✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

ज
जेपी यांनी
गुरुवार, 02/11/2016 - 21:08  ·  लेख
लेख
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
वाङ्मय
बालकथा
चारोळ्या
मुक्तक
विडंबन
प्रतिशब्द
शुद्धलेखन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
51444 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

:)

गॅरी ट्रुमन
Mon, 02/15/2016 - 16:27 नवीन
बरं विठाकाका. तुम्ही म्हणता तेच बरोबर ही बेशर्त स्विकृती. आता खूष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

काहीच अवघड नाही गॅरीश्री!

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 16:32 नवीन
काहीच अवघड नाही गॅरीश्री! इंटरनेटावर दोन चार परवलीचे शब्द टाकले की ढिगाने लेख येतात. त्यात असं खुप काही लिहीलेलं असतं. त्यातुन ही बेसिक माहिती कोणीही मिळवेल. आत्तापर्यंत ह्या धाग्यात ह्या विषयावर आलेले एकही वाक्य मला माहित नव्हते असे नाहीये. कोणत्याही टुकार लेखात हे असतंच. मुद्दा असाय की ह्या सगळ्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी (व्हाया एन्डोक्राईन) कसा संबंध आहे? एकीकडे ते लिहायचं नाही.. आणि कुणाला जेन्युईनली इंटरेस्टच नाही असंही म्हणायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मुद्दा असाय की ह्या सगळ्याचा

गवि
Mon, 02/15/2016 - 17:11 नवीन
मुद्दा असाय की ह्या सगळ्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी (व्हाया एन्डोक्राईन) कसा संबंध आहे? एकीकडे ते लिहायचं नाही.. आणि कुणाला जेन्युईनली इंटरेस्टच नाही असंही म्हणायचं..
ब्रेस्ट कॅन्सर कुत्र्यांनाही होतो. त्याचप्रमाणे तत्सम प्रकारचा कॅन्सर इतर अवयवांनाही होतो. त्यामागे केवळ मानसिक, भावनिक इ.इ. कारणं व्हाया हार्मोनल रुट असतील हे प्रथमदर्शनी पटणं अशक्य आहे. प्रेग्नंसी, स्तनपान आणि तत्सम शारिरीक बाबीमुळे कदाचित काही फरक पडत असेल असं केवळ प्रथमदर्शनी शक्य कोटीतलं वाटेल. पण स्त्रीने शरीराला नाकारणं, त्याचं इरिटेशन अशी कारणमीमांसा तात्काळ तर्कदुष्ट वाटत असूनही तुम्ही इतक्या चिकाटीने प्रश्नोत्तरं करुन खंडन करता या उत्साहाचं आश्चर्ययुक्त कौतुक वाटतं. विठांच्या मांडणीबद्दलही आश्चर्य, कोणतीही causal relationship एस्टॅब्लिश न करता इतका मोठा निष्कर्ष मांडण्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गवि,

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:34 नवीन
विषय फार सोपा आहे पण प्रामाणिकपणाची कमी आहे. इंटरेस्ट असेल तर तुम्ही स्त्रीयांच्या `जेंडर इव्किटी मूवमंट' चा बारकाईनं आभ्यास करा म्हणजे नक्की काय भानगड आहे याची तुम्हाला चाहूल लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आत्तापर्यंत ह्या धाग्यात ह्या

अभ्या..
Mon, 02/15/2016 - 18:05 नवीन
आत्तापर्यंत ह्या धाग्यात ह्या विषयावर आलेले एकही वाक्य मला माहित नव्हते असे नाहीये.
एक्स्क्युज मी. तो धागा तिकडे. हा अभिव्यक्तीवाला. मला काही विवेक ठाकूर अथवा संजयजी क्षीरसागर या आयडीचा पुळका आलेला नाहीये पण या धाग्यावर तो विषय त्यांनी काढलाच नाहीये. दुसर्‍याने पध्दतशीर उकसवलेय आणि ते वाहावत गेले की त्यांची शिस्तीत मापे काढायला सुरुवात झालीय. तिथे खरडफळ्यावर सुध्दा तोच उल्लेख वारंवार करुन असे दाखविले जातेय की बघा तेच कसा विषय उगाळताहेत. धन्य ते भिकारचोट राजकारण. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ह्या धाग्यात ह्या विषयावर...

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 18:07 नवीन
ह्या धाग्यात ह्या विषयावर... वर विठांची ऑरगॅझम संबंधित वाक्ये वाचा. त्याबद्दल विधान आहे. मी तिथे का लिहीतेय हे सांगुन ठेवते. डांगेंच्या धाग्यावर प्रयत्न केला होता, तो धागा वामा झाला. मुळ विषयावरचा खरेंचा धागाही वर आणला, तिथे ते आलेच नाहीत. खव मध्ये प्रय्त्न केलाय, तिथेही अक्कलच काढली. इथे बहुदा चेक मेट्ने ब्रेस्ट कॅन्सरचा विषय काढला. त्याला मोदकने काही तरी रिप्लाय दिलाय. आणि मी माझे स्वतंत्र प्रश्न, जे मी केव्हाची विचारतेच आहे, ते विचारलेत. धागा काढा म्हणलं की ती माझी नामी शक्कल आहे म्हणालेत. बरं ह्याउप्पर गप्प बसण्याचा पर्याय विठाकडे आहेच. तरीही ते बोलत आहेत म्हणजे त्यांनाही चर्चेत रस आहे. त्यांना निरागस समजण्याचे कारण नसावे. जर कुणी पातळी सोडुन बोलत असेल तर कुणी "उचकवले" हा मुद्दा महत्वाचा नसावा. तुम्हाला नेहमीच चर्चा टाळण्याचा पर्याय असतोच. मी, चेकमेट, मोदक, श्रीगुरुजी, गॅरी ह्या व्यतिरिक्त कुणी तिथे त्यांना ह्यावर कमेंट दिल्याचं दिसत नाही. असे असताना आम्हा अनरिलेटेड ५ आयडींचा भिकारचोट राजकारणाशी काय संबंध ते जमल्यास, इच्छा असल्यास सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

