Skip to main content

हेल्मेटसक्ती हेल्मेट्सक्ती आणि हेल्मेट्सक्ती....!!!

Published on बुधवार, 10/02/2016
नमस्कार...!!! कालच एक बातमी वाचली ...मुम्बईत दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती.... ऐकुन जरा गोन्धळलोच...आता हे काय नवीन..??? गाडी चालवणार्याला हेल्मेट्सक्ती योग्य आहे..त्याबद्दल वाद नाही पण आता मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती... आता समजा गाडी चालवताना वाटेत एखादा मित्र वा अन्य कोणी भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर काय त्यासाठी घरुन निघतानाच दोन दोन हेल्मेट घेउन निघायचे का... हेल्मेट आवश्यक आहे हे मान्य हो..म्हणुन उद्या रस्त्याने पायी चालणार्यालाही हेल्मेट्सक्ती करणार कि काय.... याबद्दल मिपाकराना काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल... ( तळ टिप : मिपावर पहिल्यादा लिहीत आहे.. लेखनात चुका असतीलच त्याबद्दल माफी असावी..) धन्यवाद...

वाचन संख्या 3740
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

ज्या कारणासाठी चालकाला हेल्मेट सक्ती हवी त्याच कारणासाठी पिलीयन रायडरला देखील हवी. मग तर गाडीवर बसलेल्या चिल्यापिल्यांना देखील हवी. मग तर एका टु व्हीलर वर ३ - ४ जण (लहान मूल धरुन) बसण्याला देखील बंदी हवी.

In reply to by मृत्युन्जय

१) ज्या कारणासाठी चालकाला हेल्मेट सक्ती हवी त्याच कारणासाठी पिलीयन रायडरला देखील हवी. २) मग तर गाडीवर बसलेल्या चिल्यापिल्यांना देखील हवी. ३) मग तर एका टु व्हीलर वर ३ - ४ जण (लहान मूल धरुन) बसण्याला देखील बंदी हवी. टेक्निकली योग्यच आहे. यात चुकीचं काय आहे?

अपघात झाला तर मागे बसलेला प्रवासी नेहमी सुखरुपच रहातो का? बाईक घसरून पडली, तर मागचा अगदी अलगद उठून उभा रहातो का? उगा काहीतरीच !

१लेच लेखन अन ते बे काठ्याकुट, शतकी धागा होण्यासाठी शुभेच्छा, लिवत राहा

आता समजा गाडी चालवताना वाटेत एखादा मित्र वा अन्य कोणी भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर काय त्यासाठी घरुन निघतानाच दोन दोन हेल्मेट घेउन निघायचे का...
मित्र असेल तर ओळख न दाखवता निघून जा (हेल्मेट मध्ये चेहरा लपल्याने फार अवघड नाही) अन्य कोणी 'भेटली' तर मात्र एकदम जेन्युइन प्रश्न. उपायासाठी वाट पहात आहे.

In reply to by संदीप डांगे

हे थोडेसे ज्यांना भीकेची अपेक्षा आहे त्याने कटोरा घेऊन फिरावे असे वाटतेय. ;) एनीवे हळूहळू आरटीओचे सगळेच नियम काटेकोरपणे राबवावेत. पहिल्यांदा पोलीस लोक्स दिसूदेत नियम पाळताना. मग गव्हरन्मेंट गाड्या, मग सार्वजनिक व्यवस्था अन शेवटी बिचार्‍या ह्यात नसणार्‍या नागरिकांचा णंबर यावा.

हेल्मेट सक्तीसाठी सरकारने आमचं गरीब औरंगाबाद शहर का निवडलं ते अगोदर सांगा ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ छे छे औरंगाबाद गरीब कसं , एकेकाळी राजधानी होती कि आद्य राजधानीपासूनचा सुरवात केली लि त्यांनी :)

In reply to by महासंग्राम

नै ओ. आधी प्रतिष्ठान. बहुधा त्यापूर्वी जीर्णनगर.

मुळात दुचाकी, बाईक्स नकोतच. हल्लीची पिढी,श्रीमंत बापाच्या काळ्यापैशावर, बाईक्सचा भरधाव वेग, वेड्यावाकड्या कसरती ,पाश्चात्त्यांचं अंधानुकरण, डेटिंग, पबसंस्कृती, तोकडे कपडे, दारु, प्रदूषण, राजकारणी, .. (काही विसरलं नाय ना यात..?)

हेल्मेटसक्ती हवीच... त्याला विरोध करण्याचा हट्ट पुणेकरांनी धरू नये असं वाटतं. पुणेरी पगडीचा अभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांनी हेल्मेट वापरलं तर पगडी पचास म्हणण्यास काही तरी वाव राहील...

In reply to by पी महेश००७

मि महेश ००७ यांना सांगु इच्छितो कि मि तन - मन - धनानेच नव्हे तर अगदि जन्माने मुंबैकर आहे ... दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मिपाकरांचे आभार..

पुणेकर लोकमान्यांचाच कित्ता गिरवताहेत. लोकमान्य म्हणाले की मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब टरफले उचलणार नाही. पुणेकर म्हणताहेत की आम्ही डोके वापरत नाही सबब हेल्मेट वापरणार नाही.

In reply to by बॅटमॅन

हा हा हा..... . . बाकि आम्हाला पण पुणेकरांना टोचण्या मारायला लई मज्जा वाटते.