Skip to main content

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

लेखक चेक आणि मेट यांनी गुरुवार, 11/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59636
प्रतिक्रिया 331

प्रतिक्रिया

Because they want to - या विधानावर विश्वास होताच. आता तो दृढ व्हायला लागलेला आहे. मृत्युंजयभौ आणि डांगेअण्णा - मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो असे तुम्ही दोघे आहात. कृपया असे भांडू नका, कारण त्याने फक्त कटुता वाढते. या संस्थळावर मोदींच्या बाजूने किंवा विरोधी मत दिल्याने मोदींना किंवा त्यांच्या राजकीय विरोधकांना काही फरक पडत असेल असं वाटत नाही. तस्मात व्यक्तिगत वाद प्लीज घालू नका.

In reply to by कपिलमुनी

वैचारिक देवानघेवान होती काय, मला वाटले???? काय पण, रंणगाडे चालवायला पाहिजे! ते इसिस मधले कुत्रे पकडले आहेत ते बिरयानी खात आहेत मजेत ते काय देशसेवा करायला गेले होते. किती शिक्षा होईल त्यांना? आपले अतिरेक्याविरुद्ध हेच धोरण राहिले तर सन्देश के जाईल माहीत आहे. पकड़े गए तो मुफ़्त का खाना, दसपंधरा साल तो सुकून, ओर मारे गए तो जन्नत में ७२ हूर है ही। रच्याकने ते बाई आंतकवादी मरतँ ते तिला काय मिलतं वो? कोणी जाणकार खुलासा करेल काय? एक हाय आपल्याकडे, पण फारच इनोदि बाबा.

In reply to by बोका-ए-आझम

ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त माघार. पण सरकारी धोरणांवर एक नागरिक म्हणून टिका करणारच. ती टिका मोदींबद्दल होते आहे असे वाटून घेणार्‍यांबद्दल नाइलाज आहे. गॉड ब्लेस देम टिल इटर्निटी.

In reply to by मोदक

डिस्क्लेमर समजा मोदकभौ, ब्लँकेट स्टेटमेंट. मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते. कुणाही आयडी-विशेषला उद्देशून नाही. लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.

In reply to by संदीप डांगे

एक मिनीट. मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्‍यांबद्दल आहे ते. मुळात तुम्ही सरकारवर टीका कुठे केली आहे? तुम्ही देशद्रोही लोकांवर टीका केली आहे. तेच ते रणगाडे वगैरे.. लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो. बोला हो.. बिन्धास्त बोला. आपलेच मिपा आहे. फक्त विषयाला धरून आणि सुसंगत बोला इतकेच.

In reply to by संदीप डांगे

मृत्युंजयांचे प्रतिसाद वाचले पण त्यांनी मोदींचं नावचं घेतलेलं नाही डांगे अण्णा. काहितरी गैरसमज होतोय तुमचा. मागे एका धाग्यावर तुम्हीचं हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन काहीतर साडेबारा एम.बी. (बी कॅपीटल) दिलेलात ना त्यामुळे हा वैचारिक बदल कशामुळे झाला असावा अश्या अचंब्यात ते, मी आणि इतर बहुसंख्य मिपाकर पडलेत. म्हणजे ह्या एका वाक्याने आजपर्यंतचे ह्या विषयावरचे सगळे प्रतिसाद वाया गेले की तुमचे. असो. रणगाडे फिरवले पाहिजेत ह्या तुमच्या एका वाक्याशी सहमत. थाळीची चाळणी करणार्‍यांना क्षमा केली नाही पाहिजे.

डांगे भाऊ मृत्युंजय यांच्या थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर नक्की का? नक्की ना? या प्रतिसादात "मोदीविरोधकफोबिया" कुठे आला ते समजले नाही. आणि त्यावर तुम्ही एकदम तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. असा प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही. त्यावर त्यानी तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ? असे स्पष्टीकरण दिलेले असताना त्याच्या खालील टोकदार भाषा असलेला प्रतिसाद कसा काय दिलात हे पाहून आश्चर्य वाटते असो

