Skip to main content

जोडी

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 08/01/2016 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सांगू का ? मी कसा अन तू कशी ? तुटता निद्राबंधन करिता मुखमंजन ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी- सका-सकाळी चहाच्या वेळी कप मी अन तू बशी !- करावया ईशचिंतन धूप मी, तू निरंजन तैसेचि टाळ मी, घंटी तू मधूरशी!- नळाभोवती भाजन जमती तिथे हंडा मी अन तू कळशी !- भोजन पंगती आपण संगती वाटी तू या ताटापाशी !- होता उदरभरती चढली सुस्ती तक्क्या तिथे मी अन तू उशी !- उद्यानी त्या सायंकाळी रमणीय स्थळी भ्रमर मी, तू कळी इवलीशी ! येई निशा सभोवार दाटुनी येता तिमीर बल्ब मी दारी, ट्यूब तू घराशी ! बा वाग्विलासा !! काही लिहावे हि जिज्ञासा तिथे कवी मी, तू कविता प्रियाशी ! दिसभर ना उसंत कि अखेरीस या मंचकी मदन मी अन तू रती उर्वशी ! सर्वत्र आपुली जोडी नाते प्रीतीचे जोडी मी असा अन तू तशी !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2199
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी- वा ! क्या बात है ! आणि " सका- सकाळी " हा एक नविनच शब्दं प्रयोग .. मस्तच .

बाकी, अशा टाईपची कविता वाट्सपवर वाचल्यासारखी वगैरे वाटली. -दिलीप बिरुटे

प्रस्तुत कविता माझ्या व अन्य दोन लेखकाच्या ''वाटेवरच्या कविता'' या पुस्तकामधील माझी कविता आहे धन्यवाद