✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?

उ
उगा काहितरीच यांनी
गुरुवार, 01/28/2016 - 20:00  ·  लेख
लेख
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. शनीच्या चौथर्‍यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ? राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ? सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57924 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

मान न मान मै तेरा मेहमान..

नीलमोहर
Fri, 01/29/2016 - 15:17 नवीन
त्या चौथर्‍यावर स्त्रिया तर दूर, पुरूषांनाही काही रक्कम दिल्याशिवाय प्रवेश नाही असं ऐकलं आहे, त्यामुळे या प्रकरणाविषयी बर्‍याच शंका, संभ्रम आहेत. बाकी जिथे आपल्या येण्याचे स्वागत नाही तिथे जाण्याचा अट्टाहास कशासाठी.. आमचे शनिपाराचे शनिमहाराज आम्हाला हवे तेव्हा दर्शन घेऊ देतात, पुष्कळ आहे :)
  • Log in or register to post comments

जिओ नीमोतै जिओ... अगदी सत्य

विजय पुरोहित
Fri, 01/29/2016 - 15:20 नवीन
जिओ नीमोतै जिओ... अगदी सत्य या धाग्यावरचा कोटीकोटी मोलाचा प्रतिसाद... सगळा वादच फुस्स्स्स....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मान न मान मै तेरा मेहमान..

माहितगार
Fri, 01/29/2016 - 16:09 नवीन
मान न मान मै तेरा मेहमान..
हाच प्रश्न इतरांना नाकारुन ईश्वरावर केवळ आपलाच मालकी हक्क आहे हे सांगू पाहणार्‍या लिंग/गट/वंश/... इत्यादींबाबतही लागू होणार नाही का ?
बाकी जिथे आपल्या येण्याचे स्वागत नाही तिथे जाण्याचा अट्टाहास कशासाठी..
कदाचित १) ईश्वराच्या नशिबी आलेली अमंगळ भेदाभेदाची संस्कृती दूर करून, ईश्वराचे दायित्व सर्वाप्रती समान असते हे सिद्ध करण्यासाठी २) अधिकारपूर्ण समतेच्या सन्मानासाठी' ३) भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष दूरकरून सर्वसमावेशकतेचे आदर्श जोपासण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष

होबासराव
Fri, 01/29/2016 - 20:24 नवीन
अरे बापरे :) आता संस्कृती चे काका, मामा, सगळे येतिल बघा. बात निकली है तो बहोत दुर तक जायेगि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कोण शनिमहाराज? धन्यवाद!

पिलीयन रायडर
Fri, 01/29/2016 - 15:53 नवीन
कोण शनिमहाराज? धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अरे कोणीतरी शेतकर्यांच्या

हेमंत लाटकर
Fri, 01/29/2016 - 19:20 नवीन
अरे कोणीतरी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवा. शनिदेवाच्या चौथर्यावर बायका गेल्या, न गेल्या काय फरक पडणारयै.
  • Log in or register to post comments

आलायसां ?

माहितगार
Fri, 01/29/2016 - 20:06 नवीन
यांवें !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

लाटकर काका तुम्हीच पुढाकार घ्या,

भंकस बाबा
Sat, 01/30/2016 - 14:35 नवीन
आपण आता शनि देवालाच साकडे घालू की बाबा थांबव या आत्महत्या! आणि हो ते देशाचे संरक्षण वेग्गेरे कशाला पाहिजे , तिथेपन शनिदेवाला सांगू आपल्या दुष्मनाच्या मागे साडेसाती लावायला. काका तुम्ही फ़क्त हो म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मागे एकदा असा संकल्प डॉ नरेंद्र दाभोळकरांनी घेतला होता

नितीनचंद्र
Fri, 01/29/2016 - 20:34 नवीन
मला आठवतय मागे एकदा डॉ नरेंद्र दाभोळकर साहेबांनी हाच संकल्प एकदा घेतला होता. त्यांनी मग तो मागे घेतला असे आठवते आहे. कोणाला माहित आहे का की त्यांनी हा निर्णय का बदलला ? त्यांना पटलेली बाजु लोकांच्या समोर आणता येईल का ? अर्थातच त्या मुलींनी स्त्रीयांनी जावे शनिशिंगणापुरला. आक्षेप असायचे कारण नाही.
  • Log in or register to post comments

शनीच्या चौथर्‍यावर महिलांना

श्रीगुरुजी
Fri, 01/29/2016 - 21:03 नवीन
शनीच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे पुरूषांना मुक्त प्रवेश आहे तिथे महिलांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत महिलांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींना ३०% प्रवेश राखीव (उर्वरीत ७०% प्रवेश घेण्यात महिलांना प्रतिबंध नाही), स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना ५०% जागा राखीव (तिथे पुरूषांना प्रवेश नाही, परंतु महिला उर्वरीत ५०% जागातून सुद्धा येऊ शकतात), बसमध्ये महिलांसाठी राखीव बाक, रेल्वेत महिलांसाठी राखीव डबा अशा अनेक ठिकाणी महिलांना केवळ महिला आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा.
  • Log in or register to post comments

क्या बात है ! और ये लगा

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 21:34 नवीन
क्या बात है ! और ये लगा सिक्सर सिधा स्टेडीयमके बाहर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वरील प्रतिसादात

मारवा
Fri, 01/29/2016 - 22:11 नवीन
जे शैक्षणिक व राजकीय राखीव जागांच उदाहरण दिलेल आहे. त्यात आज पर्यंतच्या स्त्रीयांना शिक्षण आणि राजकारण (सत्ता) पद्धतशीरपणे कुटीलतेने जाणीवपुर्वक डावलल्याची अत्यावश्यक भरपाई या हेतुने आहे. हे मागचा सर्व इतिहास पुसुन नविन पाटीवर जणु काल अस्तित्वातच नव्हता आजपासुन सुरुवात झालेली आहे. आणि आजपर्यंत दोन्ही बाजुला उत्तम अधिकार मिळत होते. अशा अ-सामान्य गृहीतकातुन घेतलेले आहेत. बस रेल्वे ठीक आहे पण किरकोळ स्वरुप असला तरी मुद्दा मात्र बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

देव नसतात.

लालगरूड
Fri, 01/29/2016 - 22:31 नवीन
देव नसतात.
  • Log in or register to post comments

लालगरूड पिवळे असतात.

काळा पहाड
Sat, 01/30/2016 - 00:22 नवीन
लालगरूड पिवळे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

(No subject)

अनुप ढेरे
Sat, 01/30/2016 - 09:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मिपावर

इरसाल
Sat, 01/30/2016 - 14:13 नवीन
असे काही आले नां की मला हटकुन " एक रुका हुआ फैसला" ची आठवण येते मग इथल्या वेगवेगळ्या प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादाने मी गडबडुन जातो. भेंडी काय चाल्लय काय ? असे धागे नेहमी उडदाचे पापड करत असताना वाचा-लिहायला घ्यावेत. उडदाच्या चिवट पीठाच्या उंड्या मस्त्पैकी ठेचल्या जातील आणी पापड मस्त मऊ मुलायम.
  • Log in or register to post comments

मस्त खुसखुशीत प्रतिसाद....

विजय पुरोहित
Sat, 01/30/2016 - 14:18 नवीन
मस्त खुसखुशीत प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

कित्ती दिवस झाले पापडाच्या

यशोधरा
Sat, 01/30/2016 - 15:21 नवीन
कित्ती दिवस झाले पापडाच्या लात्या खाऊन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

एक माझेही मत(त्याला कुत्रं पण

सुबोध खरे
Sat, 01/30/2016 - 19:31 नवीन
एक माझेही मत(त्याला कुत्रं पण विचारात नाही हे सोडा) तेथे एक पाटी लावून ठेवा. "चौथर्यावर स्त्रियांनी पाऊल ठेवल्यास शनीमहाराजांचा कोप होऊन त्यांच्यावर संकट कोसळू शकते असा विश्वास आहे. तेंव्हा चौथर्यावर पूल ठेवण्याच्या अगोदर विचार करा. " ज्यांची श्रद्धा आहे त्या स्त्रिया पाउल ठेवणार नाहीत. आणि ज्यांची श्रद्धा नाही त्या मुळातच येणार नाहीत. बस काय चार "स्त्रीमुक्ती" वाल्या स्त्रिया त्यावर पाऊल ठेवतील बाकी कोणी ठेवणार नाही. एवढा काथ्याकुट आणि ठणाणा आपण होऊन बंद होईल.
  • Log in or register to post comments

आताही पाटी न लावता तोच अर्थ

तर्राट जोकर
Sat, 01/30/2016 - 19:45 नवीन
आताही पाटी न लावता तोच अर्थ प्रचलित आहे. जे होत आलंय तेही त्याच भावनेतून आजवर होत आलंय. काथ्याकूट आणि ठाणाणा वेगळ्याच कारणासाठी आहे (इथला नाही-भुमाता रणरागिणी ब्रिगेड चा). मलातरी कुणाच्याच मुद्द्यात काहीच दम दिसत नाही. काहीतरी अंतर्गत राजकारण धुमसतंय. ती भूमाता ररा ब्रि वाचलं की भुछत्र आठवतं. दोन्ही ची उत्पत्ती साधारण एकसारखीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यापेक्षा शनि चौथर्यावर

हेमंत लाटकर
Sun, 01/31/2016 - 07:35 नवीन
त्यापेक्षा शनि चौथर्यावर जाण्यास सर्वांनाच (स्त्री पुरूष) बंदी करावी.
  • Log in or register to post comments

स्त्रीयांनी करू नये म्हणून

माहितगार
Sun, 01/31/2016 - 09:23 नवीन
स्त्रीयांनी करू नये म्हणून पुरूषांवरसुद्धा बंदी मननीय आहे ! हे आणखी कोण-कोणत्या क्षेत्रात करता येईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा