तो........
लेखनविषय:
उदासल्या अंबरी तो
कधीचा दाटलेला
आसवांत होई रिता
परी उरी साचलेला........
लाख अडवू पाही तो
या आठवांच्या लाटां
ज्या डिवचूनी जाती
त्या उध्वस्त तटाला........
उन्हे पेटवूनी गेली
त्याची गाफिल स्वप्ने
आता उरले ना काही
ह्या रात्रीस जाळण्याला.....
उतरती सांज बोले
सावर रे वेडया
ना तिचा दोष काही
होता तुच फसलेला.........
ती येईल माघारी
तुझ्यासाठी एकदातरी
का आस ही वैरी
झुलवी त्या जिवाला.....
बहरला गुलमोहर
जेव्हा तिच्या अंगणात
निरोपाच्या फुलांनी होता
मग तोही सजलेला.........
वाचने
2681
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त
.
कविता आवडली
मस्त
मस्त!
बहरला गुलमोहर
मस्त रे अमोल
प्रचंड उंची गाठणारी कविता
In reply to प्रचंड उंची गाठणारी कविता by पालीचा खंडोबा १
धन्यवाद मालक
सुरेख.
सगळ्यांचे मनपुर्वक आभार......!!!
अतिशय सुरेख भो कविता.
अत्यंत प्रभावी!
मस्तच अमोल...
एक नंबर साहेब
सुन्दर
धन्यवाद सगळ्यांचे आभार