सेक्युलर =not connected with religious or spiritual matters. कोणत्याही जातीधर्माशी संबंध नसलेला / ना पाळणारा / त्यावर आधारीत भेदभाव ना करणारा असा अर्थ होतो . हिंदुत्ववाद म्हणजेच राष्ट्रवाद ! आता लेखाकडे वळू या लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे. सेक्युलर हा कडवा देशाभिमानी असू शकतो हेच आजकाल मान्य दिसत नाही.
"मी सेक्युलर आहे .सर्वधर्मसमभाव पाळतो . प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे त्याविरूद्ध एकही शब्द एकही कारवाईला मी समर्थन देणार नाही"
अशी भुमिका असू शकते . पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा ध्रुवीकरण झाले आहे . वास्तविक पाहता या लेखात मोदींचा नाव यायचे काहीच कारण नव्हते. JNU आणी इशरत जहान च्या विरोधात बोललात तर काहीजण तुम्हाला देश प्रेमी म्हणतील ! मोदीभक्त का बरे म्हणतील? लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.

In reply to by कपिलमुनी

असहमत. लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे. हे कशावरून?

In reply to by मोदक

त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत १. दहशत्वाद आणि दुसरा जेऐनयू मधे पाकीस्तान च्या बाजून घोषणा ! कोणत्याही देशप्रेमी माणसाचा या दोन्ही गोष्टींना विरोध असेलच पण लेखकाचे म्हणणे असे आहे की या गोष्टी पटलावर मांडल्यावर त्याला मोदीभक्त म्हणतील ? का बॉ ? या गोष्टीला फक्त मोदीभक्तच विरोध करतात का ?

In reply to by मोदक

इतक्या लौकर सहमत असशील तर आमी नाय खेळणार !

In reply to by कपिलमुनी

अर्धवट प्रसिद्ध झाला वाटत ! फक्त हिंदुत्ववाद म्हणजेच राष्त्रवाद असे लोका समजतात ते चुकीचा आहे. असे वाचावे

In reply to by कपिलमुनी

लेखकाने सेक्युलर म्हणजे देशद्रोही असे ठरवून लेख लिहिलेला दिसत आहे. शेवटचं वाक्य वाचा लेखामधील. ढों आणि गी म्हणजे ढोंगी असं मी म्हटलं आहे. लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे. हळहळू श्वास घ्या,हं आता सोडा,शांतपणे डोळे झाका,श्वासोच्छवासाची क्रिया चालू ठेवा,आता डोळे उघडा आणि थोडासाच लेख आहे तो परत वाचा. धन्यवाद.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? ह्या वाक्याचा नेमका अर्थ शोधतोय. "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद देणारे" कुणी इथे असतील तर जरा मदत करा बॉ.

In reply to by संदीप डांगे

:D :D @मृत्युंजय भाऊ, माफ़ करा पण तुम्ही क्लियर कट डांगे साहेबांचा स्टीरियोटाइप केला आहात! ही अपेक्षा तुमच्याकडून तरी ख़ास नव्हती, अन हो तुम्हा दोघांनाही (आमचे डांगे ब्वा पण अन तुम्ही पण) मी अतिशय उत्तम मित्र मानतो माझे, त्याच हक्काने हा प्रतिसाद टंकतो आहे, कारण मैत्री फ़क्त गोड बोलणारी नसते प्रसंगी मित्रांनी मित्रांच्या नेमक्या जागी लाथ घालुन सावरायचे असते! (अधिक उणे असल्यास मलाही घाला लाथ) म्हणून अजुन एक गोष्ट सांगतो, तुम्ही जो प्रतिसाद लिहिला आहे त्यातली भाषा तुमच्या हातून शोभतं नाही अतिवैयक्तिक आहे ते , तुमचे मुद्दे रास्त आहेत का नाही हे पहायच्या आधी कोणालाही फर्स्ट रीडिंग मधे ते जाणवेल भाऊ! असो! बहुदा माझे मिपावरील दिवस भरत आले असतील असे वाटू लागले आहे हल्ली. :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जुन्या जाणत्या आणि मिपावर प्रसिद्ध अशा आयडीकडून अशा अपेक्षा नव्हत्या!! असो.... पाॅपकाॅर्न बद्दल वर गमतीने बोललो होतो...ते दुर्दैवाने तसेच घडले! :) आणि पदार्पणात हे असले धागे काढत राहून टीआरपी मिळवणार्यांबद्दल मला अतोनात राग आहे! हे विधान कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही! अरे, इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा! मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या...ते राहिले बाजूला.... साहेब आले नि मांडला मुद्दा, देशप्रेम-देशद्रोह वगैरे... त्याआधी आपली जरा ओळख सांगता का धागाकर्ते?? कुठुन आलात? काय करता? देशासाठी आपले योगदान काय?? आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट! हा आजचा माझा पहिला आणि बहुतेक शेवटचा! राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल..... डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक?? (मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला) Sandy

