मागे आमचे एक परमजालमित्र गुंडोपंत यांनी सांगीतले होते, रोज व्यायाम करायचा व जरी काही दिवस बुडले तरी तो एक ब्रेक होता समजायचे व परत सुरु. :-) सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. पण रोज व्यायाम करणार्यातला समजतो.
डायट कंट्रोल मधे असेल तर आठवड्यातुन ३ वेळा केलेला व्यायाम सुद्धा पुरेसा व्हावा. लेख आवडला, पटला हे.सां. न.ल.
अवांतर - प्रतिसाद प्रकाशित करे पर्यंत मला वाटले हा लेख डॉ. दाढे यांनी लिहला आहे. नवे लेखन मधे शेजारी शेजारी होते हे लेख.
सुंदर लेखन.
एखादा संकल्प जर करायचा म्हणुन केला तर कधीच टिकत नाही. बर्याच वेळा दुसरा करतो किंवा सांगतो (भरीला पाडतो) म्हणुन आपण संकल्प करतो. त्याला चिकाटीची जोड आणी आवड पाहीजे तरच आपण आपल्या संकल्पाशी एकनिष्ठ राहु शकतो.
शेखर
ईच्छाशक्तीच्या जोरावर काय होत नाही? मी स्वतः सिगरेट सोडून कैक वर्षे झाली. आता तांबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून शेकडो मैल दूर आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!
हे फारच आवडलं.
सध्या आमच्या जिममधेही सकाळी जत्रा वाटावी एवढी गर्दी असते. पण एकदा व्यायाम सुरु झाला की या नव्या चेहेर्याच्या मालकिणींचा उत्साह आणि व्यायाम करण्यातलं डेडीकेशन (मराठी शब्द?) पाहून अजून किती दिवस या येतील यावर मी आणि एका मैत्रीणीने बेटींग सुरु केलेलं आहे.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
या वर्षी संकल्प न करण्याचा पक्का संकल्प केलाय !!
बाकी व्यायामशाळेतल्या बांता अगदी तंतोतंत घडतात आमच्या बाबतीत. आरश्याचा असा राग येतो साला .. (एक पारा गळालेला आरसा फार आवडायचा मला, नेमका पोटाच्या ठिकाणीच धुसर झालेला ;) )
लेख आवडला हेवेसांनल.
>>>>मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!
>>>>लहान मूल होऊन काही काळ का होईना आपल्या आनंदासाठी जगा संकल्प तुमच्या नकळतच पूर्ण झालेला असेल.
आवडलं नि पटलं सुध्दा... :)
---वल्लरी
ज्ञान, तंत्र आणि प्रेरणा ह्याबाबत कमी पडणे... आपले लक्ष्य (गोल) ठरवताना व्यवहारिक दृष्ट्या झेपेबल ठेवणे... अनावश्यक तुलना ही घातक ठरते.
या तीन गोष्टी पक्क्या समजल्या की प्रश्न मिटतो. पण पुन्हा इथेही अंडरएस्टिमेट करण्याचा धोका राहतोच.
चांगला लेख.
लेख मस्तच. छंद आणि संकल्प यांची सांगड घालून आवडीसाठी करणे आणि बळेच करणे यातला झगडा छान सांगीतलात.
ईच्छाशक्तीच संकल्प तडीस नेते. ईच्छाशक्ती वाढावी आणि ठरावीक गोष्टी पूर्ण करण्यासाची सवय लागावी म्हणूनच 'नेम' (नियम) करण्याची पद्धत पडली असावी. स्वतःला ठाकून ठोकून नियमित दिनचर्येत बसवणे हा सुद्धा 'संकल्प शक्ती' वाढवण्याचा उपाय असावा.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
वा.. काय वेळेत लिहीलाय तुम्ही हा लेख.. मला अगदी जरूरी होती असं काहीतरी वाचायची!
खूप दिवसांपासून काही गोष्टी मनात आहेत, पण होत नाहीत. आमच्या बाबतीत गुरूत्वीय खेच जरा जास्तच डेंजर असावी!
त्यातलंच एक काम, सेव्हन हॅबिट्स वाचणे.. :) बाबांनी वाच ग बाई , वाच म्हणणं सुद्धा सोडलंय आता! :|
http://bhagyashreee.blogspot.com/
लेख एकदम छानच आहे.
संकल्प सोडणे जितके सोपे असते तितके तो पाळणे (कायमस्वरूपी आमलात आणणे) हे अवघड असते हे सत्यच आहे. मात्र, दरवर्षी असे (वजन कमी करणे, व्यायाम करणे इत्यादी) संकल्प सोडणे आणि मोडणे कायम होते हे लक्षात आल्यावर माझ्या एका अमेरिकन मित्राने उलटा संकल्प करायचे ठरवले. गेल्या वर्षी त्याने या संदर्भात संकल्प केला की, 'खाणे कमी करणार नाही, धुम्रपान कमी वगैरे करायचा प्रयत्न करणार नाही, व्यायाम वगैरे टिव्ही पहात ट्रेडमील वगैरे चालवता आली तर तेव्हढाच...' त्याला असे वाटले की हा पण संकल्प आपण मोडू - अर्थात मग सगळे चांगलेच होईल... पण आजतागायत तो आपला हा संकल्प मोडू शकला नाही :-)
संकल्प करीन असे अजूनही म्हणतोय ;)
बाकी लेख उत्तम रंग्या... आमच्यासारख्या संकल्पवीरांमुळेच तर जिममधल्या इन्स्ट्रक्टर्सना जानेवारीचा बोनस मिळतो :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहीजे... !
दुसरं काय?
मी तरी सध्या नेटाने जीम मधली ट्रेडमील झिजवते आहे. आता मुलांना नाताळच्या सुट्ट्या आल्यामुळे ते २ आठवडे नाही जमलं. पण आता पुन्हा सुरू झालं आहे.
बघू किती दिवस रहाते ही कन्सिस्टंसी.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लेख छान उतरला आहे. हलकाफुलका आहे, पण वैचारिकही आहे.
- - -
या वर्षीही रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन केले आहे. मागच्या वर्षीचे हेच रेझोल्यूशन एक अपवाद सोडला तर पाळले होते.
(रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन हा एक अपवाद!)
चतुरंग - आपला लेख आणि विचार पटले. भट्टी छान जमली आहे. :) असो... त्यानिमित्याने मला जे आठवले तेही खाली टंकतो आहे..
==========
ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. यशवंत लेले यांच्याकडून मी बर्याच गोष्टी शिकलो... पण त्यातली सर्वात लक्षात राहिलेले जर काही असेल तर त्यांचे हे वाक्य - "आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!".
त्यांच्याच शैलीत (आठवेल तसे ) सांगायचे झाले तर : लवचिकता हवी पण कोणतीच गोष्ट स्थिर नाही आणि कशाचाच आग्रह अथवा संकल्प नाही हे म्हणजे घरंगळणार्या चेंडूवर धडपड्यासारखे आहे. गोष्ट छोटी असो की मोठी -- शुभंकरोति म्हणणे असेल, व्यायाम करणे असेल अथवा घर विकत घेणे असेल -- ठरवायला तर हवे आणि पाळायलाही हवे. एक मिणमिणता का असेना पण ध्रुवतारा पक्का केला की गाडी मार्गावर राहते. खूपच अवघड जात असेल तर संकल्प जगजाहीर करावा म्हणजे भरकटणे जरा कमी होते.
- एकलव्य
Create monthly goals instead of resolutions
If you always break your New Years Resolution before January is over, try something new this year. Make 12 mini, very do-able resolutions.
उदारणार्थः जर वजन कमी करायचे असेल तर्....जानेवारी मधे भरपूर पाणी प्यायची सवय करा. फेब्रुवारीमधे हिरव्या पालेभाज्या खा...इत्यादी...
हा प्रयोग मी कॉम्प्युटर शिकण्यासाठी केला होता..एका महिन्यात एक्सेल, पॉवर् पॉईंट एका महिन्यात वेब डिझाईन्...इत्यादी...कुठेही क्लासला न जाता..
लेख आवडला ! संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असा समज झाल्यामुळे त्या शब्दाचा अर्थही दुर्लक्षीत झाल्यासारखा वाट्तो.
चतुरसेठ, व्यायामाचा विषय आला की जीव कासाविस होतो. मागच्या वर्षीच्या संकल्पाची वाट लावली ,पण आमचे वाढते वजन आणि पोटाचा घेर नजरेत भरु लागला आहे. परंपरेने चालत आलेला साखरेचा वारसा आमच्यापर्यंत कधीतरी येऊन पोहचणार आहे, या धास्तीने आम्ही काही दिवसापासून नियमित काही अंतर चालतो, क्रिक्रेटची प्रॆक्टीस करणा-यांना स्पीन ऐक्शन घेऊन मध्यमतेज गोलदांजी करतोय. नियमित व्यायाम करायचा, शरिरातील काही कॆलरीज जाळायच्याच असा संकल्प आहे. बघुया हा संकल्प किती दिवस तग धरतो !!!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
लेख आवडला.
फक्त व्यायामाबद्दल लिहिणे एवढाच उद्देश नाही.
बरोबर
मस्त विचार
ईच्चाशक्ती हवी
काय सांगताय काय! अभिनंदन!!
ईच्छाशक्तीच्या जोरावर
वुई हेट
क्या बात है! टाळ्या!!
+१
लेख आवडला
छान
या वर्षी
लेख आवडला...
रेझोल्युशन
ज्ञान,
लेख मस्तच.
लेख आवडला ,पटला..
वा.. काय
छान लेख
व्यायाम करण्याचा
मस्त लेख.
लेख मस्तच आहे
आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!
डॉ.लेले ह्यांचे विचार उधृत केल्याबद्दल धन्यवाद, एकलव्य.
लेख छान आहे..
मस्तच.
सर्व वाचकांचे आणि आवर्जून प्रतिक्रिया देणार्यांचे आभार!
संकल्पाचा लेख !
संकल्प आणि सिद्धि