Skip to main content

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

लेखक चेक आणि मेट यांनी गुरुवार, 11/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59636
प्रतिक्रिया 331

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतातला स्व तंत्र नागरीक नाखु

In reply to by नाखु

प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली.
;)

शिंद्यांची मुलाखत... तत्कालीन गृहमंत्री म्हणतात की एन आय ए काय करत होते ते मला माहीत नव्हते (हेडलीची चौकशी केली जात होती).

In reply to by विकास

आता ते काखा वर करणारच. २००५-०६ मध्ये ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची त्यांनी आपला अधिकारात मुक्तता केली होती. त्याविरूद्ध खून झालेल्या व्यक्तिचे कुटुंबीय न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर ताशेरे ओढून त्याची मुक्तता रद्द करून त्याला परत तुरूंगात पाठविले होते. त्यावर पत्रकारांनी विचारल्यावर, "न्यायालयाच्या निर्णयावर मला काही बोलायचे नाही" असे विधान करून त्यांनी काखा वर केल्या होत्या. २००१-२००२ च्या सुमारास सोलापूरमधील काही मुस्लिम कुटुंबांच्या घरात सुमारे दीडशे गावठी बॉम्बचा साठा सापडल्यावर त्यांना पोटा/रासुका खाली अटक करण्यात आली होती. २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लगेच त्यांच्यावरील पोटा/रासुकाचे आरोप मागे घेऊन सौम्य आरोप ठेवण्यात आले व त्यामुळे त्यांना लगेच जामीन मिळाला होता. २०१०-२०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सनातन वर बंदी घालावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहखात्याला पाठविला होता. केंद्रीय गृहखात्याने बंदीसाठी पुरेशी सबळ कारणे नसल्याचे सांगून तो फेटाळला असे काही वृत्तपत्रात आले होते. पानसरेंच्या खुनानंतर एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक केल्यावर पुन्हा एकदा बंदीची चर्चा सुरू झाली. तेव्हा आपण केंद्रीय गृहमंत्री असताना असा कोणताच प्रस्ताव माझ्याकडे आला नाही असे सांगून शिंद्यांनी काखा वर केल्या होत्या. हा इतिहास लक्षात घेता वरील चित्रफितीत ते जे सांगताहेत ते अपेक्षितच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?

In reply to by नाव आडनाव

लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.

In reply to by मृत्युन्जय

लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम >> तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.>> जसे कन्हय्याकुमार?

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. जर त्यामुळे श्रीगुर्जींचे एखादे मत खोडले गेले असेल तर मला माहिती नाही. जसे कन्हय्याकुमार? कन्हय्याकुम्मार बद्दल असे काही वाटात नाही ब्वॉ. तो स्वतः च्या कर्मानेच अडकला आहे. पण इशरत जहा नावा च्या अतिरेक्याच्या एनकाउंटर मध्ये अनेक निर्दोष लोकांना या मार्गे अडकवायचा प्रयत्न झाला होता असे सध्या तरी निदर्शनास येते आहे.

In reply to by मृत्युन्जय

श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. >> वरिल प्रतिसाद कशासंदर्भात आहे ते तुम्हाला माहित नाही? वॉव. ज्यांची सत्ता असते ते कुणालाही अडकवु शकतात, सोडवू शकतात ह्यावर आपले मत काय>

In reply to by नाव आडनाव

तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?
(१) त्यांना २००३ मध्ये पकडले नव्हते. त्यांना ऑक्टोबर २००८ मध्ये पकडले आणि तेव्हापासून ते आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहेत. (२) त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद कागदोपत्री दाखल केली असल्याने आता त्यांच्यावरील खटला काढून टाकता येणे शक्य नाही. न्यायालयात खटला चालल्यानंतरच निकाल लागेल. (३) त्यांच्यावर मकोका लावल्याने व मकोकाखालील गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळू शकत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला असा निर्णय दिला आहे की मकोकाचा विचार न करता त्यांना जामीन मिळू शकतो का यावर निर्णय द्या. याचा निर्णय नजीकच्या भविष्यकाळात लागेल. (४) सद्यपरिस्थितीत त्यांच्यावर खटला चालून मगच निर्णय लागणे योग्य आहे. त्यांच्यावरील आरोप रद्द करून खटला रद्दबातल करून त्यांना मुक्त केले तर भाजपने तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" वाचविले अशी टीकेची झोड उठेल व भाजप तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" पाठीशी घालत आहे अशी भावना निर्माण होईल. तसेच या निर्णयाविरूद्ध अनेक कायदेपंडीत न्यायालयात दाद मागतील व न्यायालय सरकारचा निर्णय रद्द करू शकेल. त्यातून अजून गुंतागुंत निर्माण होईल. त्याऐवजी खटला चालणेच योग्य ठरेल. ते निर्दोष असतील तर सुटतील. जर गुन्हे सिद्ध झाले तर दहशतविरोधी कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी. (५) २००८ साली त्यांना मुद्दाम अडकविण्यात आले असे माझे मत आहे. २००९ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी मुद्दाम जाणूनबुजून हिंदूंना यात अडकविण्यात आले. सुरवातीला महाराष्ट्र एटीएस तपास करीत होते. नंतर एक एसआयटी नेमण्यात आली. काही महिन्यांनतर तपास सीबीआय कडे देण्यात आला. नंतर पुन्हा एक एसआयटी नेमण्यात आली. काही काळाने एनआयए कडे तपास देण्यात आला. प्रत्येकवेळी एका नवीन तपासयंत्रणेकडे तपास देऊन त्यांना नवीन धागेदोरे मिळाले आहेत असे न्यायालयात सांगून त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्याचे टाळले गेले. आतापर्यंत काय पुरावे मिळाले आहेत याची कोठेही वाच्यता केलेली नाही. सुरवातीच्या काळात कर्नल प्रसाद पुरोहितांबद्दल बरेच खोटे पसरविले गेले. बॉम्बस्फोटात आरडीएक्स वापरले नव्हते असा सुरवातीचा अहवाल होता. काही महिन्यांनी त्यात आरडीएक्स होते असा नवीन अहवाल दिला गेला. नंतर पत्रकार परीषदेत असे सांगितले गेले की लष्कराने काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिलेले ६०० किलो आरडीएक्स पुरोहितांनी बाँबसाठी वापरले. या आरोपानंतर दुसर्‍या दिवशी तातडीने लष्कराने या खोट्या आरोपांना उत्तर दिले. पुरोहितांना लष्कराने कणभरही आरडीएक्स दिले नव्हते. लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवला जातो. ६०० किलो आरडीएक्स बेपत्ता झाले असते तर लष्कराने आकाशपाताळ एक करून ते शोधले असते असे सांगितल्यावर तपास यंत्रणांनी तो आरोप मागे घेतला. काही काळाने स्वामी असीमानंदांनी कबुलीजबाब दिला अशी अफवा पसरविण्यात आली. त्यांना म्हणे तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम कैदी ठेवला होता ज्याला याच बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडले होते. त्याच्या सेवेमुळे म्हणे असीमानंदांना पश्चाताप झाला व त्यांनी या बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली असे पसरविण्यात आले. हे प्रसिद्ध झाल्यावर आपण अशी कोणतीही कबुली दिलेली नाही असे असीमानंदांनी सांगितले. तसेच एका कैद्याच्या सेवेसाठी कधीही दुसर्‍या कैद्याला ठेवले जात नाही असे तुरूंगाधिकार्‍यांनी देखील सांगितल्यावर तपास यंत्रणांचा खोटेपणा उघडकीला आला. यातील सर्व आरोपींची प्रत्येकी ४ वेळा नार्को चाचणी करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने काहीच माहिती मिळाली नाही. यातील एक आरोपी दयानंद पांडे एका नार्को चाचणीनंतर तब्बल १२ तास बेशुद्ध होता तेव्हा तो जातो की काय या भीतिने तपास यंत्रणा घाबरल्या होत्या. यातील साध्वी प्रज्ञासिंग हिचा कबुलीसाठी खूप छळ केला गेला. तिला जेवणात मांसाहार देणे, अश्लील साहित्य देणे, तिच्या वडीलांच्या मृत्युनंतर अंतिम दर्शनासाठी सुद्धा जामीन न देणे, तिला कर्करोग झाल्यावर उपचाराकरिता जामीन न देणे अशा अनेक प्रकारे तिला त्रास दिला गेला. २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यावर या प्रकरणाला वेग यायला सुरूवात झाली. काही महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल झाले आहे. आता लवकरच निकाल लागू शकेल. या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांचा तब्बल १९ बॉम्बस्फोटात सहभाग आहे असे आरोप करण्यात आले आहेत. यातील समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट आपणच केला अशी कबुली सिमीच्या अतिरेक्यांनी देऊन व पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेऊन सुद्धा आमच्याच हिंदू लोकांनी तो बाँबस्फोट केला अशी मूर्खपणाची विधाने युपीएचे सरकार करीत राहिले. Narco analysis tests conducted on three key activists of the banned Students Islamic Movement of India (SIMI), including Safdar Nagori, have revealed that its activists had helped carry out the Mumbai train bombings of July 11, 2006 and the Samjhauta Express blasts of January 2007, http://indiatoday.intoday.in/story/EXCLUSIVE:+Pak+hand+in+Mumbai+train+… भाजप/संघ परिवाराला बॅकफूट्वर नेण्यासाठी युपीएने घेतलेल्या या अत्यंत चुकीच्या भूमिकेमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका लंगडी झाली. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानला दहशतवादाबद्दल दोषी ठरवितो तेव्हा तेव्हा पाकिस्तान समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा उल्लेख करून भारताने अजून "हिंदू अतिरेक्यांना" शिक्षा दिली नसल्याचे सांगून भारताला बॅकफूटवर नेतो. काँग्रेसचे दिग्विजयसिंग, अंतुले इ. नालायक नेते तर २६/११ प्रकरण संघाने घडवून आणले असे जाहीररित्या सांगून भारताच्या तपासयंत्रणेबद्दल संशय निर्माण करीत होते. युपीएच्या या देशद्रोही भूमिकेमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. युपीएने विशेषतः काँग्रेसने भारताचे अनेक क्षेत्रात प्रचंड नुकसान केले आहे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पाठीशी घातल्याने होणारे नुकसान सर्वाधिक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातील पाकिस्तानच्या सहभागचा हा सविस्तर अहवाल. https://www.quora.com/What-is-the-current-status-of-the-perpetrators-of…
In 2009, the United States Treasury and United Nations Security Council placed sanctions on Lashkar-e-Toiba, and named Arif Qasmani as having played a role in the bombing. “Qasmani Arif [..]chief coordinator of the relations of the [LeT] with other organisations [..] has worked with Lashkar-e-Tayyiba to facilitate terrorist attacks including [..] the bombing of February 2007 in the Samjhauta Express in Panipat (India).” — This is what resolution [No 1267] of the Committee on Sanctions of the United Nations Security Council dated 29.06.2009 declares. Adding that Qasmani was funded by Dawood Ibrahim and he did the fundraising for the LeT and the al-Qaida, the UNSC said, “In exchange for their support, al-Qaida provided support staff for the February 2007 bombing of the Samjhauta Express in Panipat.”
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटावर हा एक अजून शोध अहवाल आहे. http://www.newindianexpress.com/nation/Samjhauta-Blast-Case-Counter-Inv… परंतु भारतातले निधर्मांध अजूनही हा बॉम्बस्फोट तथाकथित "हिंदू अतिरेक्यांनी" केला असे छाती पिटत सांगत आहेत.

In reply to by नाना स्कॉच

कन्हैया ज्या प्रकारे भाषनात मोदि सरकारच्या काला धन,सबका साथ सबका विकास या घोषणाबद्दल टीका करत होता, ते पाहून हा पुढचा केजरीवाल इन making असणार असा विचार येतोय. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत आआप /काँग्रेस कडून नक्की उमेदवार असणार !

In reply to by lakhu risbud

सहमत. बहुतेक तो आआपकडूनच उभा असेल. अर्थात २०१९ मध्ये तो २०१६ प्रमाणेच जेएनयु मध्ये शिकतच असेल. जसे एफटीआयआय मध्ये बरेच लाईफ मेंबर्स आहेत, तसेच जेएनयुमध्येही असावेत. बाकी इतर गोष्टी क्षणभर बाजूला ठेवल्या तरी ज्याचे आईवडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत, वडील बेडरिडन आहेत व जो २८ वर्षांचा असून अजूनही "विद्यार्थी"च आहे, त्याच्या कुटुंबियाचा चरितार्थ, याचे शिक्षण, दिल्लीत राहण्याचा-जेवणाचा खर्च कसा चालत असेल याविषयी कुतूहल आहे. एफटीआयआयच्या तिशी पार केलेल्या "विद्यार्थ्यां"बद्दल हेच कुतुहूल होते.

In reply to by तर्राट जोकर

जळतबिळत काही नाही हो. जळण्यासारखं काहीच नाहीय्ये. सुरवातीलाच लिहिलंय ना की कुतूहल वाटतंय म्हणून. का ते सुद्धा वाटू नये? आणि मला कुतूहल वाटलं म्हणून तुम्हाला का त्रास होतोय?

In reply to by श्रीगुरुजी

साधारणतः पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याचं वय काय असावं तुमच्या मते? कोणी तुमच्या ओळखीत नातेसंबंधात पीएचडी झालेले असतील तर विचारुन पहा. विद्यार्थी न होता पीएचडी मिळते का ते.

In reply to by तर्राट जोकर

माझं काहीच रूतत नाही हो. आधीच सांगितलंय हे. तुम्हाला का त्रास होतोय ते मात्र अजून समजलं नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मी कुठे काय म्हणले आहे ?? त्यांचे काय म्हणणे होते जे मला आकलन झाले तितके फ़क्त मांडले! तुम्हाला टोचो ण टोचो तुम्ही टोचो आमचे काय जाते आहे ! उगाच किंचाळु नका!!

In reply to by नाना स्कॉच

असं झालं होय. त्यांना आम्ही योग्य ते प्रतिसाद देत आहोतच आणि तेही प्रत्तुत्तर देत आहेत. पण आमच्या सुसंवादात तुम्ही मध्येच जे लिहिलं - "तुमचे काही रुतायचे नाही हो "तुम्हाला" रुतण्याबद्दल बोलत आहेत काहीतरी" - ते वाचून तुम्ही त्यांची वकिली सुरू केली की काय असं मला वाटलं. पण तुमचं काही जात नाहीय्ये ना. मग ठीक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आम्ही वकिली करीत नाही अन आम्हाला वकिलांची गरजही नसते! असो! मी जे बोलतो मी त्याला जबाबदार असतो, तुम्हाला काय कळते त्याची जबाबदारी माझी नाही!

In reply to by नाना स्कॉच

बरोबर आहे ना. मग त्यांना काय सांगायचे आहे ते त्यांच्याकडूनच येऊ देत ना. तिसर्‍याकडून ते आले की लगेच वकीलपत्राचा संशय येतो.

In reply to by श्रीगुरुजी

वडील बेडरिडन आहेत व जो २८ वर्षांचा असून अजूनही "विद्यार्थी"च आहे, >> ह्याबद्दल कुतुहल आहेना तुम्हाला? म्हणून पीचडी स्टुडंट आहेत का कोणी ओळखीचे, वय विचारुन घ्या म्हणलं. आता जे एन यु म्हणजे पुण्याची मंडई नाही कोनीही यायला-जायला. किंवा तिथे काय डाव्या विचारांचे असणे म्हणजे प्रवेश पक्का असेही नाही. मग त्याच्या विद्यार्थी असण्यावर तुम्हाला कुतुहल काय ह्याबद्दल माझे कुतुहल जागले, मला त्रास होतोय असं कुठं म्हणलंय. काही ही हां श्री! बाकी तुम्हाला काय रुततंय ते मला बरोब्बर माहीत आहे.

In reply to by तर्राट जोकर

ह्याबद्दल कुतुहल आहेना तुम्हाला? म्हणून पीचडी स्टुडंट आहेत का कोणी ओळखीचे, वय विचारुन घ्या म्हणलं.
आहेत ना, म्हणून तर कुतुहल वाटलं.
आता जे एन यु म्हणजे पुण्याची मंडई नाही कोनीही यायला-जायला. किंवा तिथे काय डाव्या विचारांचे असणे म्हणजे प्रवेश पक्का असेही नाही. मग त्याच्या विद्यार्थी असण्यावर तुम्हाला कुतुहल काय ह्याबद्दल माझे कुतुहल जागले, मला त्रास होतोय असं कुठं म्हणलंय. काही ही हां श्री!
मला का कुतुहल वाटलं याबद्दल तुम्हाला का कुतुहल वाटतंय याचंच कुतुहल वाटतंय.
बाकी तुम्हाला काय रुततंय ते मला बरोब्बर माहीत आहे.
काय सांगताय! अभिनंदन. तुम्हाला काय रूततंत्य ते मला पण बरोब्बर माहित आहे.

In reply to by तर्राट जोकर

त्यांना प्रतिसाद दिला की तुम्ही उत्तर देताय आणि तुम्हाला प्रतिसाद दिला की ते उत्तर देताहेत. काहीतरी गडबड वाटतीये.

कन्हैयाच्या कुटूंबाचा चरितार्थ प्रतिमास 3000 रूपयात चालतो असे तो भाषणात म्हणाला. पण याच्या अंगावर तर कायम लेदर जॅकेट्स असतात. आणि कालचे भाषण उत्तम केले त्याने,सरकारविरोधी मुद्यांबाबत काहीही दुमत नाही. पण एका घोषणेचा अर्थ काय कळाला नाही "फासीवाद से आजादी" काय असेल या घोषणेचा अर्थ??? आणि शेवटी उमरबाबत सहानुभूतीही दाखवली.

In reply to by तर्राट जोकर

ओक्केच, फासीवाद म्हणजे काय?जालावर शोधलं, फॅसिस्ट, फॅसिझमला विरोध असेल तर मग काय हरकतच नाही. माझ्या हिंदीच्या अपुर्या ज्ञानामुळे मला काही वेगळाच अर्थ वाटून गेला.

In reply to by चेक आणि मेट

पण याच्या अंगावर तर कायम लेदर जॅकेट्स असतात.
मग? तुमची का जळते?
आणि शेवटी उमरबाबत सहानुभूतीही दाखवली.
मग? तुमची का जळते?

In reply to by चेक आणि मेट

याच्या अंगावर तर कायम लेदर जॅकेट्स असतात >> विवेक पटाईत आहेत दिल्लीत, जॅकेटबद्दल ते सांगू शकतील.

In reply to by चेक आणि मेट

नुसता आरोप केला म्हणून ट्विटर हैंडल डिलीट केले :O (कर नाही तर डर कश्याला ही म्हण आठवली. असो!) बाकी त्यांच्या नियुक्तिबद्दल नवेच कळले आभार

सारखा error का येतोय,प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशित होताहेत।

आता कन्हैयाच्या भाषणाने या खेळात मजा येणार. तो भाऊ आता कुठे मैदानात आलाय. आजपर्यंत त्याने अनिर्बंध पणे विचार व्यक्त केले असतील किंवा करणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांची मदत केली आहे. मा. न्यायालयाने जे मुद्दे मांडले आहेत त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. तसे नसते तर आज अखेर त्याविरोधात आवाज आला असता. आता तो भाषणे आणि मुलाखती देत आहे. त्यात त्याला आपले म्हणणे मा. न्यायालयाच्या आदेशामुळे का होईना संसदीय भाषेत मांडावे लागेल. मुळात खरे तर सर्वसामान्यांचीही तिच अपेक्षा असते, पण डाव्यांना कोण समजावणार? (याचा व्यत्यास ही तितकाच खरा आहे.) कन्हैया जसे जसे त्याचे मुद्दे मांडणार त्यानुसार विरोधक त्यावर हल्ला करणार आणि तसे तसे त्यातील फोलपणा समोर येणार. कालच्या भाषणातील आणि एबीपी वरील मुलाखतीत काही मुद्दे जरी बरोबर असले तरी काही अगदीच कुचकामी आहेत. सरळ मोदींवर हल्ला करणे ही धोकादायक खेळी ठरण्याची शक्यता फार मोठी आहे असे मला वाटते. एक दोन दिवसात भगवी फौज मैदानात उतरल्यावर बघुया काय होते ते.

In reply to by अर्धवटराव

आता सिनिअर केजरीवाल चिंतेत पडले असतील. कारण सगळा प्रकाशझोत आता बाल-केजरीवालांवर गेलाय आणि हे अंधारात गेलेत. काहीतरी विचित्र मर्कट चाळे करून सिनिअर केजरीवाल परत प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतील. मोदींवर टीका करून स्वतः परिस्थितीचा बळी असल्याचा कांगावा करणे हा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रकाशझोतात येण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

In reply to by श्रीगुरुजी

केला ना ,पत्रिका समूहाच्या कार्यक्रमात केजरीवाल म्हणाला मोदी तुम्हाला सबसिडी सोडायला लावून अंबानीच्या घशात घालतो म्हणे,मीच एक मर्द ज्याने त्याच्यावर केस केली,आणि त्या मोदिनें acb काढून घेऊन केस कमजोर केली।

In reply to by जानु

आता डावे विरूद्ध उजवे असा सरळ सामना होणार असल्याने तर्राट जनतेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता प्रत्येकाला देशभक्त-देशद्रोही असले सर्टीफिकेट देणे, ज्यात-त्त्यात सीमेवरच्या सैनिकांना ओढुन घेणे, ह्या दोन पार्टींच्या अधेमधे नसलेल्या नागरिकांना दोघांपैकी एकाची बाजू घ्यायला भाग पाडणे बंद होईल ह्याचा जास्त आनंद आहे. बनिया-ब्राह्मण पार्टी, दलित-पिछडा पार्टी, किसान-मजदूर पार्टी, ह्या आपआपसात लढो, गोंधळ घालो. ह्यांच्या लढाया ह्या जनसामान्यांसाठी नाहीत हे तर निश्चित होईल. अपुन मस्त मचली फ्राय करके देसी का खंबा लाके धुत्त रय्गा भाय! थोडा भांग-धत्तुरा मारनेका बिचमें. पर कसमसें, राजनीतीका नशा सबसे गहरा. -तर्राट जोकर.

In reply to by जानु

सरळ मोदींवर हल्ला करणे ही धोकादायक खेळी ठरण्याची शक्यता फार मोठी आहे असे मला वाटते.
मोदींवर ते फॅसिस्ट आहेत, सर्वत्र भगवेकरण सुरू आहे, ते संघाच्या आदेशाखाली काम करतात, इ. इ. जातीय टीका सुरु झाली की अंतिमतः ती मोदींनाच फायदेशीर ठरते. कन्हैय्याकुमारने नेमक्या याच मुद्द्यांवर टीका सुरू केली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदींवर ते फॅसिस्ट आहेत, सर्वत्र भगवेकरण सुरू आहे, ते संघाच्या आदेशाखाली काम करतात, इ. इ. जातीय टीका सुरु झाली की अंतिमतः ती मोदींनाच फायदेशीर ठरते.
अर्रर्रर्र. अशी गेम हाय व्हय. हरकत नाही. ये भी सही.