Skip to main content

रोहीत वेमुला

लेखक shvinayakruti यांनी सोमवार, 18/01/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली जाते, का ? तर दलित आहे म्हणून दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ? दलित आहेत म्हणून हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर तो आदिवासी आहे म्हणून म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला गेला असं म्हणता येणार नाही.

वाचने 25775
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

परत परत तेच धोरण..... आपल्याकडे रूजलेलं राजकीय हस्तक्षेपाचं, द्वेषाचं आणि दुहीचं विष काही केल्या जाणं जवळ जवळ अशक्य आहे हे दाखवणारी उदाहरणं परत परत घडताना दिसतायत. सगळेच आपापला बाब्या निवडून बाकी कारटी ठरवून मोकळे झालेत. चूकीपेक्षा कोणी केली ह्यावर शिरा ताणून जास्त चर्चा होते आणि तीच खरी पोटदूखी आहे असं वाटतं. भाजपायींच्या कुठल्याही चुकीने बाकीच्यांच्या मनाचे मोर थुई थुई नाचू लागतात तर भाजपाई रामशास्त्री लगेच मागचा हिशोब मांडू लागतात आणि चुकीचं समर्थन करायचा प्रयत्न करतात...मग अजून काहीतरी वाद विवाद....ह्यात आत्ता करणारे चुकीचे आहेत असं हिरीरीने सांगणारे मागचं सोयीने बाजूला सारतात.....वाद वाढत वाढत भक्त वि विरोधक असा होतो. आता राजकीय नेतॄत्व काय परिपक्वता दाखवते ते पहाणे आले. दोषींवर (कुणी असल्यास) त्वरीत करवाई होऊन न्याय मिळावाअ ही सदिच्छा!!!!

मद्रास आय आय टी मध्ये २०१५ ऑक्टोबर च्या एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या
ह्या डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या माहीतीवर सर्वच मुग गिळुन गप्प आहेत. नक्कीच ते सवर्ण असतील त्यात सुद्धा ब्राह्मण. आणि ३ टक्क्याच्या व्होटबँकेसाठी कोण आंदोलन वगैरे करणार? किंवा मिपावर लेख पाडणार? त्यात, ही ३ टक्के व्होटबँक सुद्धा विभाजीत.

रोहितला हिंदू/हिंदूत्व/भगवा याबद्दल प्रचंड संताप होता. साहजिक आहे,विद्रोही साहित्य फार वाचलं कि असं होतं.आणि संताप येण्यामागे तथ्यही आहेच,ते नाकारता येत नाही. पण त्याने लढा चालू ठेवायला हवा होता. भाजप/संघ/हिंदूत्ववादी इत्यादिंनीही विद्रोही/आंबेडकरी साहित्य वाचलं तर थोडं बरं होईल.

कुणाच्याही मृत्यूची अशी चर्चा होणे हे खरेच खूप दुर्दैवी आहे. रोहितच्या मृत्यूला तो दलित असणे आणि केवळ त्यामुळेच त्याला अपमानास्पद वागणूक मिळणे आणि त्यामुळे त्याला नैराश्य येणे हेच एक आणि एकमेव कारण होते काय? तसे असेल तरच 'दलित विद्यार्थ्याची आत्महत्या' हे शीर्षक योग्य ठरेल असे माझे मत आहे. असे नसेल तर वारंवार तसा उल्लेख करून सर्वसामान्य लोकांचा समूह म्हणून आपणात फूट पाडण्याच्या सोयीस्कर राजकारणाला आपण बळी पडत आहोत असे वाटते.तसेच रोहितच्या आत्मघाताशी दैनंदिन आयुष्यासंदर्भात त्याच्या दलितत्वाचा संबंध नसेल तर तटस्थ निरीक्षक म्हणून पाहता माझ्यादृष्टीने हे प्रकरण व त्यावरची चर्चा ही निव्वळ राजकीय ठरते. तसेच एका कायदेशीर बाबीची माहितीही कुणाकडे असेल तर शेअर करावी.(माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरही ही माहिती महत्वाची आहे) आंतरजातीय विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींना आपली जात(एकतर वडीलांची किंवा आईची)अशी 'ठरवण्या'चा अधिकार आहे का? या बातमीतून तरी तसेच ध्वनित होते. तीत लेखक म्हणतो-
Rohith was a Dalit, he chose to take up his mother's caste since his father had deserted them.
अवांतर:जातीची चर्चा केलेली मला आवडत नाही.पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते.

In reply to by ए ए वाघमारे

पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते. जातीचे संदर्भ बाजूला पडतात. संमिश्र कॉस्मो वातावरणात अजूनच. पण सरकारी गोष्टीत सगळीकडे जात टोचत येतेच. यावर long term उपाय काढणे गरजेचे आहे. रोहीत वेमुलाची आई दलित तर वडील इतर मागासवर्गीय होते. पण ते सोडून गेल्यामुळे तो आईबरोबर आणि त्या वातावरणात / समाजात वाढला. आजच्या हिंदूच्या बातमी प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने अशा परिस्थितीत जात ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आणि आईची जात लावणे योग्य समजले गेले आहे. आपल्या कायद्याप्रमाणे वडिलांची जात लावली जाते. http://www.thehindu.com/news/national/rohit-vemula-supreme-court-verdic… जातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक त्यातच बुडत आहोत. feel frustrated with opportunists everywhere.

येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या मेजर निवडणूका आहेत का? बिहार निवडणूकीच्या आधी दादरी प्रकरण घडलं (की घडवून आणलं?), त्यात बीफवरुन बोंबाबोंब करण्यात आली, पुरस्कार वापसीची नाटकं यशस्वीपणे राबवण्यात आली आणि बिहारची माठ जनता त्याला नंदीबैलासारखी भुलली. अर्थात बिहारमध्ये असलेल्या जातीय समीकरणांना आणि त्याप्रमाणे चाललेल्या राजकारणाला तर कुठेच तोड नाही म्हणा! कम्युनिस्टांचं शिरकाण करण्यासाठी हर्मान गोअरींगने आपल्या हस्तकांकरवी जर्मन पार्लमेंट - राईशस्टॅग जाळली होती. त्याच धर्तीवर आगामी काळातल्या निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून रोहीतची आत्महत्या 'घडवून' तर आणण्यात आली नाही ना?

In reply to by राँर्बट

भारतात दरवर्षी कोणत्यातरी राज्यात निवडणुक असतेच. २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल व आसाम मध्ये विधानसभा निवडणुक आहे. २०१७ मध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये निवडणुक आहे. २०१८ मध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान मध्ये निवडणुक आहे. २०१९ मध्ये लोकसभा व अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. दादरीसारख्या हत्या किंवा रोहित सारख्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखी प्रकरणे गेली अनेक वर्षे घडत आहेत. परंतु आता मोदी, भाजप इ. दलितविरोधी, असहिष्णु, हुकुमशहा इ. ठरविण्यासाठी त्यांच्यावर झुंडीने हल्ले होते आहेत. रोहीतच्या आत्महत्येनंतर तिथले काही दलित प्राध्यापक राजीनामा देणार आहेत म्हणे. याच विद्यापीठात गेल्या १० वर्षात इतर ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तेव्हा माध्यमांनी किंवा या प्राध्यापकांनी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. परंतु आता सगळ्यांना अचानक कंठ फुटला आहे. यामागचे कारण उघड आहे.

खालील लेख / निरीक्षण महत्वाचे वाटले. http://www.indianexponent.com/2016/01/the-real-truth-of-rohith-vemula-s… त्यात म्हणल्याप्रमाणे रोहीथ हा सुरवातीस इतर कुठल्याही तरूण विद्यार्थ्यासारखा होता... (मी नंतर चेपूवरील माहितीची खातरजमा करून घेतली) त्याची म्हणून मते होती आणि आवडी-निवडी देखील होत्या. धार्मिक नव्हता पण विवेकानंदांचा फोटो खोलीत ठेवत होता. भारताबद्दलचा अभिमान दिसत होता, सैनिकांचे दिवाळीच्या वेळचे फोटो देखील होते. निर्भयाप्रकरणाच्या वेळेस फाशीच्या शिक्षेचे कडक समर्थन करण्यात पुढे होता. अगदी सुब्रम्हण्यम स्वामींचे वक्तव्य देखील त्याला मान्य होते (जरी तो कुठेही भाजपाच्या अथवा हिंदूत्वाच्या जवळ नव्हता तरी). हैद्राबाद विद्यापिठावर खूष असल्याची काही वक्तव्ये, फोटो देखील दिसतात. पण त्याच सुमारास एक गडबड झाली. अण्णा हजार्‍यांनी लोकपाल निमित्त जनजागृती केली आणि केजरीवाल म्हणून एक राजकीय तारा दिवसाकाठी देखील लोकांच्या डोळ्यात चमकू लागला. या तार्‍याचा प्रभाव पडलेला नंतरच्या काळात दिसू लागला. पुढे अचानक सगळेच चुकीचे वाटू लागले. त्यात विवेकानंद चुकीचे होते हे देखील आले आणि याकूब मेमनची (त्या आधी अफझलची देखील) फाशी कशी चूक होती ते आले... जे झाले ते अत्यंत दुर्दवी आहे. त्याच्या मृत्यूचा ज्याप्रकारे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तो भाग "...टाळूवरील लोणी खाणे" या एकाच पद्धतीत बसू शकेल असा आहे. त्याच्या पत्रातील आंबेडकर स्टूडंट युनियन बद्दलची नाराजी/अपेक्षाभंग संदर्भातील खोडलेला भाग आता प्रकाशात आला आहे. आणि ते पत्र मिळायला ६ तास का वेळ लागला, त्याला ६ तासात कोणी शोधायला कसे गेले नाही, मित्राच्या खोलीत तो एकटा कसा होता वगैरे प्रश्न पण धूळ बसत असताना पडू लागले आहेत. अजून एक महत्वाचा प्रश्न वाचनात आला की त्याने काहीकाळ आधी कुलगुरूंना लिहीलेल्या एका पत्राची प्रत मिळाली, त्याने ते पाठवले का हे सिद्ध झालेले नाही. पण ते जर पाठवले असले तर त्यात त्याच्या मानसीक हताशपणाची कल्पना येते. जर ते पत्र पाठवल्यावर त्याचे (मानसीक अवस्थेचे) गांभिर्य लक्षात घेतले गेले नसले तर ते चूकच आहे, कारण काही असुंदेत...या संदर्भात सर्वच विद्यापिठांमधे कुलगुरू, पिन्सिपॉल, प्राध्यापकांना शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटते. असो.

लोकहो, ही घोषणा बघा : तुम कितने याकूब मारोगे? हर घरसे याकूब निकलेगा https://pbs.twimg.com/media/CZDdYbEUEAAGQbP.jpg:large कित्ती सुंदर घोषणा आहे, नाही? आवडली का? रोहित वेमुला कोणाच्या संगतीत होता ते कळतं. आ.न., -गा.पै. प्रश्न : वरील फलक हाती घेतलेल्या दोघांपैकी एक रोहितच आहे का?