Skip to main content

रोहीत वेमुला

लेखक shvinayakruti यांनी सोमवार, 18/01/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली जाते, का ? तर दलित आहे म्हणून दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ? दलित आहेत म्हणून हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर तो आदिवासी आहे म्हणून म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला गेला असं म्हणता येणार नाही.

वाचने 25775
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

ननि, तुम्ही लोकशाहीचा हक्क म्हणता तर मग सोबत कर्तव्येही येणारंच. आत्महत्या करणे हे कुठल्या कर्तव्यात बसते? आ.न., -गा.पै.

In reply to by नगरीनिरंजन

विद्यार्थ्यांनी राजकारण करु नये असं म्हणून कसं चालेल हो? आमच्या 'बुद्दू' विद्यार्थ्याने काय करायचं मग?

In reply to by नगरीनिरंजन

राजकारण कोणाही विद्यार्थ्याने करायला नको. अभाविपनेसुद्धा नाही. पण बर्‍याच लोकांचा सूर तसा नसतो. याकूब मेमनची बाजू घेणे पटत नसेल तरीही त्यांना तो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. तो हक्क दडपशाही करुन मारता कामा नये.
शिक्षणसंस्था हे शिक्षण घेण्याचे, देण्याचे, संशोधनाचे स्थान आहे. ती राजकारण करण्याची जागा नाही. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संबंधित असे प्रश्न असतील तर त्यात विद्यार्थ्यांनी जरूर भाग घ्यावा. परंतु विद्यापीठाशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षणाशी अजिबात संबंध नसलेले विषय (उदा. याकूब मेममची फाशी, मुजफ्फरपूरची दंगल, महाराष्ट्रातील बीफबंदी) विद्यापीठात आणून आंदोलन सुरू केल्याव त्यावर विरोधी गटाकडून राजकीय उत्तर येणारच. एकदा राजकारण आले की अशांतता निर्माण होते व त्यात फक्त राजकारण्यांचा फायदा होऊन सर्वसामान्यांचा बळी जातो. या प्रकरणातही तसेच झालेले दिसते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आपल्याशी संबंधित नसलेले प्रश्न न आणता अभ्यासावर व संशोधनवार लक्ष केंद्रीत करावे व अभाविप सकट इतर कोणत्याही विद्यार्थी संघटनेला विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून इतर प्रश्नात लक्ष घालण्यास बंदी करावी असे माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही वर उल्लेखलेले प्रॉब्लम राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र ह्या विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या विषयांच्या केस स्टडी असतात असे वाटते त्यामुळे हे प्रॉब्लम बाहेर ठेऊन नुसते पुस्तकी शिक्षण घ्या म्हणणे तितकेसे पटले नाही.

In reply to by नगरीनिरंजन

यांच्य विरोधातला प्रत्येक जन देशद्रोही कसा होतो? कॉंग्रेस वाला कसा बनतो? रोहित देशद्रोही होता, हे दत्तात्रेय यांनी कसे ठरवले?

In reply to by खंडेराव

आता ह्याला उत्तर म्हणून कोणीतरी जुने प्रत्यय देणार की अमुक अमुक विद्यापीठात काँग्रेसच्या मंत्र्याने असे तसे केले होते अन ऑल, मुळात ते येड़े होते म्हणूनच ह्यांना निवडून दिले होते न जनतेने? शिवाय सोशल मीडिया प्रचार करुन निवडणुका जिंकायला म्हणून आवडतो इम्प्लीमेंट करता येतो तर ती दुधारी तलवार आहे हे कसे विसरता येईल, तुम्ही इकडे तिकडे इतकेसे केले तरी विरोधक रान उठवणार फेसबुक अन ट्विटर वर, तेव्हा हे सगळे मुळात करूच नये असे मनःपूर्वक वाटते मला.

In reply to by खंडेराव

दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत स्वताचे मत असण्याचे स्वातंत्र्य आहे , त्यांनी ते मत स्मृती इराणी ह्यांच्या खात्यात पत्र लिहून कळवले ह्यावर पुढे त्यांनी विद्यापीठात चौकशी केली अंतिम निर्णय कुलगुरू ह्याचा आहे ह्यात वावगे असे काहीच नाही आहे डाव्या विद्यार्थी संघटना बंगाल व केरळ मधील विद्यापीठात वर्चस्व हे राजकीय आशीर्वादाने इतकी वर्ष टिकवून आहेत आणि हैद्राबाद विद्यापीठात देशद्रोही व्यक्तीचा अड्डा हा आरोप दिल्ली विद्यापीठाबाबत सुद्धा झाला होता आता आरोप करण्याचा मक्ता फक्त केजू चा आहे का भाजपा नेत्यांनी करू नये का आणि भाजप नेत्यांनी नियमा विरुद्ध केले तर हाय कोर्टात हि केस आहे निर्णय लागेल

In reply to by निनाद मुक्काम …

वर ते मुघल एक, ज्यांना जळी स्थळी पाषाणी कोण्ग्रेस दिसते आणि तुम्हाला युगपुरुष! अवघड केलेय ना केजरीने :-) सविस्तर लिहितोच नंतर, पण, दत्तात्रेय यान्चे मत व्यक्त करणे नाहीये, त्याला प्रक्रियेत ढवळाढवळ म्हणतात. विद्यापिठाच्या कुलगुरुने या मुलांना सोडल्यावरही इराणी यांनी ४ स्मरणपत्रे पाठवली. देशद्रोही व्यक्तिंचा अड्दा? हे असले हवाबाज आरोप नका करु. तुमच्याच पोष्ट चा आधार घेतला तर,
आणि भाजप नेत्यांनी नियमा विरुद्ध केले तर हाय कोर्टात हि केस आहे निर्णय लागेल
काय निर्णय लागलाय एखाद्या केसचा का ही विद्यापिठे देशड्रोह्याचा अड्डा आहेत म्हनुण? मी खाली कुठेतरी लिहिलेय, हे सगळे सर्तिफिकेट वाटायलाच बसलेत, कोण देशद्रोही आणि कोण भक्त..समिकरण आहे का, भक्त्=देशभक्त, बाकी देशद्रोही?

अर्थात शीतल साठे प्रकरण अन आंबेडकर पेरियार प्रकरण उल्लेख पाहून धागा लेखकांचे विचार सुद्धा एकांगीच असल्याचे स्पष्ट दिसुन येते आहे इतके नोंदवतो

दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी . मग ते दलीत(हा शब्दही मला लिहावासा वाटत नाही.) असोत , सवर्ण असोत, की मुस्लिम असोत. आपण किती दिवस तेच तेच करणार आहोत? हा उच्च हा निच्च बास ना भाऊ ! कसला उच्च आणि कसला नीच सब बराबर सब बराबर !!

In reply to by DEADPOOL

साहेब, एकदा माझा प्रतिसाद पुन्हा वाचा ही विनंती . गुन्हेगार कुठल्याही जाती, धर्माचा , पंथाचा असो शिक्षा ही समान व्हायलाच पाहिजे . किंबहुना दोषी व्यक्तीचा जात , धर्म हा पाहण्यात काहीच अर्थ नाही. त्याहीपुढे जाऊन असे म्हणेल की जाती, धर्म (religion या अर्थाने धर्म ! धर्म, अर्थ , काम, मोक्ष मधील धर्म या अर्थाने नव्हे) या कंसेप्ट नामशेष व्हायला हव्यात . मग कदाचित जगात शांतता नांदेल.

Losers quit, champions go on.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्महत्या न केलेली तमाम माणसं शूर, धैर्यवान, विचारी वगैरे असतात... साभार फेसबुक

उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या मूर्खांनो, आरक्षण वगैरे मध्ये आणून, तुमची आरक्षणाबद्दलची चीड मांडून, तुम्ही फक्त विषय भरकटवताय. तुमची मतं ही वैचारिक तर दूरच, पण नुसतं आग टाकण्याचं काम करतायेत. तुमचा हेतू तोच असेल तर, मग बाकीच्यांनी तर अशांकडे दुर्लक्ष करायला हवं.

In reply to by जव्हेरगंज

दलित - आदिवासींचा विषय निघाला की , यांना त्यांचे आरक्षण दिसते . यावेळी दलितेरांना दलितांपेक्षा अधिक आरक्षण आहे हे मात्र दिसत नाही . आरक्षणाला इतके वर्ष विरोध करणारे आता आरक्षणासाठी रुसून बसले आहेत .