In reply to by चांदणे संदीप

संदिप भाऊ , जाऊद्या दुर्लक्ष करा.
इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा!
हे नाही कळालं एखादा नवीन सदस्य असेल तरी तोही तितक्याच प्रौढपणे आपले मत मांडू शकतो की ! एखाद्या व्यक्तीचा सदस्य काळ पाहून त्याची कुवत ओळखणे कसं काय शक्य आहे ?
राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल..... डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक?? (मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला) Sandy
इथे पण असहमत , तुम्हाला चर्चा आवडत नाही तर नका ना वाचू ! शिर्षक वाचून लांब रहा झालं . मला तर वैयक्तिक आवडतात अशा चर्चा कारण यात पूर्णपणे वेगळे विचार करणारे लोक आपापले मुद्दे तितक्याच प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे एकाच घटनेचे वेगवेगळे पैलू कळतात .
आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट!
॑ का बुवा विरोध मेगाबायटी प्रतिसादांना ? ज्यांना वेळ ,इच्छा आहेत ते लिहीतात. ज्यांना वेळ, इच्छा आहे ते वाचतात. ज्यांची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. आणी काय नवीन लेखक असला तर अनुल्लेखाने मारणार का प्रोत्साहन देणार ?
मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या.
याच्याशी सहमत! रच्याकने एवढे लिहून मी माझा किलोबायटी प्रतिसाद संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

In reply to by चांदणे संदीप

धागा न वाचण्याचा आणि पाॅपकाॅर्नची प्रतिक्रिया न देण्याचा पर्याय होता तुमच्याकडे. मिपावर असा काथ्याकूट होणारच!! हे काय काव्य संमेलन नाही तुमच्या कविता ऐकायला. आणि मुद्यांची गांभीर्यता तुम्हाला कळते काय?? देशासाठी माझं योगदान विचारताय,तुम्ही काय कारगिल युद्ध खेळून आलात कि काय? काथ्याकूट मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दयांबद्दल काही लिहायचे नाही काय? अहो तुम्ही कोठून आलात?काय करता? चला हवा येवू द्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमच्या विचारांचा आदरच आहे सोन्याबापू. पण दुर्दैवाने त्यावर सहमती दाखवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व. मी संदीप डांगेंचा ४ शब्दात स्टिरियोटाइप कसा केला ते नाही कळाले. मी एक खुप साधा प्रश्न विचारला होता. तिथुन धागा मोदी, माझा मोदीविरोधकफोबिया, डांग्यांचे देशप्रेम, माझे अपमानकारक लेखन, विवेकहीन विचार, माझे पुर्वग्रहदुषित विचार, माझे अधिकार यावर कसे पोचले हे मला अजुनदेखील कळालेले नाही. माझ्या पहिल्या प्रतिसादात एकही वैयक्तिक टीकेसदृश्य वाक्य नसूनही संदीप डांगे माझ्याबद्दल उपरोल्लेखित बेछूट वैयक्तिक विधाने करत सुटले हे कदाचित तुमच्या नजरेतुन सुटले आहे. " नक्की का ? नक्की ना?" केवळ या दोन प्रश्नातुन खालील वरील गोष्टी कश्या प्रतीत होतात? असो. तरीही तुमच्या मताचा आदरच आहे. खासकरुन तुम्ही आम्हाला तुमचे मित्र मानता तर तुमच्या प्रतिसादाचा मी नक्कीच विचार करेन. नुकत्याच घडलेल्या सियाचिन घटनेनंतर तर सैनिकांबद्दलचा आदर अजुन वाढलाच आहे. तुम्ही मला मित्र समजता या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे. मतमतांतरांचा विषय बाजूला सारुन आपली मैत्री अशीच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा.

