✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवविधवेचे नवर्‍यास पत्र

व
विवेक ठाकूर यांनी
Wed, 02/10/2016 - 00:31  ·  लेख
लेख
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं. नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो. मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास. कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `दारु औषधी असते, हृदयविकार दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला , ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं....दारु पिणं नाही, स्वत:ला जस्टीफाय करणं. कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची सवय लागल्यानं, ‘हल्ली लाईफमधे काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास. तू गेल्यावर युएसमधल्या अदिती वन्सं, इतक्या वर्षांनी, वेळात वेळ काढून आल्या आणि आई-बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. मी म्हटलं, ‘ मुलांना मी कसंही सांभाळीन पण यांची मला काळजी वाटते, पुढचं सगळं आयुष्य काढायच’.... तशी म्हणाल्या, तुझं ही खरंच आहे. आणि त्यांनी त्या पावली जाऊन इतिश्रीमधे फ्लॅट घेतला... म्हणाल्या, `पुण्याच्या धोरणी बिल्डर्सनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या एनारायंची कायमची सोय केलीये. हे दोघं तिथं इतर समवयस्कांबरोबर जीव रमवतील, त्यांची मेडिकल केअरपण चांगली आहे'. कुठे बहिण आणि कुठे भाऊ ? तू आई-वडीलांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त लास व्हायचास आणि वन्संनी लास वेगासहून इथे येऊन त्यांची सोय केली....शिवाय तुझं हॉस्पिटलचं बीलही भरुन टाकलं. याला म्हणतात समानता, नाही तर फक्त वाटणीच्या वेळी येतात बहिणी.. आरटीजिएस झाल्याचं कन्फर्म करुन सह्या करायला. मी बोलून गेले खरी, पण मुलांची काळजी मी तरी कशी घेणार होते ? शेवटी मनाचा हिय्या करुन `सेकंड इनींग्ज मॅरेज' ब्यूरोत गेले. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक उमदा मध्यमवयीन, निराश बसलेला दिसला. त्याच्याशी थोडी नेत्रपल्लवी साधल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलायला लागले. तशी मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’ ‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित. ‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला. ‘माझी बायको मला सोडून गेली’ तो म्हणाला. कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे बायकांना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे नक्की काय मतभेद होते? वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि मुलं तुमच्यावर टाकून?’ त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, एकच मुलगा आहे पण ती निर्दयपणे त्याला घेऊन गेली....मला मुलांचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’. ‘मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे’ मी पटकन सांगितलं.....माझे मिस्टर अतिरेकी मद्यपानानं आम्हाला कायमचे सोडून गेले. तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती घ्यायचे? लग्नापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’. मुलांना नवे आणि चांगले बाबा मिळाले. आता त्याच्या प्रशस्त फ्लॅटमधे आम्ही चौघं मजेत राहातो. लग्नापूर्वी मी त्याचा फ्लॅट बघायला गेले होते. त्यानी मला त्याचा पर्सनल बार दाखवला आणि म्हणाला ‘तुला चालेलना मी कधेमधे घेतली तर ?’ मी म्हणाले ‘मी अनेक चुका अनेक वेळा करते पण एकच चूक पुन्हा करत नाही’ यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’ ‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !' त्यावर त्याच्या कपाळातच गेल्या, `त्यानं काय होईल?' `मग मला लिमीटमधे ठेवायला...तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले. माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता मित्रांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो' आणि मग आम्ही दोघंच बैठक जमवतो. मुलं मला विचारतात, आई तू इतकी कशी बदललीस?’ त्यावर मी त्यांना सांगते, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले, आता हे बाबा मात्र मला सांभाळायला पाहिजेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रेमकाव्य
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
17580 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

हो ना.

