✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

ज
जेपी यांनी
गुरुवार, 02/11/2016 - 21:08  ·  लेख
लेख
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
वाङ्मय
बालकथा
चारोळ्या
मुक्तक
विडंबन
प्रतिशब्द
शुद्धलेखन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
51444 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

धागा उडवला तरी कै हरकत नै.

जेपी
गुरुवार, 02/11/2016 - 21:18 नवीन
धागा उडवला तरी कै हरकत नै.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

एस
गुरुवार, 02/11/2016 - 22:37 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 22:51 नवीन
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही. सहमत. अवांतर - एक पाऊल मागे घेण्यात कधीच कमीपणा नसतो/किंवा चूक मान्य करण्यातही. उलट त्यामध्येच खरे शौर्य असते.
  • Log in or register to post comments

सहमत रे जेपी

पैसा
गुरुवार, 02/11/2016 - 23:04 नवीन
सहमत रे जेपी.
  • Log in or register to post comments

जेपी भाऊ का पेटले आहेत याचे

भीमराव
गुरुवार, 02/11/2016 - 23:26 नवीन
जेपी भाऊ का पेटले आहेत याचे कृपया कारण कळेल का? धागे का संदर्भ नही लाग्या मेरकु.
  • Log in or register to post comments

जेपी भाऊ का पेटले आहेत

हेमंत लाटकर
Tue, 02/16/2016 - 10:19 नवीन
जेपी भाऊ का पेटले आहेत
जेपीला संपादक करा, ते शांत होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 09:21 नवीन
+ १ सहमत आहे...
  • Log in or register to post comments

जेपी भाऊ ला बाड़ीस अन

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 02/12/2016 - 09:27 नवीन
जेपी भाऊ ला बाड़ीस अन +१००००००००
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2016 - 10:06 नवीन
हा काथ्याकूट आहे की कोणाला हिनवण्यासाठी काढलेला धागा आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जेपी कुणालाच हिणवत नाहीत...

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 10:11 नवीन
जेपी "कुणी लिहिलय" हे न बघता, "काय लिहिले आहे" ते वाचून मगच प्रतिसाद देतात, असे माझे वैयक्तिक मत आहे. डिस्क्लेमर : जेपीला अद्याप मी प्रत्यक्षात भेटलेलो नाही. व्यक्तीपुजा आम्हाला पण मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मीही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2016 - 10:20 नवीन
मिही धाग्याचा लेखक न पाहता ''लिहिलंय काय आणि कोणत्या उद्देशाने ते पाहूनच'' प्रतिसाद लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

लिहिलंय काय आणि कोणत्या उद्देशाने ते पाहूनच.....

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 10:28 नवीन
ओके.... पॉइंट नोटेड... आता "लिहिलंय काय" आणि "कोणत्या उद्देशाने" ते जरा शोधून आणि पडताळून बघतो. तोपर्यंत "टाइम प्लीज."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा काथ्याकूट आहे की कोणाला

जेपी
Fri, 02/12/2016 - 10:41 नवीन
हा काथ्याकूट आहे की कोणाला हिनवण्यासाठी काढलेला धागा आहे ? नाही हो बिरुटे सर्,तसा काही उद्देश नव्हता,उगा मनात आल ते बोलुन टाकल, बाकी धागा उडला तरी हरकत नव्ह्ती, पण धागा राहीला.
  • Log in or register to post comments

आपली भावना प्रामाणिक आहे त्यात वाद नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2016 - 10:50 नवीन
आपली बोच मला केव्हाच समजली मीही तुमच्या मताशी सहमत आहे, पण कसं होतं आपल्याला मिपा विविध लेखनाने आणि सदस्यांनी समृद्ध करायचं करायचं असेल तर असं कुठे तरी अडकून चालणार नाही, वाटलं ते बोललो कदाचित मी चुकतही असेन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

तसा काही उद्देश नव्हता,उगा मनात आल ते बोलुन टाकल....

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 10:53 नवीन
आता खूद्द धागाकर्त्यानेच उद्देश सांगीतल्याने, मी (न केलेली) शोधाशोध थांबवतो. @ जेपी, धन्यवाद १. माझा तुझ्यावरचा विश्र्वास दृढ केल्याबद्दल आणि २. पुढचे मुद्दे प्रत्यक्ष भेटलो की सांगीनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

धन्यवाद ,भेटु लवकरच

जेपी
Fri, 02/12/2016 - 10:55 नवीन
धन्यवाद ,भेटु लवकरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत

नीलमोहर
Fri, 02/12/2016 - 10:52 नवीन
गेले काही दिवस मिपावर बरीच चिखलफेक दिसून येतेय, हे असं लिहीण्याची वेळ येऊ नये पण गरज होती नक्कीच. एखाद्याचे मत पटत नाही, मतभेद आहेत म्हणून कोणीही कोणालाही कसेही बोलणे चुकीचेच.
  • Log in or register to post comments

अरे यार बस भी करो अब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2016 - 11:04 नवीन
अब बात को क्यों आगे बढ़ा रहे हो, रोको इसे. आता कशाचं विडंबन करता ते सांगा ! :) मराठी संस्थळावर सदस्यांची चिखलफेक कल भी होती थी, आज भी होती है, और वह आगे भी होती रहेगी. आपल्याला चीखलफेक न करता मिपा किती इंजॉय करता येईल ते महत्वाचं. -दिलीप बिरुटे (जालसंत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

काय सर

नीलमोहर
Fri, 02/12/2016 - 11:23 नवीन
'चिखलफेक न करता मिपा किती इंजॉय करता येईल ते महत्वाचं.' - तेच तर करत असतो ना आपण, 'मराठी संस्थळावर सदस्यांची चिखलफेक कल भी होती थी, आज भी होती है, और वह आगे भी होती रहेगी.' - आगे भी होऊ नये ही प्रामाणिक इच्छा. 'आता कशाचं विडंबन करता ते सांगा' - अरे हो, माझ्या धाग्याकडे लक्षच नाही, काही प्रतिसाद देणे बाकी आहे, बघते आता. आणि विडंबन असं सांगून नाही करता येत हो, ते होतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेपी जी विषय अधिक व्यापकतेने गंभीरतेने मांडायला हवा होता.

मारवा
Fri, 02/12/2016 - 11:09 नवीन
विषय अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा आहे. तो अधिक विस्ताराने तार्कीकतेने हाताळला असता तर बरे वाटले असते.. अशी दोन ओळीत आवेगात केलेली मांडणी ज्या वृत्तीचा ज्या असंयमी उथळ वृत्तीचा निषेध करता आहात त्याचीच एका अर्थाने निदर्शक आहे असे मला तरी वाटते. यावर उपायही सुचवले पाहीजेत असे वाटते. आपण सर्वांनी एकत्र विचार करुन यावर उपाय शोधुन काढले पाहीजेत. नवसदस्यांना उपयोगी पडतील असा एखादा मार्गदर्शनाचा दुवा मुख्य पानावर ठेवावा. त्यावर उत्तम सभ्य दर्जेदार प्रतिसादकांचे प्रतिसाद नमुना म्हणुन दिले पाहीजेत. उदा. धनंजय, इंद्राज पवार, जयंत कुलकर्णी, गवि, अवतार इ. मंडळी ज्या शालीनतेने व सभ्यतेने दर्जेदार प्रतिसाद स्फोटक विषयांवरही सहजतेने नोंदवतात ते व अशा संयमाने हाताळल्या गेलेल्या चर्चांचे दुवे अभ्यासासाठी ठेवावेत. त्याने प्रेरणा मिळेल. दुसर म्हणजे भाषेचे शब्दांचे काही मुलभुत नियम बनवता येतील का यावरही विचार होणे गरजेचे आहे. मुळ विचार जर अर्थपुर्ण असेल तर किंचाळण्याची काहीही गरज नसते. आक्रस्ताळेपणा हा आपल्या मुळ विचारातील कमकुवतपणाच दाखवतो. आणि सर्वात महत्वाच म्हणजे सहीष्णुता एखादी व्यक्ती आपल्या संस्कार अनुभव धारणा आदींच्या अगदी विरोधी १०० % विरोधी विचार मांडत असेल तर त्यावर संवेदनशीलतेने संयमाने आपण तो समजुन घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच तो विचार पटत नसला तरी त्या व्यक्तीचा मुलभुत आदर करणे यायला हवे. संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन प्रौढता आणणे आवश्यक आहे. विचार न मान्य करण्याचे अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री इन अ डिसेंट मॅनर सहज शक्य आहे. ही काय फार अवघड बाब नाही. विरोधी विचारांचा प्रगल्भतेने अंगिकार प्रतिकार प्रतिसाद झाला पाहीजे. आपल्या वाद चर्चांना किमान दर्जा हवा आपली किमान संवेदनशीलता चर्चेतल्या इतर सदस्यांप्रती असली पाहीजे. अस माझ प्रामाणिक मत आहे.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत.