In reply to by जव्हेरगंज

आर्थिक आधारावर आरक्षण हे परमानेंट असेल, अन तेव्हा ते खऱ्या अर्थाने कुबड्या हे स्वरुप धारण करेल. तस्मात् बंद होण्याची विंडो एक शक्यता म्हणुन ओपन असलेली जातीअंतर्गत आरक्षण व्यवस्थाच उत्तम वाटते, तसेच एक बघा, कमी मार्क्स मधे प्रवेश ते पदोन्नती मिळायला सधन लोक सुद्धा आरक्षण मिळवयच्या मागे लागतात पण त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागते जे मिळवायला आजही भ्रष्टाचार होतो, आता विचार करा जर आरक्षण आर्थिक निकष लावुन दिले तर खोटे उत्पन्नाचे दाखले बनवायला म्हणुन किती भ्रष्टाचार होणार? (कारण थोड्या इन्वेस्टमेंट मधे मिळते आहे म्हणून कोणीच ती संधी सोडणार नाही), आज मुठभर सधन दलितांनी आरक्षण घेतले (क्रीमी लेयर चे ढीले इम्प्लीमेंटेशन) तर "होतकरु सीट्स जातात अगदी ओपनच्या सुद्धा अन केटेगरीच्या सुद्धा" हे आपण म्हणत असतो उद्या जर आरक्षण आर्थिक केले तर नाही टाटा बिरला तर गावातले समुच्च मारवाड़ी, गुजराती , मामलेदार, कारकुन, वकील, अभियंते प्रथम कामधंद्यातुन उत्पन्न कमी दाखवून दाखले काढून घेणारच, नुसत्या उत्पन्नच्या दाखल्याला इतकी डिमांड आली म्हणजे त्याच्यात टेबलाखालुन भाव वाढणार, म्हणजे एकुण ज्यांना खरेच कमी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे अन जे हुशार आहेत परत एकदा ते सोडुन सगळ्यांना एडमिशन मिळणार. झाले एक , दूसरे म्हणजे सहज प्राप्य असे काही दिसले की पुढे जायची इच्छा संपते हा जातीय आरक्षणावर एक पेटेंट आरोप असतो, जर ५०० रु देऊन मिळवलेल्या इनकम सर्टिफिकेट वर सहज एडमिशन मिळायला लागल्या अन हा वरचा आरोप खरा मानला तरी आर्थिक आरक्षण घेणार लोकांस सुद्धा तो लागु होईल अन कथित क्वालिटीचा ह्रास होणारच, कसे? ह्याऊपर आर्थिक निकष हे कॉन्स्टंट असणार आहेत कारण कितीही पैसा समाजात आला तरी सापेक्षतेनुसार कोणी एक गरीब राहील कोण कोणी श्रीमंत, अश्यात क्वालिटी परमानेंट डेमेज होईल अन तेव्हा झालेल्या अराजकाला कोणीच वाली नसेल, हे झाले तात्विक विचारावर , लोकशाही मधील प्रॅक्टिकल आस्पेक्ट चा विचार करता सद्धया अनारक्षित असलेले लोक हे एकुण भारतीय लोकसंख्येच्या 5-8% च्या मधे आहे अन त्यांच्यात राजकीय एकवाक्यता सुद्धा नाही तस्मात् आर्थिक आरक्षण ही मागणी रेटायची म्हणली तरी न अनारक्षित गटाकड़े पुरेसे संख्याबल आहे न राजकीय एकवाक्यता अन वर संगीतलेल्या लोकशाही मधील अनारक्षित जातींची टक्केवारी पाहता कुठल्याच राजकीय पक्षाला त्यात रस असण्याचे कारण ही नाही, जात आधारीत आरक्षण हे वाईट म्हणले तरी तुर्तास इट्स द बेस्ट अवेलेबल वाईट इन द सिस्टम!ह्यशिवाय पॉलिसी वाईट नसते तर त्याचे "इम्प्लीमेंटेशन" वाईट असते जातिनिहाय आरक्षण पॉलिसीचे इम्प्लीमेंटेशन नीट करता बरेच प्रॉब्लेम सुटू शकतात पण परत राजकीय इच्छाशक्ति इज द की!!! असे काहीसे माझे वैयक्तिक मत आहे :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खूपच मस्त मुद्देसूद प्रतिसाद. आता कुणी आर्थिक आरक्षण विषय काढला की त्यावर हे उत्तर असेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आरक्षण असावे पण या गोष्टीला कुठे तरी सीमा असावी. या बाबतीत असे करता येईल. ज्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ शिक्षण/नोकरी मिळवण्यासाठी घेतला आहे, त्याच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला (भाऊ/बहीण्/मुले) पुढे घेता येऊ नये. हळूहळू आरक्षणाचा विषय आपोआपच संपून जाईल.

In reply to by shvinayakruti

ओ नीट बोला जरा! तुम्हांला जर विरोधी मते पचत नसतील तर येथे येऊच नका! आणि ज्या व्यक्तींना तुम्ही मूर्ख म्हणालात त्यानी तुमच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त पाहिलेत मिपावर! आणि आता मीच म्हणतो तुमच्यासारख्या मूर्खाना मिपावर बंदीच आणायला हवी!

बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर तोल ठेवावा असे सुचवतो! अर्थात ही फ़क्त सूचना आहे एक , बाकी ज्याचात्याचा वकुब अन स्वभाव!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे, भाषेवरचा तोल गेल्याने चर्चेत फायद्या एवजी नुकसानच अधिक होत असावे. एखादा विषय खूप गरम असेल तर तोल जाणार्‍यांनी सहसा दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा असे माझे व्यक्तिगत मत असते - म्हणजे मी तसा तो घेत असतो. दुसर्‍या बाजूस अनावश्य्क वाचाळ विरताही दिसते आहे. काही अपवाद वगळता, आजच्या काळात जुन्या काळा एवढे जातीयवादी कुणीच नसेल. मतांतरे असतात कठोरतेने टिका करतानाही असभ्यता टाळली पाहिजे. ज्यांना रुची असेल त्यांना मिपावरील कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? हि धागा चर्चा अभ्यासता येईल.

Hyderabad Central Uuniversity – 18/01/2016 The propaganda machine is back. As mark Twain said - Before the truth comes out and wears the shoes, the false hood must have traveled across half of the world. This is the truth about the latest incidents in Hyderabad Central University. Some elements inimical to the Nationalistic school of thought and have ulterior agenda are using the name and banner of Ambedkar Students Association to malign the image of other organisations and black out any other version or school of thought. The main accused in serial Bombay blasts of 1993, Mr.YakubMenon was found guilty on several counts. The death sentence imposed upon him by the trial court was confirmed by the Supreme Court. After that he was hanged. Some persons under the banner of ASA had protested against this hanging. They are entitled to. This meeting was held in University campus with many new unknown faces participating in it. It was claimed that from every house another Yakub will emerge. “Tum KitneYakub Mar denge, HarGhar se YakubNikalege– ASA. UOH”. The English translation reads as follows: “How many Yakubs you kill! From every house one Yakub Will be generated”. This was on 3-8-2015 One Susheel Kumar ( office bearer of local unit of AkhilBharatiyaParishad, ABVP) protested at this. He put up his comment on face book commenting about the aggressive behavior. Does he have right to comment on this protest? Or Not? On the same day, at mid night 30 persons barged into hostel room of Susheel and dragged him out of the room. The police came and left. He was beaten in the presence of two constables. The ASA volunteers beat up susheel badly and dragged him to the main security gate. He was forced to open the face book account at the Security room and forced to write a note of apology. The Security officer was witness to all this and he counter signed on the note written by Susheel. He was rushed to Hospital , and he underwent treatment in hospital, operated upon etc., This was attack on one student by 30 persons. This is not denied by anyone. There was no scuffle or a fight. As usual, the police and the University administration colluded with the attackers. There were complaints and mother of Susheel was abused when she visited the campus in the presence of senior officers of the University. She went to court and sought a direction to the management of the university to check such incidents. The university had constituted a committee to go into all this. After full-fledged inquiry, it was recommended that five students be rusticated from the university. This means that the students will lose the academic career scholar ships etc., There was huge outcry that the Dalit students are being sent out of the campus. Violent protests and confinement of in charge VC Mr. Sharma took place. The implementation of the final decision was kept in abeyance. After the new Vice Chancellor took charge, the issue was pursued and the mild punishment of keeping these erring students out of Hostel alone was imposed. Their Monthly fellowships were not affected and they are allowed to pursue their studies. These students approached the High Court in December 2015 and the case is to come up for hearing on third week of January 2016. In meanwhile ASA students protested. The High Court is to reopen on 18-1-2016. On 17 January 2016 a research scholar and one among the five who were given punishment Mr. Rohit committed suicide. This is most unfortunate. The legal battle was on. Now the story is spread that the Dalit boy was targeted. The spin story which is doing rounds is that there was a clash on Muzafarpur riots and Rohit is punished. Muzafurpur issue is regarding communal incident between Muslims and Hindu Jats in that area. The issue here in University was hanging of YakubMenon. The issue was whether 30 persons can go to room of a student and beat him up for two to three hours. This was failure of police who left the scene and university administration. The dean of Students Welfare was told (prior to the attack) by ASA that they are going to Susheels room. Should he not take steps prevent further escalation. He was instrumental in attack on Susheel. It has nothing to do with DALIT boy etc., Why Dalit card is used to protect the image of YAKUB Menon? What has Ambedkar got to do with hanging of YakubMenon.Yakub was not a champion of dalits!! The usual demands of resignation of new VC , central ministers etc., is on. The university Administration and irresponsible local police will do lot of explanation. The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.

संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ? आपण शांततेने साध्या शब्दांच्या मदतीने हळु आवाजात बोलु शकतो असो.

In reply to by मारवा

आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.

In reply to by खंडेराव

लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. हा प्रकार कोण करतय ईथे ?

In reply to by मारवा

आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.

In reply to by खंडेराव

असे पूर्वीही झाले आहे शासन निर्णय घेते त्याला विरोध करणारे आत्महत्या सारखा मार्ग निवडतात त्यातून त्या मुद्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. मंडळ आयोगाच्या वेळी अश्याच एका तरुणाचा बळी गेला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

