Skip to main content

रोहीत वेमुला

लेखक shvinayakruti यांनी सोमवार, 18/01/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली जाते, का ? तर दलित आहे म्हणून दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ? दलित आहेत म्हणून हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर तो आदिवासी आहे म्हणून म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला गेला असं म्हणता येणार नाही.

वाचने 25775
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? इथे संपूर्ण बातमी वाचा उगाच पराचा कावळा करतात , ह्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे शिका आणि स्वावलंबी व्हा हे सोडून याकुब मेनन च्या फाशीवर राजकारण करतात. आंबेडकर आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढले ह्यांनी त्यांचे अनुयायी आत्महत्या करतात. ह्या पत्रातून स्पष्ट कळून येते की टिपिकल आत्महत्या करण्याच्या अगोदर जे सामान्यतः लोकांचे विस्कटलेले विचार असतात .सैर भैर मानसिकता असते तशी ह्या तरुणाची होती , त्याने पत्रात लिहिले आहे माझ्या मृत्यूचे राजकारण करू नका पण टाळू वरील लोणी खाणार्या लोकांना धीर कुठे आहे आयती संधी चालून आली करा लेकहो राजकारण

पाच सहा दिवस मोगा यांचा गोंधळ चालू होता. त्याला विरोध करण्यासाठी मी धागा काढला तर दोन्ही धागे थोड्याच वेळात उडवले गेले. आज ही कोणतीतरी व्यक्ति पुन्हा धागा काढते. जाऊ दे लवकरच कळेल कोणाचा दुआईडी आहे.

प्रत्येक गावात /शहरात काही वजनदार व्यक्ती राजकारण करतात.यांच्याविरुद्ध आवाज उठवणं केवळ अशक्य होतं परंतू आता सोशल मिडिया-इंटरनेटमुळे वाचा फुटु लागली इतकेच.

मायावतींविरुद्ध भ्रष्टाचाराचे अारोप केले गेले तेव्हा त्यांनी 'दलित की बेटी ' असा शब्दप्रयोग केला होता त्याची आठवण झाली. शीतल साठेंच्या प्रकरणात - त्या आणि त्यांचे पती हे नक्षलवादी चळवळीमधून संबंधित होते आणि आपल्या कबीर कला मंच (चूभूद्याघ्या) या संस्थेचा वापर विद्यार्थ्यांमध्ये नक्षली विचारांचा प्रसार करण्यासाठी करत होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली आणि सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत, जो त्यांना जात, धर्म, लिंग वगैरे कशाच्याही आधारावर मिळालेला नाही. नक्षलवादी संघटना आणि त्यांचे विचार हे सरळसरळ देशविरोधी आणि घटनाविरोधी आहेत. त्यांचा प्रचार करायचा आणि अंगाशी आलं की हमखास यशस्वी ठरणारं जातीय कार्ड वापरायचं हे आता मिपावरही सुरु होणार असेल तर ते वेळीच ठेचलं पाहिजे. नाहीतर जिथे खरोखरच दलितांवर अन्याय होत असेल अशा प्रकरणांच्या बाबतीतही अशा खोटारड्या लोकांमुळे लांडगा आला रे आला अशी गत होण्याची शक्यता आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तर या मुलाचा मोठाच प्राॅब्लेम होता. त्याच्यासह एकूण ५ जणांना विद्यापिठातल्या एका विद्यार्थी नेत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरुन निलंबित करण्यात आलं होतं, ते पण गेल्या वर्षी. तेव्हा त्याची बातमी वाचल्याचं आठवत नाही. आता मारहाण केल्याबद्दल खरं तर सत्कारच करायला हवा पण ठीक आहे. त्याने आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरु नये अशी मागणी केलेली आहे. म्हणजे शिस्तभंग तर करायचा पण कारवाई केली तर त्याविरूद्ध दलितविरोधी म्हणून आरडाओरडा करायचा असा प्रकार दिसतो आहे. अशाने ख-याखु-या दलितविरोधी कारवाया ज्या सूडबुद्धी आणि आकसाने केल्या जातात त्यांच्याकडे लक्षच न जाण्याचा आणि लांडगा आला रे आला च्या गोष्टीसारखं होण्याचा धोका आहे. रोहित वेमुलाला जर जाणीवपूर्वक target केलं असेल तर गोष्ट वेगळी पण त्याने मारहाण केल्याचा आरोप होता, जो गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. जर एखाद्याला आपल्याविरुद्ध झालेली कारवाई ही आकसापोटी झालेली आहे किंवा त्यात जातीचा मुद्दा आहे असा संशय आला तर तो कोर्टात जाऊन दाद मागू शकतो, पण जर राजकारण करुन धुरळा उडवून लोकांची दिशाभूलच करायची असेल, तर मग असल्या गोष्टी होतात.

In reply to by बोका-ए-आझम

मारहाण वगैरे "दबंगई" करणारा अन तथाकथित कायदा ज्याच्याबाजुने आहे (दलितविरोधी म्हणून आरडाओरडा फॅक्टर) असा विद्यार्थी सुसाइड करू शकेल ? ही एक शंका मनात आली, की त्याने दबंगई केली म्हणुन रिएक्शन म्हणुन त्याला इंस्टिट्यूशनल त्रास दिला गेला हा फॅक्टर असू शकेल? बातमी संकलन किंवा संदर्भ तर माहितगार साहेबांनी सुद्धा दिले आहेत, मागच्या दशकभराचा यूनिवर्सिटी रेकॉर्ड अन एकंदरित मी पाहिलेले तेलंगाना मधील आयुष्य हे काहीतरी वेगळे चित्र देते आहे, अर्थात ते तसेच असले पाहिजे असा काही माझा आग्रह नाही बस काही कंट्राडिक्टरी शक्यता तपासतोय इतकेच म्हणतो, तुम्ही म्हणल्या प्रमाणे हा "लांडगा आला रे आला" मधे दबलेला एखादा जेन्युइन इशू असू शकेल का? तुम्हाला काय वाटते ते सांगा! (एकंदरित तुमच्याशी चर्चा होऊ शकते ह्या विश्वासाने मुद्दे मांडले आहेत)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इथे मुद्दा एका माणसाच्या आत्महत्येचा आहे. त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केलीय हे अजून गुलदस्त्यातच आहे, कारण त्याने आपल्या suicide note मध्ये याबद्दल कोणीही जबाबदार नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच्या आधीच्या परिस्थिती आणि मन:स्थितीवरुन लोक असा निष्कर्ष काढून मोकळे झालेले आहेत की त्याने शिष्यवृत्ती थांबवल्यामुळे आणि इतर आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केली आणि भाजप मंत्री आणि आमदार यातर २०१४ पासून favorite punching bags आहेतच. आणि आत्महत्या, मग ती कुणाचीही असो, दुर्दैवीच असते. अशा वेळी त्याच्या दलित असण्याचा उल्लेख करण्याची काय गरज होती हेच कळत नाही. याच्यामागे धुरळा उडवण्याखेरीज दुसरा हेतू दिसून येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

