नटसम्राट
मराठी रंभूमीवर अत्यंत गाजलेल्या "कट्यार काळजात घुसली" चं सुंदर चित्रपट रूपांतर पाहिल्यानंतर उत्सुकता होती ती अर्थातच नाना पाटेकर - महेश मांजरेकर द्वयीच्या येऊ घातलेल्या "नटसम्राट" ची. कुसुमाग्रजांच्या समर्थ लेखणीतून रंगभूमीवर येऊन अजरामर झालेलं ही नाटक म्हणजे नात्यसृष्टीतला एक महत्वपूर्ण मानबिंदू आहेच. अशातच, महेश मांजरेकर बर्याच काळानंतर मराठी चित्रपट बनवणार, त्यात नाना, विक्रम गोखलेंसारखे खरोखरचे नटसम्राट झोकून देऊन काम करणार.. प्रचंड ताणली गेलेली उत्सुकता, आणी उंचावलेल्या अपेक्षांनिशीच चित्रपटग्रुहात प्रवेश केला..
गणपत रामचंद्र बेलवलकर.. तब्बल ४ दशके रंगभूमीवर राज्य गाजवणार्या उत्तुंग कलाकाराची रंगभूमी सोडल्यावरची घुसमट, विक्षिप्त स्वभावामुळे ओढवून घेतलेला तणाव, त्यातच लयाला जाऊन झालेला अस्त, याची चटका लावून जाणारी कथा म्हणजे नटसम्राट. शिरवडकरांची कथा संपूर्णत: नायकाच्या मध्यवर्ती पात्राभोवतीच फिरणारी. त्यामुळेच, नटसम्राट साकारणं हा समर्थ अभिनयाचा मापदंडच मानला जातो.
आधीच दैदिप्यमान असलेल्या नानाच्या कारकिर्दितली आनखी एक मैलाचा दगड ठरावी अशी ही भूमिका नानाने ताकदीने पेलली देखील आहे. रोखठोक स्वभावाचा, रंगभूमीपासून दुरावल्यानंतर जरासा चिडचिडा झालेला, नंतर स्वतःच्याच मुलांच्या घरी आश्रितासारखं जगणं नशिबी आल्यानंतर विमनस्क झालेला नटसम्राट त्याने उत्तम उभा केलाय यात शंका नाही. विशेषतः विक्रम गोखलेंबरोबरचा हॉस्पिटलमधला प्रसंग, पत्नीच्या निधनाचा प्रसंग, "कोणी घर देता घर,घर?" म्हणून फोडलेला काळीज पोखरणारा टाहो, इत्यादि काही प्रसंग तर केवळ लाजवाब. पण तरीही, डॉ. लागूंनी अक्षरशः जिवंत केलेल्या बेलवलकरांची प्रतिमा मनात घट्ट रुजल्यामुळे असेल कदाचित, पाटेकरांनी साकारलेला नायक म्हणावा तसा मनाला भिडत नाही. खास करून पूर्वार्धात तर काही संवादांवर लागूंच्या शैलीचा इतका प्रभाव जाणवतो, की नाना चक्क लागूंची नक्कल करत आहेत की काय असा भास होतो. हे मात्र जरा खटकतंच.
नानांची मध्यवर्ती भूमिका असली तरी सर्वात प्रभाव पाडून जातात ते विक्रम गोखलेंनी साकारलेले रामभाऊ. कित्येक वर्षांनी गोखलेंना इतक्या सशक्त भूमिकेत बघून अतिशय बरं वाटलं. त्याबद्दल दिग्दर्शकाचे शतशः आभार मानायला हवेत. मूळ नाटकात नसलेलं हे पात्रच सर्वात जास्त प्रभाव टाकून जातं, यातच विक्रम गोखलेंच्या अभिनयसामर्थ्याचं पुनः एकदा प्रमाण मिळतं. मृण्मयी देशपांडेनेही गणपतरावांच्या मुलीच्या भूमिकेत अतिशय नैसर्गिक अभिनय केलाय. इतक्या हेवीवेट अभिनेत्यांच्या गर्दीतही तिने स्वतःचा खासंच ठसा उमटवला आहे. बाकी मंडळी ठीक्ठाक. नेहा पेंडसेचे सदोष उच्चार मात्र कानांवर आघात करतात.
चित्रपटात अनेक ठळक त्रुटी व anachronisms कडे आश्चर्यकारक दुर्लक्ष्य केलं गेल आहे. एकीकडे साधारण ७० च्या दशकातल्या गाड्या, व पेहेराव दाखवायचे, दुसरीकडे एकाला "अंदाज अपना अपना" मधील गाण्याची ओळ गुणगुणताना दाखवायचं. कित्येक पात्रांच्या डोळ्यांवर, शाळेच्या गॅदरिंगमध्ये, किंवा लो बजेट नातकांमधे वापरतात तसले बिन काचांचे चष्मे आहेत हे स्पष्ट दिसतं. एकिकडे पोरं विटिदांडू खेळत असलेला काळ दाखवायचा, दुसरिकडे शाळेतील मुलं एकमेकांना चिडवताना “chicken-shit pie" वगैरे बोलताना दाखवायचं.. असल्या चुका सहज टाळता येऊ शकल्या असत्या. याव्यतिरिक्त चित्रपटाची गतीही (विशेषतः पूर्वार्धात) थोडी संथ झाली आहे.
किरण यज्ञोपवीत या गुणी लेखकानेही संवादलेखनात निराशाजनक कामगिरी केली आहे. "मे घर चकाचक करते" असं त्याकाळच्या पात्राच्या तोंडी विसंगत वाटणारं वाक्य, किंवा "बाबा, आपण असं करुयाच नको" असलं धेडगुजरी मराठी एखाद दोन ठिकाणी ऐकून धक्का बसतो.
फ्लॅशबॅकच्या माध्यमातून उलगडत जाणारी कथा, आणी नाटकाचं माध्यमांतर करताना केलेले बदल मात्र चपखल बसलेत.
एकूणच, घेऊन गेलेल्या उत्तुंग अपेक्षा हा नटसम्राट जरी पूर्ण करू शकत नसला, तरी आवर्जून पाहण्याजोगा मात्र निश्चितच आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परीक्षण आवडले
ट्रेलर पाहून मी पण भारावून
धन्यवाद
चित्रपट परिक्षण, निरिक्षण
परिचय आवडला रे श्रीरंग.
आँ ? एकदम माईंचं भूत कसं काय
हाहा. :)
..
नाना नटसम्राट अप्रतिम करेल याची खात्री होतीच
नाना पाटेकर आणि बेलवरकर .,,,,
सहमत
सहमत
तेवढं ते
काय बाई ते निरिक्षण! ;)
सुंदर परिक्षण. आज हा चित्रपट
खूप छान जमला आहे
कालच पाहिला ...अप्रतीम अनुभव
अप्रतिम चित्रपट पहिल्याचे समधान मिळते
उत्तम परीक्षण. बारीक तपशीलवार
चित्रपट आज पाहिला.
पुरवणी
बघणार नाही बहुतेक..
हेच म्हणतो.
यशोधरा, एस
नाही, आपल्या लिखाणाबद्दल
स्क्युज मी.
प्रतिसाद जोरदार आणि उत्तमच आहे, पण
तुम्ही तर म्हनल्या...
सद्ध्या वेळ नाही..
आत्ताच चित्रपट पाहून परतलोय.
परिक्ष्ण अफाट
नाटक गाजल
+१
चित्रपट ओळख छान.
काही संवादाला टाळ्या
काही संवादाला टाळ्या वाजवाव्यात असंही वाटून जातं.+१ मी चित्रपट पाहिला तेव्हा लोकांनी पाचसहा वेळा नाटक चालू असल्याप्रमाणे उत्फुर्तपणे टाळ्या वाजवल्या. चित्रपट संपला तेव्हा तर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, मीही अभावितपणे त्यात सामील झालो !क्या बात है
+१
मला आवडला
फक्त एकच बाब खटकली ती म्हणजे
"वास्तव"
बघणारच.
दोन डॉ लोकानी
पिक्चर बघितला नाही, पण
नाना व गोखलेंच्या अभिनयाबद्दल
सहमत!
पर्फेक्ट
ज्योती सुभाष व सौ. मांजरेकर
नटसम्राट पहावेच लागणार....
लिहिताना मोठी चूक झाली आहे
वरचा मूळ प्रतिसादच परत एकदा