Skip to main content

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा

लेखक आकाश कंदील यांनी शुक्रवार, 29/01/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल. मी यावर जालावर शोधाशोध केल्यावर मला "http://indiatoday.intoday.in/story/who-freed-india-gandhi-or-bose/1/579…" हा दुवा मिळाला. आणि हे सर्व वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचा खूपच मोठा वाटा आहे आणी त्याप्रमाणात त्याची योग्य नोंद न घेवून इतिहास लिहिणार्यांनी त्यांच्यावर थोडाफार जास्तच अन्याय केला आहे. NDTV च्या International Agenda कार्यक्रमात एक गोष्ट कळली, कि ज्या ब्रिटीश पंतप्रधानांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंधर्भात कागदावर सही केली त्यांना ह्या निर्णयावर यायला नेताजीच्या "आजाद हिंद सेनेनी, त्यांच्या सैनिकांनी आणी इग्रज अधिपत्याखालील त्यांच्या सैनिक-बंधूनी " भाग पाडले होते. आणी हे सर्व स्वतः ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते. परिस्थिती अशी झाली होती कि जर त्यावेळी इग्रजानि स्वात्यंत्र दिले नसते तर खूप मोठा सैनिकी उठाव झाला असता आणि तो १८५७ पेक्षा मोठा आणि जास्त शिस्थबद्ध झाला असता आणि त्या वेळी इग्रज सैन्य अजून एक गृह-युद्ध टाळू इच्छित होते. बाकी सर्व वरील दुव्यावर जास्त विस्ताराने दिले आहे म्हणून मी ते सर्व परत लिहित बसत नाही. पण मला मिसळ पाव या संकेत स्थळावरील दिग्गज लोकांचे विचार/मते वाचायला आवडेल.

वाचने 13215
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by अन्नू

गांधीजींचा जयजयकार मान्य नसेल तर उत्तर ध्रुवावर जाऊन रहावे.

आमच्या लेखी दोघांचाही वाटा समसमान आहे!

याच्या इतका निर्बुद्ध प्रश्न ऐकला नाही.

मलातरी इंग्रजांचा वाटतो. अहो त्यांनी भारताला पारतंत्र्यात टाकल म्हणून तर आपलं स्वातंत्र्य मिळवता आलं न? :D

मला वाटतं भारतीयांच्या इंग्रजीचा मोठा वाटा आहे - भारतीय लोक चुकिचं इंग्रजी बोलायला लागले आणि गोर्‍या साहेबाचं कन्फ्यूजन झालं - ह्यांचं बरोबर की आपलं? त्याच रागा-वैतागात गोरा साहेब पळून गेला. what is and what is not? (हाकानाका). मोठमोठ्या पोस्टरांवरचे हिंदी मालिकांचे / पिच्चरांचे शीर्षक इंग्रजीतून वाचतांना साहेबाच्या आजच्या पिढीतला माणूस पण वाचता-वाचता पडायचा तिच्यायला - Maine Pyaar Kiya Hum Aapake Dil Mein Rahete Hain Saans Bhee Kabhee Bahu Thee Darr Mann हे कसं वाचत असतील इंग्रज भारतात आल्या नंतर :)

हत्तीचा वाटा , वाघाचा वाटा यांवर देखील धागा येउ द्या

आपण काहि दिग्गज नाय बॉ त्यामळे ह्या विषयावर आपला पास्...तरि पण आलोय तर हि एक आवडति जुनि जाहिरात :) पोरी ये पोरी, पाव्हणं आलं बघ.... खरतर माह्या घरची लक्षमी व्हायची , पण मी हिला सून म्हणून आणली, हि साधी लक्षमी न्हाही , वनलक्षमी हाये वनलक्षमी !! गुरांना चारा, जळणाला लाकूड, गाठीला पैका घरच्या घरी.. सामाजिक वनीकरण येता दारी !

In reply to by होबासराव

अर्रर्र... मी पण "दिग्गज" नाही हे लिहायला विसरलोच होतो माझ्या प्रतिसादात. तसा डिस्क्लेमर आहे असं समजा मंडळी :) होबासराव, तुमचा प्रतिसाद वाचून बरं झालं लक्षात आलं, नाहीतर लोक मला "दिग्गज" समजायला लागले असते तर? काय इमेज झाली असती माझी चार लोकांत :):):)