Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/15/2014 - 14:39
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे. उजवीबाजू कमालीची विस्तृत आणि मोकळी आहे, ती एक्स्प्रेसवेच्या बाजूला ओपन होते. तुमच्या टेबलच्या मधोमध एक शेगडी असते आणि त्यावर (वेज किंवा नॉन-वेज) असे स्टीलच्या शीगेला लावलेले (पण रेडी टू इट) स्टार्टस, तुमच्या पसंती प्रमाणे सर्व केले जातात : . त्यांचा तुम्ही शेगडीच्या मंद आचेवर हवा तितका वेळ आणि हवे तसे भाजून, टेबलवर असलेल्या अनेकविध सॉसेनं स्वतःच्या प्लेटमधे गार्निशिंग करत, आस्वाद घेत राहायचं. वेळ, सप्लाय आणि पसंती अमर्याद! कारण या बार्बेक्यूजना तिथे स्टार्टर्स म्हणतात! म्हणजे मुख्य थ्री-कोर्स जेवणापूर्वीची (सूप, मेन कोर्स, डेजर्ट्स) ती सुरुवात आहे. अर्थात, आपल्या दृष्टीनं ते स्टार्टर्सच इतके अफलातून असतात की त्यानंतरच्या जेवणाची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जेवणाचा मेन्यू तुमच्या टेबलावर एका प्लास्टीक प्लॅकमधे इतका सहजपणे ठेवलेला असतो की बार्बेक्यू स्टार्टर्सचा आस्वाद घेतांना त्याच्याकडे पत्नीनं लक्ष वेधलं म्हणून समजलं, नाही तर मेन कोर्सची आठवण यावी अशी परिस्थितीच नसते. त्यात गार्निशिंगज इतकी एकसोएक असतात की एकदा असा आस्वाद घ्यावा तर एकदा तसा, यू आर जस्ट ओपन टू अनलिमीटेड टेस्टींग एक्स्प्लोरेशन. त्यात मी दुहेरी ट्रॅफिक ठेवलेली, म्हणजे एका बाजूला फ्रेश फ्रूट्स आणि आइस्क्रीम विथ केक्स आणि दुसर्‍या बाजूला ते भन्नाट स्टार्टर्स! त्यामुळे नवे बार्बेक्यूज येईपर्यंत वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे आपण सफरचंद किंवा अननस अथवा बटाटा किंवा टॉमॅटोचा बार्बेक्यू ऑर्डर करावा आणि त्याला लागणार्‍या मध्यांतरात डेजर्ट्सची मजा घ्यावी. आपण इतके स्वर्गीय आनंदात आणि वेटर पुन्हा, `सॉरी फॉर द डिले इन सर्वींग योर ऑर्डर' म्हणतोयं! तर अशा स्वर्गसुखात तुमच्या शेजारी, एका छोट्याश्या तांब्याच्या फोल्डींग बारला अडकवलेला बार्बेक्यू नेशनचा झेंडा. जर तुम्ही बार्बेक्यूजनं तृप्त झाला असाल आणि आता तुमची जेवणाची (!) मनीषा असेल तर तो ध्वज डाऊन करायचा. जोपर्यंत तुम्ही बार फोल्ड करत नाही तोपर्यंत त्याच अदबीनं तितकीच मनपसंत सर्वीस अव्याहत चालू. मेन कोर्स जेवण तितकंच कमालीचं होतं. सूप नक्की कोणतं होतं ते आठवत नाही कारण ते घेतलं नाही पण सॅलड्स इतक्या प्रकारची होती की तिथे उभं राहून नांव लिहून घेतली तरच सगळी सांगता येतील. तीन की चार प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणि केशरानं मॅरीनेट केलाला वेज पुलाव (त्यात पुन्हा माझा आवडता कर्ड राईस होताच!). साडेबाराच्या सुमारास पोहोचलेलो आम्ही साडेतीनपर्यंत अनेकविध व्यंजनांचा इतका दीर्घ आणि तृप्त आस्वाद घेत होतो की स्वर्ग यापेक्षा वेगळा नाही याची प्रचिती आली. तिथे आसनस्थ झाल्यावर (नेहमीच्या सवयी प्रमाणे) वेटरचं नांव पाहून ठेवलं होतंच. बीलाचं कार्डपेमंट झाल्यावर त्यानं फीड-बॅक फॉर्म आणून दिला आणि पुन्हा आइस्क्रीम-विथ-केक किंवा चॉकलेट सॉस (अथवा तत्सम टॉपींग्ज म्हणजे मँगो पल्प, हनी, स्ट्रॉबेरी सॉस वगैरेची) ची पृच्छा केली पण इट वॉज जस्ट अ क्लायमॅक्स, वी कूड ओन्ली विश अ डेथ आफ्टर दॅट, त्यामुळे त्याला विनम्र नकार दिला. वेटर फीड-बॅक फॉर्म (`ऑल टेन' असलेला) न्यायला लागला तेव्हा त्याला हाक मारली, `गौतम, धीस इज फॉर यू' आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक फॉर्मच्या फोल्डरमधे मनसोक्त बिदागी ठेवली. गौतमनं फोल्डर उघडलं आणि ते परत माझ्याकडे देत कमालीच्या आदबीनं म्हणाला सॉरी सर, वी डोंट अ‍ॅक्सेप्ट टीप्स. (तिथे सर्वीस चार्ज बीलात आकारण्याची प्रथा असल्यानं टीप्स घेत नसावेत हे मान्य पण पुन्हा एक सुखद धक्का बसायचा तो बसलाच!) (केवळ तुमच्या माहितीसाठी, दोघांचं एकूण बील फॉर वेज बार्बेक्यू रुपये १,५२८)
  • Log in or register to post comments
  • 52527 views

प्रतिक्रिया

Submitted by अमित मुंबईचा on Wed, 01/20/2016 - 22:29

In reply to अरेरे! मिपावर असा प्रश्न by यशोधरा

Permalink

****

खरच मिपा इतक **** झालाय का? **** याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या प्रमाणे लावावा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 12:49

In reply to नाम में क्या रखा है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पोलीस बोलवा

>>>चाहो तो मेरी "साँसो की तलाशी ले लो...!!! पोलीस बोलवा. Breathalyzer आणतील ते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 01/20/2016 - 13:18

In reply to पोलीस बोलवा by पैसा

Permalink

पोलीस नको

संपादक बोलवा. व्यक्तिगत चारित्र्याबद्दल संशय निर्माण करणारं इंस्ट्रूमेंटची चर्चा नको असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 01/20/2016 - 09:46

In reply to मला फँटसी वाचायला खूप आवडतात. by अजया

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 01/20/2016 - 11:10

In reply to सुबोधजी, by विवेक ठाकूर

Permalink

एक सल्ला मित्राचा

संक्षी असते तर मी म्हणालो असतो की अवांतराकड़े लक्ष देऊ नका. एकदा संक्षी गमावले आता विठा नाय गमवायचा म्हणून हा प्रपंच. आणि इतर अवांतरवर उपप्रतिसादही लिहू नका. बाकी आपण पुढील वेळी कट्टा करू ते आपल्या आवडत्या बार बे क्यू नेशनलाच. -दिलीप बिरुट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 01/20/2016 - 11:19

In reply to एक सल्ला मित्राचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

संक्षींसह कट्टा करायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 01/20/2016 - 23:23

In reply to सुबोधजी, तुमच्याशी संवाद साधण्यात मजा आहे म्हणून लिहीतो. by विवेक ठाकूर

Permalink

या प्रतिसादावरून संक्षी=विठा

या प्रतिसादावरून संक्षी=विठा हे सिद्ध होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Tue, 01/19/2016 - 14:41

In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे

Permalink

+१

1000 कशाला 2000 घ्या पण फूड 'व्हॅल्यू फॉर मनी' असावं हीच अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी असंही होतं कि एखाद्या स्वस्त ठिकाणीही अपेक्षा पूर्ण होत नाही (जेवणाचा दर्जा इ. मुळे ) बऱ्याचदा जास्त पैसे मोजून किंवा पर्यायाने महागड्या ठिकाणी जेवून सुद्धा चांगल्या,वैविध्यपूर्ण पदार्थांचं समाधान मिळतं ( उदा. मलाका स्पाइस, आर्थर्स थीम, ताज विवांता- लॅटिट्यूड )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 01/19/2016 - 15:00

In reply to +१ by मालोजीराव

Permalink

मलाका स्पाईसला तब्बल माणाशी

मलाका स्पाईसला तब्बल माणाशी हजार रूपडे मोजूनही निराशा झाली. आवडले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Tue, 01/19/2016 - 15:15

In reply to मलाका स्पाईसला तब्बल माणाशी by प्रचेतस

Permalink

आवो अन्ना व्हयचंच कवा कवा :)

आवो अन्ना व्हयचंच कवा कवा :) मी मटण चॉप्स, ग्रील्ड डक आणि कसलीशी कंबोडियन डिश घेतलेली...इनोव्हेटिव्ह आणि वेगळ्या चवीचं होतं
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 01/20/2016 - 11:22

In reply to आवो अन्ना व्हयचंच कवा कवा :) by मालोजीराव

Permalink

अरे कुठली तरी hat नामक पदार्थ

अरे कुठली तरी hat नामक पदार्थ घेतला होता तर त्यात कसल्यातरी टोपलीत आली उकडलेली मटकी आणि तत्सम कडधान्य,थाई करीबरोबर भात नाही, तो वेगळा घ्यावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Wed, 01/20/2016 - 19:26

In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे

Permalink

हॉटेलात हजारो रुपये खर्च

हॉटेलात हजारो रुपये खर्च करणारे लोक जेंव्हा भाजीवाल्याशी पाच रुपयांसाठी हुज्जत घालताना पाहतो तेंव्हा जरूर वाईट वाटते.. 100% खरी गोष्ट
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 01/19/2016 - 13:19

In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर

Permalink

एक बाजू झाली

सर, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत खुश रहायचं तर तुम्हाला नेहमी फक्त खर्च करूनच आनंद मिळतो का लाईट नाही, गॅस नाही, नोकर नाहीत अशा झोपडीतही तुम्ही तेवढेच आनंदात राहू शकता?
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 01/19/2016 - 13:24

In reply to एक बाजू झाली by पैसा

Permalink

खतरा जबरा

___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 01/19/2016 - 13:26

In reply to एक बाजू झाली by पैसा

Permalink

Hechch! +१११११११

Hechch! +१११११११
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 01/19/2016 - 13:59

In reply to Hechch! +१११११११ by पिलीयन रायडर

Permalink

तिघाही सदस्यांनी प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही

आणि एखादेवेळी पैश्याकडे न पाहता असा आनंदोत्सव साजरा करण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 01/19/2016 - 14:11

In reply to तिघाही सदस्यांनी प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही by विवेक ठाकूर

Permalink

वाचला आहे

वाचला आहे, तरी तेच विचारते. कोणत्याही गोष्टीचा अभाव असतानाही तुम्ही आनंदात राहू शकता का?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 01/20/2016 - 00:26

In reply to वाचला आहे by पैसा

Permalink

तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही

पण तुम्ही दुसर्‍यांदा विचारतायं आणि प्रश्न सुद्धा व्यक्तिगत आहे, तरीही उत्तर देतो. कोणत्याही गोष्टीचा अभाव असतानाही तुम्ही आनंदात राहू शकता का आनंदाचा अर्थ स्वतःची स्वतःशी कनेक्टीविटी आहे. निर्माण झालेली परिस्थिती जर व्यक्तीचं अवधान संपूर्णपणे खेचून घेऊ शकली तर ही कनेक्टीविटी तुटते, त्याला आपण दु:ख म्हणतो. तस्मात, वस्तुचा आभाव गैरसोय निर्माण करेल पण आनंद हिरावू शकणार नाही कारण आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा माझा अनुभव आहे. आणि स्थिती संगीतातल्या समेसारखी आहे, कायम अविचल. त्यामुळे आभावानं गैरसोय होईल आणि ती दूर करण्याचा प्रयत्न होईल पण दु:ख होणं अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 01/20/2016 - 00:44

In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर

Permalink

तिने तुम्हाला विचारलं की

तिने तुम्हाला विचारलं की तुम्ही आनंदात रहाल का? तुम्ही समजावुन सांगताय की आनंद म्हणजे काय. अस्थानी आणि अवेळी ज्ञानामृत पाजणे हे विद्वत्तेचे लक्षण नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 01/20/2016 - 10:43

In reply to तिने तुम्हाला विचारलं की by स्रुजा

Permalink

आनंद कुणाला होतो?

आनंद होणारा हा आनंदा पासून वेगळा काढता येत नाही. तस्मात, एकदा आनंद म्हणजे काय हे समजल्यावर व्यक्ती सदैव आनंदी राहू शकते. घटना आणि परिस्थिती व्यक्तीला स्वतःपासून दुरावू शकत नाहीत. कदाचित व्यक्तिगत शेरेबाजीपूर्वी तुम्ही थोडं शांततेनं वाचलं तर तुम्हाला ही मुद्दा कळू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Wed, 01/20/2016 - 10:50

In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर

Permalink

दुःख याचा विरुद्ध अर्थ सुख

दुःख याचा विरुद्ध अर्थ सुख असा असला तरी दुःख होणे अशक्य आहे याचा अर्थ सुखी असणे असा होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 01/20/2016 - 11:49

In reply to दुःख याचा विरुद्ध अर्थ सुख by नूतन सावंत

Permalink

बुद्ध म्हणतो मुक्ती म्हणजे दु:खाचा आभाव !

आणि दु:खाचा आभाव म्हणजेच आनंद. आनंद म्हणजे एकसंध चित्तदशा, एक सततचा लाइट मूड. म्हणून तर म्हटलंय जर घटना किंवा परिस्थिती तुमची संपूर्ण जाणीव वेधून घेऊ शकले नाहीत तर तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहाता आणि तुमचा लाइट मूड कायम राहातो, तुम्ही आनंदी राहाता.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 01/20/2016 - 12:14

In reply to बुद्ध म्हणतो मुक्ती म्हणजे दु:खाचा आभाव ! by विवेक ठाकूर

Permalink

खरं आहे.

खरं आहे. त्या लाईटच्या लाईटमध्ये सगळं मिपा झगमगतंय ! :))
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 13:16

In reply to तुमच्या प्रश्नाचा लेखाशी संबंध नाही by विवेक ठाकूर

Permalink

लेखाशी संबंध नाही?

बरं बरं.
प्रश्न सुद्धा व्यक्तिगत आहे,
मुळात लेख व्यक्तिगत अनुभवाबद्दल असल्याने चर्चा वैयक्तिक मुद्द्यांवर होणारच. उलट कोणतीही गोष्ट जेवढी वैयक्तिक होत जाते तेवढी ती वैश्विक होत जाते.
त्यामुळे आभावानं गैरसोय होईल आणि ती दूर करण्याचा प्रयत्न होईल पण दु:ख होणं अशक्य आहे.
अभावाने गैरसोय होईल हे गृहीतक बरोबर आहे का? त्यातही मजा असते. ज्या माणसाला आनंद आपल्या आतच आहे हे समजते तो कोणत्याही गोष्टींसह किंवा गोष्टींशिवाय, तसेच कोणी सोबत असो किंवा नसो आनंदात राहू शकतो. तो त्याचा चॉईस असतो. दुसरी गोष्ट, दु:ख नाही म्हणजे सुख किंवा आनंद असेलच असेही आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 01/20/2016 - 09:23

In reply to एक बाजू झाली by पैसा

Permalink

हे गाणं आठवलं...

किंवा इथे
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 01/21/2016 - 06:19

In reply to हे गाणं आठवलं... by खेडूत

Permalink

या गाण्यातली झोपडी (बैठे घर

या गाण्यातली झोपडी (बैठे घर/चाळीतले घर/गरीबीतले घर) ३ बीएचके पेक्षा मोठी दीसतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 01/22/2016 - 12:21

In reply to या गाण्यातली झोपडी (बैठे घर by खटपट्या

Permalink

ते घर विनोद मेहराचे असते,

ते घर विनोद मेहराचे असते, जितेंद्रचे नाही असे स्मरते.
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Wed, 01/20/2016 - 14:21

In reply to एक बाजू झाली by पैसा

Permalink

आनंद

क्षीरसागर साहेबांनी त्यांना आलेला एक आनंददायी अनुभव शब्दबध्द केला आहे. त्यावर असा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन समजले नाही. मग पैसा ताई , तुम्हाला असं विचारले तर, की पंचातारांकित, आल्हाद दायक वातावरणात अतिशय चविष्ट असे वैविध्यपपूर्ण खाद्यपदार्थ अगत्याने आणि आदबीने आणून दिले जात असताना आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर त्यांचा आस्वाद घेण्यात तुम्हाला आनंद मिळेल की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 14:57

In reply to आनंद by अगम्य

Permalink

हो हो!

का नाही मिळणार? पण ते सगळे आहे म्हणून मला आनंद मिळतो आहे अशी परिस्थिती असू नये. दुसरी बाजू आहे, एखाद्या माणसासोबत अमूक एका परिस्थितीत मला आनंद मिळतो आहे असे कोणीतरी सांगितले तर त्या दुसर्‍या माणसाला तेवढाच आनंद मिळतो आहे का "मजबुरी का नाम अटलबिहारी" अशी परिस्थिती आहे ते आपल्याला कधी कळते का? कदाचित त्या पहिल्या माणसालाही कळत नसेल. उदाहरण सांगते. समजा, मला मित्रमैत्रिणींसोबत रायगडावर जायचे आहे, किंवा साहित्य संमेलनाला जायचे आहे. अशा वेळी जर माझा नवरा मला जबरदस्तीने बार बे क्यु नेशनला घेऊन गेला तर भले माझ्या जिभेला जेवणाचे सुख मिळेल पण मला त्यात आनंद मिळणार नाही. माझा नवरा भले स्वर्गात आहोत असे समजेल पण मला आतून जाम वैताग आलेला असू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Wed, 01/20/2016 - 15:17

In reply to हो हो! by पैसा

Permalink

पत्नीच्या आग्रहाखातर

त्यांनी लेखाच्या पहिल्याच वाक्यात लिहिलंय, "काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो"
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 15:45

In reply to पत्नीच्या आग्रहाखातर by अगम्य

Permalink

तो मय क्या करूं?

मी हायपोथेटिकली लिहिलंय. असं असू शकतं. पण दर वेळी असेलच असं नव्हे. एकदा त्याना चांगला अनुभव आला. समजा, त्या दिवशी जेवण बिघडलेलं असतं, किंवा वेटर दुर्लक्ष करणारा मिळाला असता, किंवा जाता जाता त्यांचं डोकं दुखायला लागलं असतं तरी असाच आणि एवढाच आनंद आला असता का इतका साधा प्रश्न आहे. जर त्यांना प्रश्न विचारायचे नसतील तर एखाद्याने किल्ल्यावर किंवा बर्फात मुक्काम टाकला म्हणून त्यालाही हसू नये. "त्यानी लिहिलंय, तुम्ही प्रश्न का विचारता" असं म्हटलं तर कोणाच्याही कोणत्याही लेखावर एकही प्रतिक्रिया लिहू नये कोणीच.
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Wed, 01/20/2016 - 19:34

In reply to तो मय क्या करूं? by पैसा

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद देण्याचे स्वातन्त्र्य तर आहेच. परंतु त्यांनी "पत्नीच्या आग्रहाखातर" इतके स्पष्ट लिहिले असून सुद्धा असा हाय्पोथेटिकल प्रतिसाद ही ओढून ताणून आणलेली नकारात्मकता वाटते हे माझे मत. आता इथे गोव्याच्या इतिहासावर एक सुंदर लेखमालिका आहे. त्यावर मग "फक्त गोव्याचा इतिहासच रोचक आहे असे थोडेच आहे? केरळचा इतिहास तुम्हाला रोचक वाटत नाही का? काही वेळा दाखवले असेल शौर्य पण समजा ते घाबरले असते तर ?" किंवा डॉक्टर खरे साहेबांच्या वाचनीय लेखांवर "फक्त नौदल देशाचे रक्षण करते असे थोडेच आहे? खरे साहेब जर उंदीर मारायचा विभागात कारकून असते तर त्यांना असेच थरारक अनुभव लिहिता आले असते का?" असे अनेक प्रश्न विचारता येतील. अगदी तुमचेच लाईट, gas, नोकर हे उदाहरण आणखी ताणून "मग समजा अतिरेक्यांनी तुमचे अपहरण करून कोंडून ठेवले तरीही आनंद वाटेल का?" असेही विचारता येईल. इथे बरेच लोक आपल्या प्रवासाची वर्णने लिहितात, फोटो टाकतात. बहुसंख्य मिपाकर (त्यांना त्या ठिकाणची ट्रिप परवडत असो वा नसो) स्वागतपर प्रतिसाद देतात. बहुतेक लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला घरबसल्या त्या ठिकाणची सफर घडवलीत. कोणी असे म्हणत नाही कि "एवढा खर्च करून युरोपला जायची काय गरज? तुम्हाला खर्च करून ट्रिप केल्याशिवाय आनंद मिळत नाही का? घरबसल्या डिस्कवरी चानल वर युरोप फुकट बघता येतो". अशा पार्श्वभूमीवर एका सुखद अनुभवाच्या सरळ वर्णनावरचे असे हाय्पोथेटिकल प्रतिसाद म्हणजे क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळेला देशी खेळांचा जाज्ज्वल्य अभिमान थाटाचे वाटले. असो. तुम्हाला आणि इतर कुणालाही प्रतिसाद द्यायचे स्वातंत्र्य तर आहेच. पण एखादी गोष्ट खटकली तर ती नोंदवायचे स्वातंत्र्य मलाही असावे असे वाटले म्हणून हा प्रपंच.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 01/20/2016 - 20:27

In reply to प्रतिसाद by अगम्य

Permalink

सुरेख !

"पत्नीच्या आग्रहाखातर" इतके स्पष्ट लिहिले असून सुद्धा असा हाय्पोथेटिकल प्रतिसाद ही ओढून ताणून आणलेली नकारात्मकता वाटते आणि दाखले तर असे एकसोएक दिलेत की वाचून नकारात्मकता दूर होईल अशी आशा करु.
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on गुरुवार, 01/21/2016 - 12:09

In reply to सुरेख ! by विवेक ठाकूर

Permalink

प्रतिसाद आणि प्रतिवाद

ठाकूर साहेब, तुम्हीच श्री क्षीरसागर आहात ह्याची मला जवळजवळ खात्रीच आहे. तुम्हाला श्री किसन शिंदे साहेबांनी दिलेला सल्ला परत देऊ इच्छितो. तुम्ही लेख चांगला लिहिला आहे, पण प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देण्याचा फंदात पडू नका. प्रतिवाद करण्याचा अभिनिवेशात एक शब्दही वावगा जाणार नाही ह्याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही. आणि मग त्याचेच भांडवल होऊन धाग्याला अप्रिय असे वळण लागते. ह्याउप्पर आपली मर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 01/20/2016 - 20:29

In reply to प्रतिसाद by अगम्य

Permalink

क्या बात है

प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 20:57

In reply to प्रतिसाद by अगम्य

Permalink

अय्या!

म्हणजे संजय क्षीरसागर हेच विवेक ठाकूर हे तुम्हाला पक्के माहीत आहे तर! त्या दोघांच्या मनात काय आहे हे तुम्ही इतके ठामपणे कसे सांगताय पण? http://www.misalpav.com/comment/793434#comment-793434 इथे
मला व्यक्तिशः लोकांच्या पैश्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचं कायम नवल वाटत आलं आहे. बर्फाच्या घरात झोपण्यासारख्या विक्षिप्त कल्पनेसासाठी एखादा लाखो रुपये खर्च करतो आणि लोकांना ते ग्रेट वाटतं. हजारो मैलांचा प्रवास, कमालीचं विपरित हवामान, अत्यंत काँप्लिकेटेड व्यवस्था, त्यात कुठे काही चुकलं तर नाहक जीवावर बेतण्याची शक्यता, खाण्यापिण्याच्या गैरसोयी ... आणि मजा म्हणजे शेवटी आनंद तोच ! पण असं म्हटलं की लोक म्हणतात वडापाव आणि कटींग चहामधे आम्हाला मजा येते कशाला हवा तो बीबीक्यू ! लोकांची विचारसरणी एक्स्ट्रीम वाटते. असाच अनुभव मला स्प्लेंडर कंट्रीच्या लेखावर आला. लोक पर्यटनासाठी किंवा दुर्गम तिर्थक्षेत्री जायला, कितीही हजार खर्च करतील, काहीही खातील, अशक्य वणवण करतील पण एखाद्या जवळच्या लोकेशनला, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन-चार दिवस रमायचं म्हटलं तर हॉटेलचं टॅरीफ बघतील !
हे सगळं ठाकूर यांनी लिहिलं, आणखी कुठे कुठे सुख आणि आनंद काय हे आपल्याला समजलंय असं ते आत्मविश्वासाने सांगत आहेत म्हणून प्रश्न विचारायची वेळ आली. (त्या प्रश्नाचं सरळ उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही.) नाहीतर या धाग्यावर लोकांच्या अकला काढणारे क्षीरसागर यांचे इतके प्रतिसाद पडले आहेत की या धाग्यावर यायला पण नको वाटतं. राहिला प्रश्न लोकानी मला किंवा डॉ खरे यांना असले प्रश्न विचारायचा. ते विचारले गेले आहेत आणि आम्ही त्यांना कोणाच्याही अकला न काढता शांतपणे उत्तरे दिली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 01/19/2016 - 16:51

In reply to डिबी, आता तुम्ही विषय काढलाच आहे तर लिहीतो by विवेक ठाकूर

Permalink

आधी तुम्ही या संस्थळावर

आधी तुम्ही या संस्थळावर कार्यक्षम (अ‍ॅक्टिव्ह) नसतानाही संक्षींना काय म्हणायचं होतं हे तुम्हाला कळावं, हे नवल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 01/19/2016 - 17:18

In reply to आधी तुम्ही या संस्थळावर by सूड

Permalink

तुला अज्जून नवल वाटते याचे

तुला अज्जून नवल वाटते याचे नवल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 01/20/2016 - 22:59

In reply to लौट के आजा मेरे गीत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद सर !!

आपण धन्याला उद्देशुन लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्या मत मांडेलच पण धन्या त्याच्या मतावर ठाम आहे. मित्रांसाठी आणि मित्रांच्या आनंदासाठी धन्या बार बे क्यु नेशनला आला होता एवढेच सांगू इच्छितो. :)
अगदी हेच लिहीणार होतो मी. मित्रांसाठी कायपन. कालपन आजपन आनि उदयापन. गेल्या वर्षीच्या जानेवारीतील गोष्ट. आमच्या एका मित्राचा ह्याप्पी बड्डे होता. त्याला आम्ही पार्टी द्यायची ठरवलं. कुणी म्हटलं बारबेक्यू नेशन. त्यावर कुणी म्हटलं सिगरी. बारबेक्यू नेशनपेक्षा भारी आणि महागही. या "भारी" हाटेलांचं गणित आम्हाला चांगलंच माहिती होतं. पण म्हटलं होऊ दे खर्च. दोस्तासाठी कायपन. हितं आनि तितं पन. मात्र मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे, "संजय क्षीरसागर" या सदस्याची बाजू "विवेक ठाकूर" हे सदस्य इतक्या हिरीरीने का मांडत आहेत? काय असावे बरे यातले गुपित? -आपलाच सगा/धन्या/फटू
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 01/20/2016 - 23:53

In reply to धन्यवाद सर !! by सतिश गावडे

Permalink

सगा/धन्या/फटू, विठापण

सगा/धन्या/फटू, विठापण मित्रांसाठी कायपन. कालपन आजपन आनि उदयापन अणि हितं आनि तितं पन,करताहेत बहुतेक. त्याशिवाय का इतक्या हिरीरीने मतं मांडतील?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 01/18/2016 - 11:20

Permalink

ह्म्म...तोडणे सोपे जोडणे अवघड

ह्म्म...तोडणे सोपे जोडणे अवघड.... दुर्दैवी घटनाक्रम!
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 01/18/2016 - 12:10

Permalink

किमतीच्या मानाने स्टार्टर्स

किमतीच्या मानाने स्टार्टर्स सर्वसमावेशक नाहीत सी फूड मध्ये फक्त बास्सा देतात पापलेट,सुरमई,क्रॅब,लॉबस्टर,टायगर प्रॉन्स कधी दिसले नाहीत. मटण मध्ये सुद्धा सिक कबाब, मटण पॅटी आहेत चॉप्स, रान, बफेलो चिप्स,टुनडे कबाब वगैरे काहीही उपलब्ध नाही. 1000 रुपयात याचा समावेश व्हायला काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Mon, 01/18/2016 - 19:33

Permalink

डॉ. खरेंशी सहमत. बार-बे-क्यू

डॉ. खरेंशी सहमत. बार-बे-क्यू नेशन खूपच महाग झाले आहे. आमच्या कंपनीत पण बर्याचदा काही पार्टी वगैरे असल्यास बार-बे-क्यू नेशनला जाणे होते. पण वैयक्तिकरित्या इतके पैसे एका जेवणाला घालवणे मनाला पटत नाही. कदाचित लहानपणीचे आयुष्य थोडे कठीण, तडजोडीने घालवलेले असल्याने असे होत असेल. दुसरे म्हणजे दुपारपासून कमी खायचे किंवा दुपारी उपाशी राहायचे आणी रात्री तिथे जाऊन फक्त पैसे वसूल करण्यासाठी बकासुरासारखे खायचे वगैरे स्वभावात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गेलो तरी मला १५-२० मी. पुरतात जेवायला. जेव्हा अन्य सर्वांचे तिथेच जायचे असे मत होते तेव्हा मात्र नाइलाज होतो. आपण एकटेच सर्वांच्या विरुध्ध बोलणे ठीक वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Tue, 01/19/2016 - 11:39

Permalink

...

स्वस्त दुसरे ऑप्शन आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Tue, 01/19/2016 - 12:26

In reply to ... by मोगा

Permalink

टेंझो टेंपल एक जरा स्वस्त

टेंझो टेंपल एक जरा स्वस्त आॅप्शन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 01/19/2016 - 12:26

Permalink

स्वस्त दुसरे ऑप्शन आहेत का?

जन्नत दरबार लजिझ खाने का मरकझ फुलारि गल्लि,मोमिन पुरा अकोला. अपना नाम बोलना उधर तेरे लिये सब गोश्त बडे का रहेगा उधर थोडा बाजु मैच बडे के गोश्त के समोसे बि मिल्ते १० रु मे तिन. नोश फर्मा..ऐश कर
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 01/19/2016 - 12:58

In reply to स्वस्त दुसरे ऑप्शन आहेत का? by होबासराव

Permalink

जन्नत दरबार नाही हो गाववाले,

जन्नत दरबार नाही हो गाववाले, होटल अल मन्नान, लज़ीज़ खानो का मरकज़ आहे ते, आमच्या मित्राच्या काका ऍम सासऱ्याचे हॉटेल आहे :D :D बाकी लै ख़ास आठवणी जाग्या केल्या, अस्सल मुगलाई पद्धतीची कोंबड़ी अन बकरा (पार शोरवा ते पाया निहारी) खायचे असेल तर हॉटेल अल फ़ारुख़ उत्तम आहे , गारंटीड बोकड़ किंवा कोंबड़ीच मिळेल बड़ा किंवा कौवा बिरयानी नाही :D
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 01/19/2016 - 13:13

Permalink

आडनाव झुल्फिकार हाय ना त्याइचे ? दोघ भाउ हायत बघा

:)
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 01/19/2016 - 13:17

Permalink

बड़ा किंवा कौवा बिरयानी नाही :D

आता हे मले माहित हाय ना..पन मोगा ले आता सस्तात ल काय सांगाव आन जे त्याली बि आवडल्..म्ह्नुन मंग ते अंडा मस्जिद जौळ (अमरसिंग च्या दुकाना पुढ) एक लंगडा बसत जाय बडे के गोश्त के समोसे घेउन, आपला दोस्त फिरोझ (राहणार भांडपुरा बैल जोडि) बम्म सहा सहा समोसे हानत जाय...
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Tue, 01/19/2016 - 13:42

In reply to बड़ा किंवा कौवा बिरयानी नाही :D by होबासराव

Permalink

...

आम्ही शाकाहारी आहोत
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com