त्याची स्कॉलरशिप थांबवली होती असा काहीतरी लोक त्याच्या पत्रावरून निष्कर्ष काढतायत. पण ती तर पेंडिंग होती असं दिसतंय. २ वर्षांपासून सगळ्या सरकारी स्कॉलरशिप्स डायरेक्ट बॅंक ट्रांसफरने येत आहेत आणि वर्षभर विलम्ब हा जवळपास प्रत्येकाच्या बाबतीत होत आहे. त्यात विद्यापीठाचा संबंध नाही. आधी जेव्हा होता, तेव्हा ३ वर्ष वगैरे लागायची. पण आता त्यातल्यात्यात बरी आहे परिस्थिती. त्यामुळे त्याची स्कॉलरशिप विद्यापीठाने थांबवली यात काही तथ्य नसावे. अशी स्कॉलरशिप कुणी थांबवू शकत नाही.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या या बातमीनुसार हैदराबाद विद्यापिठात (उस्मानिया नव्हे) गेल्या दहा वर्षा ९ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे विश्लेषण कसे करावे माहित नाही. लहानवयातील मुलांसाठी स्थानिक पालक अशी काही कल्पना राबवता येऊ शकते पण विद्यापिठातले पोस्टग्रॅज्युएशन + विद्यार्थी यांच्या मानसिक (आर्थिक आधार तर शिष्यवृत्तीतून दिला जातोच) आधारासाठी स्थानिक प्रशासनातील दलित+दलितेतर उच्चपदस्थ काही पुढाकार घेतील तर काही फरक पडेल का ?

In reply to by माहितगार

या ९ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या इतका गवगवा झाल्याचे ऐकले नव्हते. मे २००४ ते मे २०१४ या काळात भारतात व आंध्रप्रदेशात कॉंग्रेसचेच सरकार होते त्यामुळे गवगवा झाला नसावा. आता मात्र प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपून ढेकर देणारे केजरीवाल, राहुल इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार रिंगणात उतरलेले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला सगळीकदे कोन्ग्रेस्स कसे दिसते? मुघल आहात ? त्यांना धनाजी आणि तुम्हाला कॉंग्रेस. बॅंदारू दत्तात्रेय यांचा हस्तक्षेप आणि इराणी यांच्या ministry ची पत्रे माहिती आहेत ना? ते कॉंग्रेसचे आहेत का?

In reply to by खंडेराव

अहो या विद्यापीठात गेल्या १० वर्षात रोहीत धरून ९ दलित मुलांनी आत्महत्या केल्याचे अनेक बातम्यात लिहिले आहे. याआधी झालेल्या ८ आत्महत्यांची कोठे कोपर्‍यात सुद्धा बातमी आलेली दिसली नाही. यावेळी मात्र काँग्रेस अगदी तावातावाने थेट दोषारोप करायला लागली आहे. प्रश्न हा आहे की आधीच्या ८ आत्महत्यांच्या वेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सलग १० वर्षे सरकार असताना ही मंडळी का गप्प होती?

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दाम करताय असे, कि तुम्हाला खरच कळाले नाहीये? कोन्ग्रेस्सचे मन्त्री अशी पत्रे लिहायचे, पोरे विद्यापिठातुन काढा म्हणुन? शिक्शनमन्त्री हे धन्दे करायचे?

In reply to by खंडेराव

गुरुजींवर आरोप करण्याआधी जरा विचार करा काय बोलताय त्याचा. काँग्रेसच्या काळातही असल्या गोष्टी झाल्या पण मिडियामध्ये बातमी आली नाही याचा अर्थ काँग्रेसवाल्यांनी असल्या गोष्टी केल्या नाहीत असं थोडंच आहे? तुम्ही लगेच काँग्रेसला क्लीन चिट देऊन मोकळे झालात. तुम्हाला सांगून करतात वाटतं ते या सगळ्या गोष्टी? आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायला केजरीवाल आणि काँग्रेस पुढे येतात यात चुकीचं काय आहे? केजरीवालांच्या दिल्लीतील सभेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हाचं केजरीवालांचं वर्तन पाहिलंत तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते समजेल. कुणीही आत्महत्या केल्यावर भाजप सरकारच्या नावाने गळे काढणं हे आता मिपावर पण सुरु झालेलं दिसतंय. ग्लिसरीनची घाऊक फॅक्टरी काढलीय सगळ्या केजरुच्या अाणि पप्पूच्या गुलामांनी!

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. सध्या देशात असे कोठेही काही झाले तरी सगळ्यात आधी प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपायला आणि मोदींना शिव्या द्यायला केजरीवाल आणि राहुल धावतधावत येतात. अर्थात माल्डातला हिंसाचार किंवा पठाणकोट अशा ठिकाणी जायला त्यांना अजिबात वेळ नसतो.

In reply to by माहितगार

माहितगार साहेब मद्रास आय आय टी मध्ये २०१५ ऑक्टोबर च्या एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस कोणी राजकारणी तेथे पोहोचला नाही कारण त्यातील एकही दलित नव्हता. म्हणजे त्यात कोणता मतांचा किंवा राजकारणाचा फायदा दिसत नव्हता. वर म्हटल्याप्रमाणे गेल्या १० वर्षात ९ मुलांनी आत्महत्या केल्या त्यातील ८ आत्महत्यांच्या वेळेस कॉंग्रेसचे सरकार होते. त्या साडे आठ वर्षात कॉंग्रेस सरकारला असे वाटले नाही कि आपण दलितांसाठी काही करावे?तेंव्हा जर भाजपचे किंवा चंद्राबाबू नायडूंचे लोक राजकारण करायला पोहोचले असते तर या लोकानी दलितांच्या वेदनांचे राजकारण करतात म्हणून टाहो फोडला असता. आता एकदम कसा उमाळा आला? राजीव गांधी किंवा श्री केजरीवाल यांना पठाणकोटला किंवा तेथे हुतात्मा झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी जावेसे वाटले नाही पण हैदराबादला मात्र ते लगेच पोहोचले. राजकारणी आपल्या साठी काय करत आहेत किंवा करणार आहेत हे सर्वसामान्य जनतेला समजेल तो सुदिन. जनतेचा उद्धार करता करता स्वतःचा उद्धार करतो तो राजकारणी हे साधे सरळ गणित लोकांना समजत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. एखाद्या तरुण माणसाने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे मी स्वतः चौकशी आयोगाचा सदस्य म्हणून आणि मनोविकार शास्त्रात काम करतानाहि प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे अशा आत्महत्यांचे राजकारण करणाऱ्या माणसांची मला मनापासून चीड येते. अर्थात आमच्यासारख्यांचा संताप नपुंसक असतो हेही माहिती आहे.

