✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 01/30/2016 - 20:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच. ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
77613 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

त्यांची जीवनशैली वेगळी होती.

हेमंत लाटकर
Fri, 02/05/2016 - 09:15 नवीन
त्यांची जीवनशैली वेगळी होती. वय मागे पुढे होऊ शकते. ते बेवडे नव्हते गटारात पडणारे. वा पिणार्यांना साजेसे उदाहरम दिले आहे. पिणे काही मर्दपणा नव्हे. अंवातर: लिहताना भाषा चांगली वापरावी वाघे.
  • Log in or register to post comments

काका ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/05/2016 - 10:17 नवीन
पण काका सर्वच पिणारे गटारात थोड़ी पडतात पिणा-यांबददलही आदराने बोललं पाहिजे असं नाही का वाटत ? आता मर्दपणाही विषय आणि व्यक्तिपरत्वे बदलतो असे नाही का वाटत ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

डेड लाइन तुम्ही दिली होती ....

हेमन्त वाघे
Fri, 02/05/2016 - 10:14 नवीन
हेला ६० ची डेड लाइन तुम्ही दिली होती .... त्याचप्रमाणे तुम्ही मी दिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत ( ते इंग्रजी भाषेत आहेत ) तुम्हाला एखाद वेळी माहित नसेल पण टाईम हे एक फार मोठे आणि प्रतिष्टीत नियतकालिक आहे ( तुम्हाला तो अमेरिकेचा संध्यानंद वाटला का? ) तसेच वरील यादीत खुशवंत सिंघ सोडून बाकी सर्व जबरदस्त पिणारे होते ... आपल्याला गुगळे हि सीते माहित आहे की ? त्यात वरील पैकी कोणाचेही नाव आणि ड्रिंकिंग असे लिहिल्यास बरीच माहिती मिळेल . ( इंग्रजी भाषेत )
  • Log in or register to post comments

गुगळे हि सीते

सुनील
Fri, 02/05/2016 - 10:18 नवीन
म्हणजेच गूगल ही साइट!! बाकी चालू द्या..आम्ही वाचतोयच.. (आज शुक्रवार!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

=))

यशोधरा
Sat, 02/06/2016 - 04:23 नवीन
गुगळे हि सीते म्हणजेच गूगल ही साइट!! >> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

=))

एस
Sun, 02/07/2016 - 11:50 नवीन
मला वाटलं की 'सिंहीण' इकडेपण आली की काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाघे साहेब

सुबोध खरे
Fri, 02/05/2016 - 10:20 नवीन
वाघे साहेब असे एक दोन नावानी काय होणार? या नात्याने मोरारजी देसाई सुद्धा ९९ वर्षे जगले म्हणून सर्वांनी शिवांबू प्यायला पाहिजे असे म्हणावे लागेल. असे "समर्थन" देण्याची गरज नाही. बाकी अमुक इतकी एम एल दारू वाईट आणी अमुक तितकी चांगली याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

काहीही म्हणा पण या धाग्यावरील

उगा काहितरीच
Sun, 02/07/2016 - 00:55 नवीन
काहीही म्हणा पण या धाग्यावरील प्रतिक्रिया पुन्हा वाचतानाही मज्जा येतेय . नुसता दारूच्या उल्लेखाने मज्जा येत असेल तर कदाचित पिल्यानेही मज्जा येत असावी . ;-)
  • Log in or register to post comments

मजा येतेच हो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/07/2016 - 11:28 नवीन
आत्ताच एका एका वाचक मिपाकराने छायाचित्र पाठवलं आणि म्हटलं की प्रमाण इतकं असावं. साला आज रविवार साधुन दुपारीच बसला आहे. सोबत गझल असली पाहिजे म्हणुन मी त्याला 'जीस दिन के साजन बिछडे है ' लाव म्हटलं. :) Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

वाह.. कसला बेत जमवला आहे

सतिश गावडे
Sun, 02/07/2016 - 11:46 नवीन
वाह.. कसला बेत जमवला आहे पठ्ठयाने. याला म्हणतात जगणं !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे आठवलं

लॉरी टांगटूंगकर
Sun, 02/07/2016 - 11:46 नवीन
Image removed. जॅक आत्ता नाही, थोडं कामात आहे...
  • Log in or register to post comments

मस्तय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/07/2016 - 11:55 नवीन
आवडलं आहे. -दिलीप बिरुटे (बीझी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

मला स्वतःला दारुमध्ये बिअरची

काकासाहेब केंजळे
Sun, 02/07/2016 - 12:00 नवीन
मला स्वतःला दारुमध्ये बिअरची चव त्यातल्या त्यात बरी वाटते ,विस्कि, रम वगैरे प्रकार अत्यंत कडवट व नंतर हॅंगओवर देणारे असतात.एकदा हातभट्टीची दारु पिल्यानंतर माझे घरही मला सापडत न्हवते,एकाने घरी नेऊन सोडला.नंतर बापाने दोन कानाखाली ठेउन दिल्या.इथे परदेशी दारु नावे सांगून फुशारक्या मारणार्यांनी एकदा हातभट्टीची पिऊन दाखवावीच,,शंभर मीटर चालोत्सोवर गटारात पडतील याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

