विषय आवडता आहे. धागा सविस्तर टाकला असतात तर चर्चा करता आली असती. रामदेवराय आणि महानुभव पंथाचे वैर प्रसिद्ध आहे. विठ्ठल भक्ती महानुभव पंथाला मान्य नव्हती कारण चक्रधर स्वामी हे कृष्णाचे अवतार अशी पंथीयांची श्रद्धा होती तर रामदेवराय पंढरीच्या विठ्ठलाचा निस्सीम उपासक होता.
महाराष्ट्र सारस्वत या पुस्तकाच्या दोनही खंडांत आपल्याला बरीच माहिती मिळेल. तेथे इतर लेखकांचे संदर्भही मिळतील.
पुण्यात रहात असाल तर मला भेटा.
( मला वाटते, नवीन सभासदांना जरा जास्त आपुलकीची वागणुक मिळावी. आपण सर्वांनी केंव्हातरी पहिले लेखन केले याची आठवण ठेऊन खेकसण्याऐवजी हळुवारपणे मार्गदर्शन केले तर आपल्या मित्रमंडळात नवीन सभासद लवकर एकजीव होतील.)
शरद
+१
ह्यांनी प्रश्न सुद्धा जेन्युइन विचारलाय , धागा काढायच्या वेळी नसेल सुचले! होते असे मी पण असेच करीत असे फोटोच्या जागी डायरेक्ट यूआरएल पेस्ट करणे वगैरे तेव्हा पै ताई, गणपा भाऊ ह्यांनी शिकवले मला, मागील लिंका हाइपरलिंक करायला श्रीरंगभाऊ सतत मदत करत असत. चालायचेच! गोंडस बाळ तुम्हाला लेखनाला शुभेच्छा अन फ़क्त ह्यापुढे हे पथ्य पाळा , एखाद ओळी प्रश्न अन चर्चेचा मसूदा असता तो धागा रुपात न मांडता खरड़फळयाचा वापर करावात ही विनंती
काल असले माहिती पाहिजे प्रकारातले तीन धागे आले. तेवढेच कोणीतरी मेहनतीने लिहिलेले मागच्या पानावर जातात. मदत पाहिजे प्रकारातला धागा पहिल्या पानावर असताना असे धागे काढायचे प्रयोजन कळले नाही. त्यातला एक धागा "स्कोअर सेटलिंग म्हणजे काय" तर निव्वळ दंगा करण्यासाठी काढलेला होता. मग अशा धाग्यांवर धुमाकूळ झाला की मिपावर असलेच लिखाण असते, मिपा टवाळांचा अड्डा आहे असे म्हणणार्यांना फावते.
मराठीतून अभिव्यक्तीसाठी हे संकेतस्थळ आहे. तर निदान ४/६ ओळी तर लिहायचा प्रयत्न करा ना! मिपावर ४/५ महिने काढलेल्या लोकांना (ते त्यापूर्वीही बरेचदा वाचनमात्र असतात) इथे कोणत्या प्रकारचे धागे असतात हे माहीत असेल असे समजते. कोणीतरी सदस्यत्व घेतले आणि एका सकाळी येऊन महानुभाव म्हणजे पंथ का धर्म असा धागा काढील हे कठीण वाटते.
या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत संपते. महानुभाव हा पंथ आहे. कारण त्याची स्वतंत्र धर्म म्हणून कुठे नोंद असल्याचे माहीत नाही. त्यांचे देव, काव्य सगळे हिंदू लोकांचेच आहेत. लेखकाला नेमके कोणत्या पातळीची माहिती हवी आहे हेही शीर्षकावरून समजत नाही. कदाचित त्यांच्या सातवी यत्तेतल्या मुलीला एका मार्काच्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, अशा वेळी तुम्ही त्याना महानुभावांची सगळी माहिती दिलीत, ढेर्यांच्या पुस्तकातले उतारे टंकलेत किंवा महानुभावी गद्य पुस्तकाच्या स्कॅन केलेल्या कॉपीज चिकटवल्यात तर ते सगळे पुढे वाचतील अशीही शक्यता नसते.
अशा धाग्यांबद्दल मिपाचे धोरण स्पष्ट सांगते की असे धागे अप्रकाशित केले जाऊ शकतात. एखाद्या धाग्यावर विषय चर्चा होण्यासारखा असेल तर अपवादही केला जातो. पण इतर चांगले धागे विनाकारण मागे जातात म्हणून संपादक मंडळ सहसा असे धागे अप्रकाशित करून लेखकाला (तो नवीन असेल तर) निरोप देते की असे धागे मदत धाग्यात हलवत आहोत, किंवा अजून काही लिखाण करून पाठवा, ते धाग्यात समाविष्ट करून मग धागा पुन्हा प्रकाशित करू.
पण आता इथे लोक इतके बोलल्यानंतरही धागा लेखकांनी त्यांना नेमकी किती माहिती हवी आहे लिहिले नाही. मग ते कितपत गंभीर आहेत प्रश्नच पडतो.
अजून थोडे
नवीन सदस्य यायलाच हवेत व त्यांनी लिहिते व्हायलाच हवे! त्याशिवाय मिपा विस्तारू शकत नाही.
पण..
आपण रस्त्याने येता जाता बघतो, कुठेतरी दिसते की काही लोक एकत्र येऊन गप्पा मारताहेत. आपल्याला दिसते, इथे लोक मजा करत आहेत, गप्पा मारत आहेत, हिंदू धर्मापासून ते पर्थच्या खेळपट्टीचा बाउन्स कमी झालाय का इथपर्यंत आणि गोव्यात चांगले मासे कुठे खायला मिळतील पासून ते 'मोकलाया' पर्यंत ३६० अंशातल्या गोष्टींवर चर्चा होतायेत.
आपल्याला वाटते की आपण पण त्यांच्यात सामील व्हावे.
आपण काय करतो? तिथे जाऊन 'राहूल गांधी व नरेंद्र मोदी यांच्यातील वैचारिक मतभेदाचे साहित्यिक विश्लेषण' यावर भाषण देतो का? असं केलं तर त्या घोळक्यातील लोकांची प्रतिक्रिया काय असेल?
किंवा 'शिरधनकरवाडीचं हवामान बदलल्यामुळे तेथील घरांचे भाडे कमी झाल्याविषयी तुम्हाला काय वाटतं?' असं विचारून गायब होतो का? अशावेळी तिथे आधीपासून असलेल्या लोकांनी कशी प्रतिक्रिया द्यावी?
किंवा आपण अशावेळी रस्त्यावर कसे वागू?
आपण आधी काही दिवस पाहतो, की साधारण तिथे कोणत्या गोष्टींवर चर्चा होतात? कोणते विषय इथे लोकप्रिय आहेत, कोणते विषय त्याज्य आहेत, कोणते लोक कशी प्रतिक्रिया देतात? (वाचनमात्र फेज)
आपल्याला वाटतं की आपल्याला या घोळक्याचा अंदाज आलाय, लोकांचा अंदाज आलाय, आपणही त्यात सहभागी व्हावं. (सदस्य होणं)
सहभागी झाल्यावर आपण एखाद्याच्या बोलण्यावर हसून सहमती दाखवतो, 'सहमत, वा, छान, आवडलं' अशी प्रतिक्रिया देतो. हळूहळू प्रतिक्रियांमधून 'अरे मला असं वाटतं....' अशी थोडी मोठी प्रतिक्रिया देतो. मग कधीतरी विरोधी प्रतिक्रिया देतो. किंवा थोडं रुळल्यानंतर एखादी नवी चर्चा सुरू करतो.
मग मिपावरही तसंच झालं तर नवसदस्य जास्त चांगल्या प्रकारे जोडले जातील. जास्त सहभाग घेतील. जास्त व्हॅल्यू अॅडिशन करतील. जास्त टि़कून राहतील.
आता असं करायचं, का घरी (स्वतःच्या ब्लॉगवर) भाषण तयार करून प्रत्येक चौकातल्या घोळक्यात (मिपा व अन्य संस्थळं) जाऊन ते ऐकवायचं आणि अजून ऐकायला माझ्या घरी या (झैरात) असं आवतान देत सुटायचं, हे सदस्यत्वोत्सुकांनी ठरवावं.
अगदी निगुतीने सांगीतलेले विचार आवडले.
हे त्यात "भर" टाकण्यास अगदी उपयुक्त आहे, किमान काहीजण लिहिण्यापसून बिचकणार नाहीत.
सगळे थोडीच आम्च्या सारखे निर्लज्ज आणि बिन्धास्त असतात.
चुकार नाखु
स्कोर सेटलींग बद्दल मी विचारलेला प्रश्न हा धुमाकूळ घालण्यासाठी नसून जेनुईनली विचारला होता. तो कुठे विचारावा हे न कळल्याने मी त्यातल्या त्यात काथ्याकुट हा प्रकार निवडला होता. मिपा वर नवीन असल्याने थोडा गोंधळ उडू शकतो. त्यातही माझ्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने आणि हि धमाल चालू आहे हे कळल्याने मी त्या धाग्याला नंतर उत्तर दिले नाही. एका मिपा सदस्याने मात्र मला व्यक्तिगत संदेश करून स्पष्टीकरण दिले, आता तो धागा अप्रकाशित केला तरी त्यात मला अजिबात वाईट वाटणारं नाही. पण नवीन सदस्यांकडून अशा थोड्या चुका होऊ शकतात हे समजून घेऊन उगाच मुद्दाम दंगा करण्यासाठी केले म्हणणे चुकीचे आहे. कारण दंगा करण्यासाठी माझी इथे कोणाशीही वैयक्तिक ओळख नाही.
बाकी क्षमस्व
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद! आतापर्यंतचा अनुभव असा आहे की अशा प्रकारचे धागे सहसा डुप्लिकेट आयडीने येणारे सदस्य काढतात. त्यात त्यातला 'वैगरे' शब्द, जो मिपावर मुद्दाम चुकीचा लिहायची पद्धत आहे, तुमचा आयडी सगळ्यामुळे भर पडली! अर्थात इथे मी लिहिले ते केवळ तुमचा धागा ताजा होता म्हणून त्याचा उल्लेख केला. तो धागा मुद्दाम सिंगल आऊट करायचा नव्हता. आता तुम्ही जेन्युइनली नवीन आहात हे लक्षात आले आहे. मात्र यापुढे अशा शंका प्लीज 'मदत पाहिजे' धाग्यांवर विचारा. किंवा गूगल सर्च वापरा. (मिसळपाव+ स्कोर) असा सर्च केलात तर जुने सगळे धागे सापडतील.
त्या धाग्यावरची चेष्टा हलक्याने घेतल्याबद्दल धन्यवाद. बरेच दिवसांनी आम्हाला मजा करायची संधी दिल्याबद्दलही धन्यवाद आणि तुम्हाला दुखवले असेल तर त्याबद्दल क्षमस्व.
जी माहिती मिळाली त्यासाठी आभारी आहे. मान्य मी खूप active नसतो. पण मला पाककृती विभाग फार आवडतो. मी तिथे अधून मधून प्रतिक्रिया देत असतो.
महानुभाव या पंथाबद्दल मला अधिक जाणून घ्यायचे आहे. बुकगंगा वर बरेच शोधले पण उपयुक्त पुस्तक काही दिसले नाही. शरद सरांनी सुचवलेली पुस्तके मिळतात का ते पाहतो.
पुन्हा एकदा आभारी आहे.
http://bhagvans.blogspot.in/?m=1 या ब्लॉग वर आपल्याला काही चांगली माहिती मिळेल.
अभ्यासासाठी पुस्तके
१) महानुभाव संशोधन भाग १ आणि २ - डॉ. वि.भि.कोलते
२)महानुभाव इतिहास- डॉ.अ.का.प्रियोळकर
३)महानुभावीय मराठी वाड;मय. -डॉ. य.खु. देशपांडे
४)लीलाचरित्र - संपादित -डॉ.श.गो.तुळपुळे
-दिलीप बिरुटे
पंढरपुरच्या विठ्ठ्लाची वारी करणारा वारकरी आणि श्रीचक्रधरासहित पंचकृष्णांना मानणारा महानुभाव पंथ हे महाराष्ट्रातील प्रमुख धर्मसंप्रदाय होते. महानुभव पंथास सुरुवातीला महात्म पंथ,भटमार्ग, परमार्ग अशी नावं होती. महाराष्ट्रातील ब्राह्मण,मराठी,माळी,दलित आणि विविध जाती जमातीतील लोक या पंथाचे अनुयायी होते. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी हे संस्थापक. महाराष्ट्रातील नाथसंप्रदायात अनागोंदी सुरु झाली त्यानंतर महानुभ संप्रदायाची बीजं रुजली.
नाथसंप्रदायाचा प्रभावही या संप्रदायावर दिसून येतो.
तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा द्वैती मताचा भक्तीपंथ, अद्वैती शंकराचार्य सत्य असा एकच पदार्थ मानतात तो म्हणजे ब्रह्म. सांख्य पुरुष आणि प्रकृती हे दोन मूळ पदार्थ मानतात म्हणुन ते द्वैती. श्री चक्रधरस्वामी द्वैतीआहेत, कारण जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर अशा चार वस्तू ते स्वतंत्र व निय मानतात. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धा करु शकतो. थोडक्यात परमेश्वराच्या ज्ञानाने वा भक्तीने जीवाला मुक्ती मिळु शकते. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराने अनंत अवतार घेतले आहेत,
पुढेही घेणाराअहे. जीवाला ज्ञान देण्यासाठी अव्यक्त परमेश्वर मनुष्यदेह घेतो: ही श्रद्धा हाच भक्ती भक्तीमार्गाचा आधार होय.महानुभावांच्या श्रद्धेप्रमाणे परमेश्वर चार युगात हंस, दत्त, कृष्ण व चक्रधर असे चार अवतार घेतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सान्निधानाने आपला उद्धार करुन घेतात.
आचारधर्म म्हटला तर सन्याशीवृत्ती आणि आंत्यतिक निवृत्तीवाद या पंथात आहे. सन्याशी व गृहस्थ असे दोन वर्ग अनुयायात दिसतो. अन्न, वस्त्र,भ्रमण, निद्रा, उपासना याबाबतीत अतिशय कडक नियम श्री चक्रधरांनी आपल्या शिष्यांना घालुन दिले होते. विकारविकल्पशुन्य होऊन, स्वभावाला आवर घालून कोणाचा आश्रय न घेता ईश्वराच्या अधीर राहुन त्याचे स्मरण करीत आपला जन्म कंठावा. विकारशुन्यासाठी इंद्रियांचे नियमन आवश्यक केवळ ज्ञानाने मनुष्य उद्धरत नाही. (खुप नियम आहेत) ओळखीच्या घरी भिक्षा मागायची नाही. स्त्रीयांचा विचार करायचा नाही.घाणेरडी वस्त्र नेसुन किळसवाण्या स्थितीत राहावे. (मला हे लोक खरंच किळसवाणे वाटतात)
असो, अजून काय माहिती पाहिजे आणि का पाहिजे ती सांगा, जमेल तसं खरडत राहीन.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला.
ह्या विषयावर स्वतंत्र लेखन करावे ही विनंती.
+१
चक्रधरस्वामींच्या हत्येत हेमाडपंताचा हात होता अशी वदंता आहे. त्यात कितपत तथ्य असावे?
महानुभावपंथी पुढे स्वत:ला श्रेष्ठ समजू लागले आणि त्यातूनच 'मानभावीपणा॑ करणे' असा वाक्प्रचार रूढ झाला, अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. त्यात कितपत तथ्य असावे?
लिळाचरित्रातील शेवटच्या लीळांमध्ये हेमाद्रीने वैर चक्रधरांशी वैर धरल्याचा आणि त्याने कान फ़ुंकल्यामुळे रामदेवरायाने स्वामींचा छळ करण्याचा उल्लेख आलेला आहे पण ह्या नंतर घुसडलेल्या लिळा आहेत असे डॉ. ब्रह्मानंद देशपांडे ह्यांचे मत आहे. लीळाचरित्र उत्तरार्धातील लिळा क्र. ४११ मध्ये विठ्ठल हा देव नसून तो पंढरपूर येथील मंदिर एका दरोडेखोराचे स्मारक आहे असा उल्लेख आढळतो. महानुभव पंथ भागवत धर्माचा विरोधक जरी असला तरी चक्रधर स्वामी विठ्ठलाचा असा उल्लेख करणार नाहीत तेव्हा ही आणि अशा प्रकारच्या लिळा प्रक्षिप्त असाव्यात.
रामदेवराय विठ्ठलाचा परमभक्त होता व हेमाद्री त्याचा श्रीकरणाधिप. चक्रधरांच्या मृत्युनंतर रामदेवरायला पश्चाताप होऊन त्याने हेमाद्रीला देहांत शासन केले अशीही एक लिळा आहे पण ती उघडउघड प्रक्षिप्त आहे कारण चक्रधरांच्या प्रयाणानंतर हेमाद्री ९ वर्षे जीवंत होता ह्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत.
