सजुक तुपाचा शीरा
साधारण ४ थीत असेल त्या वेळी
शनिवार होता शाळा १/२ दिवस होति.
घरी आलो दप्तर ठेवल. हात पाय धुतले....
"अरे आपल्याला पारखी काकु कडे जायचय, समाचाराला..
तु चल माझ्या बरोबर....सोबत" आईन हुकुम सोडला
आम्हि दोघे निघलो पारखी काकुकडे,
अरे तुला पारखी काका माहित आहेत ना ते गेलेत.. आई
माझ्या फारस लक्षांत आल नाहि..
अरे समाचारला जायचे आहे...
तिथे शहाण्या सारख वागायच..आई....हो....मी
आम्हि दोघे काकुंच्या घरी आलो..
घरात शांतता..जमीनिवर पीठ सारवुन एक गोल त्या वर तेवता दिवा...
काकु कोप~यात शांत..कपाळ पांढर..
आईन त्यांच्या कडे पाहिल अन त्या रडायला लागल्या..
मी बघतच होतो..
"नका रडु..कहि आपल्या हातात असत का?.कस झाल?.आई म्हणाली
"काय सांगु?३- ३.३० ची वेळ असेल .... खुर्चीत पेपर वाचत बसले होते..मला म्हणाले ४ ला दुकानात जायच आहे..मला जरा शीरा कर खायला....काकु सांगत होत्या
आई ऎकत होति..काकु पुढे म्हणाल्या "अन मी शीरा केला साजुक तुपाचा अन शी~याची बशी घेउन आले अन म्ह्टले पेपर नंतर वाचा आधी हे खा...पण एक नाहि दोन नाहि..मग मी जरा हलवल तर पेपर हातातुन गळुन पडला अन...... काकु खुप रडायला लागल्या
मग आई पण जरा जवळ गेळी अन पाठीवरुन हात फिरवीत सांत्वन करु लागली.
काकु जरा शांत झाल्यावर म्हणाली "बहुतेक छातिचा रोग असेल"
"असेलहि... आमच कर्म..दुसर काय?..काकु म्हणाल्या.
जरा वेळान काकुंचा निरोप घेउन आम्हि निघालो
रस्त्यात हि आई डोळे पुसत होति...
मला एक प्रश्ण पडला होता.."शि~याच काय झाल असेल? मग तो शिरा कोणी खाल्ला असेल?????
avinash
वाचने
5474
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
१: काही
किव आली
+१ कपिल..
In reply to किव आली by कपिल काळे
सहमत सहमत सहमत
In reply to किव आली by कपिल काळे
सहमत!
In reply to सहमत सहमत सहमत by पांथस्थ
नक्कीच
In reply to सहमत सहमत सहमत by पांथस्थ
प्रपोझल
:)
In reply to प्रपोझल by सुनील
कृपया उत्तर द्या
वेताळपंचविशी
In reply to कृपया उत्तर द्या by चित्रा
...
प्रटावाना
+१
In reply to प्रटावाना by बिपिन कार्यकर्ते
आणखी थोडा प्रयत्न हवा
डिलिट
आमच्यावर
मला तरी