सगळा हुच्चभ्रूंचा,

तर्राट जोकर
Sun, 02/07/2016 - 19:26 नवीन
सगळा हुच्चभ्रूंचा, हुच्चवारुण्यांचा क्लब हाय इथं जमलेला. आपला देशी ठर्र्र्याबद्दल कोणच नाय बोलत. पौव्वा, चपटी, गिलास १० रुपये, किदर है? ताडी, माडी, मोहाची, पैल्या धारंची, बांधावरच्या अनधि़कृत गाळणारांची, कै आठवन तर असु द्या हो हुच्च्च्वारुणीय.... काकासाहेब बोल्ला तो इतं आलो.
  • Log in or register to post comments

दोन प्रश्न

वामन देशमुख
Tue, 02/09/2016 - 15:52 नवीन
माझेही दोन प्रश्न : व्हिस्की (
  1. किंवा इतर कोणतेही मद्य) नीट (पाणी किंवा इतर द्रव घालून विरल न करता) पिण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
  2. हिप फ्लास्क मध्ये नीट व्हिस्की घालावी की तिच्यातपाणी वगैरे घालून पातळ करून घालावी?
  3. विस्कळीतपणाबद्धल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

हिप फ्लास्क काय असतं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/09/2016 - 17:04 नवीन
जाणकार मदत करतीलच ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

Hip Flask

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 17:16 नवीन
Image removed. Hip Flask
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यामारी. हे पाहिले की कानात

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 17:49 नवीन
च्यामारी. हे पाहिले की कानात द गूड द बॅड द अग्लीचे मुझिक वाजायला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वा.प

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 17:24 नवीन
१. ह्याचे वैद्यकीय उत्तर जाणकार देऊदेत पण सामान्यतः फायदे अन तोटे आपल्या कोट्यावर अवलंबून असतील असे वाटते २.माझ्या माहीती प्रमाणे फ्लास्क मधे सामान्यतः ब्रांडी किंवा जिन भरली जाते, क्वचित् प्रसंगी डार्क रम ह्यातील ब्रांडी अन रम कोरा घोट मारल्यास कानसुले गरम करणारे प्रकार असतात तस्मात् अन फ्लास्क ची कैरिंग कैपेसिटी पाहता dilute मदिरा फ्लास्क मधे भरण्यात काही हशील नसावा असे वाटते, क्वार्टर जरी फ्लास्क मधे मावत असली तरी dilute केल्यावर ९० कशीबशी मावल अन इतकी कमी सोबत बाळगण्यात काही पॉइंट असेलसे वाटत नाही, अर्थात हे मी अंदाजे अदमासे सांगतोय हो! मला फ्लास्क वापरायचा अनुभव नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

सहमत

अगम्य
Wed, 02/10/2016 - 10:01 नवीन
सोन्याबापुंनी व्यवस्थित सांगितले आहे. स्वानुभवाची पुस्ती माझ्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हिप फ्लास्क = प्राण.

आनंदी गोपाळ
Wed, 02/10/2016 - 20:52 नवीन
प्राण म्हणजे तेच आपले हिंदी पिच्चरमधले व्हिलन. हा फ्लास प्राणसाहेबांना पाहूनच माहिती झालाय. अन दुसरी ती व्हिस्कीच्या ग्लासात चिरुटाची राख झाडून हलवून पिण्याची कन्सेप्ट. कुठला पिच्चर ते विचारू नका. तर, या फ्लास्कमधे दारू भरणारे लोक, अट्टल असतात. त्यांना पाणी घालून पातळ करून घातलेल्या दारवा 'पुरणार' नाहीत. यात दारू कोणती भरावी याबद्दल वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. "नीट" पिता येईल अशी कोणतीही दारू भरता येते. व्हिस्की : स्कॉच किंवा बर्बन कोणतीही. ब्रॅंडी, रम, गेला बाजार लिक्युअर देखिल भरून आणलेली पाहिली आहे. पण ह्यात वाईन किंवा बियर भरायचा बालिशपणा चुकूनही करू नये. चवीने प्यायची असेल, तर टेस्टी काँबो करता येतात. व्होडका भरायची असेल, तर तिच्यात फ्लेवरसाठी आवडीचं सरबत. ७ औंसाचा फ्लास्क असेल, तर १ औंस पिनाकोलाडा अन उरलेले ६ औंस = १ क्वार्टर (१८० मिली) अ‍ॅब्सोल्यूट. हे मिक्स्चर. पिनाकोलाडाऐवजी रसना, किंवा वाळ्याचं सरबत किंवा अगदी रूहअफझाही चालेल ;_) पसंद अपनी अपनी. मी स्वतः ६ औंस बकार्डी प्लस ३ औंस मालिबू हे काँबो वापरतो. एकदम मस्त लागतं. माझा फ्लास्क ९ औंसाचा (दीड क्वार्टर साईज) आहे. यातून दारू पिण्याचे फायदे म्हणजे हवा तेव्हा हवा तिथे रिचार्ज मारता येतो. बाटली फुटत नाही. "मागच्या" खिशात व्यवस्थीत मावते. प्रवासात चांगला पडतो हिप फ्लास्क. तोटा म्हणजे गाऽर वगैरे करता येत नाही. अन भरण्यासाठी मेझरिंग सिलिंडर किंवा तत्सम व फनेल नसेल, तर हमखास दारू सांडते. घोर पातक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

पोर्टेबिलिटी हा सगळ्यात

राजाभाऊ
Wed, 02/10/2016 - 23:32 नवीन
पोर्टेबिलिटी हा सगळ्यात मोठ्ठा अ‍ॅडवांटेज, फ्लास्कचा. फॉलमध्ये, प्रत्येक फेअरवेवर सिंगल माल्टचे मारलेले दोन घोट स्वर्गिय आनंद देतात. आणि खरा शोकिन सिगारची राख स्कॉच मध्ये टाकत नाहि तर सिगारचं टोक (शिलगावलेलें नाहि) स्कॉच मध्ये बुडवुन झुरका घेतो. सिगार क्युबन अस्ली तर उत्त्तम... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आणि खरा शोकिन सिगारची राख

उगा काहितरीच
गुरुवार, 02/11/2016 - 00:38 नवीन
आणि खरा शोकिन सिगारची राख स्कॉच मध्ये टाकत नाहि तर सिगारचं टोक (शिलगावलेलें नाहि) स्कॉच मध्ये बुडवुन झुरका घेतो. सिगार क्युबन अस्ली तर उत्त्तम... ;)
काय तो व्यासंग ! बाबौ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ

सिगारचं टोक (शिलगावलेलें नाहि) स्कॉच मध्ये बुडवुन

आनंदी गोपाळ
Sat, 02/13/2016 - 19:44 नवीन
व्हय जी. चिरुटाचा प्रकार म्हणजे धुरापेक्षा चावून तंबाकू खाण्याचा मजा जास्त अशी गम्मत असते. स्पेशल आधीच दारूत भिजवलेल्या तंबाखूच्या पानांचाही सिगार मिळतो. अवांतरः सिगार/चिरुट/पाइप वि. सिगारेट, विडी यांच्यात तंबाकू 'कुजवण्याचा' फरक असतो. चहाची पाने जशी विशिष्ट प्रकारे कुजवतात तशी तंबाखू प्रोसेस् केली जाते. त्यामुळे सिगारेट / विडी यातील आयोनाईज्ड निकोटीन धुरातून रक्तात घेण्यासाठी जास्त मोठ्या (सरफेस एरिया) पृष्ठभागाची गरज लागते. ज्यासाठी हा धूर छातीत घ्यावा लागतो. सिगार/चिरुटचा धूर फक्त तोंडात घेऊन बाहेर सोडला तरी पुरेसे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ

प्राध्यापक बिरुटे यांनी

mahayog
Tue, 02/09/2016 - 22:56 नवीन
प्राध्यापक बिरुटे यांनी मनापासून हा धागा काढलेला आहे. अगदी बारकाईने ते नजर ठेवून आहेत. सोन्याबापूंचे प्रतिसाद मनापासून आहेतच.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/10/2016 - 12:17 नवीन
आम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो, याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल यांचा अजिबात विचार करत नाही. आपला ब्रांड आणि प्रमाण नाही सांगितलं तुम्ही. बाकी, कौतुकाबद्द्ल आभारी आहे. मिपावर लिहित राहा. :) हम तो बनेही तबाह होने के लिए थे...! उसका मिलना तो इक बहाना था..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mahayog

आमच्यात पोरं पोरं बसली की

अभ्या..
गुरुवार, 02/11/2016 - 00:44 नवीन
आमच्यात पोरं पोरं बसली की कुणी एक उत्साही खंबा गलासात ओतायचा जिम्मा घ्यायचा. त्याने पुरती ओतायच्या आत कुणाचा तरी आवाज घुमायचाच. "मापात खोट त्याच्या बापात खोट" बिचारा तीन्तीनदा बघून ओतायचा. . असले काही लिक्योर कोट्स नाहीत का कुणाकडं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या काही महाभागांचे

उगा काहितरीच
गुरुवार, 02/11/2016 - 00:57 नवीन
आमच्या काही महाभागांचे व्हिडीओ आहेत. अशक्य डिक्शनरी असते . पब्लिकली नाही सांगता येत . ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छे ....

चेक आणि मेट
Wed, 02/10/2016 - 14:05 नवीन
छे .... "हातभट्टीतली पिऊन गटारीत लोळण्यात जी मज्जा हाय,ती कशातच नाय." असे एक बेवडा म्हणत होता ओ.
  • Log in or register to post comments

जो जे वांछील तो ते लाहो ...

उगा काहितरीच
गुरुवार, 02/11/2016 - 00:44 नवीन
जो जे वांछील तो ते लाहो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा