✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धर्मासाठी...........

ए — एकप्रवासी, Mon, 02/08/2016 - 22:08
धर्म जाणताना किती चुकामूक झाली धर्माच्याच नावे किती कत्तले पाहिली धर्मासाठी माणसा माणसात अंतरे माणुसकीच्या नात्यांची उरली वेशीवर लक्तरे धर्म सांगतो प्रेम घ्यावे वाटावे प्रेमाचीच दुनिया सारी मर्म त्याचे जाणावे महोत्सव धर्माचा भवती जरा थांबून पाहावे निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे प्रेम वजा जगती अंती उरतेच काही तिमिरातून तेजाची मग वाट भेटत नाही

प्रतिक्रिया द्या
2042 वाचन

💬 प्रतिसाद (9)

कवितेतला भाबडेपणा आवडला.

सतिश गावडे
Mon, 02/08/2016 - 22:33 नवीन
कवितेतला भाबडेपणा आवडला. मात्र खरंच जर तुम्ही जगातील विविध धर्मांचा खोलात जाऊन अभ्यास केलात तर या कवितेतील एकूण एक ओळ तुम्ही मागे घ्याल. अर्थात "धर्म चांगलेच सांगतो. माणसेच त्याचा चुकीचा अर्थ लावतात" अशी पळवाट शोधली नाहीत तर. ;)
  • Log in or register to post comments

खरंच?

राघव
Mon, 02/08/2016 - 23:04 नवीन
खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

उदाहरणादाखल सम्राट अशोकानंतर

सतिश गावडे
Mon, 02/08/2016 - 23:16 नवीन
उदाहरणादाखल सम्राट अशोकानंतर झालेला राजा पुष्यमित्र शुंग याचा इतिहास आणि Buddhist Warfare वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

बरं.. बाकी धर्मांबद्दलची उदा.

राघव
Tue, 02/09/2016 - 14:32 नवीन
बरं.. बाकी धर्मांबद्दलची उदा. देखील वाचावी म्हणतो. कृपया द्यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नक्की कोणता?

भंकस बाबा
Mon, 02/08/2016 - 22:39 नवीन
नक्की कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात तुम्ही कविराज?
  • Log in or register to post comments

मला माणुसकीचा धर्म अभिप्रेत आहे.

एकप्रवासी
Mon, 02/08/2016 - 23:08 नवीन
आपण विज्ञानवादी सगळे नवनवीन यंत्र कालानुरूप बदलत असतो ते अद्ययावत ठेवत असतो तसं आपण आपल्या धर्माबद्दल का अद्ययावतपणा ठेवत नाही, सभोवती मला धर्माचा महोस्तव आहे असं वाटत, त्यातून तुम्ही चागल्या गोष्टी घेयू शकता, शिकू शकता त्यासाठी आपल्याला संकुचित वृत्ती सोडावी लागेल अस मला मनापासून वाटत.
  • Log in or register to post comments

माणुसकीच्या धर्माबद्दल

एकप्रवासी
Tue, 02/09/2016 - 00:24 नवीन
माणुसकीच्या धर्माबद्दल मी माझ मत मांडण्याचा प्रयत्न केलाय.
  • Log in or register to post comments

जगामध्ये

एकप्रवासी
Tue, 02/09/2016 - 00:25 नवीन
जगामध्ये सगळ्याच चांगल्या गोष्टी नाही आहेत मान्य पण ज्या थोड्या फार आहेत त्यांचा आपण आदर त्यांचं आचरण नक्कीच करू शकतो मित्रहो... तरी आपण उपस्थित केलेल्या शंकांबद्दल मी नक्कीच वाचन आणि त्यावर विचार करीन.
  • Log in or register to post comments

निसंकोचपणे त्यातून चांगले ते

चेक आणि मेट
Tue, 02/09/2016 - 19:09 नवीन
निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे
तेच तर कोणी घेत नाही ना!!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा