Over the past nine months, Mehbooba was watching the results of 17 years of hard work slipping away. ____________________________________________________________________ जम्मू-काश्मिरमध्ये भाजप सत्तेत असणे का आवश्यक होते हे लेख वाचल्यावर लक्षात येइल. http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-…

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी आपण जरी म्हणालात कि कॉंग्रेस चे धोरण नरमाईचे होते तरिहि तेथे असलेले सनदी नोकर हे त्या ( काश्मिरी) सरकारचीच नव्हे तर केंद्र सरकारची पण मदत करीत होते. यामुळे आतील बातम्या केंद्र सरकार आणि लष्करी मुख्यालयाकडे येत असत. कितीही लष्कर एखाद्या भागात ठेवा आतील माहिती हि तेथील स्थानिक जनता आणि स्थानिक पोलिस / सरकारी नोकर/ शिक्षक यांना जास्त असते आणि आपत्कालीन स्थितीत हीच माहिती फार मोलाची ठरते. दुर्दैवाने UPA २ च्या काळात निर्णयशून्यता आल्याने परिस्थिती थोडी बिघडली हे खरे आहे. यास्तव जर लोकशाही सरकार असले तर "आपले" लोक तेथे सरकार मध्ये किंवा सनदी सेवेत असणे आवश्यक असते.

In reply to by चेक आणि मेट

तुम्ही प्रत्येक माणूस आपल्या विरोधात असल्याच्या थाटातच प्रतिसाद देता का हो महाराज? आपण अधोरेखित केलेली माझीच वाक्यं परत एकदा वाचाल का श्रीमान. मला सरकार ला विरोध करायचा नाहीये तर त्यांचा पक्ष उचलून धरताना अंगी नैतिक बळ असावे म्हणून आलेली ही उस्फुर्त कळकळ आहे. काथ्या भांडणाच्या आवेशात नका कुटु मालक. अन समोरचा काय म्हणतो आहे ते एकदा नीट लक्षात घ्या, मी मला हव्या असलेल्या नैतिक बळाबद्दल बोलतोय राजे. बाकी प्रश्नाला प्रतिप्रश्न वगैरे म्हणून ठीक आहे पण तीनशे सत्तर बद्दल विचारलेच आहेत म्हणून सांगतो की मला तीनशे सत्तर एक फुक्कट लाड वाटतो, तो लवकरात लवकर नल एंड वॉइड व्हावा असेही वाटते. पण सद्द्यस्थितीत त्या दिशेने काहीच दिसत नाहीये , काँग्रेस ते करणे अशक्यच होती कारण हरामखोरी अन काँग्रेसी असणे हा समानार्थी शब्द आहे फ़क्त बीजेपी ने त्या वाटेने जाऊ नये असे वाटते, नाहीतर सेना काय वाईट होती राव आमची! एकच बुलंद आवाज होता थोरल्या साहेबांचा! असो!.

In reply to by चेक आणि मेट

काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे. असाच "पाय" काँग्रेस, आप किंवा अजून एखाद्या पक्षाने पसरण्यासाठी अफजल गुरू ज्यांना जवळचा वाटतो अश्या पक्षाबरोबर युती केली तर चालेल का? उत्तर "नाही" असेल तर हे म्हणजे "हम करे तो प्यार, तुम करो तो बलात्कार" असं होइल.

In reply to by नाव आडनाव

हो चालेल.आणि यापुर्वी चालवूनही घेतले आहे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. फक्त बाकिच्यांनी JNU बाबत राजकारण करू नये हीच इच्छा आहे.

मोगा नावाच्या पाजी माणसाला तातडीने हाकलून द्यावे अशी मा संपादक मंडळला विनंती ! कुठे हुतात्मा आणि कुठे अतिरेकी .. अक्कल आहे का जागेवर ? धागा तातडीने संपादित करुन अशलाघ्य प्रतिसाद संपादित करावेत.

भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे आणि बाकि विरोधि पक्षानीं सिक्-ल्युरिझमचे. भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह हि घोषणा तेहि दिल्लि मध्ये...काय समजायचे

तिकडे मोगा कधीच हद्दपार झालाय, नवा ना सिर (ना पैर) बनुन आलाय. इथे पण तेच होणार.

In reply to by इरसाल

इथे त्यांनी कधीच "हद्द" पार केली आहे !! एखादा अअ‍ॅण्टी व्हायरस प्रोग्राम मिळेल का अश्या आय्डींसाठी ????? संगणक आज्ञावली वाल्यांसाठी आव्हान आणि आवाहनही !!!!!

मी नथुराम ..... नाटक कायमचे बंद होणार ..... आजचा मटा.

चला आता तुमचे आणि तुमच्या मांजरिचे दोघांचेहि भले होणार....दोघांनाहि जंता चा त्रास होता ना..तो बरा होणार.

भाजपा आमदाराची कोर्टाच्या आवारात मारहाण ! पत्रकार, विद्यार्थी , विरोधी नेते अशा सर्व देशद्रोह्यांना धडा शिकवला आहे. कायद्यावर विश्वास नसल्याने स्वतःच कोर्टाच्या आवारात जाउन न्यायदान केले आहे ! जय हो !

हेडली चा सारा जबाब जेव्हा अमेरिकेत साक्श दिलि तेव्हा वेब्साईट वर उप्लब्ध होता.ंमी तो वाचला आहे. त्यात त्याने इत्यंभुत माहिती दिलि होति - मुम्बईत रेकि कशि केलि, कुथे रुम्/ हॉटेल घेतलि वगैरे. आता आपन फक्त पोस्ट्मार्तेम करतोय जुन्या मढ्याचे . गिधाडाना ताजे मास चालत नसते. त्याना शिळेच आवडते कारन तेच पचते. असो तेव्ह्ढाच मेडियाचा टिआर्पी तर वाधेल. आणि निकम साहेबाना पुधच्यावर्शी एक पद्मश्री पक्कि. हा हा हा

"अफजलगुरू"जी म्हणे!!! . . काँग्रेस प्रवक्त्यांचं मुक्ताफळ! . देशद्रोह्यांना श्री,जी,साहब,अशी विशेषणे लावण्याचे काम काँग्रेसने घेतले आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

- ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर दिग्विजय सिंगांनी त्याचा उल्लेख 'ओसामाजी' असा आदरपूर्वक करून ज्या पद्धतीने अमेरिकेने समुद्रात त्याच्या मृतदेहाची वासलात लावली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. - सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत हाफिज सईदचा उल्लेख श्री. हाफिज सईद व हाफिज सईद साब असा आदरपूर्वक केला होता. - रणदीप सुरजेवालाने अफझल गुरूचा उल्लेख अफझल गुरूजी असा आदरपूर्वक केला. देशद्रोही व दहशतवादी हे नेहमीच काँग्रेस नेत्यांसाठी वंदनीय व आदरणीय राहिलेले आहेत.

कन्हैय्या कुमार (देशद्रोही) याचे संपूर्ण भाषण अटक होण्याअगोदर. अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>

In reply to by तर्राट जोकर

अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
तुम्हाला कोणी सांगितलं अटकेचं कारण हे भाषण आहे म्हणून? हा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आंदोलन करताना देशविरोधी घोषणाबाजी झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी अध्यक्षाचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला.

In reply to by चेक आणि मेट

डांगे....?????? बरे आहात ना चेकमेट? स्वतः डुआयडी असल्याने सगळेच डु आयडी आहेत असं वाटायला लागलंय काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक? मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते. मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.

In reply to by तर्राट जोकर

मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते.
Good Joke
काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक?
Better joke
मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.
Best joke उलटा चोर कोतवाल को डाटे

In reply to by चेक आणि मेट

yes. I am a joker. and you are crafted nuisance.

In reply to by चेक आणि मेट

@चेकमेट, तुमचे वाक्य बदलून घेतो, लॉजिक समजायला सोपे जाईल. हा माणुस राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि दंगे घडतांना निरपराधांची कत्तल झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला. पण मुख्यमंत्र्याला चौकशी समित्या बसवून आपली बाजू मांडण्याची संधी दिल्या गेली, कन्हैयाला मात्र कोर्टात जायच्या आत फटके बसले.

In reply to by तर्राट जोकर

तजो, कोणालाही ताब्यात घेण्यासाठी गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असणे हे महत्त्वाचे असते. या निकषावर नमो आणि ककु यांची बरोबरी होऊ शकत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by चेक आणि मेट

अहो अजून कोर्टात कनैह्या विरूध चार्ट शिट दाखल व्हायची आहे तेव्हा कोणत्या आधारावर दिल्ली पोलिसांनी त्याला आत टाकले आणि त्यांच्याकडे त्याच्या विरोधात काय पुरावे आहेत ह्या बाबत काहीही माहिती कुणालच नसतांना काही लोक सोयीस्कररीत्या फक्त विडीयो च्या आधारावर त्याची अटक झाली असा निष्कर्ष काढून मोकळी झाली . असो

In reply to by तर्राट जोकर

अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
खिक्क ! समजा हो , खुषाल समजा ! केन्द्रात सत्ताबदल झाल्याने अनेकांचा बाजार उठला आहे , नुसत्या आणिबाणी चे काय घेऊन बसलात ? होऊन जाऊ दे , काढा एक नवीन धागा -
देशात आणिबाणी सुरु झाली आहे का ?
शुभेच्छा !!!