आता पुढच्या बातमीत काही राजकीय्+सामाजीक पोळी भाजण्याचे मूल्य नसल्याने आणि म्रुत व्यक्ती अगदीच गरीबाघरची असल्याने ना दांडी मिडीयाला त्याचे सोयरेसुतक नाही की सजग मिपाकरांना (आणि हो अपराधी लोकांबद्दल बोलल्लात तर खबरदार) हे आरोपी १०००% निर्दोष सुटतील याबाबत मी पक्की खात्री बाळगून आहे संबधीत बातमी मटा आणि पुढारी याबरोबरच सकाळमध्ये आली आहे
पेटवून दिलेल्या तरुणाचा ससून रुग्णालयात मृत्यू - - शनिवार, 16 जानेवारी 2016 - 03:45 AM IST Tags: crime, thief, burn, police, kasba peth, pune पुणे - चोरीच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावन धर्मा राठोड (वय 17, रा. करमाळा, सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. इब्राहिम मेहबूब शेख (वय 35, रा. 726, कसबा पेठ), जुबेर इकबाल तांबोळी (वय 29) आणि इमरान इकबाल तांबोळी (वय 30, दोघेही रा. फातिमानगर) या तिघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. सावन राठोड हा मूळचा करमाळा (जि. सोलापूर) येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील वीटभट्टीवर काम करतात. घरी भांडण झाल्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी तो रागाने पुण्यात आला होता. कचरा आणि भंगार जमा करून त्याची उपजीविका चालली होती. असेच काम करणाऱ्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली होती. पुण्यात कोणी नातेवाईक नसल्यामुळे पदपथ हेच त्याचे घर होते. बुधवारी दुपारी कसबा पेठेतील पवळे चौक ते फडके हौद चौकादरम्यान तो भंगार जमा करत असताना आरोपींनी चोरीच्या संशयावरून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल पाजून काही पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले. सुमारे 70 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक भाजल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.
सकाळ दि १६ जानेवारी २०१६

In reply to by खंडेराव

हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. रोचक आहे. एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.

In reply to by मोदक

मोदक दादा, अहो कोल्हापुर मधे belligerent parties ह्या दोन्ही सवर्ण होत्या की हो! जातीच्या फुकट अन वृथा अभिमानातून घडलेली ती घटना आहे खाप पंचायत टाइप हॉरर किलिंगची, त्याच्यात दलित-सवर्ण किवा वाईस वर्सा एंगल कुठे आहे? बरं तुम्ही म्हणता तशी एक केस अमरावती मधे काही वर्षं मागे झाली होती, ज्यात एका दलित मुलाने कुळकर्णी मुलीला एकतर्फी प्रेमातुन घरात शिरून खलास केले होते, अन माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा पुर्ण सहानुभूति (मीडिया कोर्ट प्रशासन) ही पीड़ित कुळकर्णी च्या बाजुने होती. मग कसे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब हा हिशेब चुकला पहा. उद्या अगदी एखाद्या उच्च कुळातील राजघराण्यातील मुलाने अगदी गरीब मुसलमान मुलीला जर एकतर्फी प्रेमातून जीवे मारले तर अगदी कट्टर हिंदुत्व्वादिसुद्धा त्या मुलीची बाजुच घेतील. येथे कुणीही कुणाला मारले नसून आत्महत्या आहे आणि तिला दलित विरुद्ध उच्च असा राजकीय रंग मुद्दाम भरला जात आहे.

In reply to by सुबोध खरे

बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे कोल्हापुर केस बद्दल म्हणत होते मी त्याच्यावर बोललो, प्रॉपर हुकला का पॉइंट माझा?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे बापू तुमचे.. मला इतकेच म्हणायचे आहे की खंडेनाना विसंगती विसंगती म्हणताना स्वत: एखादी विसंगती दाखवायचे विसरले काय?

The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.
+ १

अत्यंत तोकड्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे लिहिलेला लेख . रोहित वेमुला चा इतिहास बघता त्याच्या आत्महत्येच निव्वळ राजकारण केलं जात आहे . याकुब मेनन च्या फाशीला विरोध करणारा , अभाविप च्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात सामील झालेला असल्यामुळे त्याला होस्टेल मधून निलंबित करण्यात आले होते . त्याने त्याची वर्तणूक सुधारण्या ऐवजी आत्महत्या केली . आता आत्महत्या कोणत्याही जातीचा , कोणत्याही धर्माचा माणूस करू शकतो . पण त्याचं दलित असणं हे काही फेक्युलर लोकांनी उचलून धरलं. लेखामध्ये गोमांस खाल्याचा संशयावरून मारण्याचा उल्लेख केलाय पण ब्याटरी चोरण्याच्या संशयावरून पेट्रोल पाजून पेटवून दिल्याच्या , मालदा घटनेचा , टिपू सुलतानच्या जयंती वादात 'शांतताप्रिय' धर्मियांनी ३ हिंदूंना मारल्याचा उल्लेख नाहीये . प्रसारमाध्यमे अश्या गोष्टींना महत्व देत नाहीत कारण त्यावरून राजकारण करता येत नाही ना.

विरोधी पक्षांनी राजकारण करावयाचे आणि परिस्थीतीनुसार सत्ताधारींनी राजकीय बचाव करावयाचा या चाकोरी पलिकडे राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक कितपत जाऊ शकतील याची सांशकताच वाटते. दलितांना राजकीय दृष्ट्या सामिलकरून घेण्यासाठी सारेच पक्ष धडपडताना दिसतात, पण सामाजिक स्तरवरील अभिसरणाच्या बाबतीतल राजकीय नेते फारसे कृतीशील दिसत नाहीत. -नाही म्हणावयास, उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापिठातील प्रस्तुत घटने बाबत अगदी संसदीय समिती मार्फत चौकशी पर्यंत सोपस्कार होऊ शकतील- वस्तुतः आरक्षणावरूनची मनातली अढी दलितांना सर्वांसोबत सहभागी करून घेण्याच्या आड येणार नाही ह्या दृष्टीने आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करणे, हि राजकीय नेत्यांची नैतीक जबाबदारी असावी पण राजकीय नेते हि जबाबदारी निभावताना दिसत नाही. आंदोलनांना रचनात्मक दिशा देऊ शकेल असे दलितांमधूनही राष्ट्रीय स्तरावरील स्विकार्य आणि जबाबदार नेतृत्व आकार घेताना दिसत नाही. आंध्र आणि तेलंगाणातील द्लित विद्यार्थी चळवळी - सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद विद्यापीठाची धरून- ह्या मुख्यत्वे डाव्या कम्यूनीस्ट पक्षांच्या विद्यार्थी चळवळींशी संलग्न आहेत आणि बाकी भारतातील दलित चळवळीतील नेत्यांचा त्यांच्यावर सरळ प्रभाव कमी असेल असे गृहीत धरले तरीही, राजकारणात एखादी अडचणीची जागा असते तेथे संवादाची मागचे दरवाजे उघडे असावे लागतात हैदराबाद विद्यापीठ प्रसंगाबाबत भाजपाचे राजकारणी या बाबत असे प्रयत्न न करून अयशस्वी झाले का? हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी चळवळी सोबत होत असलेल्या संघर्षाने भाजपाचे मान्यवर नेते अस्वस्थ झाले असतील त्यांनी मंत्रालयामार्फत अधिकृत कागदी घोडे नाचवले, मंत्रालयातील बाबूलोकांनी विद्यापीठातील बाबू लोकांनीही कागदी घोडे नाचवून आपापली कर्तव्ये पारपाडली हे ठिक परंतु राजकीय प्रश्नांची सोडवणूक राजकीय पद्धतीने करण्यासाठी काही -परोक्ष-अपरोक्ष- राजकीय संवादाचे प्रयत्न करून पहाण्यात भाजपाचे आंध्र आणि तेलंगाणातील मान्यवर नेते कमी पडले का ? तळे राखी तो पाणि चाखी हे समजता येते, सत्ता बदलल्या नंतर सर्व ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार लावणार हे समजता येते. पण काही जागा संवेदनशील असतात, बाकी भारतास हैदराबाद विद्यापीठातील जातीय संघर्षांचा इतिहास माहित नसेल म्हणजे त्यांच्या आंध्र आणि तेलंगाणातील नेत्यांना माहित नसेल असे नसावे; त्यांच्या नेत्यांना जर स्थानिक माहिती असेल तर दलित विद्यार्थ्यांशी संघर्षाची जुनी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती (भले मग त्यांची समजा जुन्या घटनांमध्ये चुक नसेलही) उपकुलगुरू म्हणून कशी काय निवडली जाऊ शकते ? उपकुलगुरू म्हणून संवेदनशील ठिकाणी नेमण्याकरता तुमच्या कडे तुमच्या गटाची दुसरी एकही व्यक्ती नसते का ?

प्रकाटाआ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाय पटले बुआ कप्तान साहेब! अजिबात नाही पटले! असो! आता काय बोलणार... एका फोटोवर "स्कॉलरशिप"वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांस हीनपणे जोखणे वाटले मला होनेस्टली अधिक उणे माफ़ी पण अजिबातच आवडले नाही

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्यंत आभारी आहे कप्तान साहेब! तुम्हास विचार करता येतो ह्या विश्वासाने खुल्यामनाने बोललो होतो, तुम्ही आमच्या मैत्रीचा मान राखलात आनंद वाटला ____/\_____

१) अनुपमा राव, सिनियर वैद्यकिय अधिकारी - सुशील ला मारहाण झाल्याचे मी जेव्हा त्याला तपासले तेव्हा वाटले नाही. तारिख - ८ ओगस्त २) डो. चेन्ना रेड्डी, अर्चना हॉस्पिटल जिथे सुशील दाखल होता - USG abdomen taken on August 7 show acute appendicitis. PAC and surgical profile done, patient taken up for surgery. Diagnostic Lap and Appendectomy done under GA on August 7. Patient improved well and discharged with stable vitals - ३) डिएसओ दिलिप सिन्ग - सेक्युरिटि अधिकारी- मी असा च्या विद्यारथ्यांना सुशिल ला मारताना बघितले नाही. मी पोहोचलो तेव्हा ते ( सुशील आणि असा ) बोलत होते. सुशीलला अपेन्दिक्स होता, आनि त्याने त्याचे ओपरेशन करुन असा वाल्या विद्यर्थ्यांना अडकवण्यासाठी हा उद्योग केला. हे झाल्यानंतर, रोहित आणि सुशिल यांना, डो. राव आणि सिन्ग यान्च्या साक्षि ग्राह्य धरुन, समज देउन सोडण्यात आले. नंतर, HRD आणि दत्तत्रया बान्देरु यान्च्या दबावामुळे ५ जनांचे निलंबन झाले. अधिक माहितीसाठी - http://indianexpress.com/article/india/india-news-india/hyderabad-stude…

ही अजून एक नवीन धक्कादायक माहिती - Former chairman of the University Grants Commission (UGC) and chairman of Indian Council of Social Science Research (ICSSR) Professor Sukhadeo Thorat said that the issue should be looked in a wider context. "In Hyderabad University, there were two suicides, one was in 2008 and now in 2016. But in Hyderabad city itself there were nine suicides. If we come to northern India, then two suicides were reported in AIIMS, 14 suicides reported from Lucknow, Kanpur, Roorkee and Chandigarh. The issue is why is that the proportion of suicide much higher among the Dalits. The 23 cases that I mentioned, one is Muslim and one tribal and rest of them were Dalits. It means there are problems as far as the stay of Dalits in universities is concerned," Thorat said. गेल्या काही वर्षात निरनिराळ्या विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली हे आजच समजले. बरोबर आहे. तेव्हा केंद्रात व राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार असल्याने या आत्महत्या देखील धर्मनिरपेक्ष समजल्या गेल्या असाव्यात.

In reply to by श्रीगुरुजी

यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात . मेरी कमीज उस्से सफेद है ! जिथे राजकीय कारणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्या त्या सगळ्या कॉंग्रेसशासित , सप शासित , आप शासित राज्यांचा , मंत्र्यांचा निषेध !! आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ? २. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?

In reply to by कपिलमुनी

सगळ निट बाहेर येतेय, कि कसा सुशिल आणि बान्देरु यांनी बनाव केला असा वाल्यांना अडकवण्यासाठी, तर हे आता भुत़काळात पोहोचायला लागलेत. यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
चार लाडु खाल्यानंतर
लाडु चवदार होते. त्यांनी तब्येत सुधारली पाकिस्तान घाबरले. इत्यादि इत्यादि

In reply to by खंडेराव

तेवढे तुम्ही महत्वाचे नाही आणि तुमची मतं वाचल्यावर तर तुम्हाला महत्व देण्याची गरज नाही हेही समजतंच आहे. काॅग्रेसने आधी जे केलं ते तर दाखवावंच लागेल, कारण जर ते चुकीचं असेल आणि त्यामुळे काँग्रेसवाले करुन सवरुन नामानिराळे राहात असतील तर भाजपवाल्यांना एक न्याय आणि काँग्रेसवाल्यांना दुसरा असं म्हणायचंय का तुम्हाला?
यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
असली लाचारी हे काँग्रेसी लांगुलचालक करतात. इथे मिपावरही त्यांची कमी नाहीच आहे. तुम्ही त्यातले नसाल असा अंदाज आहे, पण तो खोटा ठरला तर आश्चर्य वाटणार नाही. मुळात रोहितने आत्महत्या ही बंडारू दत्तात्रेय यांच्या पत्रामुळे झालेल्या तथाकथित कारवाईमुळे केली हे कोर्टात सिद्ध करुन दाखवणं आणि इथे त्यावरून गळा काढणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यावरून तुम्हाला मिपावरील रुदाली असा किताब का देण्यात येऊ नये?

In reply to by कपिलमुनी

यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात .
हे मी दिलेले नाही. एका आधीच्या वेगळ्या सदस्याने दिलेल्या प्रतिसादातील हा परिच्छेद आहे.
आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ?
मुळात या आत्महत्येच्या बातम्यांना इतके दिवस प्रसिद्धीच देण्यात आली नव्हती. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येनंतर हे प्रसिद्ध झाले आहे. एकंदरीत या आत्महत्यांच्या बातम्या दडपून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यामागे जी काय कारणे असतील ती यापुढे बाहेर येतील.
२. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?
कशासाठी?

केंद्रातील सरकारला स्वत:लाच उर्वरीत राज्यातील निवडणूका जिंकत जाणे आणि राज्यसभेतील सध्याची कमकुवतस्थिती हि मोठी आव्हाने आहेत की ज्यामुळे मोदीसरकारकडून एकीकडून स्वपक्षीयांचा बचाव केला जातानाच दुसरीकडून -स्वतःच्या सरकारची प्रतिमा पॉलीटीकली करेक्ट ठेवण्यासाठी- संसदीय समित्या आणि इतर वरीष्ठ स्तरीय चौकशांचे सोपस्कार पार पाडण्याची तारेवरची कसरत करावी लागेल. या चौकशी समित्यांपुढे कोणत्या गोष्टी येऊ शकतील १) ज्या सुशिलकुमारांना दुखापत केली गेल्याचे आक्षेप आहेत ते आक्षेप तपासले जाऊ शकतील २) मानवसंसाधन मंत्रालयातील बाबू लोकांनी नाचवलेले कागदी घोडे खरेच सुविहित प्रक्रीयेचा भाग होते का हे तपासले जाऊ शकेल ३) हैदराबाद विद्यापिठाची निर्णय घेणार्‍या काऊंसील सदस्य ज्यांना ऑदरवाई़ज गोपनियतेच्या आड रहाता येते त्यांच्या भूमिका तपासून योग्यायोग्यतेची खात्री केली जाऊ शकेल. ४) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास झालेल्या विलंबाची कारणे; पण यातील निसटणारी बाजू म्हणजे विद्यार्थ्यांच हॉस्टेलमधून निलंबन ऐन हिवाळ्यात केले गेले, आणि ऐन थंडीत बाहेर टेंट टाकून झोपण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, आणि निलंबीत केलेल्या विद्यार्थ्यांशी समोरून कडकपणाचा आव आणला तरी दुसरा पाठीवर ठेवणारा हात हवा, हा हात देण्यात विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व दोन्हीही आपापल्या परीने कमी पडले नाही का ? हे कोणत्याही चौकशी अहवालातून पुढे येणे अवघड असेल याच्यासाठी माणसात माणूसकीचा धर्म शिल्लक असावा लागतो. हजारे सारख्या गांधीवाद्यांचा एक गुण असा की आंदोलन केव्हा थांबवायच याचा अंदाज यावा लागतो अथवा महाराष्ट्रातील दलित चळवळीप्रमाणे अधिकतम किती ताणता येईल याचा तरी अंदाज नेतृत्वास हवा. मला मुंबईच्या गिरणीकामगारांचा संप आठवतो, कुठे थांबायच आणि जनतेची सहानुभूती कशी जपायची हे माहित नसणे, हा योगायोग आहे का की डाव्या चळवळींची सर्वसाधारण शोकांतीका असते ? हि सर्व चौकशी जेव्हा व्हावयाची तेव्हा होईल ती पूर्ण होऊन कुणी चांगला अहवाल तयार करून काही रचनात्मक सूचना केल्यातरी विवाद्य भागाचे चर्वितचर्वण आणि घ्यावयाच्या रचनात्मक स्टेप्सकडे दुर्लक्ष असे न होण्यासाठी भारतासारख्या देशात नशिबच चांगले असावे लागते. गमतीचा भाग असा कि चौकशी अहवाल कसेही आले तरीही दुखवलेल्या जनतेचा विश्वास बसू नये एवढे राजकारण लगोलग केले गेले आहे. हैदराबाद-तेलंगणाच्या भाजपा नेत्यांनी मानवसंसाधन मंत्र्यांना दिलेली आणि मानव संसाधन मंत्र्यांनी विद्यापिठाला दिलेली सर्वच पत्रे मी वाचलेली नाहीत पण प्रथम दर्शनी कायदेशीरदृष्ट्या त्या पत्रांमध्ये काही वावगे नसावे, परंतु तेलंगणाच्या पोलीस, मिडीया सर्वांनी असा भ्रम निर्माण करून ठेवला आहे की हि दोन तीन मंडळी अगदी केवळ त्या पत्रांच्या भरोशावर कायदेशीर दृष्ट्याही बहुधा दोषी असावीत, आणि बहुधा अशी आरोपबाजी सहजपणे चौकशी आयोगांसमोर आणि न्यायालयासमोर टिकणे कठीण असू शकेल. त्यामुळे चौकशी अहवाल काही आले तरीही दुखावलेले लोकांना विश्वास ठेवणे कठीण जाईल हे चित्र आजच दिसते आहे. रोहीतची बातमी आली तेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी अद्वातद्वा आरोपबाजीत मश्गुल होती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री जे स्वत: कायद्याचे अभ्यासक आहेत ते शॉपींगकरण्यात व्यस्त होते ह्या टाईम्स ऑफ इंडीया बातमीचे आजीबात नवल वाटले नाही. दुखावलेल्या विद्यार्थ्यांनी काही राजकारण्यांना त्यांच्या कंप्लेटमध्ये आरोप लावणे आणि विद्यार्थ्यांचा राग शांत व्हावा म्हणून पोलीसांनी अशी कंप्लेंट नोंदवून घेणे -मग राजकारण्यांचे राजकारण- हा क्रम समजून घेता येतो परंतु या सर्वातून निसटणारी बाजू म्हणजे स्थानिक पोलीसांनी रोहीतच्या मृत्यूच्या इतर सर्व शक्यता तपासून पहाण्याचे कर्तव्य कितपत चोखपणे बजावले ह्याची बातम्यांमधून माहिती मिळतच नाही उलटपक्षी शंकाच अधिक वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे समाज घटकांचे एक्मेका प्रति विश्वास संपादन, अभिसरण आणि समरसता हे उद्दीष्ट बाजूस राहून नित्या प्रमाणे राजकारणाचीच शक्यता अधिक; जी बाजू निसटावयास नको ती नेमकी निसटत राहते.