चेक आणि मेट
Mon, 02/15/2016 - 18:17 नवीन
मी विषय काढलाय,तेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचा विषय इथेच थांबवावा अशी मी दोन्ही पक्षांना विनंती करतो.आणि वेळ मिळाल्यास ब्रेस्ट कॅन्सरवर मीच धागा काढतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

शाब्बास !

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 22:31 नवीन
पण आधी त्या 'विचारांच्या कंपनांची ' काय वाट लागलीये ते पाहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

शाब्बास !

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 22:33 नवीन
पण आधी त्या 'विचारांच्या कंपनांची ' काय वाट लागलीये ते पाहा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

.

चेक आणि मेट
Tue, 02/16/2016 - 08:23 नवीन
साहेब, मी लेखिकेचे म्हणणे मांडले आहे म्हणजे पुस्तकपरीक्षण केले आहे, धाग्याची वाट लागण्याचा काहीच संबंध नाही,कारण मी कोणतेच विचार लादत नाहीये आणि वाट लागली असेल तर ती पुस्तकवाल्या लेखिकेची, माझी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

पिरा।

सामान्य वाचक
Tue, 02/16/2016 - 06:48 नवीन
दत्तू शिपाई आठवला पु लं चा अणु युद्ध टाळण्याचा एकच उपाय खात्रीलायक रित्या सांगणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:17 नवीन
ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही.
एक जेनुन शंका...स्त्रीला तसा अनुभव नाही आला तर काहीवेळेस पुरुषाचे स्किल कमी पडते हा पण प्रकार असतोच की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

टका.. खरंच इथलं वाचुन मत बनवु

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 18:35 नवीन
टका.. खरंच इथलं वाचुन मत बनवु नकोस. "चौफेर" वाचन कर मुला!!! आणि आपापल्या आनंदाला जोडीदारा इतके आपणही जवाबदार असतो असे माझे मत आहे. निव्वळ पुरुषाचे स्किल्स कमी पडत आहेत असे म्हणुन चालणार नाही. दोघांमध्ये काही तरी मिसिंग असेल किंवा "त्याक्षणी" काही तरी मिसिंग असेल. दोन्ही कडुन इच्छा आणि प्रयत्न असले तर फक्त ह्याच नाही तर सर्वच आघाड्यांवर समन्वय असेल. सरसकट एकाचीच चुक असु शकत नाही. (हे मा वै म)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपणांस मुद्दा कळलेला नाही

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 18:49 नवीन
आपणांस मुद्दा कळलेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बापरे! कुठे मारुतीच्या बेंबीत हात घालतोयस?

पैसा
Mon, 02/15/2016 - 18:51 नवीन
क्या तुम वही बोल रहे हो, जो मय समझ रही हूँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जो मै समज रहा हूं वैसाच रहेगा

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 18:58 नवीन
जो मै समज रहा हूं वैसाच रहेगा तो टका हवेत रथ घेऊन युद्ध खेळणार्‍या महामहारथींप्रमाणे हुच्च झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खि खि खि

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:04 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

माझा प्रतिसाद तुम्च्या(पण)

टवाळ कार्टा
Mon, 02/15/2016 - 19:04 नवीन
माझा प्रतिसाद तुम्च्या(पण) डोक्यात घोळ करून गेला म्हणजे बाण बरोबर लाग्लेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुमचे प्रतिसाद "जोरकस" आहेत

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 16:24 नवीन
तुमचे प्रतिसाद "जोरकस" आहेत आणि माझे "अज्ञानातुन" आलेले हे एकदा तुम्ही ठरवलं की झालंच सगळं. पुढे कशाला इतकं लिहायचं म्हणते मी? तुम्ही एकदा एखाद्या उंच इमारतीवर जाऊन "तुम्ही सगळे मुर्ख आहात" असं ओरडुन का घेत नाही, पुढे कुणालाच काही सांगायची गरज नाही. ;)
हे बेछूट विधान आहे. ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही. तुमच्या माहिती करता, पुरुषाच्या ऑरगॅजम सदृश स्त्रीला आलेला अनुभव ही फार दुर्मिळ घटना आहे, त्यामुळेच तर प्रणयविश्वात त्याची चर्चा आहे. आणि स्त्रीच्या ऑरगॅजमचा अनुभव `ऑबजर्वर' म्हणून यायला पॉर्न पाहाणं पुरेसं आहे. तो `पार्टनर' म्हणून असेल तर इतका प्रत्यक्ष असतो की तुम्ही दोन्हीकडून, त्याची उघड ग्वाही देऊ शकता. त्यासाठी फालतू डेटा वगैरे गोळा करण्याची गरज नसते.
बेछुट का? ब्वॉर! पुरुषाच्या ऑरगॅझम वर कधी उतरला विषय? तुम्ही पुरुष आहात (बहुतेक*) म्हणुन "उत्सर्जनाचा" अनुभव तुम्हाला असेल, त्यालाच तुम्ही पुरुषाचा ऑरगॅझम म्हणत असाल तर तुम्ही त्यावर बोललात तरी माझं काही म्हणणं नसेल. पण मी उद्या तुम्हाला "पुरुषाची संबंधातली मानसिकता" इ वर "तुम्ही अज्ञानी आहात.. मी काय सांगते ते ऐका" अशा आविर्भावात सांगायला लागले तर तुम्ही ऐकुन घ्याल का? कारण मी जे बोलेन तो सर्व माझा अंदाजच असेल. पुरुषाला नक्की काय "वाटते" हे मला कधी अनुभवता येईल का? पॉर्न म्हणुन स्त्रियांना जे काही करताना दाखवतात ते पाहिलं की स्त्रियांचा ऑरगॅझम कळतो का? की नुसता दिसतो? की त्याला ऑरगॅझम म्हणतात असं आपलं आपणच समजुन घ्यायचं आणि मग पार्टनरही तशीच रिअ‍ॅक्ट करेल अशी अपेक्षा ठेवायची? बरं चला तुमच्या सारखा हुषार माणुस असेल तर ऑरगॅझम कळतोच कळतो असं आपण मानु, तरीही तुम्हाला स्त्री देह घेउन शक्य आहे का तो अनुभवणं? म्हणजे मी जे म्हणतेय की तुमचा सगळा खेळ अंदाजपंचेच आहे त्यात काय चुकलं? आनी ह्या सगळ्याचा, मला माझ्या पार्टनर पुरता विचार करायचा असेल तर कशाला लागतोय डेटा? पण जर समस्त पुरुषांना सल्ले देणार असेल तर?
अर्थात, अपत्यप्राप्तीसाठी मी केलेलं अफाट वाचन, स्त्री देहाचा, तिच्या मानसिकतेचा आणि भावविश्वाचा विविध अंगांनी केलेला अभ्यास, प्रणय आणि जनन प्रक्रियेची सखोल माहिती, हा माझा बेसिक डेटा नाही, फर्स्ट-हँड एक्स्पिरियंस आहे. आणि तो सार्वत्रिक का आहे याचं स्पष्टीकरण मी इथे देऊ शकत नाही. पण याबाबतीत माझे प्रतिसाद पुरेसे जोरकस आहेत यावरनं तुम्ही अनुभवाच्या सत्यतेचा आदमास लावू शकता.
"एकाच" स्त्री भोवती फिरणारा हा सर्व अनुभव आहे. फार तर अजुन चार दोघांचे समुपदेशन वगैरे केले असेल तर त्यांचा ऐकीव अनुभव असु शकतो. तरीही तो सार्वत्रिक का आहे हे इथे सांगु शकत नसाल तर मला व्यनि करा, मला चालेल. भाषा आणि हेतु शुद्ध असतील तर मला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. तुमचे प्रतिसाद तुम्हीच भारी ठरवले आहेत. मी काय डोंबलाचा अदमास लावु? माझा मुद्दा केवळ एकच आहे. तुम्ही "अफाट" वाचन केले असेल..इतरांहुन तुम्हाला काकणभर जास्तच माहिती असेल.. पण म्हणुन "समस्त" स्त्री जातीला लागु होणारी विधाने (ब्रेस्ट कॅन्सरचा उपाय) तुम्ही कोणत्या आधारावर करता ते तुम्ही सांगत नाही आहात. धागा काढा म्हणलं तर ते ही नाही. तुम्ही तुमचे संपुर्ण म्हणणे एकसंध मांडले तर कदाचित विधायक चर्चा होऊ शकते. हे असं तुकड्या तु़कड्यात हाती काही लागु शकत नाही. अजुन एकच विनंती.. मलाही ह्या विषयाची माहिती आहे. तेव्हा "तुम्हाला माहिती नसेल कदाचित" टाईप वाक्यरचना टाळल्यास बरे होईल. तुम्ही आत्तापर्यंत ह्या विषयावर जे "जनरल फॅक्ट्स" मांडले आहेत ते माझ्यासाठी नवीन नाहीत. संंमं.. प्रतिसाद उडवण्याजोगे मला तरी ह्या चर्चेत काही दिसत नाही. जरुर राहु द्यावेत. * - तुम्ही नक्की पुरुषच आहात ह्याबद्दल माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. मी अनाहिता सदस्य असल्याने (गरज असल्यास) मी स्त्रीच आहे ह्याची खात्री तुम्ही बाळगु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कदाचित तुम्ही काय लिहीतायं ते तुम्हाला कळत नाहीये

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:07 नवीन
पुरुषाच्या ऑरगॅझम वर कधी उतरला विषय? ऑरगॅजम हा स्त्री आणि पुरुषांसाठी एकच अनुभव आहे. समान अनुभूतीसाठी तो कॉमन शब्द आहे. आणि तो अनुभव स्रीला येतो तेंव्हा त्याला फिमेल ऑरगॅजम म्हणतात, इतकाच फरक आहे. तुम्ही ज्याप्रमाणे केलायं तसा तो, गुगलवर डेटा सर्च करुन मिळत नाही. पॉर्न म्हणुन स्त्रियांना जे काही करताना दाखवतात ते पाहिलं की स्त्रियांचा ऑरगॅझम कळतो का? की नुसता दिसतो तुम्ही पुढचा प्रतिसाद लिहीण्यापूर्वी, स्वतःचा आधीचा प्रतिसाद वाचत जा, त्यानं लिंक राहाते. आधीच्या प्रतिसादात तुम्हीच ऑबजर्वर असा शब्द वापरला आहे : १. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यावर मी उत्तर दिलंय : स्त्रीच्या ऑरगॅजमचा अनुभव `ऑबजर्वर' म्हणून यायला पॉर्न पाहाणं पुरेसं आहे. तो `पार्टनर' म्हणून असेल तर इतका प्रत्यक्ष असतो की तुम्ही दोन्हीकडून, त्याची उघड ग्वाही देऊ शकता. त्यासाठी फालतू डेटा वगैरे गोळा करण्याची गरज नसते. तुम्ही पुढे लिहीलंय : "समस्त" स्त्री जातीला लागु होणारी विधाने (ब्रेस्ट कॅन्सरचा उपाय) तुम्ही कोणत्या आधारावर करता ते तुम्ही सांगत नाही आहात. धागा काढा म्हणलं तर ते ही नाही. तुम्ही तुमचे संपुर्ण म्हणणे एकसंध मांडले तर कदाचित विधायक चर्चा होऊ शकते. हे असं तुकड्या तु़कड्यात हाती काही लागु शकत नाही. काही जमलं नाही की तुमची एक नामी शक्कल आहे, विषय ब्रेस्ट कॅन्सरला न्यायचा! पण विषय स्त्रीच्या ऑरगॅजमचा आहे, तुमचा तोच गुंता अजून सुटत नाही.... त्यापुढे मग इंडोक्राइन सिस्टम, स्री देहावर आणि तिच्या भावविश्वात ऑरगॅजममुळे होणारा फरक आणि त्याही पुढे जाऊन मग पती-पत्नीच्या पारस्पारिक अनुबंधात त्यामुळे होणारं कमालीचं परिवर्तन असे अनेक टप्पे आहेत. तिथपर्यंत मजल जायला अजून बराच आवकाश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

शक्कल? म्हणजे मी तुम्हाला

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 17:34 नवीन
शक्कल? म्हणजे मी तुम्हाला पेचात टाकतेय तर!! ब्रेस्ट कॅन्सरही तुम्हीच काढलेला विषय आहे.. ऑरगॅझम सुद्धा. आणि ह्या दोघांच्या मध्ये जी काही स्टेशन्स येणार असतील ती सुद्धा तुम्हालाच ठाऊक आहेत. आता असं बघा की डांगेंच्या दोन व्यवसाय.. ह्या धाग्यावर तुम्ही "संक्षीं"च्या आठवणींना उजाळा देत होतात, आणि तुम्हीच "ब्रेस्ट कॅन्सर"चा विषय काढलात. त्याला मी उत्तर दिले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणुन तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर आणि ऑरगॅझमची सांगड घातली. (खालचे सगळे प्रतिसाद पहा..) इथे पुन्हा तो विषय निघाला तेव्हा मोदकने तुम्हाला त्यावर पेपर पब्लिश का करत नाही असे विचारले. तर तुम्ही म्हणालात की तो प्रतिसाद "ऑरगॅझम" च्या अनुषंगाने लिहीला होता. तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर विषयी बोलत होतात ना? मग त्याच्याच अनुषंगाने ऑरगॅझमचा विषय निघाला ना? उलटे कसे होईल? आता किमान हे तरी एस्टॅब्लिश झालंय ना की ऑरगॅझम आणि ब्रेस्ट कॅन्सरचा संबंध तुम्ही लावलेला आहे. (व्हाया स्त्रीदेहाची मानसिकता.. प्रणयातली तृप्ती.. स्त्री देहाचा अभिमान) मग मी ऑरगॅझमचा मुद्दा ब्रेस्ट कॅन्सर ह्या मुळ विषयाकडे (आठवा डांगेंचा धागा - संक्षींच्या आठवणी - ब्रेस्ट कॅन्सरचा मुद्दा) नेला तर का वैतागताय? मी तुम्हाला अजुन मुद्द्याचे प्रश्न विचारलेलेच नाहीयेत. जसं की:- लग्न न झालेल्या बायका, ज्यांनी आयुष्य एका कार्याला वाहुन घेतले आहे, पण त्यांना ऑरगॅझमचा अनुभव नाही, त्यांना आपल्या देहाचा अभिमान नसतो का मग? (संदर्भः- कारण ज्या स्त्रीला पुरुषाचं प्रेम लाभतं तिच्या देहावर पुरुष आशिक असतो आणि पर्यायानं तिला स्वतःच्या देहाचा आणि स्त्रीत्वाचा अभिमान असतो. जिथे पारस्पारिक अनुबंध नाही तिथे स्त्रीला नकळतपणे उरोजाचं ओझं वाटून, मनात अनाहूतपणे रिजेक्शनची भावना निर्माण होते आणि पर्यायनं काँन्सटंट इरिटेशन (अंतर-द्वंद) सुरु होतं. या अंर्तगत नकारामुळे उरोज अनावश्यक वाटून कॅन्सरची शक्यता निर्माण होते.) किंवा मला माझ्या देहाचा आयुष्यात कोणताही पुरुष येण्याआधी पासुनच अभिमान आहे. मला कधीही पाळी, बाळंतवेदना इ गोष्टी स्त्री देहाचे भोग वाटल्या नाहीत. काय हा स्त्री जन्म इ रडकथा मी गायल्या नाहीत. मग माझे लग्न झालेच नसते, माझ्या आयुष्यात कुणी पुरुष आलाच नसता, तरीही एक पुरुष नाही म्हणुन मला माझ्या देहाचे ओझे वाटले असते का? ऑरगॅझमचा अनुभव नाही म्हणुन मी माझ्या देहावर बेहद्द खुष नसते का? म्हणजे एकंदरीत माझ्या देहाबद्दल अभिमान / आनंद वाटायला पुरुष आणि त्याने केलेली लैंगिक तृप्तीच आवश्यक आहे का? (संदर्भ :- यापुढे ऑरगॅजमची (स्रीचा अत्यंतिक आनंद) पायरी आहे. ज्या स्त्रीया ऑरगॅजम भोगू शकतात त्यांना प्रथमच, निसर्गानं स्त्रीला बहाल केलेल्या कमालीच्या वरदानाची प्रचिती येते. तस्मात, तिला आपल्या देहाप्रती आणि स्वतःच्या स्त्रीत्वाविषयी बेहद्द आनंद वाटू लागतो. उरोज हा स्रीत्वाचा सौंदर्याविष्कार आहे याची तिला जाणीव होते. देहाविषयी तिला कोणताही नकार राहात नाही. तस्मात, अशा स्त्रीच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरची शक्यताच शून्य होते. ) असं बरंच काही काही... कुठे विचारायचं हे तुम्हाला? सनी लियोनच्या धाग्यात? जेपीच्या धाग्यात? खवत? व्यनित? तुम्ही वर जी काही शब्दांची आतिषबाजी केली आहेत ( ऑरगॅजम, इंडोक्राइन सिस्टम, स्री देहावर आणि तिच्या भावविश्वात ऑरगॅजममुळे होणारा फरक आणि त्याही पुढे जाऊन मग पती-पत्नीच्या पारस्पारिक अनुबंधात त्यामुळे होणारं कमालीचं परिवर्तन ...) त्यावर आम्हाला काय साक्षात्कार होणारे का स्वप्नात? बादवे.. माझा ऑरगॅझम विषयकच गुंता आहे हे तुम्हाला कोण म्हणालं? वर स्पष्ट लिहीलं ना मी? ही चर्चा वैयक्तिक नसुन सर्वसाधारण विषयावर आहे हे तुम्हाला कळत नाही का? मी तुमच्या खाजगी आयुष्यावर बोलले का कुठे? तुम्ही का सारखे माझ्या अनुभवावर उतरत आहात? पती-पत्नीच्या पारस्पारिक अनुबंधात त्यामुळे होणारं कमालीचं परिवर्तन ह्या विषयावर तुम्हाला काय किर्तन करायचं असेल ते करा, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतेय म्हणजे माझ्या समस्या मांडत आहे असला समज करुन लिहीणार असाल तर अवघड आहे. मी पुर्वीही तुम्हाला सांगितलय, मी काही तुमची मुलाखत घेत नाहीये की समुपदेशनाला आले नाहीये. अजुन अवांतर करायचं असेल ह्या धाग्यावर तर जरुर करा. मी थांबणार नाहीये उत्तरं द्यायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

माझा ऑरगॅझम विषयकच गुंता आहे हे तुम्हाला कोण म्हणालं?

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:40 नवीन
तुमचे प्रतिसाद आणि माझी उत्तरं वाचा म्हणजे कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बाकी १६८८९३ शब्द आहेत त्या

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 17:43 नवीन
बाकी १६८८९३ शब्द आहेत त्या प्रतिसादात. त्यावर फोकस करा. गुंता कुणाचा आहे ते ठरवु आपण नंतर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मी थांबणार नाहीये उत्तरं

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 18:03 नवीन
मी थांबणार नाहीये उत्तरं द्यायची. >> पिरातैंचा जाहीर निशेढ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

थोडा वाह्यातपणा...

गॅरी ट्रुमन
Tue, 02/16/2016 - 11:01 नवीन
थोडा वाह्यातपणा...
अपत्यप्राप्तीसाठी मी केलेलं अफाट वाचन...
अपत्यप्राप्तीसाठी अफाट वाचन करावे लागते? ही नवीनच माहिती मिळाली. तसे असते तर मिपावरच्या अनेकांच्या घरी महाभारत काळाप्रमाणे १००+ अपत्यांची टिम असती.गेलाबाजार माझ्या घरीही चार-पाच अपत्ये असतीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मला वाद घालायचा नाही. आधीच

