दिनुची प्रेम कहाणी
( एक सत्य कथा )
भाग १
आज दिनु थोडा ऊदास दिसत होता . रवी ने त्याला नाराजीच कारण विचारल पण दिनु आज काहीच बोलत नव्हता मुकाट्याने टेकडीची वाट चढत होता त्याच्या पाठीमागे रवी ,, शेवटी रवीने त्याचा हात पकडला व त्याला खोदुन विचारले तेव्हा कुठे दिनु ने तोंडातुन उच्चार काढला अगदी बारीक आवाजात तो बोलला ' अरे रवी काल तिला बघायला स्थळ आल होतं रे !
ओ हो अच्छा तर हे कारण आहे माझ्या मित्राच्या नाराजीच ,,
अरे रवी तुला मजाक वाटतोय का ? अरे मी तिच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती तर जीवच देईल कारण कालच ती मला म्हणाली होती . की लवकरात लवकर घरी सांग नाहीतर मी जीव देईन .
अरे मग सांगुन टाक ना घरी रवी म्हणाला
नाही रे घरचे ऐकणार नाही.
हे ऐकुन रवी पण शांत झाला. कारण दिनुचे घरचे समजुन घेणार नाही हे रवी ला पण चांगले माहीत होते.
बोलत बोलत ते टेकाडाच्या वर आले आजुबाजुला करवंदीच्या जाळ्या काळ्या भिन्न पिकल्या होत्या . दिनुने एक करवंद तोंडात टाकले आणि त्याची मधुर चव जीभेला लागताच तो ४ वर्षापुर्वीच्या काळात हरवुन गेला . याच टेकाडावर करवंदे खातांना झालेली त्यांची पहिली भेट आणि घाबरत मारलेला प्रपोज . सार काही डोळ्यासमोर घडत वस जाणीव दिनुला झाली. क्रमशः
वाचने
3266
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
येऊ द्या मोठे भाग पटाटा !!
प्रपोज मारतात?????
हो प्रपोज मारता म्हणजे
दिनूची भाषा ही दिनूची भाषाच राहू द्या
In reply to हो प्रपोज मारता म्हणजे by दिनु गवळी
कचकुन समर्थन.
In reply to दिनूची भाषा ही दिनूची भाषाच राहू द्या by विवेक ठाकूर
बर
पुभाप्र..
याला म्हणतात सामन्यांच्या
आभारी आहे
पुढचा भाग येवुदे आता....