Skip to main content

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

वाचने 8769
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

बेसन सेठ, एकदम जबरा.. सगळेच शेर एकसे एक..ह.ह.पु.वा.. केशवसुमार (स्वगत: केश्या हा कच्चा माल तुझ्या नजरेतून सुटला कसा?)

सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

In reply to by बाळ्या पाल्हाळकर (verified= न पडताळणी केलेला)

बाळ्या पाल्हाळकर (not verified)??? हा (not verified) काय लोचा आहे?

बेलाशेठ झक्कास. तोडले आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी मस्तचं... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

>> गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी

मस्त विडंबन रे! :) दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! हा हा हा! हे मात्र खरे हो...! अहो आमच्यावर ओकार्‍या काढण्याकरता काही असंतुष्ट आंतरजालीय आत्मे संस्थळे आणि ब्लॉग काढतच असतात! :) आपला, (बर्‍याच जणांना न पचलेला) तात्या.

साष्टांग दंडवत गुरुदेव. प्रतिसादांमधे विसोबा खेचर आणि अन्य जुन्या जाणत्यांची नावे वाचून मिपावरचे जुने दिवस आठवले.