मात्र चक्रधरांचा महानुभव पंथ विरूद्ध रामदेवराय आणि हेमाद्री ह्यांच्यात शत्रुभाव होता हे निश्चित.
ह्या वैराला दुसराही एन्गल आहे. तो म्हणजे उपासनापद्धतीवरुन नसून सत्ताकारणाचा.
रामदेवरायाचा पिता कृष्णदेव ह्याच्या मृत्युनंतर त्याचा धाकटा भाऊ महादेव यादव रामदेवराय अल्पवयीन असल्याने सत्तेवर आला. ह्या महादेवाची बरीच प्रशस्ती विविध लिळांमध्ये आहे. महादेव यादवाबद्दल महानुभवीयांना आपुलकी वाटत असे. महादेवाच्या निधनांतर मात्र रामदेवरायला सिंहासन मिळण्याऐवजी महादेवाचा पुत्र आमणदेव सत्तेवर आला. अल्पावधीतच रामदेवरायाने बंद करुन आमणदेवाला पदच्युत केले व् स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. ह्याचा खोल परिणाम महानुभव पंथावर झाला असावा..'आमणदेवाचे डोळे काढियेले' अशी एक लिळा सांगते. तर दुसऱ्या एका लिळेत महादेव परम धार्मिक, कण्हदेवो आस्तिक तर रामदेवो निरपवस (नास्तिक) असे म्हटले आहे.
सध्या काही संदेश फिरत आहेत ज्यामध्ये :
- महानुभाव पंथ हा पंथ नसून ब्राह्मणांचे षड्यंत्र आहे किंवा ब्राह्मणांनी हायjack केलेला पंथ आहे, असा संदेश दिला जातोय..ज्यात तथ्य नाही..
- शिवाय महानुभाव हा पंथ नसून धर्म आहे, असा संदेश दिला जातोय. माझे कुटुंब महानुभाव पंथीयच आहे, पण आम्हाला हे संदेश पटले नाहीत. म्हणून मी स्वतः यावर अधिकाधिक अभ्यास करून महानुभाव हा धर्म नसून पंथ आहे हे सिद्ध करणार आहे.
ब्रिगेडच्या फेसबुक पानावर देखील अशा आशयाची पोस्ट आहे. नक्कीच मी याच्या मुळाशी जाऊन जगासमोर सत्य ठेवेन..
तुम्ही स्वतः महानुभावीय पंथातले आहात म्हणजे इतर माहितीची तुम्हाला गरज नाही, उलट तुम्हीच आम्हाला जास्त माहिती देऊ शकाल. तो पंथ आहे हे नि:संशय. तुम्ही म्हणता तो प्रकार धक्कादायक आहे. ब्रिगेड सगळ्या महाराष्ट्राची वाट लावायला निघाले आहेत असे दिसते.
हे मी माझ्या पाहण्यातून सांगत आहे. ब्रिगेडी काहीही म्हणोत. महानुभाव इतरांप्रमाणे सण साजरे करीत नाहीत/करू शकत नाहीत. ते इतर देवतांचा प्रसाद घेत नाहीत, इतर मंदिरांत जात नाहीत आणि मूर्तीपूजा करीत नाहित. ते वेद-पुराणे मानीत नाहीत. तसेच गीता फक्त अर्जुनाला सांगितली आणि मानवजातीचा उद्धार करण्यात उदासीनता दाखवली म्हणून कृष्णाला दोष देतात.
ज्याप्रमाणे एकच प्रेषित मोझेस असूनही ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू हे वेगळे धर्म आहेत त्याप्रमाणे हे प्रकरण आहे. ते कृष्ण आणि दत्ताच्या इतर मंदिरातही जात नाहीत; फक्त महानुभाव मंदिरात जातात. महानुभावांच्या स्वर्ग आणि नरकाच्या कल्पनाही हिंदूंपेक्षा वेगळ्या आहेत. जन्म-अंत्यसंस्काराच्या त्यांच्या विधीही वेगळ्या असतात.
अहिंसेवर त्यांचा जोर असतो. त्यामुळे तण काढतांना झालेल्या हिंसेमुळे शेती हे पापकर्म म्हणून ते ओळखतात. पूर्वी दसऱ्याला होणाऱ्या बळीमुळे ते त्या दिवशी गावात थांबत नसत. तसेच महानुभावांची नवरात्र हि अत्यंत बंधनांची असते हे तुम्हाला माहित असेलच.
तसेच इतर हिंदू महानुभावांकडे कुत्सित नजरेने बघतात हे मराठीतल्या वाक्प्रचारांतून दिसून येते.उदा मानभावीप्रमाणे बोलणे, कामाला भ्याला नि मानभाव झाला. तसेच ते जिझिया कर देत नसत आणि अनेक महानुभाव मंदिरे आधी हिंदू मंदिरे होती. त्यामुळे महानुभावांबद्दल हिंदू लोकमानस आधीपासूनच कलुषित आहे.
जर धर्माची व्याख्या religion म्हणून न करता जगण्याची पद्धत म्हणून केली तरी महानुभाव हिंदू धर्मात बसत नाही कारण त्यांची जगण्याची पद्धतच वेगळी आहे. जर ब्रिगेडी पूर्व म्हणत असेल तर मी मुद्दाम पश्चिमेला बघून काही अर्थ नाही.
विदर्भातले सुप्रसिद्ध साहित्यसंशोधक कै.डॉ.वि.भि.कोलते यांनी महानुभावपंथाविषयी बरेच लिखाण केले आहे. मला वाटते त्यांनी लीळाचरित्रावर पुस्तक लिहिले होते त्यावर श्रीकृष्णांविषयीच्या लीळाचरित्रातील उद्धृतामुळे मोठेच राजकीय काहूर उठले. इतके की त्या पुस्तकावर बंदी आणली गेली होती. याविषयी इथे कोणी विगतवार लिहील काय? डॉ. कोलते त्यानंतर फारच निराश झाले होते. त्यांची संशोधनाची क्षितिजे आणि पंचोपाख्यान ही पुस्तके मला माहीत आहेत. आणखीही नक्कीच असतील.
वि.भी.कोलते महानुभाव संप्रदायाचे मोठे अभ्यासक त्याचबरोबर आमच्या औरंगाबादचे ब्रम्हानंद देशपांडे यांचाही खुप अभ्यास होता. लीळाचरित्र एकांक आणि उत्तरार्ध अशी दोन पुस्तके त्यांची होती.
आमच्याकड़ील विद्यापिठात बी.ए.च्या अभ्यासक्रमात देशपांडे यांचं पुस्तक लिळाचरित्र होतं, शिकवायला मजा यायची.
-दिलीप बिरुटे
ब्रह्मानंद देशपांडे यांचा उल्लेख माझ्याकडून राहिला. तेही थोरच. पुरातत्त्वशास्त्रामधले त्यांचे काम मोठे आहे. पण कोलतेंवर अन्याय झाला हा सल अजूनही मनात आहे त्यामुळे महानुभाव म्हटले की त्यांचेच नाव चटकन डोळ्यांसमोर येते.
महानुभाव हा पंथ आहे का असे हिंदुना विचारले तर ते पंथ असेच उत्तर देणार.
मुसलमान व ख्र्स्चन इतर व्यक्तीना आपल्या धर्मात ओढतात म्हणुन हिंदु बोंबलत असतात.
पण हिंदुंची पद्धत तर यापेक्षा अघोरी आहे... ते अख्खा धर्मच गिळुन आपला पंथ म्हणुन जाहीर करतात . उदा. जैन , बौद्ध.
त्यामुळे जाणकार व्यक्तीकडुन माहिती घ्या.
पण हिंदुंची पद्धत तर यापेक्षा अघोरी आहे... ते अख्खा धर्मच गिळुन आपला पंथ म्हणुन जाहीर करतात . उदा. जैन , बौद्ध.
मोगासेठ हिंदुत्वाची विचारधारा उपासना पद्धतींचे स्वातंत्र्य स्विकारते विवीधततेत एकात्मता शोधत कुणालाही परका मानण्या पेक्षा आपलेसे करू पहात असेल तर त्यात वावगे काय आहे ? एखादी ख्रिश्चन अथवा मुस्लीम उपासना करणारी व्यक्ती मुर्तीपुजा आणि जातीभेद या दोन गोष्टी बाजूस ठेऊन उर्वरीत हिंदू संस्कृतीतील त्याला आवडणार्या चांगल्या मुल्यांचे आचरण त्यांच्या धर्माचे पालन करत करून आणि स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ शकेल आणि असे ख्रिश्चन अथवा मुस्लीम त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपासना करताना हिंदू का असू शकणार नाहीत ? एकमेकांमधील चांगले स्विकारण्यात अघोरी काय आहे ?
पंथ = पथ / मार्ग हा अर्थ घेतला तर सर्वच धर्म त्यांच्या त्यांच्या समजूतीनुसार मार्ग दर्शवत असतात, -हिंदू धर्म केवळ कोणत्याही एका पंथाने अथवा मार्गाने बनत नाही सर्व धर्म पंथ त्याचे भाग असू शकतात, त्यातील प्रत्येक पंथ स्वतःस स्वतंत्र धर्मही म्हणू शकतो - धर्म म्हणा का पंथ म्हणा काम असो वा नुकसान जे व्हायचे तेवढेच होत असावे नाही का ? सर्वसमावेशक सर्वांचा आदर करणार्या कोणत्याही दृष्टीकोणात अस्वस्थ होण्यासारखे काय असावे ?
प्रतिक्रिया
बिन ओळीचा धागा?
सदस्यकाळ ४ महीने ६ दिवस,
हॅ:
In reply to सदस्यकाळ ४ महीने ६ दिवस, by कविता१९७८
गोंडस बाळ,तुमचा प्रश्न इथे
कित्ति मोठ्ठा लेख आहे
विषय आवडता आहे. धागा सविस्तर
कमाल आहे! अजून धागा (?) जिवंत
महाराष्ट्र सारस्वत
+१
In reply to महाराष्ट्र सारस्वत by शरद
+१
In reply to +१ by बोका-ए-आझम
बिनओळीचा धागा
+१
In reply to बिनओळीचा धागा by पैसा
+१
In reply to +१ by तुषार काळभोर
वा पैलवान, प्रतिसाद आवडला.
In reply to +१ by तुषार काळभोर
खरंच
In reply to वा पैलवान, प्रतिसाद आवडला. by उगा काहितरीच
स्कोर सेटलींग बद्दल मी
In reply to बिनओळीचा धागा by पैसा
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद!
In reply to स्कोर सेटलींग बद्दल मी by लाडू.
धन्यवाद.
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद! by पैसा
हेहे!
In reply to धन्यवाद. by लाडू.
खर तर मराठी माध्यमातून
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद! by पैसा
सांगितले ना अशा शंका 'मदत
In reply to खर तर मराठी माध्यमातून by लाडू.
वगैरे
In reply to खर तर मराठी माध्यमातून by लाडू.
धन्यवाद
In reply to वगैरे by पैसा
पैसाताई, वगैरे साठी धन्यवाद!
In reply to वगैरे by पैसा
फाऊल, फाऊल!
In reply to वगैरे by पैसा
अर्रर्र!
In reply to फाऊल, फाऊल! by एस
@वगैरे.>>> पै तै चं चूक! ;)
In reply to वगैरे by पैसा
अवांताराबद्दल आभार.
In reply to स्कोर सेटलींग बद्दल मी by लाडू.
जी माहिती मिळाली त्यासाठी
संदर्भ
In reply to जी माहिती मिळाली त्यासाठी by गोंडस बाळ
माहिती का पाहिजे ते सांगा.
प्रतिसाद आवडला.
In reply to माहिती का पाहिजे ते सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to प्रतिसाद आवडला. by प्रचेतस
हे मी पण ऐकले आहे. विशेषतः
In reply to +१ by सुनील
लिळाचरित्रातील शेवटच्या
In reply to +१ by सुनील
धन्यवाद
In reply to लिळाचरित्रातील शेवटच्या by प्रचेतस
सुंदर प्रतिसाद.
In reply to माहिती का पाहिजे ते सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभारी आहे सर ..
धन्यवाद!
In reply to आभारी आहे सर .. by गोंडस बाळ
धर्म आहे.
In reply to आभारी आहे सर .. by गोंडस बाळ
प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो.
In reply to धर्म आहे. by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
वि.भि. कोलते
बरोबर
In reply to वि.भि. कोलते by राही
अगदी सहमत
In reply to बरोबर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरुषोत्तम नागपुरे हे नाव पण
In reply to बरोबर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमची धागा जाहिरात
.
पण हिंदुंची पद्धत तर यापेक्षा
In reply to . by मोगा
..
In reply to पण हिंदुंची पद्धत तर यापेक्षा by माहितगार
पंथ = पथ / मार्ग हा अर्थ
In reply to .. by मोगा