Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीरंग on Sat, 01/02/2016 - 02:29
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
मराठी रंभूमीवर अत्यंत गाजलेल्या "कट्यार काळजात घुसली" चं सुंदर चित्रपट रूपांतर पाहिल्यानंतर उत्सुकता होती ती अर्थातच नाना पाटेकर - महेश मांजरेकर द्वयीच्या येऊ घातलेल्या "नटसम्राट" ची. कुसुमाग्रजांच्या समर्थ लेखणीतून रंगभूमीवर येऊन अजरामर झालेलं ही नाटक म्हणजे नात्यसृष्टीतला एक महत्वपूर्ण मानबिंदू आहेच. अशातच, महेश मांजरेकर बर्याच काळानंतर मराठी चित्रपट बनवणार, त्यात नाना, विक्रम गोखलेंसारखे खरोखरचे नटसम्राट झोकून देऊन काम करणार.. प्रचंड ताणली गेलेली उत्सुकता, आणी उंचावलेल्या अपेक्षांनिशीच चित्रपटग्रुहात प्रवेश केला.. गणपत रामचंद्र बेलवलकर.. तब्बल ४ दशके रंगभूमीवर राज्य गाजवणार्या उत्तुंग कलाकाराची रंगभूमी सोडल्यावरची घुसमट, विक्षिप्त स्वभावामुळे ओढवून घेतलेला तणाव, त्यातच लयाला जाऊन झालेला अस्त, याची चटका लावून जाणारी कथा म्हणजे नटसम्राट. शिरवडकरांची कथा संपूर्णत: नायकाच्या मध्यवर्ती पात्राभोवतीच फिरणारी. त्यामुळेच, नटसम्राट साकारणं हा समर्थ अभिनयाचा मापदंडच मानला जातो. आधीच दैदिप्यमान असलेल्या नानाच्या कारकिर्दितली आनखी एक मैलाचा दगड ठरावी अशी ही भूमिका नानाने ताकदीने पेलली देखील आहे. रोखठोक स्वभावाचा, रंगभूमीपासून दुरावल्यानंतर जरासा चिडचिडा झालेला, नंतर स्वतःच्याच मुलांच्या घरी आश्रितासारखं जगणं नशिबी आल्यानंतर विमनस्क झालेला नटसम्राट त्याने उत्तम उभा केलाय यात शंका नाही. विशेषतः विक्रम गोखलेंबरोबरचा हॉस्पिटलमधला प्रसंग, पत्नीच्या निधनाचा प्रसंग, "कोणी घर देता घर,घर?" म्हणून फोडलेला काळीज पोखरणारा टाहो, इत्यादि काही प्रसंग तर केवळ लाजवाब. पण तरीही, डॉ. लागूंनी अक्षरशः जिवंत केलेल्या बेलवलकरांची प्रतिमा मनात घट्ट रुजल्यामुळे असेल कदाचित, पाटेकरांनी साकारलेला नायक म्हणावा तसा मनाला भिडत नाही. खास करून पूर्वार्धात तर काही संवादांवर लागूंच्या शैलीचा इतका प्रभाव जाणवतो, की नाना चक्क लागूंची नक्कल करत आहेत की काय असा भास होतो. हे मात्र जरा खटकतंच. नानांची मध्यवर्ती भूमिका असली तरी सर्वात प्रभाव पाडून जातात ते विक्रम गोखलेंनी साकारलेले रामभाऊ. कित्येक वर्षांनी गोखलेंना इतक्या सशक्त भूमिकेत बघून अतिशय बरं वाटलं. त्याबद्दल दिग्दर्शकाचे शतशः आभार मानायला हवेत. मूळ नाटकात नसलेलं हे पात्रच सर्वात जास्त प्रभाव टाकून जातं, यातच विक्रम गोखलेंच्या अभिनयसामर्थ्याचं पुनः एकदा प्रमाण मिळतं. मृण्मयी देशपांडेनेही गणपतरावांच्या मुलीच्या भूमिकेत अतिशय नैसर्गिक अभिनय केलाय. इतक्या हेवीवेट अभिनेत्यांच्या गर्दीतही तिने स्वतःचा खासंच ठसा उमटवला आहे. बाकी मंडळी ठीक्ठाक. नेहा पेंडसेचे सदोष उच्चार मात्र कानांवर आघात करतात. चित्रपटात अनेक ठळक त्रुटी व anachronisms कडे आश्चर्यकारक दुर्लक्ष्य केलं गेल आहे. एकीकडे साधारण ७० च्या दशकातल्या गाड्या, व पेहेराव दाखवायचे, दुसरीकडे एकाला "अंदाज अपना अपना" मधील गाण्याची ओळ गुणगुणताना दाखवायचं. कित्येक पात्रांच्या डोळ्यांवर, शाळेच्या गॅदरिंगमध्ये, किंवा लो बजेट नातकांमधे वापरतात तसले बिन काचांचे चष्मे आहेत हे स्पष्ट दिसतं. एकिकडे पोरं विटिदांडू खेळत असलेला काळ दाखवायचा, दुसरिकडे शाळेतील मुलं एकमेकांना चिडवताना “chicken-shit pie" वगैरे बोलताना दाखवायचं.. असल्या चुका सहज टाळता येऊ शकल्या असत्या. याव्यतिरिक्त चित्रपटाची गतीही (विशेषतः पूर्वार्धात) थोडी संथ झाली आहे. किरण यज्ञोपवीत या गुणी लेखकानेही संवादलेखनात निराशाजनक कामगिरी केली आहे. "मे घर चकाचक करते" असं त्याकाळच्या पात्राच्या तोंडी विसंगत वाटणारं वाक्य, किंवा "बाबा, आपण असं करुयाच नको" असलं धेडगुजरी मराठी एखाद दोन ठिकाणी ऐकून धक्का बसतो. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून उलगडत जाणारी कथा, आणी नाटकाचं माध्यमांतर करताना केलेले बदल मात्र चपखल बसलेत. एकूणच, घेऊन गेलेल्या उत्तुंग अपेक्षा हा नटसम्राट जरी पूर्ण करू शकत नसला, तरी आवर्जून पाहण्याजोगा मात्र निश्चितच आहे.
  • Log in or register to post comments
  • 23089 views

प्रतिक्रिया

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 01/05/2016 - 19:15

Permalink

कुणी तिकीट काढाल का हो तिकीट??

पाहीन मी सुद्धा...
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 01/05/2016 - 19:21

Permalink

बघणार!!

बघणार!!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 01/05/2016 - 19:43

Permalink

पाहिला

लग्न झाल्यापासून हा पहिलाच सिनेमा जो सगळ्या कुटुम्बाने पाहिला. सर्वच लोकाना थेटरी अभिनय व सिनेमाचा अभिनय यातील तुलना करण्याचा मोह होणे साहजिकच आहे. मूळ कथानकात फारसे सांगण्यासारखे काही नाही. कोणीतरी इथेच म्हटले आहे की हे पात्रांभोवती शिरवाडकर फिरत असतात व पात्र आले की जरा अंगावर येणारे संवाद आवश्यकच. ते तसे सिनेमातही आहेत. एक दोन ठिकाणी नानाच्या आवाजात लागू डोकावतात हे खरे आहे पण एरवी नानाच डोकावत असतो कधीतरी बेलवलकरही. मी कथानकाचा शौकिन असल्याने जरा कमी अपेक्षेने सिनेमा पाहिला आहे. (सी फी सिनेमे मला यासाठी आवडत नाहीत कारण कम्जोर कथानक )एकदा पाहावा असा मात्र आहे. बेलवलकर व रामभाउ यांचे मैत्रामधील सम्वादाचे पंचेस हशा पसरवितात. विक्रम गोख्ले लाज्वाब नाही पण मस्त. तेच नानांचे. बाकी संगीत हा चित्राचा महत्वाचा भाग नाहीच आहे. त्या बद्द्ल काय लिहायचे ?
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Mon, 01/11/2016 - 16:22

Permalink

कालच चित्रपट पाहिला. आवडला.

कालच चित्रपट पाहिला. आवडला. नानाची भूमिका आवडली. पण त्याहीपेक्षा आवडले विक्रम गोखले ह्यांचे काम. विशेषत: तो हॉस्पिटल मधला नाना व विक्रम गोखले ह्यांचा संवाद.त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बघायची इच्छा आहे. बाकी पोलिसांचे जे काही प्रसंग ठेवले होते ते कशाला ठेवले होते ते कळले नाही. फक्त बेलवल्कराना शोधण्याच्या कामापुरते दाखवले असते तरी चालले असते. पोलिसांचा छापा वगैरे हास्यास्पद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 01/22/2016 - 17:16

Permalink

भावनाप्रधान

मूळ मेलोड्रामाचा मेलो मेलोड्रामा केला आहे. नाना, कुठल्याच प्रसंगात थकलेला वाटत नाही. अभिनयांत देहबोलीही महत्वाची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मीता on Fri, 01/22/2016 - 18:04

Permalink

आवडला चित्रपट . विक्रम गोखले

आवडला चित्रपट . विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांनी जबरी काम केलंय .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 01/23/2016 - 18:32

Permalink

बघावा की न बघावा..

सिनेमा बघावा की न बघावा हा प्रश्न आहे. कुसुमाग्रजांची स्वगते नानाच्या आवाजात ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असेल. त्याचवेळी आता अशा शोकांतिका बघायची मानसिक ताकद राहिली नाहीये. जगाबद्दल फारसे न कळण्याच्या वयात सतिश दुभाषीचा नटसम्राट बघितला होता. मात्र तेव्हाही त्या स्वगतानी जबरदस्त मोहिनी घातली होती. छोट्या नातीच्या भूमिकेत अलका कुबल होती का काय असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sun, 01/24/2016 - 17:44

Permalink

छान पिक्चर आहे. मन भरून

छान पिक्चर आहे. मन भरून डाेळ्यातून पाणी येते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/24/2016 - 19:33

In reply to छान पिक्चर आहे. मन भरून by हेमंत लाटकर

Permalink

काय म्हणता ?

नवा शीन कसं काय आहे ? त्याच्यासाठी पुन्हा पिच्चर बघावा लागेल असं वाटतं ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अन्नू on Fri, 01/29/2016 - 00:21

In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अगदी हेच ईचाराय आलो होतो.

अगदी हेच ईचाराय आलो होतो. नक्की काय बदल केलाय?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Mon, 01/25/2016 - 10:13

Permalink

माय-बापाने सर्व मुलांना देऊन

माय-बापाने सर्व मुलांना देऊन टाकू नये द्यायचे असल्यास मृत्यूपत्रात द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 01/25/2016 - 10:53

In reply to माय-बापाने सर्व मुलांना देऊन by हेमंत लाटकर

Permalink

ब्वारं

डन.....! --दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 01/29/2016 - 00:24

Permalink

बेस्ट ऑफ नाना पाटेकर.

आणि बहुतेक आजवर बघितलेल्या सर्वोत्तम (मनावर आघात करणार्‍या अभिनयाच्या बाबतीत) चित्रपटांपैकी एक. सबकुछ नाना.. पण इतरही तेव्हढेच ताकतीने उतरले आहेत आखाड्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 02/04/2016 - 23:33

Permalink

आत्ताच बघितला!!

" दुनिया बेईमान झाली तरी चालेल, पण तुम्हाला ती मुभा नाही" ज्याप्रकारे हा संवाद येतो त्याला तोड नाही! लाजवाब!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/05/2016 - 12:56

Permalink

एकच दाद.

आजवर अनेक सिनेमे बघितले कि ज्यात कमि जास्त पोर्शन जबरदस्त अ‍ॅक्टींग केली स्टारकास्टनी. हा असा एक चित्रपट आहे कि ज्यात अगदी १००% म्हणावं अशी भन्नाट अ‍ॅक्टींग झाली आहे. नानाच्या पाया पडावसं वाटतय. अवांतरः 'कट्यार काळजात घुसली' पण बघितला होता. सहज तुलना केली कट्यार आणि नटसम्राटची. तर कट्यार म्हणजे जीतेंद्र आणि नटसम्राट म्हणजे दिलीपकुमार वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 02/05/2016 - 14:35

In reply to एकच दाद. by अर्धवटराव

Permalink

दिलीप कुमार?

दिलीप कुमार? अर्धवट राव आवडला नाही तर सरळ सांगायच की नाही आवडला. पण डायरेक्ट दिलीपाकुमाराशी तुलना? इतकाही काही वाईट नाहीये सिनेमा. जगदीप किंवा जॉनी लिव्हर म्हणाला असतात तर एकवेळ समजुन घेतले असते. पण दिलीप कुमार? छे.... कल्पना देखिल सहन होत नाही. आणि रहाता राहिला तो कट्यार आणि नटसम्राटच्या तुलनेचा. ही तुलना मला रत्नागिरी हापुस आंब्याची लोणकढ्य़ा रवाळ साजुक तुपा बरोबर केल्यासारखी वाटली. दोन्ही चित्रपट आणि नाटके आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 02/06/2016 - 00:04

In reply to दिलीप कुमार? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

???

दिलीप कुमार? अर्धवट राव आवडला नाही तर सरळ सांगायच की नाही आवडला. पण डायरेक्ट दिलीपाकुमाराशी तुलना? इतकाही काही वाईट नाहीये सिनेमा. जगदीप किंवा जॉनी लिव्हर म्हणाला असतात तर एकवेळ समजुन घेतले असते. पण दिलीप कुमार? छे.... कल्पना देखिल सहन होत नाही.
काहिच नाहि कळलं. कोणाला, काय नाहि आवडलं म्हणताय पैजार बुवा?
आणि रहाता राहिला तो कट्यार आणि नटसम्राटच्या तुलनेचा. ही तुलना मला रत्नागिरी हापुस आंब्याची लोणकढ्य़ा रवाळ साजुक तुपा बरोबर केल्यासारखी वाटली. दोन्ही चित्रपट आणि नाटके आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत.
नाटके आपापल्या जागी हुच्च आहेतच. चित्रपटाच्या बाबतीत नटसम्राटपुढे कट्यार अगदीच केवीलवाणा वाटला. ते ही नाना आणि सचिन हि तुलना मनात आल्यानंतर...
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/05/2016 - 13:12

Permalink

टू सी ऑर नॉट टू सी?

टू सी ऑर नॉट टू सी? दॅट इज द क्वश्चन. बघावं की न बघावं? हा एकच सवाल आहे. अखंड मनोरंजनाच्या लखलखाटात पल्लेदार भाषेची झालर लावलेलं आप्पा बेलवलकरांचं आत्मकेंद्री जुनाट दु:ख जाऊन बघावं निर्बुद्ध नॉस्टॅल्जिक आनंदानं... की रोखून धरावं स्वत:ला नाविन्याच्या कंटाळवाण्या प्रतीक्षेत मनाच्या मनोरंजनाच्या व्यसनासह आणि करावा अस्वीकार एकाच क्षणी जुनाटपणाचा, नॉस्टॅल्जियाचा, पाट्या टाकण्याचा आणि कल्पनाशून्यतेचाही? नाविन्याच्या नवलाईने जुनेराला असा रंग मारावा की नंतर येणाऱ्या नवलाईला स्मरणरंजनाचा वासही नसावा! पण..पण अशी नवलाई आलीच नाही तर? तीच तर खरी मेख आहे. नव्या नवलाईच्या नागड्या अनुभवांना फकीर होऊन भिडण्याची हिंमत होत नाही म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुन्याचेच नवथरलेपण. सहन करतो विचारशक्तीवर माहितीच्याच गोष्टीसाठी टाळ्या पिटण्याचा बलात्कार. कवटीच्या गाभाऱ्यात असलेल्या मेंदूची विटंबना आणि अखेर? पॉपकॉर्न घेऊन उभे राहतो दाखवतील ते बघण्यासाठी. मराठी माणसा, तू इतका विचारहीन का झालास? एका बाजूला ज्यांनी आमच्या पैशाचा पुरेपूर दाम द्यायला पाहिजे ते आम्हाला गृहीत धरतात आणि दुसरीकडे नवनवीन प्रयोग करणाऱ्यांकडे मात्र तू पाठ फिरवतोस. मग जुन्याच तोंडाला नवा रंग फासून फडावर उभ्या राहिलेल्या या नाट्य-चित्रसृष्टीकडे पाहून कौटुंबिक विषय, पुणेरी भाषा आणि गोरे(च) नायक-नायिका स्विकारणाऱ्या तुझ्या बेगडी चित्र-नाट्य प्रेमाचं कौतुक आम्ही कुठवर करायचं?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 02/05/2016 - 14:00

In reply to टू सी ऑर नॉट टू सी? by नगरीनिरंजन

Permalink

प्रतिसाद आवडला

त्यातल्या मतांशी किंचीत असहमत, तरी अ‍ॅज ए प्रतिसाद म्हणून आवडला. नाविन्य हवेच. (ते नव्हते तेव्हा नव्वदीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीची काय अवस्था होती, ते पाहिलंय आपण). पण म्हणून अशा (उदा नटसम्राट/कट्यार.. अशी नाटके पडद्यावर आणणे) गोष्टी करूच नयेत का? चित्रपटामुळे नटसम्राट उभ्या महाराष्ट्रात पोहचला. (आणि नानामुळे तो जास्त लोकांनी पाहिला (असावा). सामान्य प्रेक्षक, जो सामान्यपणे नाटकांपासून लांब आहे-सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या)- त्यांना चित्रपटामुळे 'नटसम्राट' पाहता आला.) मराठीतील आणखीही उत्तमोत्तम नाटके योग्य माध्यमांतराद्वारे मोठ्या पडद्यावर यावीत अन् जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावीत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/05/2016 - 14:21

In reply to टू सी ऑर नॉट टू सी? by नगरीनिरंजन

Permalink

__/\__ अभिप्रायाचा प्रतिसाद

__/\__ अभिप्रायाचा प्रतिसाद जबरस्त! लाखात एक!
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा ashay on Fri, 02/05/2016 - 14:22

Permalink

कट्यार आणि नटसम्राट

आप आपल्या ठिकाणी बरोबर..तुलना कशाला करायची..जे समोर आहे त्याचा आनंद घ्यावा..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com