In reply to by विटेकर

तुम्ही आता हसणारच. हेच इंदिराबाईंनी केले तेव्हा छाती पिटत होते लोक. जे लोक संघविरोधी आहेत त्यांना विनाकारण जेलमधे टाका, जे खरे देशद्रोही आहेत त्यांच्याशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसा. अशा वातावरणात जगायचे तर शुभेच्छांची गरज आहेच.

In reply to by तर्राट जोकर

हा भिकारचोट कान्ह्याया महिला आरक्षण खाजगी क्षेत्रातील आरक्षण याविषयी बोलताना संघाला दोष देतोय याला मुलायमसिंग लालूप्रसाद दिसले नाही काय ज्यांनी ते बिल रखडवले .मुलायम आणि लालू तर महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधातच आहे भाषा तर मायावतीची बोलतोय मनुवादी मनुवादी बोंबलतोय . ६० वर्षात कॉंग्रेस चे पाप नाही दिसले . जणू १ वर्षात या सरकारनेच व्यवस्था बदलली . जातीयवाद तर याच्यातच ठासून भरलेला आहे ब्राह्मणद्वेष सावरकरांबद्दल द्वेष तर भलताच दिसतोय या हल्कटला . १२४ (अ) हे संपूर्णपणे लागू होतेय याला त्याने उघड उघड आव्हानच दिलेय सरकारला भाषणामध्ये . वर अजून कसाब ला आणि अफजल ला स्पष्टपणे जस्टीफाय करतोय तो . कसला लाल सलामाची भाषा करत आहे . काय आहे ते रक्तरंजित क्रांती आणायचीय ? असे असेल तर सोराबजी पण तोंडघशी पडेल मग . शेवटी त्याने अंतस्थ हेतू उघड केलाच पुढच्या वर्षी निवडणुका आहेत विद्यापीठाच्या या गोष्टीचे भांडवल करून तोफांड करून त्याला प्रसिद्धी मिळवायचीय . नेतागिरी करण्यासाठीचा खटाटोप ,जो या बिहारी यु पी वाल्यांचा आवडता उद्योग आहे . दुर्दैव हे की असल्या हरामखोरांचे समर्थन इथले काही आय डी निर्लज्जपणे करत आहेत .

In reply to by तर्राट जोकर

हीच गंमत आहे सोयीनुसार सगळ्यांनी अटकेसाठी हे भाषण आहे असे स्वताचे स्वताच वाटून घ्यायचे तसे असते तर मोदींना अभद्र शब्द बोलणारा केजू तुरुंगात असता.

In reply to by निनाद मुक्काम …

हा हा. सोयीनुसार विचार करण्याची हिच गम्मत आहे. केजरीला हात लावू नाही शकत, लहान मुलांना दमदाटी करु शकतो.

आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन आहोत!!. नोकरशाही कडून काम करवुन घेणारा तो द्रष्टा नेता आहे एक. ती तड़फ तो वेग सर्वोत्तम आहे! फ़क्त हल्ली भक्तमंडळी डोक्यात जाते खुप. त्यांची चाय से केटली गरम वृत्तीच मोदींपुढला खरा धोका असल्याचे वाटते. बरेच दिवस अगोदर मोदींनी स्वतः भक्तांना "सोशल मीडिया वर बोलताना तारतम्य बाळगा, तोल ढळू देऊ नका" असे सांगितले होते. पण उन्मादी भक्त ते ही ऐकेना झालेत. काँग्रेसची शष्प औकात नाहीये आता उभी रहायची पण टंगड्या ओढायला आता गिरिराज सिंह अन आदित्यनाथ सारखी अंतस्थ माणसे अन बाहेर उन्मादी भक्त सज्ज आहेत! विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे बस प्रभु उन्हें अपने कुछ सांसद और भक्तोंसे बचाएं! असो!.

In reply to by नाना स्कॉच

नाना तुमच्या सगळ्या प्रतिसादाशि सहमत फक्त विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे हे सोडुन. एक मजबुत विरोधि पक्ष तर लागतोच अंकुश ठेवायला.

In reply to by होबासराव

खरे आहे तुमचे! पण असा विरोधीपक्ष कोण असणार?? माणसाचे मन बेटे फारच बेक्कार असते होबासरावजी, सत्ता सद्धया मोदी सोडुन दूसरे काहीच ऑप्शन नाहीये, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. फ़क्त ऑप्शन नाही हे त्यांना कळाल्यावर जर त्यांचे डोके फिरले (शक्यता शुन्य. एक अब्ज शुन्य एक इतकी धरता) तर देशाचे होत्याचे नव्हते होईल. सुदृढ़ जनतंत्र चालवायचे तर चेक्स एंड बॅलन्स चा तराजु हवाच, तुर्तास मात्र एक कर भरणार नागरिक ह्या रूपाने मला मात्र मोदी मोदी अन फ़क्त मोदी इष्ट वाटत आहेत हे खरे. अन त्या करा ची शपथ सांगतो, हा फेब्रुअरी महीना आहे बॉस, बजेट सत्र येते आहे, ते जेएनयु हेडली वगैरे सगळे कॅन वेट प्रथम पुर्ण लक्ष बजेट वर हवे, सामान्य माणुस आहे मी, अन घामाचा पैका कसा जाणार किंवा बचत होणार ह्याची निती जास्त महत्वाची आहे मला. बाकी सगळे चालत राहणार , हा फेब्रुअरी आहे अन बजेट महत्वाचे आहे. असो!

मी कधी कधी विचार करतो कि आपले सीमेवरचे जवान किती सहनशील आणि थंड डोक्याचे आहेत कि हे सर्व जे देशात चाललेय ते बघून त्यांना आपल्या बंदुका आतल्या दिशेने वळवाव्या वाटत नाहीत! असा विचार ते करत नाहीत कि या अशा लोकांच्या संरक्षणार्थ आपण इथे जीवाची बाजी लावून उभे आहोत! Shame on these ba****ds!!!

In reply to by विनायक पन्त

पंत साहेब असे विचार अनेक वेळेस माझ्या मनात आले होते. एक उदाहरण देत आहे. मी विक्रांत वर असताना जहाजाच्या मागच्या भागात श्री देवीलाल उप पंतप्रधान म्हणून आले होते. त्यांनी विक्रांतच्या हँगर मध्ये ठेवलेले विमाने ओढण्याचे tractor पाहिले आणी विचारले इथे शेती होत नाही तर या tractor वर खर्च कशाला. त्यांना नम्रपणे त्याचे कारण सांगितले गेले . नंतर त्यांच्या सन्मानार्थ जहाजाच्या क्वार्टर डेक वर मेजवानी ठेवली होती.हा भाग जहाजाच्या सर्वात मागे आणि फ्लाईट डेक च्याखाली असतो आणि तीन बाजूना समुद्र असतो.नौसैनिकांनी अर्धा दिवस खपून तो भाग स्वछ करून रंगरंगोटी करून सजवला होता. याच्या मध्यभागी एक फ्लाईट डेक च्या आधारासाठी लोखंडी खांब असतो. या खांबाला सजावट म्हणून निळे आणि पांढरे सुंदर कापड गुंडाळले होते. श्री देवीलाल यांनी पान खाऊन त्या सुंदर कापडावर "कोपरा" म्हणून आपली थुंकी टाकून त्याची माती केली. तीन बाजूना उघडा समुद्र होता आणि सर्व कोपर्यात कचर्याच्या कुंड्या ठेवलेल्या असतानाहि यांना अशी बुद्धी झाली.ते पाहून मला त्या मेजवानीतून निघून जावे असेच वाटले. दुर्दैवाने जहाजाचा मी एकटाच डॉक्टर होतो त्यामुळे तसे करणे मला नियमांमुळे शक्य नव्हते. यावर अनेक नौ सैनिकांनी त्याबद्दल आपली नाराजगी खाजगीत बोलून दाखविली. हि घाण नौसैनिकांना नंतर स्वतः साफ करावी लागली. स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा यांनी गिरवलेले नसावेत याचे आश्चर्य वाटले.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, श्री. देवीलाल यांच्या नवलकथा वाचून मन कसं प्रसन्न झालं. अशी माणसे ही आपल्या लोकशाहीची अमूल्य देणगी आहे. याचा आपणांस अजिबात विसर पडता कामा नये. आ.न., -गा.पै.