Skip to main content

तो........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 22/01/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
उदासल्या अंबरी तो कधीचा दाटलेला आसवांत होई रिता परी उरी साचलेला........ लाख अडवू पाही तो या आठवांच्या लाटां ज्या डिवचूनी जाती त्या उध्वस्त तटाला........ उन्हे पेटवूनी गेली त्याची गाफिल स्वप्ने आता उरले ना काही ह्या रात्रीस जाळण्याला..... उतरती सांज बोले सावर रे वेडया ना तिचा दोष काही होता तुच फसलेला......... ती येईल माघारी तुझ्यासाठी एकदातरी का आस ही वैरी झुलवी त्या जिवाला..... बहरला गुलमोहर जेव्हा तिच्या अंगणात निरोपाच्या फुलांनी होता मग तोही सजलेला.........
लेखनविषय:

वाचने 2702
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

प्रचंड उंची गाठणारी कविता शेवटचे कडवे खास समारोपाचे . अश्या कविता वाचून काही तरी सकस वाचल्याचे खासमखास वाचल्याचे समाधान मिळते. ते समाधान प्राप्त करून दिल्याबद्दल आभार. असेच लिहित रहा आम्ही वाचत राहू बहरला गुलमोहर जेव्हा तिच्या अंगणात निरोपाच्या फुलांनी होता मग तोही सजलेला.........

In reply to by पालीचा खंडोबा १

आपल्या प्रतिसादाने उत्साह वाढला. नक्कीच प्रयत्न करीन...

हुश्श..... मला वाटलं की ही कविता देखिल "फ़ेंटसी" सारखी वांझोटी बोर्डावरुन खाली उतरते की काय... पण वाचलो....... :-)

अत्यंत प्रभावी! कशी काय राहून गेली होती वाचायची काय माहित... खूपच परिणामकारक शेवट केलाय! लिहित राहा!!