बोका-ए-आझम
Wed, 02/10/2016 - 13:28 नवीन
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे - बबन - ए - आझम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वेगळा बबन झालाच पाहिजे

_मनश्री_
Wed, 02/10/2016 - 13:29 नवीन
वेगळा बबन झालाच पाहिजे विदर्भ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नाही आवडलं

_मनश्री_
Wed, 02/10/2016 - 11:04 नवीन
नाही आवडलं अनलिमिटेड असो वा लिमिटेड पण दारू प्यायचीच कशाला ? दारू म्हणजे काय ऑक्सिजन आहे का ? ज्याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही बायकोला लिमिट मधे ठेवायला नवरा लिमीट मधे राहणार हे लॉजिक अजिबात पटले नाही
आणि नवरा बायको दोघही लिमिटच्या बाहेर गेले तर पोरांनी काय करायचं आई आणि बाप दोघंही अनलिमिटेड ढोसून खपले तर पोरांनी अनाथ होऊन रस्त्यावर भीक मागायची का ?
का आई बापांना लिमिट मधे ठेवायला पोरांनी पण ग्लास घ्यायचा हातात कारण मग मुलांना लिमिट मधे ठेवायला आई बापांना लिमिट मधे रहावच लागेल मस्तच बैठक जमेल
  • Log in or register to post comments

एवढा बोल्ड प्रतिसाद,

अभ्या..
Wed, 02/10/2016 - 11:56 नवीन
एवढा बोल्ड प्रतिसाद, . बी नॉर्मल यार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

एवढं मनावर नका हो घेऊ!

बोका-ए-आझम
Wed, 02/10/2016 - 13:29 नवीन
ते पितात म्हणजे नक्कीच सज्ञान असावेत. सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

हेहेहेहेहेहे. आपला

अभ्या..
Wed, 02/10/2016 - 16:37 नवीन
हेहेहेहेहेहे. आपला पिण्याविषयी एक मिलीचा पण आक्षेप नैय्ये. सगळा प्रतिसाद बोल्ड फाँटात लिहीलाय. शाई किती वाया जातीय. काय हाय का नाय राष्ट्राचा इचार. आँ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

:)

मन१
Wed, 02/10/2016 - 11:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/10/2016 - 11:48 नवीन
लिमिट मधे राहून बाबांनी सांभाळायला हवं. -दिलीप बिरुटे मी नेहमीच म्हणतो
  • Log in or register to post comments

उपसंहार

विवेक ठाकूर
Wed, 02/10/2016 - 12:04 नवीन
प्रथम मूळ कल्पनेबद्दल धुरंधारांच्या सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार : __________________ एकदा माझ्या सवतीला पण हळदी कुंकवाला बोलावणारे...एकदम डोहाळे जेवणाला ती काही येणार नाही. म्हणजे तिला कळेल की माहेर तालेवार आहे आणि नोकरी आहे म्हणून, ऊठली की निघाली, असा संसार होत नाही. आणि एकदा कडेलोट केला की पुन्हा माघारी येता येत नाही. तिला ओटी भरतांना सांगणारे, मुक्तीवादे, मुक्ती म्हणजे विभक्ती नाही. असल्या विचारनं विमुक्त आणि भटकी होशिल. संगतीनं उपभोगलेलं स्वातंत्र्य हीच खरी मुक्ती. आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयुष्यात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल. पण येशील तेंव्हा आमच्या सुखी संसारात, माझ्या पोटी ये. म्हणजे तुला `लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते बालपणापासूनच कळेल. नवर्‍यानं बायकोशी कसं वागावं आणि असा नवरा असला की बायको कशी साथ देते हे तू बघशिल. मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल : `डिबी, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं?.... वेगास नियंत्रण दिलं की लास न होता क्लास जगता येतं. आणि एकदम आकाशात न जाता, जमीनीवर राहून पण तरंगता येतं.'
  • Log in or register to post comments

एकदा माझ्या सवतीला पण हळदी

पिलीयन रायडर
Wed, 02/10/2016 - 13:36 नवीन
एकदा माझ्या सवतीला पण हळदी कुंकवाला बोलावणारे...एकदम डोहाळे जेवणाला ती काही येणार नाही. म्हणजे तिला कळेल की माहेर तालेवार आहे आणि नोकरी आहे म्हणून, ऊठली की निघाली, असा संसार होत नाही. आणि एकदा कडेलोट केला की पुन्हा माघारी येता येत नाही. तिला ओटी भरतांना सांगणारे, मुक्तीवादे, मुक्ती म्हणजे विभक्ती नाही. असल्या विचारनं विमुक्त आणि भटकी होशिल. संगतीनं उपभोगलेलं स्वातंत्र्य हीच खरी मुक्ती.
आँ?? टोटल लागेना. सवत म्हणजे कोण? दारु? तालेवार माहेर आणि नोकरी कुठुन आली? मुक्ती? कुणाची? कशापासुन? सर, समजावुन सांगा ना! (ढ विद्यार्थिनी) पिरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

"‘माझी बायको मला सोडून गेली’ तो म्हणाला."