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 15:51 नवीन
मला वाद घालायचा नाही. आधीच डिक्लेअर करतेय. फक्त जर कुणी माझ्या आयडी बद्दल पुर्वग्रह न ठेवता वाचु शकणार असेल तर चर्चा होऊ शकते. जगात कुठेही एखादा समुह एकत्र आला की नियम, त्या नियमांची अंमलबजावणी करणारे लोक (संपादक) , नियम ठरवणारे लोक (मालक) आणि नियमांचे पालन करणारे लोक (सदस्य) एकत्र येतात. मालक स्वतः प्रत्येक गोष्ट पाहु शकणार नाहीत. म्हणुन संपादक. संपादक कोण? तर आपल्यातलेच, मालकांच्या थोड्या ओळखीतले, अनुभवी इ क्रायटेरीयात बसणारे लोक. हे ही सदस्यांमधुनच आलेले असणार. म्हणजे स्वतःचे लागेबांधे घेउन आलेले. इतकी जनता एकत्र येणार, इतक्या विषयांवर चर्चा होणार. मतभेद होणार.. म्हणजे पर्यायाने वाद होणारच. कोणत्याही वादात, दोन गट पडणारच. निकाल कोणातरी एकाच्या बाजुने लागणार. त्या प्रसंगापुरती तरी दुसरी बाजु कायम दुखावलेली रहाणार. काहीतरी निकाल द्यावा तर लागेल ना? कुणी तरी एक त्याच्या विरोधात असणारच ना? म्हणजे संपादक कुणीही असो.. निकाल काहिही लागो.. एक गट कायम दुखावलेला असेलच. त्याला कायम वाटणार की अन्याय झाला.. धोरण चुकीचे आहे.. पार्शिलिटी झाली.. इथे कधी माझ्या विरुद्ध कारवाई झालेली नाही, प्रतिसाद उडालेला नाही, संमंचे कधी काही निरोप आलेले नाहीत, कधी माझ्या विरुद्ध वैयक्तिक तक्रार झालेली नाही. म्हणुन मला मिपावर सर्व आलबेल आहे असे वाटत आहे असाही समज होणे स्वाभाविक आहे. पण मी इथे केवळ एक संस्थळावरची सदस्य म्हणुन त्रयस्थपणे भुमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. १. वाद झाले, तक्रार झाली, संमने निकाल दिला. पटणारा असेल तर प्रश्न नाही. पण पटणारा नसेल तर त्याही पुढे मालकांपुढे म्हणणे मांडण्याचा मार्ग असतोच ना? तो वापरला जातो का? २. समजा मी सतत माझ्या बॉस समोर "मला सगळे एकटे पाडतात" , "मला सगळे टाकुन बोलतात" वगैरे तक्रारी करायला गेले तर त्याला मला तसे पुरावे द्यावे लागतील ना? नुसतेच ब्लँकेट स्टेटमेंट करुन काय कामाचे? तर तशा पद्धतीने ज्या तक्रारी होत आहेत (कंपुबाजी, पार्शिलिटी इ.) ह्यासाठी प्रतिसादांचे बॅकप घेऊन, फॅक्ट्स मांडुन कधी मालकांसमोर चर्चा झाली आहे का? ३. मालकांच्याच निर्णयावर भरवसा नाहीये असं काही आहे का? ४. परवा संदीपभाऊंना संपादकांचा निर्णय पटला नाही. त्यांनी मेगाबयटी चर्चा करुन मुद्दा लढवला. निर्णय काय होईल तो वेगळा प्रश्न आहे. पण आज त्यांनी फॅक्ट बेस्ड मुद्दे मांडले. चर्चा झाली. ते नुसतेच "संमं अमुक आहे.. तमुक आहे" असं बोलत राहिले असते तर काय साध्य झाले असते? ५. मिपावर काही समस्या आहेत. तुम्हाला त्या त्रास्दायक वाटतात. खरं तर तुम्हाला मिपा सोडुन जाण्याचाही पर्याय आहे. पण तुम्ही इथे आहात, म्हणजे तुम्हालाही मिपा प्रिय आहेच. मग मला खरंच कळत नाही की इथे हे मुद्दे मांडुन फक्त असंतोष खदखदत ठेवण्यापलीकडे काय होत आहे? माझ्या समजुतीत दोष असतील. पण मला वाटतं की ह्यातुन काहीच निष्पन्न होत नाहीये. ह्यापेक्षा पुरावे घेऊन इथे सर्वांसमोर मांडावेत किंवा मालकांशी बोलणे करावे. किमान त्यातुन काही सोक्षमोक्ष तरी लागेल. ६. मला कधी कधी ज्येष्ठ / जुन्या सदस्यांसंबंधीची मालकांची (असेलच तर) थोडी वेगळी स्ट्रॅटजी पटते. कारण हे माणसांनी चालवलेले संस्थळ आहे. आपण सर्वांनाच सारखं बोलु शकत नाही. प्रत्यक्षातही आपण वय बघुन भाषा बदलतो. किंवा जुन्या संबंधामुळे इतरांपेक्षा थोडी वेगळी वागणुक देतो. तसेच काही कारण इथेही असु शकते. मला कधी अनुभव नाही. अंदाज बांधत आहे. मी असंतोष निश्चित समजुन घेऊ शकते. पण तो खदखदत ठेवणे नाही. त्यावर मार्ग निघावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. मिपा हे केवळ "संस्थळ" नाही. इथे पुषकळ चांगले लोक, मित्र-मैत्रिणी मिळालेले आहेत. तेव्हा उगाच वातावरण टेन्स असावे असे वाटत नाही म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच..
  • Log in or register to post comments

मिळाली उत्तरं?