राही
Sat, 02/13/2016 - 22:08 नवीन
वरील प्रतिसादही सभ्य, संयत, संवेदनशील, समंजस प्रतिसादाचा नमुना ठरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

जे पीं शी सहमत.

शान्तिप्रिय
Fri, 02/12/2016 - 11:12 नवीन
जे पीं शी सहमत. प्रतिसाद देताना लेखकाला हिणवण्याचा प्रयत्न होत आहे असे वाट्ते मिपावर.
  • Log in or register to post comments

+ १

ब़जरबट्टू
Fri, 02/12/2016 - 11:17 नवीन
हेच म्हणतो http://www.misalpav.com/comment/803090#comment-803090
  • Log in or register to post comments

संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन

मयुरMK
Fri, 02/12/2016 - 11:57 नवीन
संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन प्रौढता आणणे आवश्यक आहे.
नाहीतर चेपू आणि मिपा मधे फरक काय राहिला. बाकी अश्या विषयांवर कोण चर्चा करायला किव्हा आपले मत व्यक्त करायला येणार असे दिसत नाही. नको त्या धाग्यावर तुटून प्रतिसाद देणार. सहमत मारवाजींशी. आणि जेपी जी शी . बाकी मी माझं मत व्यक्त केलं आहे.
  • Log in or register to post comments

जे पी भाउंशी सहमत.

मृत्युन्जय
Fri, 02/12/2016 - 12:00 नवीन
जे पी भाउंशी सहमत.
  • Log in or register to post comments

अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 12:45 नवीन
अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे भ्रम आहे. हे खाजगी संस्थळ आहे आणि आपापल्या लहरीप्रमाणेच चालणार. (लेस बांधून बसलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

बॅटोबाला सहमत असणारच. खाजगी

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 13:39 नवीन
बॅटोबाला सहमत असणारच. खाजगी संस्थ्ळ आहे वेळोवेळी बजावले गेले आहे त्यामुळे लोकशाही मूल्याचे अरुण्यरुदन इथे करण्यात काही अर्थ नाही. पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट चमकोगिरी यापलिकडे ह्या धाग्याला किंमतही नाही. . (लेस बांधून उभारलेला) अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट

चेक आणि मेट
Fri, 02/12/2016 - 13:51 नवीन
पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट चमकोगिरी यापलिकडे ह्या धाग्याला किंमतही नाही. .
हे काय पटले नाही. पण तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुम्ही या धाग्यावर

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 13:58 नवीन
तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन करतो.
फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

तुमची मानसिकता दाखवून

चेक आणि मेट
Fri, 02/12/2016 - 14:27 नवीन
तुमची मानसिकता दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! (तुमच्याबद्दल चांगले मत आहे अजूनही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अप्रस्तुत

गॅरी ट्रुमन
Fri, 02/12/2016 - 14:49 नवीन
फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.
मला वाटते की जेपी महाशयांनी "पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये.प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही" हे म्हटले आहे ते अशाच प्रवृत्तींविरूध्द.तुम्हाला एखाद्याची मते पटली नाहीत तर ते लिहायला कोणाचीच आडकाठी नाही.पण "फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतात.
(लेस बांधून उभारलेला) अभ्या..
तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाही.जेव्हा आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो, वातावरण निकोप रहावे म्हणून स्वत:चे नोकरीधंदे सांभाळून संपादकपदाची जबाबदारी सांभाळत असतो अशा ठिकाणी वावरताना मिपा संचालक/संपादकमंडळ/सल्लागार आणि इतर जे कोणी असतील त्यांच्याविषयी किमान कृतज्ञता असावी ही संचालक/संपादक्/सल्लागार यांची अपेक्षा असल्यास (तशी त्यांची अपेक्षा आहे की नाही हे माहित नाही) तर त्यात काहीही चुकीचे मला तरी वाटत नाही.तसेच त्यांच्याविषयी काही आक्षेप असतील तर त्यांच्याशी बोलून त्यातून मार्ग नक्कीच निघू शकतो हे मी स्वानुभवातून सांगतो. कुणाही सदस्यावर तुम्ही इथे या अशी निमंत्रणपत्रिका घेऊन कुणी गेले होते असे वाटत नाही.तेव्हा मिपावर वावरता येणे हा आपला जन्मसिध्द अधिकार वगैरे नाही.तेव्हा लेस बांधून तयार आहे वगैरे भाषा अप्रस्तुत वाटते हे परत एकदा लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेस बांधायची भाषा या धाग्यावर

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:56 नवीन
लेस बांधायची भाषा या धाग्यावर अगोदर मी केली म्हणून प्रतिसाद लिहितो. मधल्या काळात इथे जो सालस वेडाचार झाला त्यामुळे असे उद्वेगजनक प्रतिसाद अधूनमधून येत असतात. ते तुम्हांला माहिती नसावे बहुधा, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

पटलं राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2016 - 15:02 नवीन
''तुम्ही लेस बांधून राहा की अनवाणी उभे राहा'' पासून ते ''लेस बांधून तयार आहे वगैरे भाषा अप्रस्तुत वाटते'' इथपर्यन्त एकून एक विचार पतला. -दिलीप बिरुटे ''
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

फुकट चमकोगिरी" वगैरे

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 16:33 नवीन
फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतात
का वाटावेत? जर सर्व अधिकार मालकांच्या हातात आहेत तर
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
ही वाक्ये मालकांनी म्हणावीत. कुणीही उठून धागा काढून हा आव आणायलाच फुकट चमकोगीरी म्हणलेय.
तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाही
नाही पडत ना? मग का मनावर घेताय येवढे. तुम्ही पण करा ना दुर्लक्ष.
आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो,
योगदानाची भाषा मला आपणांकडून शिकायची नाही क्लिंटनभाऊ. आम्ही रोख पैसे देत नाहीत पण जे दिलेय त्याचे बाजारमूल्य आम्हाला चांगलेच माहीत आहे. ते मिपासाठीच म्हणून दिलेय. बोलून काढायचे नसतात पण परत परत जन्मसिध्द अधिकार नसतात वगैरे सांगितल्यामुळे काढावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

सही बोलतायं !

विवेक ठाकूर
Fri, 02/12/2016 - 20:31 नवीन
संकेतस्थळ जरी मोफत असलं तरी ते रिकाम्या स्टेजसारखं आहे. त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही. त्यामुळे संकेतस्थळ मोफत आहे ही एकमेव गोष्ट नेहमी ठासून सांगितली जाते त्याचा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

__/\_____/\__

चेक आणि मेट
Fri, 02/12/2016 - 21:58 नवीन
त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही
तुमच्या ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या दर्जेदार लेखनाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ज्या अर्थी त्यांच्या लेखनाला

सतिश गावडे
Sat, 02/13/2016 - 15:09 नवीन
ज्या अर्थी त्यांच्या लेखनाला तुम्ही दर्जेदार म्हणत आहात त्याअर्थी दर्जेदार लेखनाचे काय निकष असतात हे तुम्हाला ठाऊक आहे. आम्हालाही सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

.

चेक आणि मेट
Sat, 02/13/2016 - 15:45 नवीन
उपहासात्मक आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमची हिंमत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरवर

विवेक ठाकूर
Sat, 02/13/2016 - 19:24 नवीन
तुम्ही धागा काढा आणि तुमची मतं मांडा. माझा जो स्टँड आहे त्या अनुषंगान मी उत्तरं देईन . सुबोधजींचा धागा सुद्धा सेल म्युटेशनची नक्की कारणं देऊ शकत नाही . आणि तिथे किंवा इथे मी त्या विषयावर बोलू इच्छीत नाही . आणि धागा काढू शकत नसाल तर माझा उपहास वगैरे करण्यापूर्वी दोनदा विचार करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

तुमचे ते अध्यात्म, निराकार

मोदक
Sat, 02/13/2016 - 19:33 नवीन
तुमचे ते अध्यात्म, निराकार विचार, ती कसलीतरी कायतरी मेथड वापरली तर ब्रेस्ट कॅन्सर होत नाही हा तुमचा दावा आहे ना? मग तुम्ही पेपर पब्लीश करून जगन्मान्यता का मिळवत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुम्हाला मी काय लिहीलंय याची सुध्दा कत्पना नाही

विवेक ठाकूर
Sat, 02/13/2016 - 20:10 नवीन
आणि निष्कारण प्रतिसाद देतायं. माझा प्रतिसाद ऑरगॅजमच्या अनुषंगानं होता . प्रथम शांतपणे वाचायला शिका . आणि पेपरचं राहू द्या , स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही धागा काढा आणि मग काय होतयं ते बघा .....नाही तर शक्यतो माझ्याशी पंगा घेऊ नका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी

पिलीयन रायडर
Sat, 02/13/2016 - 20:39 नवीन
स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी स्त्रियांपेक्शा तुम्हालाच जास्त माहिती आहे हो. ईथे आक्खा स्त्री देह असुनही मी जगातल्या सर्व स्त्रियांना लागु होईल अशी एकच थिअरी ठामपणे मांडु शकत नाही.. तुमची बातच और!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

बाईश्री

विवेक ठाकूर
Sat, 02/13/2016 - 21:56 नवीन
स्त्री देह आहे याचा अर्थ ऑरगॅजमचा अनुभव असेलच असं नाही. त्यात तुम्ही म्हणतायं की जगातल्या सर्व स्त्रियांना लागु होईल अशी एकच थिअरी ठामपणे मांडु शकत नाही हे तर विषयाचं उघड अज्ञान दर्शवतं. कारण पुरुषांना जसा ऑरगॅजमिक आनंद मिळतो अगदी तसाच आणि त्याही पुढे जाऊन मल्टीपल ऑरगॅजमिक अनुभव स्त्री देहाला लाभू शकतो. हा अनुभव नसल्यानंच तर, जननानंतर काही काळातच, स्त्री प्रणयविरक्त होते. पुरुष देह हा सिंगल ऑरगॅजमिक आहे आणि स्त्री देह मल्टी-ऑरगॅजमिक आहे. ही जगनमान्य आणि सर्व स्त्री देहांना अ‍ॅप्लिकेबल थिअरी आहे. ऑरगॅजमचे स्त्री देहावर, विषेशतः तिच्या मानसिकतेवर आणि इंडोक्राइन सिस्टमवर दूरगामी परिणाम होतात. पण इथे कुणालाही त्यातलं काहीएक गम्य दिसत नाही. कारण तसं असतं तर याविषयावरची चर्चा निश्चित विधायक वळणानं गेली असती. तुम्ही ही माझ्याशी वेळोवेळी, कधी पोस्टवर तर कधी खवत, निष्कारण वाद घालता आहात. त्यातून मला काही समजलेलं नाही हा तुमचा गैरसमज, तुम्हाला स्वतःलाच पटवून द्यायचा असेल तर विषयच काढू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काका.. सर्व स्त्रियांना

पिलीयन रायडर
Sat, 02/13/2016 - 22:20 नवीन
काका.. सर्व स्त्रियांना शाररिक पातळीवर एक अनुभव मिळणे हा मुद्दा आहे का माझा? प्लिझ नीट वाचाल का? "तुम्ही" त्याचा संबंध कोणत्या आधारावर ब्रेस्ट कॅन्सरशी लावलात हे विचारलं. तर consciousness वर उतरलात. तुमचे अनुभव वैयक्तिक आहेत. ते १००% स्त्रियांना लागु होतीलच ह्याची काही खात्री नाही. तुमचा तेवढ्या स्त्रियांचा अभ्यास नाही. तुम्हाला खोटं पाडणे हे एकच काम मला आहे किंवा इतक्या क्षुल्लक गोष्टींना महत्व देणं हेच एक ध्येय आहे असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही लिहीताय ते सर्वांनी ताबडतोब मान्य करावं असं का वाटतं? मी तुम्हाला खव मध्येही साधे प्रश्न विचारले होते. तुम्ही धागा काढा.. लोक चर्चा करतील. या त्या धाग्यावर फक्त अवांतर होईल, बाकी काही नाही. ईतकं नीट लिहुनही तुम्ही गैरसमज करुन घेणार असाल तर माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

+१

श्रीगुरुजी
Sun, 02/14/2016 - 15:08 नवीन
+१ स्त्रियांच्या ऑरगॅझम् बद्दल काही जणांची इतकी ठाम मते वाचून मला आदि शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यातील वादविवादाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

उगीच फालतू कमेंट करण्यापेक्षा

विवेक ठाकूर
Sun, 02/14/2016 - 15:18 नवीन
तुम्ही तुमची मतं लिहा ना, मग बघू काय होतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्त्रियांच्या ऑर्गॅझमबद्दल

श्रीगुरुजी
Mon, 02/15/2016 - 22:24 नवीन
स्त्रियांच्या ऑर्गॅझमबद्दल फक्त स्त्रियाच अधिकारवाणीने सांगू शकतात. आम्ही कसे सांगणार? अर्थात तुम्ही स्त्री नसतानासुद्धा त्याबद्दल तुम्हाला स्त्रियांपेक्षा जास्त व सखोल माहिती व परीपूर्ण माहिती आहे म्हणूनच मला श्री श्री आदि शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यातील वादविवादाची आठवण झाली. प्रसूती होतानाही स्त्रियांना किती वेदना होतात किंवा अजिबात वेदना होत नाहीत याविषयी स्त्रियांपेक्षा तुमच्याकडेच जास्त व सखोल माहिती असणार यात अजिबात शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

स्त्री देह आहे याचा अर्थ

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 14:02 नवीन
स्त्री देह आहे याचा अर्थ ऑरगॅजमचा अनुभव असेलच असं नाही.
ह्या एका वाक्यावर बोलायचं मुद्दाम ठेवलं होतं कारण मोबाईल वरुन एवढं नीट लिहीणं शक्य नसतं. मी वर म्हणतेय की "स्त्री देह असुनही.." आणि तुम्ही त्याला म्हणताय की "स्त्री देह आहे म्हणून ऑगॅझम माहिती असेलच असे नाही." म्हणजे तुम्ही माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी टिपण्णी करत आहात का? तसे असल्याने केवळ ते अशिष्टच नाही तर मुर्खपणाचेही आहे. संक्षी / विठा, तुम्ही ज्या काही थिअरीज मांडत आहात त्या कितीही म्हणलं तरी अखेर कल्पनेच्या भरार्‍याच आहेत. दोन कारणांसाठी १. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी. २. हा मुद्दा मी अगणित वेळा आधी मांडलेला आहे. परत मांडते. आणि ह्यावेळेस नाईलाजाने काही बोलावे लागणार आहे. संक्षी तुमचा डेटापॉईंट एक आणि एकच आहे. त्यापेक्षा जास्त तुमच्या अनुभवाच्या कक्षा नाहीचेत. तुम्ही मागे एकदा तुमच्या मुल होतानाच्या अनुभवाविषयी लिहीले होते तेव्हा साधारण हेच मुद्दे आले होते. तुम्ही कदाचित तेव्हा बरेच वाचन केले असेल. काही प्रयत्नही केले असतील. तुम्हाला मुलगा झाला. तुम्हाला तुमच्या मेथडवर विश्वास बसला असेल. पण दुर्दैवाने तेच समस्त स्त्री जमातीला लागु करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात असे वाटते. तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव सार्वत्रिक आहे असे मानणे हा ही एक कल्पनाविलासच आहे. धागा काढण्याइतपत काही शिल्लक असेल आता तर काढा. (मला तसं काही आता बोलायला असेल तुमच्याकडे असं वाटत नाही हा भाग वेगळा...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तसे असल्यास*

पिलीयन रायडर
Mon, 02/15/2016 - 14:03 नवीन
तसे असल्यास*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सविस्तर प्रतिसाद

विवेक ठाकूर
Mon, 02/15/2016 - 15:28 नवीन
खाली दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा