आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे.
कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता. जर दोन स्वरातलं अंतर वाढलं तर ऑडिबिलीटी आणि क्लॅरिटी वाढते पण मेलडी बिघडते. दोन स्वरातलं अंतर कमी झालं तर मेलडी वाढू शकते पण क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी कमी होते. त्यामुळे स्वरसंयोजनात पहिल्या स्वरानंतर नेमका दुसरा स्वर कोणता घ्यावा आणि मग त्यापुढचा कोणता घ्यावा...अशा सांगितिक चिंतनातून संपूर्ण गाणं तयार होतं.
सगळं गाणं म्हणजे क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन पैलूंवर काम करत निर्माण झालेली एक धून असते. या धूनेवर मग शब्द आणि वाद्य यांची गुंफण होऊन आपण ऐकतो ते गाणं तयार होतं.
ओपींची खासियत म्हणजे त्यांची शब्दांवरची हुकूमत. एखादी सुरेख धून बांधल्यावर ओपी लिरीस्टला घेऊन एकेक शब्द तोलायचे, त्यामुळे ओपींची गाणी हृदयाला स्पर्शून जातात. ओपीचं गाणं लागलं की नकळतपणे आपलं लक्ष गाण्याकडे वेधलं जातंच.
आप यूं ही अगर हमसे मिलते रहे... असं नुसतं रफीनी म्हणायचा आवकाश की आपण गाण्याकडे ओढले जातो. आशानी, बलमा खुली हवामें...म्हटलं की आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आल्यासारखं वाटतं. ओपींच्या गाण्यांची कडवी म्हणजे एकेसोएक शेर असल्यासारखी आहेत. त्यामुळे ओपीचं संगीत म्हणजे साध्या सोप्या शायरीलाच जणू स्वरसाज चढवलेला आहे.
इंटरल्यूड (म्हणजे गाण्यामधल्या म्युझिकसाठी) वाद्य निवडण्याचं ओपींचं कौशल्य हा तर क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन्ही पैलूंचा अप्रतिम आविष्कार आहे. मग ती बहुत शुक्रीया बडी मेहेरबानी मधली हार्मोनीयम असो, दिवाना हुवा बादल मधली सतार असो की एक परदेसी मेरा दिल ले गया मधली बीन असो; ओपींचं वाद्य निवडण्याचं कौशल्य अद्वितीय होतं.
ओपींचा रिदमसेन्स हा तितकाच कौतुकाचा विषय आहे. माझ्या मते ओपींनी अत्यंत साधे, पण एकदम उठावदार रिदमस वापरले. साध्या रिदमची खासियत अशीये की तो ऐकणार्याच्या हृदय-लयीशी समरुप होतो त्यामुळे ऐकणार्याला ते गाणं आपल्यालाही सहज गाता येईल असं वाटतं.
उस्ताद आमीर खां हे ओपींचे खास दोस्त, एकदा त्यांच्यावर नाराज झाले. ओपींना त्यांच्या नाराजगीचं कारण कळेना तेंव्हा ते आमीर खांना भेटायला गेले. उस्तादजी म्हणाले की तू शास्त्रीय संगीत शिकलायंस हे इतके दिवस माझ्यापासून लपवून का ठेवलंस? त्यावर ओपी म्हणाले, मला माझ्या गाण्यांची शपथ, मी खरंच शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. पण तुम्हाला असं का वाटतंय? त्यावर खांसाहेब म्हणाले की शात्रीय संगीत शिकल्याशिवाय असं गाणं करता येणंच शक्य नाही. ओपींंनी विचारलं कोणत्या गाण्याबद्दल म्हणतायं तुम्ही? तर खांसाहेब म्हणाले तुझं हे गाणं, देखो बिजली डोले बीन बादल की!
मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है.
आशा पारेखनी ओपींच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारलं होतं की `आखिर आपकी दिलकश मौसिकी का राज क्या है?' त्यावर ओपी हसून म्हणाले "बस एक ही चिज है, रोमान्स! मेरे गाने जबभी आप सुनेंगे तो आपका दिलभी उसी मोहोब्बतके रंगमे रंग जाएगा".
वाचने
14198
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत, अजुन इतरही बर्याच
धन्यवाद!
In reply to सहमत, अजुन इतरही बर्याच by जयन्त बा शिम्पि
सिंथेसयझर
In reply to धन्यवाद! by विवेक ठाकूर
मी फार वेगळ्या प्रकारानं शिकलो!
In reply to सिंथेसयझर by अभिजितमोहोळकर
ओह!
In reply to मी फार वेगळ्या प्रकारानं शिकलो! by विवेक ठाकूर
लेख सुरु होता होताच संपला.
क्या बात है संक्षी...!!
छानच लिहीलंय
अतिशय सुंदर लेख संक्षी
अतिशय सुरेख लेख! अजून वाचायला
ओंकारप्रसाद नय्यर द ग्रेट!
छान.
छान.
भक्ती
संक्षी :?
चौरा,
In reply to संक्षी :? by चौकटराजा
देखो बिजली डोले बीन बादल की!
लता मंगेशकरसारख्या
सुगमसंगितात गाणार्याचे
In reply to लता मंगेशकरसारख्या by प्रसाद१९७१
असहमत. असे असते तर गाणी
In reply to सुगमसंगितात गाणार्याचे by मराठी_माणूस
असहमत.
In reply to लता मंगेशकरसारख्या by प्रसाद१९७१
उत्तम लेख.
गाण्यात नेहेमीचा त्रिताल आहे
जर गायकांचे काँट्रीब्युशन बर्
In reply to गाण्यात नेहेमीचा त्रिताल आहे by विवेक ठाकूर
मदन मोहन ने जेंव्हा लताबाई
In reply to जर गायकांचे काँट्रीब्युशन बर् by प्रसाद१९७१
त्यांची मर्जी. आणि लताबाई
In reply to मदन मोहन ने जेंव्हा लताबाई by मराठी_माणूस
ओरिजिनल गाणं स्वतःच्या आवाजात गाणं,
In reply to त्यांची मर्जी. आणि लताबाई by प्रसाद१९७१
ओपी ने काही काळ , काही
In reply to ओरिजिनल गाणं स्वतःच्या आवाजात गाणं, by विवेक ठाकूर
खरी बात अशी
In reply to गाण्यात नेहेमीचा त्रिताल आहे by विवेक ठाकूर
माझ्याकडे आशा पारेखनी ओपींची घेतलेली मुलाखत आहे
In reply to खरी बात अशी by चौकटराजा
विवेक ठाकुर जी
इंपॉसिबल वगैरे काही नाही..
श्रेय गीतकाराना आहे ?,
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
अर्थात याचा अर्थ हे सर्व जण केवळ वादक या लायकीचे होते काय ? तर य
In reply to श्रेय गीतकाराना आहे ?, by चौकटराजा
फरक
In reply to अर्थात याचा अर्थ हे सर्व जण केवळ वादक या लायकीचे होते काय ? तर य by नया है वह
नया, तुम्ही दिलेली गाणी पाहा :
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
नक्कीच मेलोडियस गाणी आहेत!
In reply to नया, तुम्ही दिलेली गाणी पाहा : by विवेक ठाकूर
एखादी धुन बांधणं म्हणजे मेलोडीची गुंफण असते
In reply to नक्कीच मेलोडियस गाणी आहेत! by नया है वह
मला एकदम आधी Perhaps perhaps
In reply to इंपॉसिबल वगैरे काही नाही.. by नया है वह
अतिशय सुरेख लेख! बेहद्द आवडला
छान आहे लेख.आवडला.ओपीची गाणी
दिवाना हुवा बादल !
वॉव. मला संगीतातले जास्त काही
छान...अजून लिहायला हवे होते.
लेख आवडला.
लेख संपलाय कुठे ?
In reply to लेख आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके.
In reply to लेख संपलाय कुठे ? by विवेक ठाकूर
+
In reply to ओके. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ये मेरे हाथमे तेरा हाथ, नये जजबात, तो फिर क्या बात
मारवाश्री, तुमची फरमाईश पूर्ण केली आहे
आपली किंचित भर
या क्लिपची ऑडिओ क्वालिटी जास्त चांगली आहे
या गाण्यातून तीन गोष्टी क्लिअर होतील
In reply to या क्लिपची ऑडिओ क्वालिटी जास्त चांगली आहे by विवेक ठाकूर
दोन स्पेशालिटी
In reply to या गाण्यातून तीन गोष्टी क्लिअर होतील by विवेक ठाकूर
सं क्षी?? ते तुम्हीच का?
संगीत, आवाज आणि गीत : ओपी साहेबांचे मत ऐक
नय्यरांची काम करण्याची पद्धत
या क्लिपबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to नय्यरांची काम करण्याची पद्धत by अभिजितमोहोळकर
अजून गाणी आणि त्यावर विष्लेषण येउ दे
मस्त धागा....
मुवि
शम्मीच्या करीयरला तारले ते...
In reply to मुवि by होबासराव
इशारो इशारोंमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहांसे ?
सॉरी!
In reply to इशारो इशारोंमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहांसे ? by विवेक ठाकूर
ह्या गाण्यातील अजुन एक
In reply to इशारो इशारोंमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहांसे ? by विवेक ठाकूर
येस !
In reply to ह्या गाण्यातील अजुन एक by मराठी_माणूस
काही कहाण्या
बहुतेक "साधना"
In reply to काही कहाण्या by हुप्प्या
नया दौरच
In reply to बहुतेक "साधना" by चौकटराजा
नया दौर च्या नंतरची कथा
In reply to नया दौरच by प्रदीप
आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया!
फार आवडते गीत
In reply to आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया! by विवेक ठाकूर
अगदी सुंदर गाणे.
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
खरंच मनात रुंजी घालतंय हे
In reply to फार आवडते गीत by चौकटराजा
मस्ती चॅनेल
बलमा खुली हवा में, महकी हुई फिजा में