In reply to by संदीप डांगे

याचा अर्थ खालीलप्रमाणे झालेल्या अन्य घटनांसाठी जसे वेमुला केस मध्ये निषेध करणारे कार्यक्रम केले तसे का केले गेले नाहीत ? (आं जा वरून साभार) http://picsture.com/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-in-bareil… http://www.abplive.in/videos/12-year-old-dalit-girl-raped-and-murdered-… http://www.uniindia.com/girl-raped-and-murdered-in-bareilly/states/news… http://timesofindia.indiatimes.com/city/patna/60-dalit-students-from-Bi… http://www.thehindu.com/news/national/other-states/60-dalit-students-in… http://zeenews.india.com/news/maharashtra/my-son-was-murdered-because-h… सगळे निषेध कार्यक्रम मोदी सरकार विरोधीच का असतात ? तथाकथित सेक्युलरांचा निवडक राजकीय विरोध हा मुद्दा आहे. (जुनाच आहे)

In reply to by sagarpdy

सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा. पण धागाकर्त्याचा रोख काय आहे नेमका? रोहित वेमुला वा इतर देशांतर्गत पक्षीय राजकारणी कुरघोड्या व जेएनयुतला कार्यक्रम ह्या दोहोंना एकाच पातळीवर घेऊ नये असे वाटते. कारण रोहित वेमुला निषेधप्रकरण हे स्पष्ट मोदीविरोधी-संघविरोधी-भाजपविरोधी कारस्थान होते. जेएनयुतला कार्यक्रम देशविरोधी कार्यक्रम आहे. त्याचा केंद्रात कोणत्या पक्षाचे, विचारांचे सरकार आहे ह्याच्याशी संबंध नाही.

In reply to by संदीप डांगे

मोंदीना काय समजतात लोक ते देवच जाणे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते
काही दुमत? खरेच आहे हे. मोंदीना विरोध करायला जाऊन आपण नकळत देशविघातक कार्य करत आहोत. हे ढोंगी फेक्युलर लोकांना समजत नसते,म्हणजे त्यांचा त्या गोष्टीशी संबंधच नसतो म्हणा ना!त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. आणि आपण इथे चकाट्या पिटत परत मोंदीवरच घसरतो काय म्हणता?

डेविड हेडलीची साक्ष २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात घेतली जात आहे. इशरत प्रकरण हे त्या आधीचे आहे. हेडलीला साक्ष देताना तीचे नाव आठवत नव्हते, त्याने तीन महिलांच्या नावाचे ऑप्शन मागीतले,आपल्या वकिल साहेबांनी तीन महिलांची नावे सांगितली त्यात इशरतचेही नाव होते.ते नाव हेडलीला ओळखीचे वाटले व त्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्या तीन ऑप्शनमध्ये आपल्या वकिलानी इशरतचे नाव घेतले नसते तर? सगळंच संशयास्पद वाटतय. -

बातमीनुसार त्याला नूरजहाँ, इशरत आणि मुमताजमहल अशी तीन नावं ऐकवण्यात आली होती आणि त्याने इशरत जहाँ हे नाव घेतलेलं आहे. पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही. कायद्यानुसार हेडली कोर्टात under oath साक्ष देत असल्यामुळे जोपर्यंत त्याची साक्ष निखालस खोटी ठरवणारा पुरावा कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत कोर्ट हीच साक्ष ग्राह्य धरेल.

पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाही
म्हणुनच संशयास्पद वाटतय.

In reply to by मार्मिक गोडसे

इशरतचा एन्काउंटर झाल्यावर तीचा फोटो लष्कर-ए-तोयबा च्या वेबसाईटवर शहीद म्हणून झळकला होता.

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे अण्णा, दहशतवादी समोर हातात बंदूक घेऊन उभा असेल तेंव्हा त्याला संशयाचा फायदा देत येत नाही. इशरत जहान गुजरात मध्ये गरबा खेळायला गेली होती का? डेव्हिड कोलने अमेरिकन कोर्टात इशरत जहान दहशतवादी होती आणि ती श्री मोदींना मारण्यासाठी गुजरातला गेली होती हे कबुल केलेले आहे. तेथे दिलेला कबुली जबाब भारतीय कोर्टात चालत नाही म्हणून हि व्हिदिओ कॉन्फरन्स आहे. तिला मारल्याबद्दल या सुडोसेक्युलर माणसांनी मोदिजीना खूनी ठरवून टाकले होते. सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत. तरीही आपण त्यांना संशयाचा फायदा देऊ पाहत आहात? कोणत्या आणि किती विश्वासार्ह माहितीवर? आपण त्यांचे वकील आहात का आणि आपल्याला अशी खास माहिती आहे? जर असेल तर इथे मांडा. नसेल तर निदान हवेत बाण मारू नका. धन्य आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत.
डॉ.साहेब आपला प्रचंड गैरसमज झालेला आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर १०० % विश्वास आहे.भारतीय न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या व्यक्तीचा मी द्वेषही करत नाही किंवा दोषी ठरवलेल्या इशरतला निर्दोषही मानत नाही. आपल्या सरकारी वकिलावर हेडलीच्या वकीलाचा केवढा तो विश्वास? समजा आपल्या वकीलाने हेडलीला जाळ्यात पकडले असते व त्यात हेडली अडकला असता आणी त्याने इशरतच्या ऐवजी दुसर्‍या कोणत्या महीलेचे नाव घेतले असते तर इशरत निर्दोष ठरली असती का? हेडली म्हणतो म्हणून ढोल बडवणारे आपल्या न्यायव्यवथेचा अपमान करत आहेत. दुसरा संशय हा Quid pro quo प्रकारचा आहे. योग्यवेळी त्यासंबंधी लिहीन,इथे नको.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, तुमचा मुद्दा पटला. मात्र एक विधान दुरुस्त करायला हवंय.
>> सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले ....
कुठल्याही न्यायालयाने मोदींना निर्दोष म्हणून जाहीर केलेले नाहीये. कारण की कुठल्याही न्यायालयात मोदींवर आरोपपत्र दाखल नाहीच्चे मुळी! आ.न., -गा.पै.

1)डांगेसाहेबांचा पहिला प्रतिसाद →पाॅपकाॅर्न म्हणजे धागाकर्त्याचे लिखाण क्षूद्र आहे. बर चला लेखन मुद्देसूद नाही, धाग्याचा आशय काय आहे?मी कोणविरूद्ध आगपाखड केली आहे का? केली आहे तर ती ढोंगी लोकांवर मी ढोंगी सेक्युलर असाही शब्द वापरलाय. बरं यातून माझं लिखाण भाजपेयी आहे असं वाटत का? 2)डांगे साहेबांचा तिसरा प्रतिसाद मी स्टोरिओटाईप प्रतिसाद दिल्यावर खवळले, आणि प्रतिसाद आला तोही धमकीवजा सूचना असाच होता.म्हणजे चड्डीत रहा वगैरे,आणि पहिली आणि शेवटची सूचना.अशी सूचनावजा धमकी. मग मी मोठं मन करून माफी मागितली. 3)चौथा प्रतिसाद मी माफी मागितल्यावर लेखन कसे असावे हा उपदेश त्यांनी केला. 4)पाचवा प्रतिसाद त्यामध्ये ते असे म्हणतात, थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर मुद्देसूद,विचारनीय,तर्कशुद्ध लेखन करणारा माणूस अशी प्रतिक्रिया कशी देईल?हा प्रश्न मनात आला.आणि त्यामुळे त्यांनी असे उपहासात्मक म्हणलं असं न राहवून वाटलं. कदाचित मला डांगेफोबिया झाला असेल. त्यानंतर त्यांची आणि मृत्युंजयसाहेबांची जुगलबंदी चालू झाली. बरं मी धाग्यात दोनदा मोदींचा उल्लेख केला आहे 1)
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
मुद्दा रास्त आहे. अल्पसंख्यांक तुष्टीकरण करण्यासाठी हे स्वयंघोषित ढोंगी सेक्युलर काहीवेळेस दहशतवाद्यांच्या विरूद्ध सुद्धा तोंड उघडायला घाबरतात. दहशतवाद्यांच्या नावापुढे 'श्री' लावतात. ते फक्त आणि फक्त राजकारण करतात. प्रश्न असा आणि तो फार महत्वाचा आहे,कि दहशतवाद हा राजकारण करण्याचा मुद्दा आहे का? दहशतवादाची झळ अजून आपल्यापर्यंत पोहचली नाही. 2)
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
इथेही मी मोदींचा उल्लेख केला आहे. आणि हाही मुद्दा रास्त आहे,अगदी 100% मी मोदीभक्त नाही,तरीही तटस्थपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोदी आल्यापासून दांभिक सेक्युलरांचा सुळसुळाट वाढला आहे कि नाही?? उत्तर हो असं आहे,वाढला आहे. बरं आता चर्चा शांतपणे होणे गरजेचे होते,पण चर्चा निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न झाला. chandnesandeep यांनी तर मला जिल्बिवालाच ठरवून टाकलं तुमचे देशासाठी योगदान काय म्हणे?कोण आहात?काय करता?वगैरे वगैरे. मिसळपाव हे फक्त आणि फक्त कविता सादर करायचे संस्थळ आहे का? चांगले वाचावे,चांगले विचार मांडावे असे ते म्हणतात, मी काय वाईट विचार मांडले हे कोणीतरी सांगा. आणि ही चर्चा तर एकदम सरळ आहे, मी देशद्रोही,धर्मविरोधी,भडकाऊ,असे काही लिहले आहे का? तसे असेल तर आमचे मिपावरील सक्रीय सभासद म्हणूनचा प्रवास संपवतो.आणि आम्ही वाचनमात्र म्हणूनच राहतो. चांदणेसाहेब,सोन्याबापू तुमची मिपाला गरज आहे,तेव्हा कृपया कायमचे गमन करू नका ही विनंती. तुम्ही छान लिहता. ...धन्यवाद

पहिले म्हणजे ज़रा गार व्हा, दूसरे म्हणजे स्वतःचे मुद्दे मांडायमागे तुमची काय भूमिका होती ती मांडा. डांगे ह्यांना जर तुमचा रोख चुकीचा वाटला तर त्याचा प्रतिसाद करा, हे असे "आम्ही नाय जा" "आम्ही चाललो मिपा सोडुन" हाच का तो काथा कुटायचा बाणा? इतके मनावर घेऊ नये पब्लिक फोरम! बाकी आम्ही नवे होतो तेव्हा आमची ही हुर्यो उडाली आहे इथेच "ह्या धाग्यावर!" हे मिपा आहे देवा! ज्यांनी माझी आडमाप टंगड़ी ओढ़ली होती ती माणसे आज चांगले मित्र आहेत माझे , आले काय गेले काय असं नसतं,अन वाचन मात्र रहाणे वेगळे पड़ते स्वतः लिहिण्यापेक्षा! बघा विचार करा काय ते! शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू, तुम्ही सैन्यात असल्याने मिपावर माझ्यासकट सगळेच तुम्हांला थोडा अधिक आदर देतात. सैन्यातल्या व्यक्तीने तो आदर कमावलेलाही असतो, पण गेले काही दिवस आपले प्रतिसाद बघता थोडे आश्चर्य वाटते. इथे चेक आणि मेटना आपण योग्य सल्ला दिलेलाच आहे, पण http://www.misalpav.com/comment/802860#comment-802860 ह्या आणि अशाच अनेक प्रतिसादांवर आपला मित्रत्वाचा सला का दिसला नाही, ह्याचे मला खरेच मनापासून आश्चर्य वाटून राहिले आहे. सैनिक देशाचा हो, फक्त प्रांताचा नव्हे, खरे ना?

In reply to by यशोधरा

काकांचा धागा आत्ता वाचला हो! बाकी कुठल्या धाग्यावर कुठे काय बोललो नाही ते बयाजवार सांगाल का जरा ताई ? माझी चुक (कळत केलेली नकळत झालेली) कुठलीही असो ती दुरुस्त करायला मला लाज नव्हती/नाही/नसेल अशी मी इथे लिखित ग्वाही देतो इथे, बाकी ते "एका प्रांताचा" वगैरे वाचुन मनःपूर्वक वाईट वाटले इतके नोंदवतो, इतका उथळ मी निश्चित नाही पण अर्थात तशी इमेज झाली असेल तर माझेच दुर्दैव म्हणावे लागेल. तुमच्या माहीती करता मी मुळचा सातार चा, आई सांगलीची,लहानाचा मोठा विदर्भात झालो अन नोकरी भारतभरात करतोय तस्मात् मी सगळीकडला अन सगळ्यांचाच आहे इतके सांगतो भरोसा ठेवणे न ठेवणे तुमची इच्छा उरला प्रश्न तुम्ही आदर देण्याचा अन मी तो कमवण्याचा तर तो कमवला आहे की नाही हे मला माहीती नाही मी , मला २ गोष्टी माहीती आहेत १ मिपा परिवाराने (तुम्ही सुद्धा) खुप भरभरुन आदर नक्कीच दिलाय मला २ तो आदर टिकवणे अन पचवणे हा खरोखर एक अग्निदिव्य असतो पब्लिकली तो आदर एक्सेप्ट करायचा असेल तर प्रसंगी एकट्यात आरश्यासमोर उभे राहून स्वताडन सुद्धा करावे लागते, कारण आदर म्हणजे भरोसा असतो तो लोकांचा तो जगणे कठीण असते पण तितकाच तो जॉब सैटिस्फैक्शन सुद्धा देतो बाकी आपण सुज्ञ आहात अन ज्येष्ठ सुद्धा, ताई म्हणतो मी तुम्हाला तेव्हा त्या हक्काने घड़ाघड़ा बोललो कमी अधिक लागले असेल तर माफ़ी मागतो (व्यथित) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब व्यथित होऊ नका, दुसरा व्यनि केलाय रिप्लाय द्या कि राव. ताईंच्या बोलण्याचे व्यर्थ वाईट वाटून घेताय तुम्ही. बर तुम्ही डांगेसाहेबांना समजावून सांगितलय का? याबाबत सोयीस्कररित्या मौन बाळगले आहे तुम्ही. "हो मी त्यांना समजावून सांगितलं आहे"अशा आशयाचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुरले आहेत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच तुम्हांला मी आत्ता उदाहरणादखल दिल्या सरखे प्रतिसाद दिसले नाहीत म्हणता, मग दाखवून तरी काय उपयोग नाही का? :) पण हरकत नाही, आता जे उदाहरण दिलेय त्याबद्दल काय मत नोंदवता?

In reply to by यशोधरा

नाही तसे नाही, दाखवले तर बोलताही येईल, दाखवायला मी सुद्धा तसेच प्रतिसाद दाखवु शकेल पण ही टोटल एक्सरसाइज माझ्या चूका रेक्टिफाय करायची आहे इतर कोणाच्या हाईलाइट करून स्वतःच्या चुका रेशनलाइज करायची नाही म्हणून मी प्रतिवाद करणार नाही ! चुक सांगा मी करेक्ट करतो, बाकी काकांची पोस्ट पहाल, ती पोस्ट आली तेव्हा मी जेवत होतो हो! अन नंतर गुरुजींच्या धाग्यावर लिहित होतो, वाचल्याबरोबर तिकडे मत नोंदवले आहेच अर्थात हे तुम्हाला पटने न पटने तुमचा मुद्दा असेल पण तुम्ही सांगितले म्हणून मी उपचार म्हणून तिकडे बोललो असे नाही तर खरेच मला पटले नाही म्हणून बोललो ! बाकी काय सांगणार? _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ठीके हो सोन्याबापू, तुम्ही सैन्यात आहात म्हणून तुम्हांला पेडेस्टलवर ठेवून आम्ही (निदान मी तरी) पहातो, तेव्हा असे कसे, असे वाटले म्हणून पोस्ट प्रपंच. नपे़क्षा आपको कुछ कहनेकी मेरी क्या जुर्रत. आपण व आपल्यासारखे सैनिक आहात म्हणून आम्ही सिविलियन्स आहोत.

एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी Intelligence Bureau's letter to CBI: 'David Headley told FBI Ishrat Jahan was a suicide bomber' New Delhi: When officers of India's National Investigating Agency (NIA) were allowed to interrogate David Coleman Headley in a jail in Chicago in 2010, the Pakistani-American allegedly told them that Ishrat Jahan, a college student shot dead by the Gujarat Police in 2004, had terrorist links. .... NDTV has learnt that in March 2010, the FBI had independently warned India's Intelligence Bureau that in his questioning by US investigators, Mr Headley had said that Ishrat and her associates were planning terror strikes on Gujarat temples including the Akshardham temple in Gandhinagar. २०१३ म्हणजे युपिएच्या अच्छे दिनांचा काळ... त्यावेळेस हॅडली म्हणला तर एन डी टीव्ही ला काही ठसका लागला नव्हता... गंमत म्हणजे सरकारने माध्यमांना दिलेल्या कागदपत्रांमधे तो भाग गाळला होता तरी देखील... सरकारने तो भाग त्यावेळेस का गाळला असेल? अर्थातच निवडणुकांच्या आधीचा काळ होता त्यामुळे साहजीकच होते म्हणा... असो.

In reply to by विकास

काय हो.. चांगलं दळण-कांडण-पॉपकॉर्न सेवन चाललं असताना नेमका रसभंग करणं कसं सुचतं तुम्हाला ?? :प

In reply to by अर्धवटराव

"आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे, (शहाणे सगळेच आहेत म्हणून) इन्फॉर्म्ड करावे सकल जन" असा आमचा उदात्त हेतू आहे... ;)

राका, भाजपा, का, इ इ इ च्या प्रवक्त्याना वन्दन करून त्यांचे ठराविक वाक्य इथे वापरतो " सध्या प्रक्रण न्यायप्रविस्ट असल्याने त्याबाबत बोलने उचित नाही"

नथुलाही तीन ऑप्शन द्यायला हवे होते. त्यांचा खून करायला कुणी सांगितले ? ऑप्शन्स.. काका तात्या नाना

In reply to by मोगा

काल टी.व्ही. सरकारी वकीलांवर "कौन बनेगा करोडपती" खेळल्याची कॉमेंट ऐकली आणि एका चर्चा सत्रात काँग्रेस प्रतीनिधीने गांधी हत्येच्या संदर्भात माफीच्या साक्षीदाराचा पण उल्लेख केलेला ऐकला. हेडलीला जर तीन नावे विचारली होती, तर तो यापैकी एकही नाही असे म्ह्णू शकला असता ना? की अ‍ॅड. निकमांनी , "नाही, तू नाव सांगीतलेच पाहीजेस" अशी जबरदस्ती केली होती ?

In reply to by बबन ताम्बे

हेडलीला नावच सांगायचे असते तर त्याने ते स्वतःच सांगितले असते. पर्याय द्यायची गरज काय होती ?

In reply to by मोगा

पण मग पर्याय दिल्यावर नेमके त्याने तेच नाव का निवडले. इतरही पर्याय होते. किंवा माहीत नाही हाही पर्याय होता.

In reply to by मोगा

जे बोलायचे ते स्पष्ट लिहा ना, तुम्ही मिपावर काय गाण्याच्या भेंडया खेळायला येता? ती कॉंग्रेसची आणि राष्ट्रवादीची येडं राजकीय फायदा मिळावा म्हणुन सेक्युलर बनतात,तुम्ही काय म्हणुन? पुढच्या वेळी निवडणुकीला उभे रहायचे आहे काय? उगाच्च गुळमुळीत बोलत राहु नका, सपष्ट बोला की इशरत जहां देशसेवक होती, ती गुजरातमधे अनाथ मुलांची सेवा करायला चालली होती,या चांगल्या कामासाठी तिने दोन अतिरेक्यांचे मनपरिवर्तन देखिल केले होते. र्च्यामारि तिच्याबरोबर सापडलेले अतिरेकी होते हे सिद्ध झाले म्हणुन हे सेक्युकर थोडे चेकाळले नाहीतर राजघाटावर तिची कब्र बांधा असे सांगायला पण यानी मागे पुढे पाहिले नसते.

In reply to by मोगा

ओ ...तुम्ही आधी तुमची बायको सांभाळा काड्या मग लावा

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

चर्चा मनोरंजक आहे…डेव्हिड हेडली सारख्या डबल एजंट वर विश्वास ठेवण कितपत योग्य ? आय पी एस राजेंद्रकुमार ने सुद्धा हेडली कडून हे वदवून घेतलय फार पूर्वीच आणि तेव्हाच NIA ने हेडली चा हा दावा फेटाळला होता. हा राजेंद्रकुमार स्वताच या इशरत च्या केस मध्ये अडकलेला