अगम्य
Wed, 02/10/2016 - 13:52 नवीन
त्यांच्या लेखातल्या वरील वाक्याचा तो विस्तार आहे. सवत म्हण्जे नवविधवेच्या दुसऱ्या नवऱ्याला सोडून गेलेली त्याची पहिली बायको. (स्वगत) आता पॉपकॉर्न घेऊन येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओके.. हे लॉजिकल वाटतय..

पिलीयन रायडर
Wed, 02/10/2016 - 15:00 नवीन
ओके.. हे लॉजिकल वाटतय.. पण मग केवळ "माझी बायको मला सोडुन गेली" ह्या एका वाक्यावर विठांनी एवढी कल्पना भरारी मारली.. मुक्तीवादी काय.. भटकी काय... सॉल्लीडच हां!! नवर्‍याला सोडुन गेलेली बाई म्हणजे स्त्री मुक्ती संघटनेची भटकी बयाच असणार.. प्रश्नच नाही...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

असं असंल

तुषार काळभोर
Wed, 02/10/2016 - 14:37 नवीन
सवत्=दुसर्‍याची पहिली बायको तालेवार माहेर=दुसर्‍याच्या तिसरीच्या पहिलीच्या (पहिल्या एकुलत्या)बापाचं घर नोकरी= पहिल्याच्या दुसर्‍याच्या दुसरीचं पहिलीचं उपजीविकेचं साधन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आँ?

अन्नू
Wed, 02/10/2016 - 14:45 नवीन
कैच कळलं नै. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

कशाला बोलावणार आहे ,टेंभा

_मनश्री_
Wed, 02/10/2016 - 15:23 नवीन
कशाला बोलावणार आहे ,टेंभा मिरवायला का ? आणि माहेर तालेवार असलं आणि नोकरी असली कि बाई लगेच नवऱ्याला सोडून देते कारण ती स्त्री मुक्तीने पछाडलेली एक भटकी असते आणि नवऱ्याला सोडण हे एवढ महान पाप आहे कि एका जन्मात त्याची फेड होत नाही म्हणून पुनर्जन्म घ्यावा लागतो वा वा !!!! काय महान निष्कर्ष आहेत Image removed. `लिमिटमधे राहून किती मजा करता येते ' ह्याच ट्रेनिंग बालपणा पासूनच देणार का ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

सही बोलते हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/10/2016 - 14:05 नवीन
`डिबी, ड्रींक्सचं प्रमाण किती असावं?.... वेगास नियंत्रण दिलं की लास न होता क्लास जगता येतं. आणि एकदम आकाशात न जाता, जमीनीवर राहून पण तरंगता येतं.' _/\_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे काय आहे हे! कसले भन्नाट

यशोधरा
गुरुवार, 02/11/2016 - 03:37 नवीन
अरे काय आहे हे! कसले भन्नाट प्रतिसाद! हहपुवा! =)) नंदनचा प्रतिसाद म्हंजे महान आहे!!!
  • Log in or register to post comments

उपसंहाराबद्दल ....

विवेक ठाकूर
गुरुवार, 02/11/2016 - 11:18 नवीन
नायिका तिच्या नव्या पतीबरोबर खुष आहे आणि आपल्या सवतीला (दुसर्‍या नवर्‍याच्या पहिल्या पत्नीला) आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी हळदी कुंकवाला बोलवत आहे. तिला पुनर्विवाहातून दिवस जाऊन डोहाळे लागण्याची सुद्धा शक्यता आहे, पण सवतीला एकदम डोहाळे जेवणाचं निमंत्रण देणं कितपत रुचेल याबद्दल ती साशंक आहे. अर्थात, स्रीयांच्या ममत्वाला तोड नसते. नायिकेला आपल्या गत पतीनं, आपल्याच घरात जन्म घ्यावा म्हणजे त्याला या जन्मी तरी सुख मिळेल, अशी इच्छा आहे. त्याचा दुसरा फायदा असा की त्याला बालवयातच लिमिटचं महत्त्व कळेल आणि त्याचं आयुष्य मजेत जाईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा