Skip to main content

कर्दळी वनात जात आहात का ?

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 05/02/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात. ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अ‍ॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात. माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला. या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?

वाचने 18522
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

सहमत... पण सर्व सोयी सुविधा पुरवल्या तर त्या यात्रेतील थरार कमी होईल. आज अनेक प्रसिद्ध देवस्थानांचा जसा बाजार झालाय तसे इथेपण होईल.

In reply to by टवाळ कार्टा

कदाचित थरार हा चुकीचा शब्द आला. पण मला काय म्हणायचंय ही यात्रा पण अगदी सामान्य लोकांना अॅक्सेसिबल ठेवली तर आज अनेक देवस्थानांची जशी वाट लागलीये तसे इथे पण नक्कीच होणार.

In reply to by विजय पुरोहित

लोक देवस्थानांना गेल्याने देवस्थानांची वाट कशी काय लागेल? तुम्ही बरोबर उलट म्हणत आहात. सामान्य लोकांना देवस्थाने अॅक्सेसिबल ठेवली तर अधिकाधिक रंजले गांजले, दु:खी कष्टी लोक तिकडे जातील. देवस्थानाच्या पावित्र्यामुळे, तेथील दैवी शक्तीच्या प्रभावामुळे त्यांची दु:खे दूर होतील. जर कुणाच्या मनात काही वाईट विचार असतील तर ते दूर होऊन त्यांचा मनात सद्विचार उत्पन्न होतील.

In reply to by सतिश गावडे

काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय. त्यामुळे या यात्रा सोप्या करणे पेपर फोडल्यासारखे आहे.

In reply to by sagarpdy

काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय.
संत तुकारामांचा एक अभंग आहे: जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्‍त ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी दया करणें जें पुत्रासी, तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ति अभंगाच्या मतितार्थावरून आपण ही त्यांच्या मनातील देवाची प्रतिमा होती असे म्हणायला हरकत नाही. यात देव भक्ताला जवळ करण्याआधी कठोर परीक्षा घेतो याचा उल्लेख नाही. म्हणजे ही प्रतिमा अपुर्ण आहे असे म्हणता येईल का? (तुमचा प्रतिसाद उपहासात्मक नाही असं समजून मी प्रतिसाद दिला आहे.)

In reply to by सतिश गावडे

प्रतिसाद उपहासात्मकच होता.:) तुकोबांची डिग्री ची ब्रँच वेगळी, रावणादी राक्षस तसेच हरीश्चंद्रादी भक्तांची वेगळी.

ही यात्रा एका ओळखीच्यांनी गेल्या वर्षी केली. १५ जणांचा ग्रुप होता. त्यांच्या मागून त्यांचे खाणे घेउन येणार्‍या माणसावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. तो जगला की मेला कळले नाही . या ग्रुप्चे देखिल हाल दोन दिवस हाल झाले.

In reply to by अजया

हेच म्हणतो. घरी बसून नामस्मरण केले तर काय देवाला चालत नाही का?

In reply to by टवाळ कार्टा

टक्या घरी बसून नामस्मरण करतोय हे चित्र डोळ्यांसमोर आले.

In reply to by प्रचेतस

आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात...इथे मिपावरच शास्त्रोक्त पुजा कशी करावी याचा जुना धागा आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

ती पुजा सांगणारे गुरुजी आता उत्क्रांतीच्या नादी लागलेत. ;)

In reply to by सतिश गावडे

हो. आणि एक धर्म सुधारणा करणारे गुरूजी अता शास्त्रोक्त पूजेच्या नादी लागलेत.

In reply to by प्रचेतस

कर्दळी वनात नेऊन हत्तीला ठार मारायचा विचार करत असलेला :- आत्मुभट कुठारकर http://freesmileyface.net/smiley/leisures-and-sports/leisures-and-sports-024.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

काल खफवर अजयाने एक कोडं घातलं होतं. आणि आज तुमचा हा प्रतिसाद बघितला.
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला:

In reply to by टवाळ कार्टा

>>>>काळ्या रानात हत्ती मेला>>> या कोड्याचं उत्तर माझ्या माहितीत 'ऊ' असं आहे, आणि बुवा कर्दळीवनात हत्तीला ठार मारणार म्हणाले ना, म्हणून विचारलं, कोणता हती. =))

In reply to by भीमराव

कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)
त्यात फार गहन असा अध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक पांढरा हत्ती असतो. हा हत्ती असतो "अहं"चा. कर्दळीवनासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन हा अनावश्यक आणि न परवडणारा अहंचा पांढरा हत्ती मारायचा असतो.

In reply to by सतिश गावडे

सालं 'उठाबसायला' भारी जागा आहे ती असा विचार आला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

" मोक्षासाठी कुणी उठा म्हणत नसेल तरच बसायला अर्थ आहे !! अन्यथा बसणेच काय कर्दळीवन यात्राही व्यर्थ आहे !!! नाखुष चारोळीकर

In reply to by प्रचेतस

हे कधी झाले? धर्म सुधारणेकडून शास्त्रोक्त पूजेकडे वळणे हे पुरोगामित्वाचे लक्षण की प्रतिगामित्वाचे?

In reply to by सतिश गावडे

मुळात पुजा करणे (देवाची), सत्यनारायणाची पुजा सांगणे वगैरे हे पुरोगामित्व की प्रतिगामित्व? (शास्त्रोक्त की धर्मसुधारोक्त ही नंतरची गोष्ट)

In reply to by मृत्युन्जय

ते तुमचा देवावर (किंवा देव या संकल्पनेवर) विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे असं वाटतं. :)

In reply to by प्रचेतस

वाह... मान गये. लेबल लावण्याच्या पलिकडे जाऊन तुम्ही अशा गोष्टींकडे मानवी अनुभव म्हणून पाहता तर.

In reply to by टवाळ कार्टा

आमचे? पुजा जोडीने करायची असते. ते बघा आधी!! ;)

In reply to by प्रचेतस

पण कोणाचे नामस्मरण करतोय 1 ? हे पण महत्वाचे आहे नाही का वल्लीदा.

In reply to by Rahul D

या धाग्यात तसेच तुमच्या या प्रतिसादात उल्लेख असलेले स्वामी म्हणजे अक्कलकोट स्वामी का?

In reply to by विजय पुरोहित

मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी तुमच्या प्रतिसादाला उल्लेखून एक प्रश्न विचारला आहे. त्याचेही उत्तर दया जमले तर. :)

सुखाचा जीव धोक्यात घालायचाच कशाला ? कंटाळा आणला राव या लोकांनी. कशाला मरायला जायचं जिथे त्रास होतो तर. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग काय तर. गप्प आपलं नैण्टीथम्साप्बिसलेरीसलाडन्शेंगा घिऊन बसायचं सन्डेला. परत जिस दिन साजन हायेच.

In reply to by अभ्या..

ओ तुम्ही त्या बयेला सोडली म्हणता मात्र तुमच्या मनातून ती गेली आहे असं वाटत नाही.

In reply to by सतिश गावडे

खरं कुणापाशी बोलायचं अन खोटं कुणापाशी हे आम्हाला त्या बयेनेच शिकविले हो धनाजीराव.

In reply to by अभ्या..

जब से तुने मुझे दिवाना बना रखा है पत्थर हर शक्स ने हाथ मे उठाया है. म्हणुन त्या बयेचं नाव घेऊ नका. ;) -दिलीप बिरुटे