त्या मुलांची काहीतरी आंबेडकर स्डुडंट्स असोशिएशन होती.आणि त्यांनी याकुब मेमन फाशी प्रकरणावरून विरोध केला म्हणजे याकुबच्या फाशीला विरोध केला होता.तसेच 'मुजफ्फरनगर अभी बाकि है' अशी फिल्म होती म्हणे, फिल्मला विरोध करण्यार्या विरूद्ध आवाज उठवला होता.म्हणजे एकंदरीतच मुसलानांवर होणार्या अन्यायाबद्दल(त्यांच्या दृष्टीने) त्यांचे काम चालू होते,किंवा इतर बरेच काही. त्यामुळे युनिवर्सिटीमध्ये ही मुले देशविरोधी कार्य करत आहेत म्हणून बंडारू दत्तात्रेय(केंद्रीय कामगार मंत्री) यांनी स्मृती ईरानींना पत्र लिहले.एका स्थानिक नेत्यानेही पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मग कुलगूरूंनी समिती वगैरे स्थापून मुलांना निलंबित केले. माझे मत - ते विद्यार्थी दलित आहेत हा केवळ योगायोग आहे,दुसरे कोणी दलितेतर/मुस्लिमेतर विद्यार्थी असते तर एवढे राजकारण झाले नसते. . . अवांतर-बाकि मानव संसाधन/शिक्षण मंत्री या पदावर अयोग्य व्यक्ती आहे हे ही तितकेच खरे आहे,हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

अगदी हि आत्महत्या होण्यापुर्वी हैदराबाद विद्यापिठात आत्महत्या झाल्या आहेत एवढेच नाही हैदराबादच्या उच्चन्यायालयाने सुमोटो म्हणजे स्वतःहून ह्याची दखल घेतली आणि विद्यापिठास सूचना केल्या असे जुन्या ऑनलाईन बातम्यांमधून दिसते. या आत्महत्यांच्या कारणांच्या मागे जाण्याचा एक चांगला प्रयत्न तेथिल सॉलिडॅरिटी नावाच्या एका न्युट्रलचमूने करुन हा एक उल्लेखनीय अहवालही (हा पिडीएफ अहवाल सर्वांनी जरूर वाचावा - प्रा.डॉ. सरांनी अहवालात महाराष्ट्रा संबंधाने काहीच नसले तरीही शैक्षणिक क्षेत्रातल्या एका नाजुक गोष्टीबद्दलचा अहवाल म्हणून दखल घ्यावी असे वाटते.) विद्यापीठास सादर केला होता असे दिसते. तरीही दुर्दैवाने हैदराबाद विद्यापीठासमोर अजून एका अत्महत्येचे भूत समोर येऊन उभे राहीले असे दिसते. इतर संदर्भ , ,

In reply to by कपिलमुनी

म्हैती नै ब्वॉ. मी तर कॉलेज मध्ये अभ्यास करतात असंच समजत होतो. बाकी आमच्या कॉलेज मध्ये पण असे धंदे करणारे लोक होते. पण ते बड्या बापाचे मुलगे कॉलेज मध्ये फक्त टाईम्पास करायला यायचे. लोकांना आत्महत्या करायला लावणारे. हे असं कर्जावू पैसे घेवून रिसर्च करायला येवून असे धंदे करणारे मी तर कधी पाहिले नाहीत. बाकी ब्रिटिश काळ वेगळा होता. विद्यापिठाकडूनच स्कॉलरशिप घेवून त्या पैशात रिसर्च करायचं सोडून एका बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या गुन्हेगाराच्या बाजूने प्रदर्शनं करणे, एका विरूद्ध विचारांच्या विद्यार्थ्याला मारहाण करणे असले आरोप यांच्यावर आहेत. यांची क्रांतीकारकांबरोबर बरोबरी करताय तुम्ही? आणि वर आत्महत्या ग्रँट थांबवल्यावर! काय चाल्लंय काय!! विद्यापीठानं काय सत्कार करायला हवा होता काय असले धंदे केल्याबद्दल?

In reply to by प्रदीप साळुंखे

नाशिकचा मुलीचा एकतर्फी खून , कोल्हापूरच ओनर किलींग यात कुणाला कळवळा आला नाही . धागा आला नाही कारण मरणारे दलीत किंवा मुस्लीम नव्हते

In reply to by कपिलमुनी

खरं सांगायचं तर बातमीपुढे दलीत, अल्पसंख्यांक असं लिहिलं कि कैवारी असल्याचा आव आणता येतो. "ओपन" कॅटेगरीतल्या लोकांवर अत्याचार म्हणजे अत्याचार नसतातच. त्यामुळे मिडीया काय किंवा मिपा काय अश्या घटनांवर धागे येणं दुरापास्तच.

In reply to by वेल्लाभट

प्रकरण मुळात लेखकाने वाचलेलेच दिसत नाही. देवा सगळ कर पण आधी अश्या धागा पिसाटांना फक्त अक्षर ओळख नको तर नीट आणि नेटके ( नेट वरचे नाही) वाचायला ( आणि समजायला) शिकव रे बाबा ! पाहिजे तर त्या करिता आरक्षण ठेव पण मिपाकरांचे रक्षण कर !!!! गेल्या आठवड्यातील "शिळ्या कढीला उत" वाले धाग्यांनी कावलेला नाखु अति अवांतर : सवंग लोकप्रियतेची आवर्तने मिपावर दर २-३ वर्षात येत असावीत असा जाणकारांचा अंदाज आहे. मिपासाहीत्य काल परवा आज उद्या आणि तेरवा मिपाबाह्य टीकाकरांच्या समीक्षेतील एक संतवचन

In reply to by नाखु

सगळ कर पण आधी अश्या धागा पिसाटांना फक्त अक्षर ओळख नको तर नीट आणि नेटके ( नेट वरचे नाही) वाचायला ( आणि समजायला) शिकव रे बाबा ! पाहिजे तर त्या करिता आरक्षण ठेव पण मिपाकरांचे रक्षण कर !!!!
सहमत

आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
आयआयटीने आपल्या संकेतस्थळावरील एक पान या संघटनेला वापरण्यासाठी दिले होते. अभ्यास, संशोधन इ. साठी संकेतस्थळ वापरले जावे असाच त्यामागे उद्देश होता. ते करण्याऐवजी या संघटनेने गोवंशबंदी विरोधाला विरोध (ही बंदी तामिळनाडूत नसून महाराष्ट्रात आली होती. पण आयआयटी तामिळनाडूत असताना सुद्धा यांनी विरोध सुरू केला), देशात आणिबाणी येउ घातली आहे अशा तर्‍हेचे निव्वळ राजकीय लेखन त्या पानावर करायला सुरूवात केली. संकेतस्थळाचा वापर राजकीय लेखन करण्यासाठी सुरू झाल्याने आयआयटीने या संघटनेला संकेतस्थळावरील पानावर लेखन करण्यास बंदी घातली होती. पूर्ण संघटनेवर बंदी घातली हा तद्दन खोटा प्रचार आहे. आयआयटीत अभ्यासाचा प्रचंड भार असतो. विद्यार्थी दिवसरात्र मान मोडून अभ्यास व संशोधन करीत असतात. त्यामुळे आयआयटीतील विद्यार्थ्यांनी अशा राजकीय मुद्द्यांवर वेळ घालविणे योग्य वाटत नाही. तसेच जे संकेतस्थळ शैक्षणिक कारणासाठी वापरावे अशी अपेक्षा आहे, ते राजकीय कारणांसाठी वापरणे सुद्धा चुकीचे वाटते.

काल सकाळपासून यावर वाचतेय. यासंदर्भात चळवळीत ऍक्टिव असणाऱ्या मैत्रिणी प्रत्येक बातमी शेयर करत चालल्यायत. त्यांनी शेयर केलेल्या पोस्ट्स वरून काही प्रोफाइल्स वर पोचले आणि काल दिवसभर हे राजकारण दोन्ही बाजूंनी किती विखारी आहे त्याची झलक दिसली. एक जीव गेला, त्याचं अक्षरश: कुणाला काही देणंघेणं नाही. मृत्यूनंतर काही तास लोटले नव्हते, तेवढ्यात त्याचं पत्र व्हायरल झालं होतं. अनेक ठिकाणी प्रोटेस्ट सुरू झाले होते. त्यावरचे काहीही संवेदना नसणारे शब्दांचे बुडबुडे अपेक्षित विद्यापीठांच्या संघटनांकडून आलेच. किती, किती एखाद्या मृत्यूचा फायदा करून घ्यायची चढ़ाओढ़..असो..

म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
यातल्या मुसलमान आहे म्हणून वगळता बाकी सगळ्याबद्दल वाईट वाटतंय. काये ना मुसलमान आहे म्हणून नख लागलं तर गावभर बभ्रा होतो आणि हिंदू आहे म्हणून कोणी ओरबाडून नेलं तरी कुत्रंदेखील विचारत नाही.

लिहिणार्‍या बर्‍याच मिपा कारांना हे प्रकरण नीट माहीत नाही असे दिसतेय. 1) आंध्रा मधे महाराष्ट्रपेक्षा जातीय दरी जास्त खोल आहे. विद्यापीठात अजूनही जास्त. गेल्या काही वर्षात 9 विद्यार्थांनी आत्महत्त्या केलीय या सगळ्यात. 2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली विश्वविद्यालयात अभविप कार्यकर्त्यांनी, मुझफ्फरनगर बाकी है या डोक्‍यू सिनेमाचे आयोजन करणार्‍या मॉंतेज फिल्म सोसायटी च्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या विरोधात ASA आणि इतर विद्यार्थी संघटनांनी हैदराबाद विद्यापीठात मोर्चा काढाला . सुशीक्ल कुमार, जो अभविपचा नेता आहे, त्याने फेसबुकवर ASA विद्यार्थ्यांना गुंड असे संबोधले. त्याचा जाब विचारला गेला असता त्याने माफीनामा लिहून दिला. यावेळी विद्यापीठ सुरक्षा समितीचे मुख्य उपस्थित होते. दुसर्या दिवशी, सुशील कुमार रुग्णालयात भरती झाला. त्याने आरोप केला की 30-40 लोकांनी त्याला मारहाण केली. 3) विद्यापीठाच्या proctorial board या घटनेची शहानिशा केली. त्यांचा अहवाल असे म्हणतो - The board could not get any hard evidence of beating of Mr. Susheel kumar either from Mr Krishna Chaitanya or from the reports submitted by Dr. Anupama. Dr. Anupama’s reports also could not link or suggest that the surgery of the Susheel Kumar is the direct result of the beating.” 4) यानंतर जो फायनल रिपोर्ट आला त्यात रोहित आणि इतर चार विद्यार्थ्यांना दोषी मानून विद्यापीथातून suspend करण्यात आले. या रिपोर्ट च्या विरोधात विद्यार्थी कुलगुरू शर्मा याना भेटले. त्यांनी suspension काढले आणि सांगितले की एक नवीन समिती या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल. 5) तेवढ्यात आपाराव हे नवीन vc आले. त्यांनी या विद्यार्थांना कुठलीही चौकशी न करता, suspend केले. 6) यात बॅंदारू दत्तात्रेया यांचा काय संबध? त्यांनी स्मृती इराणी यांना पत्र लिहिले की ASA विद्यार्थ्यांवर कार्यवाही व्हाही. हे पत्र HRD मंत्रालयाने वियायपी तक्रार असा शेरा देऊन विद्यापीठाला पाठवले. पुढील काही दिवसात, मन्तरलायाकडून केलेल्या कारवाईची माहिती पाठवा अशी 2 पत्रे व 4 email विद्यापीठाला पाठविली. 6) यानंतर विद्यापीठ प्रशासनाने रोहित आणि इतर चार विद्यार्थी यांना जवळ जवळ वाळीत टाकले. ही मुले विद्यापीठासमोर मोकळ्या जागेत तंबू टाकून रहात होती.

In reply to by खंडेराव

असं काही नसतं हो ! "ते" उगाच दलित कार्ड खेळतात!! ही लाइन फिक्स!! बाकी काही नाही विषय संबंधित अवांतर वरती काही कॉमेंट्स मधे ओपन केटेगरी सोबत काही झाल्यास आरडाओरडा होत नाही असा काहीसा सुर लागला, किती ओपन केटेगरी वर झालेल्या गुन्ह्यात आरोपी हे दलित असतात अन दलित हत्यांमधे किती ओपन केटेगरीचे आरोपी असतात हे मागील काही वर्षांचे आकड़े पाहून स्पष्ट व्हावे (सद्धया हाती आकड़े नाहीत क्षमस्व) अर्थात बीजेपी सत्तेत आल्यापासुन विरोधी गटाला सुद्धा एक वेगळाच विखार चढलेला स्पष्ट दिसतो आहे हे मागील काही दिवसातल्या तथाकथित लिबरल्स मुळे स्पष्ट होतेच आहे तरीही ह्या तथाकथित लिबरल्स अन उजव्यांच्या साठमारीत कोण्या एका खरेच जातिभेदाचा विखार सोसणाऱ्या मग तो दलित असो वा सवर्ण सोबत अन्याय होऊ नये हेच वाटते

In reply to by खंडेराव

2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली विश्वविद्यालयात अभविप कार्यकर्त्यांनी, मुझफ्फरनगर बाकी है या डोक्‍यू सिनेमाचे आयोजन करणार्‍या मॉंतेज फिल्म सोसायटी च्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या विरोधात ASA आणि इतर विद्यार्थी संघटनांनी हैदराबाद विद्यापीठात मोर्चा काढाला . सुशीक्ल कुमार, जो अभविपचा नेता आहे, त्याने फेसबुकवर ASA विद्यार्थ्यांना गुंड असे संबोधले. त्याचा जाब विचारला गेला असता त्याने माफीनामा लिहून दिला. यावेळी विद्यापीठ सुरक्षा समितीचे मुख्य उपस्थित होते. दुसर्या दिवशी, सुशील कुमार रुग्णालयात भरती झाला. त्याने आरोप केला की 30-40 लोकांनी त्याला मारहाण केली.
यात अजून बरेच आहे. या डॉक्युमेंटरीच्या आधी याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधात रोहीत व ASA च्या इतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून "तुम्ही जितक्या याकूबना फाशी द्याल, तितके प्रत्येक घरातून नवीन याकूब तयार होतील" अशा अर्थाचे प्रक्षोभक विधान केले होते. त्यानंतर अभाविप व ASA च्या विद्यार्थ्यांची मारामारी झाली होती. आजच एका वाहिनीवर रोहीतची एक चित्रफीत दाखवित होते. विद्यापीठात अभाविपने लावलेले बॅनर्स रोहीत व त्याच्या सहकार्‍यांनी फाडून टाकल्यावर अभाविपचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेल्यावर तो म्हणाला की "जे जे हिंदू, अभाविप, भगवे असे आहे ते ते मी फाडून टाकणार". यावर "का फाडणार?" असे विचारल्यावर "माझी मर्जी" असे त्याने उत्तर दिले होते. हे सर्व या चित्रफीतीत आहे. रोहीतची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु तो विद्यापीठात राहून अभाविप/हिंदू विरोधी राजकारणात सक्रीय असावा असे दिसते. विद्यार्थ्यांनी कोणत्याच राजकीय संघटनेच्या मागे न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे असे माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

चित्रफित कुठे आली? लिन्क द्यावी.
त्यानंतर अभाविप व ASA च्या विद्यार्थ्यांची मारामारी झाली होती.
मारामारी झाली का? मग अभाविपच्या एकाही विद्यार्थ्यावर का कारवाइ झाली नाही? ते अभाविपचे आहेत म्हनुन?
रोहीतची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु तो विद्यापीठात राहून अभाविप/हिंदू विरोधी राजकारणात सक्रीय असावा असे दिसते.
हे धन्दे बन्द करा हो. मी हिन्दु आहे. या अभाविप वाल्याना कोणी ठेका दिलाय हिन्दुन्चा? मी नाही. अभाविपला विरोध म्हनजे हिन्दु विरोध मानने हे डोक्यावर पडल्याचे लक्शन आहे. आनि काय हिन्दु विरोध होता हे विस्कटुन सान्गा जरा.

In reply to by खंडेराव

(१) चित्रफीत एनडीटीव्ही/आजतक/झी न्यूज यापैकी एका हिंदी वाहिनीवर संध्याकाळी ६:३० च्या सुमाराला दाखविली होती. त्याची लिंक मिळाल्यास देतो. (२) ही झटापट डॉक्युमेंटरी दाखविण्याच्या वेळी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंपैकी कोणावरही कारवाई झाली नव्हती. नंतर सुशीलकुमारने फेसबुकवर कॉमेंट टाकल्यावर रोहीत व इतरांनी त्याला त्याच्या खोलीत मारहाण केली असा आरोप आहे. (३) अभाविपवाल्यांनी कोणीच हिंदुंचा ठेका दिलेला नाही. त्यांना विरोध म्हणजे हिंदु विरोध असा अर्थ नाही. जे जे हिंदु, भगवे, अभाविपचे आहे ते ते मी फाडणार असे त्या चित्रफितीत रोहीतच म्हणताना दिसतो. त्यावर का असे विचारल्यावर माझी मर्जी असे तो उत्तर देतो.

In reply to by श्रीगुरुजी

स्त्रोत चुकिचे आहेत. १) मीही शोधतो. २) नाही. डॉक्युमेंटरी दिल्लीत दाखवली होती. ३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे
जे जे हिंदु, भगवे,
हे मानने कठीण आहे.

In reply to by खंडेराव

चित्रफीत मी ही पाहिली आहे. यूट्यूब वर ती तेलुगू मध्ये आहे. आज रात्री पर्यंत झी किंवा एबीपी ट्रान्स्लेटेड टेक्स्टसकट यूट्यूब वर अपलोड करतीलच. लगेच लिंक पाठवेन.

In reply to by खंडेराव

ही घ्या: https://www.youtube.com/watch?v=GkWtVVC6sm4 अर्थात एक गोष्ट ही लिंक पहाताना जाणवते. ती ही, की या माणसाला मनोविकारतज्ञाची आवश्यकता होती. जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता, तर अशी उत्तरे देणं हा कदाचित एका दुबळ्या आणि अस्वस्थ माणसाचा रिव्होल्ट चा प्रयत्न असावा. ही लिंक पहाताना त्याच्याबद्दल हिंदूंबद्दल असं बोलत असताना सुद्धा राग येण्याऐवजी वाईट वाटत राहतं.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड. १) झी न्युझ बद्दल प्रतिमा, ते भाजपच्या दावणीला बान्धलेली **** आहेत अशी होती, आणि ते लगेचच रोहित हा वेडा कसा आहे हे दाखवायला सक्रिय झाले असणार ( रात्री साहेबचा फोन आला असेल परवा) अशी अपेक्शा ही होती. २) हे घ्या भाषाण्तर..झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले. ३) टwo or three ABVP members (off camera) are confronting Rohith about why he tore down the ABVP banner (during campaigning for student elections, I'm assuming). Rohith says, "[inaudible phrases] could see. If Hindutva, or Hindus, or using the Hindu name, anyone coming onto minorities, or onto Dalits, if I see them, I will..." ABVP guys interject, "Hello. Why did you tear the banner? Why?" One of the ABVP guy says, "I'm a Dalit. You tell me, why did you tear the banner down?" Another ABVP guy says, "Did you tear the banner?" Rohith replies, "Yes, I tore it." The ABVP guy asks, "Why did you tear it?" Rohith replies, "I saw it. I tore it down. I saw ABVP I tore it down." Rohith continues, "I got angry, and tore it down." The ABVP guys say, "You tore it down because you saw us in its vicinity." Rohith replies, "It has nothing to do with you. I saw the saffron banner and tore it down." Rohith continues, "I saw the saffron color. I saw the Hindutva color. I saw the RSS color. I tore it down." The Dalit ABVP guy asks, "Tomorrow morning (during daily rituals), even in your house, it will have saffron colors. Will you tear it down too?" Rohith replies, "Yes, I will tear it down in my house." The Dalit ABVP guy continues, "Saris will be there (in saffron color), will you tear them?" Rohith replies, "In my house, I will tear them down." The Dalit ABVP guy reiterates, "(Saffron) saris will be there, will you tear them down?" Rohith replies, "Yes, yes. I will tear it down." The other ABVP guy says to the Dalit ABVP guy, "He says he'll tear it down. Why are we having this pointless conversation with him." Rohith interjects, "In my house, I'll tear them down." One ABVP guy to another, "Ok, Ok. Let him be." ABVP guy tells Rohith, "Whatever you didn't like, you tore it down. If we tear down what we don't like, not one (banner) will remain. Understand?" Rohith nods and replies, "Tear it down, tear it down." One ABVP guy to another, "Hey, don't tear (any banners)." Another ABVP guy continues with Rohith, "We don't have the need to tear them down. We put up our banners without making any inconvenient fuss." One ABVP guy to another, "This man doesn't have any common sense," referring to Rohith. The other ABVP guy says to Rohith, "Ok, so you, you said you'll see, right. Ok, fine. Go. We shall see." 4) आणि आता, अवान्तर -
" अर्थात एक गोष्ट ही लिंक पहाताना जाणवते. ती ही, की या माणसाला मनोविकारतज्ञाची आवश्यकता होती. जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता, तर अशी उत्तरे देणं हा कदाचित एका दुबळ्या आणि अस्वस्थ माणसाचा रिव्होल्ट चा प्रयत्न असावा. ही लिंक पहाताना त्याच्याबद्दल हिंदूंबद्दल असं बोलत असताना सुद्धा राग येण्याऐवजी वाईट वाटत राहतं"
इतके सगळे जाणवले तुम्हाला भाषा न येत असताना? तुम्ही तरुण आहात/ होता कधी, भडकपणे बोलला नाहित कधी? एका २५-२६ वर्षाच्या मुलाच्या, तुम्हाला न येणार्या भाषेत घडलेल्या सम्भाषणावरुन इतके ठोकताळे? याला चरित्र खन्डन म्हणतात. Call him mad, and then kill him. 5) अति, अति अवांतर .
जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता
खरच कौतुक आहे आपले. जर हा
अशा
समाजाचा भाग असेल, तर त्याने या समाजाला फाट्यावर मारण्यात काय चुकिचे? ६) सामान्य ज्ञान - हिन्दुत्वा आणि हिन्दु असणे या वेगळ्या गोष्टी आहेत.

In reply to by खंडेराव

विद्यार्थी दशेत मुळात राजकारणात पडणार असाल तर खुशाल पडा मात्र देशात राजकारण कसे होते कोणत्या पातळीवर केले जाते ह्याचा अनुभव आला कि दोन पर्याय असतात एकतर त्यातून निवृत्त होऊन सरळमार्गी जगा. नाहीतर राजकारणात आरपार घुसा , शासन व्यवस्थेला तोंड द्या मेघां पाटकर सारखी किती उदाहरणे आहेत अजूनही झुंझत आहेत . आमच्या परिचयाचे अनेक सुशिक्षित तरुण आभासी जगतात केजू चा झेंडा घेऊन मिरवत होते पण गेल्या वर्षभरात त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली त्यांची आभसी जगातील राजकीय वाटचाल काजव्यां सारखी चमकून थंड झाली हीच गात हजारे समर्थकांची झाली , तस्मात स्वतः शिका संघटीत व्हा समाजाला आपल्या परीने चांगले परत द्या आत्महत्या हा काही उपाय नाही. अभाविप च्या नेता सुशील ने काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

In reply to by खंडेराव

रोहितचा विद्यापिठातील प्रवेश हा मेरीट थ्रु होता, आरक्शणातुन नाही.

In reply to by खंडेराव

२) हे घ्या भाषाण्तर..झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले.
जरा नीट फॉर्मॅटिंग करून हेच भाषांतर खालील प्रमाणे - टwo or three ABVP members (off camera) are confronting Rohith about why he tore down the ABVP banner (during campaigning for student elections, I'm assuming). Rohith says, "[inaudible phrases] could see. If Hindutva, or Hindus, or using the Hindu name, anyone coming onto minorities, or onto Dalits, if I see them, I will..." ABVP guys interject, "Hello. Why did you tear the banner? Why?" One of the ABVP guy says, "I'm a Dalit. You tell me, why did you tear the banner down?" Another ABVP guy says, "Did you tear the banner?" Rohith replies, "Yes, I tore it." The ABVP guy asks, "Why did you tear it?" Rohith replies, "I saw it. I tore it down. I saw ABVP I tore it down." Rohith continues, "I got angry, and tore it down." The ABVP guys say, "You tore it down because you saw us in its vicinity." Rohith replies, "It has nothing to do with you. I saw the saffron banner and tore it down." Rohith continues, "I saw the saffron color. I saw the Hindutva color. I saw the RSS color. I tore it down." The Dalit ABVP guy asks, "Tomorrow morning (during daily rituals), even in your house, it will have saffron colors. Will you tear it down too?" Rohith replies, "Yes, I will tear it down in my house." The Dalit ABVP guy continues, "Saris will be there (in saffron color), will you tear them?" Rohith replies, "In my house, I will tear them down." The Dalit ABVP guy reiterates, "(Saffron) saris will be there, will you tear them down?" Rohith replies, "Yes, yes. I will tear it down." The other ABVP guy says to the Dalit ABVP guy, "He says he'll tear it down. Why are we having this pointless conversation with him." Rohith interjects, "In my house, I'll tear them down." One ABVP guy to another, "Ok, Ok. Let him be." ABVP guy tells Rohith, "Whatever you didn't like, you tore it down. If we tear down what we don't like, not one (banner) will remain. Understand?" Rohith nods and replies, "Tear it down, tear it down." One ABVP guy to another, "Hey, don't tear (any banners)." Another ABVP guy continues with Rohith, "We don't have the need to tear them down. We put up our banners without making any inconvenient fuss." One ABVP guy to another, "This man doesn't have any common sense," referring to Rohith. The other ABVP guy says to Rohith, "Ok, so you, you said you'll see, right. Ok, fine. Go. We shall see." वरील संभाषण नीट वाचले आणि झी-न्यूज ने दाखविलेले फूटेज पाहिले तर झी ने एकही महत्त्वाचा मुद्दा गाळल्याचे दिसत नाही. संपूर्ण संभाषणात असे दिसून येते की अभाविपचे कार्यकर्ते रोहीत ने पोस्टर्स का फाडली हे विचारत आहेत. त्यांनी संपूर्ण संभाषणात एकदा सुद्धा रोहीत बद्दल वावगे शब्द उच्चारल्याचे दिसत नाही किंवा त्याला धमकी दिल्याचे दिसत नाही. याउलट रोहीतच उर्मटासारखा उत्तरे देताना दिसतो. एकंदरीत रोहीतचा हिंदू, अभाविप, भगवा रंग, संघ इ. वर प्रचंड राग दिसतो. जे जे भगवे दिसेल ते ते मी फाडून टाकीन, घरातल्या भगव्या साड्यासुद्धा मी फाडून टाकीन ... अशा उत्तरामधून काहीशी मानसिक समस्या वाटते.

In reply to by खंडेराव

३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे
आता कसं. म्हणजे तुमचं मत हे पूर्वग्रहदूषित आहे हे तुम्हीच मान्य केलंत. आता तुमच्या मतांना गंभीरपणे कसं घ्यायचं ग्लिसरीन फॅक्टरी?

In reply to by बोका-ए-आझम

त्या चित्रफितित काय आहे ते लिहिलय मी, वाचता येत असेल तर वाचा जरा. झी वाल्यांनी त्यांना पाहिजे तेच लिहिलेय..पुर्न ट्रान्सस्क्रिप्त आहे माझ्या पोस्ट मधे..

In reply to by श्रीगुरुजी

याचा अर्थ होतो, तेलुगु शिका. लिन्क चे काय करणार तुम्ही? तुमच्याकडे आहे त्या लिन्क मधले पुर्ण संवाद एखादा तेलुगु मित्र बरोबर घेउन ऐका. झी ने आख्या ५० ओळीतले एक वाक्य टाकलेय. तेलुगु मित्र नसेल तर, తెలుగు తెలుసుకోండి

