✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

न्यू इअर रेझोल्यूशन (अर्थात तेरड्याचा रंग तीन दिवस)!

च
चतुरंग यांनी
Wed, 01/07/2009 - 09:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5632 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

स
सहज Wed, 01/07/2009 - 10:30 नवीन

लेख आवडला.

मागे आमचे एक परमजालमित्र गुंडोपंत यांनी सांगीतले होते, रोज व्यायाम करायचा व जरी काही दिवस बुडले तरी तो एक ब्रेक होता समजायचे व परत सुरु. :-) सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. पण रोज व्यायाम करणार्‍यातला समजतो. डायट कंट्रोल मधे असेल तर आठवड्यातुन ३ वेळा केलेला व्यायाम सुद्धा पुरेसा व्हावा. लेख आवडला, पटला हे.सां. न.ल. अवांतर - प्रतिसाद प्रकाशित करे पर्यंत मला वाटले हा लेख डॉ. दाढे यांनी लिहला आहे. नवे लेखन मधे शेजारी शेजारी होते हे लेख.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 10:33 नवीन

फक्त व्यायामाबद्दल लिहिणे एवढाच उद्देश नाही.

एकूणच कोणतीही नवीन गोष्ट सुरु होताना काय होते त्याबाबतचा विचार आहे. संकल्प आणि सिद्धीतल्या अडथळ्यांचाही विचार आहे.. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Wed, 01/07/2009 - 10:37 नवीन

बरोबर

मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शेखर Wed, 01/07/2009 - 10:31 नवीन

मस्त विचार

सुंदर लेखन. एखादा संकल्प जर करायचा म्हणुन केला तर कधीच टिकत नाही. बर्‍याच वेळा दुसरा करतो किंवा सांगतो (भरीला पाडतो) म्हणुन आपण संकल्प करतो. त्याला चिकाटीची जोड आणी आवड पाहीजे तरच आपण आपल्या संकल्पाशी एकनिष्ठ राहु शकतो. शेखर
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/07/2009 - 10:37 नवीन

ईच्चाशक्ती हवी

ईच्छाशक्तीच्या जोरावर काय होत नाही? मी स्वतः सिगरेट सोडून कैक वर्षे झाली. आता तांबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून शेकडो मैल दूर आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 10:40 नवीन

काय सांगताय काय! अभिनंदन!!

अहो सुनीलराव, आमच्या तात्यांना घ्या की जरा घोळात त्यांचा सातारी काळा जर्दा त्यांना सोडत नाहीये! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 10:43 नवीन

ईच्छाशक्तीच्या जोरावर

ईच्छाशक्तीच्या जोरावर कुठलीही गोष्ट सहज करता येते ! मी स्वतः सिगरेट कित्येक वेळा सोडलीय ! (हघ्याहेसांनल) - धूम्रकांडीला स्पर्श न केलेला , मुक्तसुनित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 10:45 नवीन

वुई हेट

वुई हेट सिगारेट्स ... दॅट्स व्हाय वुई बर्न देम आउट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 10:48 नवीन

क्या बात है! टाळ्या!!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 10:48 नवीन

+१

फार घाण वस्तु आहे ती.... जाळूनच टाकावी दिसली की. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 10:36 नवीन

लेख आवडला

मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्‍याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही! हे फारच आवडलं. सध्या आमच्या जिममधेही सकाळी जत्रा वाटावी एवढी गर्दी असते. पण एकदा व्यायाम सुरु झाला की या नव्या चेहेर्‍याच्या मालकिणींचा उत्साह आणि व्यायाम करण्यातलं डेडीकेशन (मराठी शब्द?) पाहून अजून किती दिवस या येतील यावर मी आणि एका मैत्रीणीने बेटींग सुरु केलेलं आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 10:45 नवीन

छान

चतुरंग शेठ ! मस्त लेख !!! अवांतर - आमच्यात संकल्प करण्यासाठी आणि तो सोडुन देण्यासाठी नवीन वर्षाची वाट पहात नाहीत. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 10:54 नवीन

या वर्षी

या वर्षी संकल्प न करण्याचा पक्का संकल्प केलाय !! बाकी व्यायामशाळेतल्या बांता अगदी तंतोतंत घडतात आमच्या बाबतीत. आरश्याचा असा राग येतो साला .. (एक पारा गळालेला आरसा फार आवडायचा मला, नेमका पोटाच्या ठिकाणीच धुसर झालेला ;) ) लेख आवडला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Wed, 01/07/2009 - 10:58 नवीन

लेख आवडला...

>>>>मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्‍याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही! >>>>लहान मूल होऊन काही काळ का होईना आपल्या आनंदासाठी जगा संकल्प तुमच्या नकळतच पूर्ण झालेला असेल. आवडलं नि पटलं सुध्दा... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/07/2009 - 13:00 नवीन

रेझोल्युशन

Re-Solution ला सोल्युशन नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/07/2009 - 16:05 नवीन

ज्ञान,

ज्ञान, तंत्र आणि प्रेरणा ह्याबाबत कमी पडणे... आपले लक्ष्य (गोल) ठरवताना व्यवहारिक दृष्ट्या झेपेबल ठेवणे... अनावश्यक तुलना ही घातक ठरते. या तीन गोष्टी पक्क्या समजल्या की प्रश्न मिटतो. पण पुन्हा इथेही अंडरएस्टिमेट करण्याचा धोका राहतोच. चांगला लेख.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 16:10 नवीन

लेख मस्तच.

लेख मस्तच. छंद आणि संकल्प यांची सांगड घालून आवडीसाठी करणे आणि बळेच करणे यातला झगडा छान सांगीतलात. ईच्छाशक्तीच संकल्प तडीस नेते. ईच्छाशक्ती वाढावी आणि ठरावीक गोष्टी पूर्ण करण्यासाची सवय लागावी म्हणूनच 'नेम' (नियम) करण्याची पद्धत पडली असावी. स्वतःला ठाकून ठोकून नियमित दिनचर्येत बसवणे हा सुद्धा 'संकल्प शक्ती' वाढवण्याचा उपाय असावा. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 01/07/2009 - 18:02 नवीन

लेख आवडला ,पटला..

पण काय हे .. कळतये पण वळत नाही.... :-( बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 01/08/2009 - 00:01 नवीन

वा.. काय

वा.. काय वेळेत लिहीलाय तुम्ही हा लेख.. मला अगदी जरूरी होती असं काहीतरी वाचायची! खूप दिवसांपासून काही गोष्टी मनात आहेत, पण होत नाहीत. आमच्या बाबतीत गुरूत्वीय खेच जरा जास्तच डेंजर असावी! त्यातलंच एक काम, सेव्हन हॅबिट्स वाचणे.. :) बाबांनी वाच ग बाई , वाच म्हणणं सुद्धा सोडलंय आता! :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/08/2009 - 01:13 नवीन

छान लेख

लेख एकदम छानच आहे. संकल्प सोडणे जितके सोपे असते तितके तो पाळणे (कायमस्वरूपी आमलात आणणे) हे अवघड असते हे सत्यच आहे. मात्र, दरवर्षी असे (वजन कमी करणे, व्यायाम करणे इत्यादी) संकल्प सोडणे आणि मोडणे कायम होते हे लक्षात आल्यावर माझ्या एका अमेरिकन मित्राने उलटा संकल्प करायचे ठरवले. गेल्या वर्षी त्याने या संदर्भात संकल्प केला की, 'खाणे कमी करणार नाही, धुम्रपान कमी वगैरे करायचा प्रयत्न करणार नाही, व्यायाम वगैरे टिव्ही पहात ट्रेडमील वगैरे चालवता आली तर तेव्हढाच...' त्याला असे वाटले की हा पण संकल्प आपण मोडू - अर्थात मग सगळे चांगलेच होईल... पण आजतागायत तो आपला हा संकल्प मोडू शकला नाही :-)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 01/08/2009 - 02:22 नवीन

व्यायाम करण्याचा

संकल्प करीन असे अजूनही म्हणतोय ;) बाकी लेख उत्तम रंग्या... आमच्यासारख्या संकल्पवीरांमुळेच तर जिममधल्या इन्स्ट्रक्टर्सना जानेवारीचा बोनस मिळतो :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/08/2009 - 02:57 नवीन

मस्त लेख.

केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहीजे... ! दुसरं काय? मी तरी सध्या नेटाने जीम मधली ट्रेडमील झिजवते आहे. आता मुलांना नाताळच्या सुट्ट्या आल्यामुळे ते २ आठवडे नाही जमलं. पण आता पुन्हा सुरू झालं आहे. बघू किती दिवस रहाते ही कन्सिस्टंसी.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 01/08/2009 - 04:33 नवीन

लेख मस्तच आहे

लेख छान उतरला आहे. हलकाफुलका आहे, पण वैचारिकही आहे. - - - या वर्षीही रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन केले आहे. मागच्या वर्षीचे हेच रेझोल्यूशन एक अपवाद सोडला तर पाळले होते. (रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन हा एक अपवाद!)
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 01/08/2009 - 10:02 नवीन

आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!

चतुरंग - आपला लेख आणि विचार पटले. भट्टी छान जमली आहे. :) असो... त्यानिमित्याने मला जे आठवले तेही खाली टंकतो आहे.. ========== ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. यशवंत लेले यांच्याकडून मी बर्‍याच गोष्टी शिकलो... पण त्यातली सर्वात लक्षात राहिलेले जर काही असेल तर त्यांचे हे वाक्य - "आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!". त्यांच्याच शैलीत (आठवेल तसे ) सांगायचे झाले तर : लवचिकता हवी पण कोणतीच गोष्ट स्थिर नाही आणि कशाचाच आग्रह अथवा संकल्प नाही हे म्हणजे घरंगळणार्‍या चेंडूवर धडपड्यासारखे आहे. गोष्ट छोटी असो की मोठी -- शुभंकरोति म्हणणे असेल, व्यायाम करणे असेल अथवा घर विकत घेणे असेल -- ठरवायला तर हवे आणि पाळायलाही हवे. एक मिणमिणता का असेना पण ध्रुवतारा पक्का केला की गाडी मार्गावर राहते. खूपच अवघड जात असेल तर संकल्प जगजाहीर करावा म्हणजे भरकटणे जरा कमी होते. - एकलव्य
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/08/2009 - 21:38 नवीन

डॉ.लेले ह्यांचे विचार उधृत केल्याबद्दल धन्यवाद, एकलव्य.

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/08/2009 - 17:45 नवीन

लेख छान आहे..

Create monthly goals instead of resolutions If you always break your New Years Resolution before January is over, try something new this year. Make 12 mini, very do-able resolutions. उदारणार्थः जर वजन कमी करायचे असेल तर्....जानेवारी मधे भरपूर पाणी प्यायची सवय करा. फेब्रुवारीमधे हिरव्या पालेभाज्या खा...इत्यादी... हा प्रयोग मी कॉम्प्युटर शिकण्यासाठी केला होता..एका महिन्यात एक्सेल, पॉवर् पॉईंट एका महिन्यात वेब डिझाईन्...इत्यादी...कुठेही क्लासला न जाता..
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 01/08/2009 - 18:12 नवीन

मस्तच.

चतुरंगजी, लेख एकदम एनर्जीटीक झाला आहे.:) 'गुरुत्वीय खेच' तर अगदी मनाला पटली. :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/08/2009 - 21:38 नवीन

सर्व वाचकांचे आणि आवर्जून प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार!

चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/08/2009 - 22:05 नवीन

संकल्पाचा लेख !

लेख आवडला ! संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असा समज झाल्यामुळे त्या शब्दाचा अर्थही दुर्लक्षीत झाल्यासारखा वाट्तो. चतुरसेठ, व्यायामाचा विषय आला की जीव कासाविस होतो. मागच्या वर्षीच्या संकल्पाची वाट लावली ,पण आमचे वाढते वजन आणि पोटाचा घेर नजरेत भरु लागला आहे. परंपरेने चालत आलेला साखरेचा वारसा आमच्यापर्यंत कधीतरी येऊन पोहचणार आहे, या धास्तीने आम्ही काही दिवसापासून नियमित काही अंतर चालतो, क्रिक्रेटची प्रॆक्टीस करणा-यांना स्पीन ऐक्शन घेऊन मध्यमतेज गोलदांजी करतोय. नियमित व्यायाम करायचा, शरिरातील काही कॆलरीज जाळायच्याच असा संकल्प आहे. बघुया हा संकल्प किती दिवस तग धरतो !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Sun, 01/11/2009 - 14:00 नवीन

संकल्प आणि सिद्धि

संकल्प लेख सुंदरच जमलाय. कारण आम्ही सारे संकल्पांचे बळी. अनंत संकल्प मोडून पडलेले. शेवटी संकल्प करायचा नाही असा संकल्प केला.... छान चाललंय. - रेझर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा