Skip to main content

एका कातरवेळी ……….

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 10/02/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
(कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी, अदभूत, अविश्वसनीय, रोमांचकारी.) रम्य अश्या ह्या सुवर्णमय सायंकाळी नभामध्ये ह्या ढगांची मांदियाळी दाटते चैतन्य मनामध्ये कातरवेळी पाहून हि निसर्गाची होळी रंगपेक्षाही किती सुंदर भरले जातात निसर्गाचे रंग पाहून हा रंगांचा सोहळा भरून येते हे अंतरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2398
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

म्हणजे काही विशेष असत का? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर अनुभव शेअर कराल का?

In reply to by एक एकटा एकटाच

नै हो. पण एकंदरीतच तिथे असलेली शांतता, रातकिड्यांचा किर्र आवाज, धड उजेडही नाही आणि अंधारही नाही अशी अवस्था.

In reply to by प्रचेतस

सहसा म्हणुनच कातरवेळ एक एकटी असते.... ना ती कुणाची ना कुणी तिचा..... अशीच काहीशी.....

In reply to by एक एकटा एकटाच

आहे वल्ली मागे एकदा म्हणाले होते अश्यावेळी सोबत खात्रीशीर कातरी असावी बरोबर म्हणजे अंतर्+वेळ कापली जाते !!!!! का तर वे(ग)ळा नाखु

कातरवेळेचं फक्त वर्णन करायचं की त्यावेळी दाटून येणार्‍या भावनांचंही चित्र चितारायचं? की दोन्हीही? चॅलेंजींग आहे, नाही??

कातरवेळच वर्णन तर अवश्य असावं पण त्याला भावनेची जोड असेल तर ती अधिक रसपूर्ण होईल.