In reply to by खंडेराव

त्या चित्रफीतीतलं बोलणं आहे त्याप्रमाणे तुमचं english transcript आहे. मी व्हिडिओ बघून मगच लिहितो आहे. मग .झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले. -- काय गाळलं आहे? हेच सगळं त्या झी च्या युट्युब मध्ये आहे. मग काय सोयीने गाळलं आहे. आणि transcript मध्ये मी मला पाहिजे ते करणार - जिथे रंग दिसेल तिथे फाडणार याव्यतिरिक्त काय आहे. ज्या माध्यमांना भाजपाला आरोपी करायचं आहे ते सरळ निर्णय करून मोकळे झाले आहेत. ज्यांना भाजप बद्दल पूर्ण खात्री आहे आणि अभाविप ने गुंडगिरी केली असेल यावर ज्यांना विश्वासच ठेवायचा नाहीये ते रोहितला नालायक ठरवत आहेत. माझे दोन पैसे: ABVP काही १००% सरळ नाही हे सगळ्यांनाच माहित आहे आणि ASA ने पण बरेच उद्योग केले आहेत. पण मग या अर्धवट माहितीवर सगळेजण न्यायनिवाडा करून कसे मोकळे होतात? ज्यांना दलितांबद्दल आस्था किंवा victim feeling आहे ते ताबडतोब निष्कर्ष काढून मनुवादी, बामण इ. मध्ये शिरतात, किंवा संघद्वेषामध्ये. जे कट्टर अभाविप आहेत ते एक तरूण मुलगा जिवानिशी गेला याचा विचार करायच्या आधी तो कसा नालायक होता हे सिद्ध करायला पाहतात. २. दोन विद्यार्थी संघटनांच्या भांडणात एका मुलाने आत्महत्या केली हा संपूर्ण देशाच्या वादाचा विषय का होतो? बंडारू दत्तात्रेय सिकंदराबादचे खासदार आहेत. अभाविप वाल्यांनी तक्रारी केल्या की आमच्या मुलांना मारतात, याकुब साठी प्रार्थना करतात वगैरे. वेळेला हेच त्यांचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं. पण केंद्रीय मंत्र्यांनी दोन विद्यार्थी गटातल्या भांडणासाठी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना लिहिणं हे अतिच नाही का? त्यांनी विद्यापीठ कुलगुरुंना का नाही लिहिलं. त्यांचं भाजपामधलं वजन आणि पद यामुळे केंद्रातून पत्र गेलं. एकदा समजू शकतो, पण सहा महिन्यात पाच पत्रं का? आणि गेली तर विद्यापीठाने त्याला जे काही असेल ते उत्तर का कळवलं नाही? याची स्पष्ट माहिती नाही. ३. आता राजीनामा देणारे दलित प्राध्यापक मागचे दहा वर्ष आणि त्याहून महत्त्वाचं जो एक महिना ही पाच मुलं तंबूत राह्त होती तेव्हा काय करत होते. त्यांनी कुलगुरुंची भेट घेतली का/ पत्रं लिहिली का? कारण तेव्हा अन्याय होत होता. कोणाचा जीव जाईपर्यंत भारतात कुठलीही कृती का होत नाही? ४. सुशील कुमार अभाविप कार्यकर्ता हा मारहाणीमुळे रुग्णालयात गेलाच नव्हता असा अहवाल आला आहे. खरा खोटा माहित नाही. हा भयंकर प्रकार आहे. म्हणजे तक्रार खोटी होती ज्यासाठी या मुलांना सस्पेंड केले गेले. पण त्यांचे बॅनर फाडले, हॉस्टेल मध्ये येऊन ASA ने धमक्या दिल्या हे खरे आहे. आणि कशासाठी तर सुशील कुमारने बॅनर फाडणार्‍या मुलांना फेसबुक वर Goons म्हटलं - त्यावर भांडणं झाली. गुंड म्हटलं म्हणजे शिव्या दिल्या, अपशब्द वापरले वगैरे सोयीची माहिती बर्‍याच माध्यमांनी दिली. ५. रोहित वेमुला हा पीएचडी विद्यार्थी होता. म्हणजे किमान चांगली बुद्धिमत्ता, अभ्यास अपेक्षित आहे. तरी तो इतका वेळ फक्त संघटनेचंच काम करत का होता? त्याचं फेसबुक आणि ट्विटर धक्कादायक आहे. विवेकानंदांबद्दलचे उद्गार अशक्य आहेत. त्याचबरोबर तो २६/११ च्या मृतांबद्दल तळमळीने लिहित होता. दुसरीकडे - "तुम कितने याकुब मारोगे, हर घर से याकुब निकलेंगे" असंही लिहून मोर्चा काढत होता. एकूण confusion आहे. ५. काही वेळा असं वाटतं की दलितांना victimization मधून बाहेर यायची तीव्र इच्छाच नाहीये. पण त्याच बरोबर इतर जातीय आणि दलितांना कटाक्षाने टाळणारे / बाजूला करणारे कर्मठही कमी नाहीत. आणि मिळाली संधी की कर राजकारण याचा तर वैताग नाही संताप आला आहे. डेरेक ओब्रायन, केजरीवाल, राहुल गांधी यांची कृती ही गिधाड वृत्ती आहे. एकूणात काहीतरी खराब वातावरण होतं हे तर दिसतंच आहे. एकूण अनुभवातून निराशेपोटी त्याने आत्महत्या केली. त्याचा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा करणे वगैरे अती आहे. पण आता दोन्हीही वाईट घडून गेलं आहे तर त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. जातीय विद्वेष वाढवण्यापेक्षा दलितांना समान वागणूक कशी मिळेल याचा विचार व्हायला हवा. बामसेफी भयंकर द्वेषातून देशासाठी आणि समाजासाठी काहीही साध्य होत नाही.

In reply to by खंडेराव

३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे जे जे हिंदु, भगवे, हे मानने कठीण आहे.
तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. मला फरक पडत नाही.

In reply to by खंडेराव

1) आंध्रा मधे महाराष्ट्रपेक्षा जातीय दरी जास्त खोल आहे. विद्यापीठात अजूनही जास्त. गेल्या काही वर्षात 9 विद्यार्थांनी आत्महत्त्या केलीय या सगळ्यात.
आंध्रप्रदेशमध्ये १९४७ ते २०१६ या ६८ वर्षात सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हा योगायोग असावा काय? महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड जातीयवाद आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हाही योगायोग असावा काय?

In reply to by श्रीगुरुजी

तुमचा फारच विश्वास हो गुरु योगायोगांवर! एक शंका -तुमचा जन्म या ६८ वर्षांमधला का?

In reply to by खंडेराव

जातीयवाद हा मुख्य विषय आहे आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी यत्किंचितही प्रयत्न न करता तो जिवंत राहून वाढावा व त्यामुळे आपली राजकीय पोळी भाजून घेता येईल असे ज्यांनी गेल्या ६८ वर्षात केले त्यांचे नाव घेतले तर राग कशाला मानता?

राजकारण करु नका म्हणण्यामागे आम्ही तुमच्यावर उपकार करतोय, मिळतंय ते घेऊन मुकाट बसा असा अर्थ असतो. हा जो बेमुर्वतपणा इथेही दिसतोय तो कधीही जाणार नाही. ह्या लोकांना पिढ्यानपिढ्या अपमान सहन करणे, डोल्यावरुन मैला वाहणे, देवदासी म्हणून भोगदासी होणे, पारधी होऊन रानोमाळ भटकणे म्हणजे काय हे कधीही कळणार नाही. तेवढी त्यांची बौद्धिक कुवतच नाही. उच्चवर्णियांनी हजारो वर्षे छळ केलेला चालतो पण आता खालचा एखादा माणूस त्रासदायक झाला तर लगेच सरसकटीकरण करून पुन्हा गळचेपी करायला एका पायावर तयार. हेच लोक परत भारत सहिष्णु आहे म्हणून बोंबा मारायला पुढे. =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राजकारण कोणाही विद्यार्थ्याने करायला नको. अभाविपनेसुद्धा नाही. पण बर्‍याच लोकांचा सूर तसा नसतो. याकूब मेमनची बाजू घेणे पटत नसेल तरीही त्यांना तो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. तो हक्क दडपशाही करुन मारता कामा नये. वर कोल्हापूरच्या ऑनर-किलींगचा उल्लेख आला आहे. त्यात मारणारेही सवर्ण आणि मरणारेही सवर्ण. आपल्या जातीचा अभिमान बाळगणार्‍यांनाच त्याची झळ पोचायला लागली आहे. त्याचा ठपका इतरांवर ठेवून काहीही होणार नाही.