पैसा
Tue, 02/16/2016 - 09:16 नवीन
काय तरी बै अवास्तव अपेक्षा तुझ्या. या सगळ्यासाठी स्वतः विचार करावा लागतो. त्यापेक्षा कुणीतरी हातात दिलेली लाकडी तलवार फिरवत ढिंगचांग करत काल्पनिक शत्रूवर वार करणे सोपे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

_/\_

तुषार काळभोर
Tue, 02/16/2016 - 11:03 नवीन
मस्त प्रतिसाद ५. मिपावर काही समस्या आहेत. तुम्हाला त्या त्रास्दायक वाटतात. खरं तर तुम्हाला मिपा सोडुन जाण्याचाही पर्याय आहे. पण तुम्ही इथे आहात, म्हणजे तुम्हालाही मिपा प्रिय आहेच. मग मला खरंच कळत नाही की इथे हे मुद्दे मांडुन फक्त असंतोष खदखदत ठेवण्यापलीकडे काय होत आहे? माझ्या समजुतीत दोष असतील. पण मला वाटतं की ह्यातुन काहीच निष्पन्न होत नाहीये. ह्यापेक्षा पुरावे घेऊन इथे सर्वांसमोर मांडावेत किंवा मालकांशी बोलणे करावे. किमान त्यातुन काही सोक्षमोक्ष तरी लागेल. हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ते रस्त्यावर बोर्ड लावून बसलेले असतात नै का

पैसा
Mon, 02/15/2016 - 16:03 नवीन
ते रस्त्यावर बोर्ड लावून बसलेले अस्तात नै का, सर्व गुप्त समस्यांचे समाधान साठी काशी रिटर्न्ड डॉ अमूक तमूक यांना भेटा. तसल्या जडीबुटीवाल्या डॉक्टरसमोर येऊन बसल्यासारखं वाटतंय. अरे कुठे नेऊन ठेवलात मिपा माझा!
  • Log in or register to post comments

खि खि खि खि ..........

श्रीगुरुजी
Mon, 02/15/2016 - 22:31 नवीन
खि खि खि खि ..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसल्या जडीबुटीवाल्या डॉक्टरसमोर येऊन बसल्यासारखं वाटतंय

होबासराव
Mon, 02/15/2016 - 16:07 नवीन
:)) आणि त्यांचे पँप्लेट जे बस स्टँड इत्यादि जागि चिकटवलेले असतात, त्यात हे असा कुठलाहि आजार मेंशन करायचे सोडत नाहि जे कि हे बरा करत नाहित, अगदि एड्स सुद्धा.
  • Log in or register to post comments

जे पी

मी-सौरभ
Mon, 02/15/2016 - 16:24 नवीन
११ नंबर ला बॅटींगला येऊन शतक होणार या धाग्याचे. त्यात माझीही १ धाव बस :)
  • Log in or register to post comments

हा धागा तर ऑरगॅजमची

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 16:27 नवीन
हा धागा तर ऑरगॅजमची अभिव्यक्ती झालाय. जानाथाजापानपहुंचगयेचीनसमझगयेना.
  • Log in or register to post comments

एक माणुस धागा काढायला तयारच

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 16:29 नवीन
एक माणुस धागा काढायला तयारच नसेल तर काय करायचं ब्वॉ!! आता आम्हीच प्रमुख पाहुणे येणार की नाही ह्याची गॅरेंटी नसताना चौकात मंडप घालुन बसावे काय? (पक्षी:- आम्हीच धागा काढावा काय!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नको तिथेही जर ग्यारंटीड येतात

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 16:42 नवीन
नको तिथेही जर ग्यारंटीड येतात, तर मग....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तेवढेच काय

पैसा
Mon, 02/15/2016 - 16:45 नवीन
कुठचाही धागा सेक्स, ऑर्गॅझम, उपभोग इत्यादि इत्यादि विषयाकडे गुरे वळावीत तसा हाकलवून नेला जातो. धागा हायजॅक करणे याचे प्रात्यक्षिक बघून लै कट्टाळा आला राव! मराठी बोलीभाषा सप्ताह लौकरात लौकरात सुरू करा मंडळी. हे सेक्सचे दळण आता पुरे. आयुष्यात करण्यासारखे आणि वाचण्यासारखे याच्यापेक्षा बरेच काही असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बरं ते चाललंही असतं पण काही

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 16:51 नवीन
बरं ते चाललंही असतं पण काही निष्पन्न तरी कुठे होतंय?? नुसतं आपलं सेक्स.. प्रणय... तृप्ती.. ऑगॅझम इ इ शब्दांच्या झालरी.. विषयाचे वावडे नाही. पण चुकीची माहिती पसरणे धोकादायक वाटते. त्यात हा नाजुक विषय असल्याने लोकांचे आधीच खुप समज-गैरसमज असतात. म्हणूनच एकच काय तो धागा काढा असं हजार वेळा सांगुन झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बाईश्री !

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:27 नवीन
विषय तुम्हीच काढतायं, मला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे एकाच विषयावर प्रश्न विचारतायं आणि वरती मीच चर्चा करतोयं असा, तुम्ही आणि इथल्या दुसर्‍या विदुषी, बोभाटा करतायं. मला या विषयावर पोस्ट टाकण्यात काही रस नाही. तुम्हाला असेल तर तुम्ही काढा करा आणि डेटा गोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

.

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 17:29 नवीन
तुम्हाला असेल तर तुम्ही काढा आणि करा डेटा गोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

पैसाबाई

विवेक ठाकूर
Tue, 02/16/2016 - 12:24 नवीन
हे सेक्सचे दळण आता पुरे. आयुष्यात करण्यासारखे आणि वाचण्यासारखे याच्यापेक्षा बरेच काही असते. हा प्रतिसाद अप्रत्यक्षपणे मला असेल तर तुमचं वाचन केवळ या एकाच धाग्यापुरतं मर्यादित झालं आहे. मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, धागा हायजॅक केलेला नाही. आणि एकाच वेळी : १) भोजन : रसपरिपोष आणि उत्सव हा धागा दिला आहे. २) आनंद मोरेंच्या रोशोमनवर : अभिव्यक्ती आणि सौंदर्यमिमांसा अशी सविस्तर चर्चा चालू आहे. ३) जयंत कुलकर्णींच्या सेपकूवर : बिभित्सरस आणि संवेदनाशीलता याची चर्चा जारी आहे...जेणे करुन लेखकाला आणि सदस्यांना बिभित्सरसाची व्यर्थता कळेल. ४) चेक-मेटच्या विचार-कंपनांच्या पोस्ट्वर : वैश्विक इंटेलीजन्सवर सविस्तर प्रतिसाद देऊन चेक-मेट केला आहे. तुम्ही बहुदा पूर्वग्रहाचा चष्मा चढवल्यानं तुम्हाला सगळीकडे एकच दळण दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

_______/\_______

पैसा
Tue, 02/16/2016 - 12:30 नवीन
______/\_______
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

संमुडीला विनंती

पैसा
Mon, 02/15/2016 - 16:42 नवीन
संमुडीला विनंती. पूर्वी उजव्या बाजूला एक घोषणा कायमस्वरूपी होती. "मिपावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणाशी संपादक मंडळ किंवा मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नव्हे. ती सर्व लेखकाची वैयक्तिक मते आणि जबाबदारी आहे." तो बोर्ड पुन्हा आणा.
  • Log in or register to post comments

काय रे? सगळे तुम्ही

प्रदीप साळुंखे
Mon, 02/15/2016 - 17:02 नवीन

दिस जातील,दिस येतील भोग सरल,सुख येईल

  • Log in or register to post comments

ह्म्म

इरसाल
Mon, 02/15/2016 - 18:14 नवीन
आता मी काय करावे ??????????
  • Log in or register to post comments

ठाकूर साहेब"ऑरगॅजमचा अनुभव

सुबोध खरे
Mon, 02/15/2016 - 19:53 नवीन
ठाकूर साहेब "ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच." हे विधान चुकीचे आहे. उत्सर्जनाच्या रोगांमध्ये बरेच प्रकार आहेत त्यात उत्सर्जन( ejaculation) न होणे उशिरा होणे, अंतर्गत ( मुत्राशायात) होणे (retrograde ejaculation) असे अनेक प्रकार असतात. अशा बर्याच माणसाना प्रत्येक प्रणयात ऑरगॅजमचा अनुभव "येत नाही" Retarded ejaculation (RE) is probably the least common, and least understood, of all the male sexual dysfunctions. RE is one of the diminished ejaculatory disorders (DED), which is a subset of male orgasmic disorders (MOD). DED is a collective term for an alteration of ejaculation and /or orgasm that ranges from varying delays in ejaculatory latency to a complete inability to ejaculate, anejaculation, and retrograde ejaculation, as well as reductions in volume, force, and the sensation of ejaculation. The American Psychiatric Association’s Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM-IV-TR) defines RE as the persistent or recurrent delay in, or absence of, orgasm after a normal sexual excitement phase during sexual activity that the clinician, taking into account the person’s age, judges to be adequate in focus, intensity, and duration. The disturbance causes marked distress or interpersonal difficulty. Similar to the term “premature ejaculation,” the most commonly used term—“retarded ejaculation”—is sometimes avoided because of its pejorative associations. - See more at: http://www.issm.info/news/review-reports/understanding-and-treating-retarded-ejaculation/#sthash.knKmgfYK.dpuf किबहुना "बहुसंख्य" माणसाना आयुष्यात अतिश्रमामुळे कधी तरी उत्सर्जन( ejaculation) न झाल्याने ऑरगॅजमचा अनुभव "येत नाही". व्हायगारा घेतल्याने मध्य वयीन माणसे उत्साहाच्या भरात संभोग करायला जातात परंतु ऑरगॅजमचा अनुभव उशिरा येतो किंवा "येत नाही"तोवर "श्रम करतात" आणि या अतिश्रमामुळे हृदयविकाराचा झटका येतो, हा एक व्हायगाराचा साईड इफेक्ट आहे आणि तो त्या औषधाच्या पट्टी वर किंवा बाटलीतील सूचनेत स्पष्ट पणे लिहिलेला आहे. तेंव्हा वरील विधान हे अज्ञान जन्य आहे असे नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

संपुर्ण प्रतिसादाला तीव्र

तर्राट जोकर
Mon, 02/15/2016 - 20:18 नवीन
संपुर्ण प्रतिसादाला तीव्र सहमती. वीर्यस्खलन म्हणजेच पुरुषांचा ओरगॅजम नाही. हो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोधजी

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 20:58 नवीन
तुम्ही धागा सेक्शुअल डिसऑर्डरकडे वळवला आहे . आणि त्याचा व्यत्यास असा की डिसऑर्डर नसेल तर पुरुषाला ऑरगॅजमचा अनुभव नैसर्गिकपणे येतोच . आणि जर ती नैसर्गिक योजना नसती तर पुरुष प्रणयोत्सुक कशाला झाला असता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 21:25 नवीन
ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष प्रणयोत्सुक असतो. व्यत्यास सहसा ऑरगॅझम मिळत नाही म्हणुन स्त्री प्रणयोत्सुक नसते. बरोबर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

एकदम

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 21:53 नवीन
बरोब्बर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमच्या सर्व चर्चेचे सार

कपिलमुनी
Tue, 02/16/2016 - 00:34 नवीन
हाय कंबख्त ! तूने पी ही नही !
एवढेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा