Skip to main content

विसंगतींचे संदर्भ...!

लेखक झेल्या यांनी सोमवार, 29/12/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
कळून इतके काय कळे हे नकळे मजला का न कळे ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भास भाबडे रंग रूप हे भास भावना भास चेतना, भास सत्य अन भास भासही भास असे सगळे सगळे... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! समजून घेतो आपण आपले सगळे आपल्यासाठी इथे.. आपण कोण नि कोण दुजे हे परंतु येथे कोणा न कळे.. ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भूल दिशा अन दिवस निशा हे पोकळ जडता स्थिर चल हे.. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! -झेल्या
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5348
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

कवितेल फ्लो मस्त आहे.. एकदम सह्ही. "भासरंग" हे नाव कसं वाटतं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मनापासून आभार... "भासरंग" हे नाव खरच खूप छान आहे..पण या नावाची आणखी वेगळी आणि आणखी सुंदर कविता होऊ शकेल असं वाटतं..! कवितेबद्दल दोन कौतुकाचे शब्द वाचून खूप आनंद झाला. -झेल्या

ज्याचे त्याचे समज खुळे हेच वाक्य प्रत्येक कडव्यात सारखे आले आहे. तेव्हा हे शीर्षक देणे तर्कसंगत दिसते... :) बाकी तुम्हाला पटते की नाही ते तुम्हीच ठरवा... कारण जो लिहितो त्यालाच योग्य शीर्षक ठरवता येते असे मला वाटते... - सागर

झेल्या ची कविता झेला !! हे नाव कसं वाटतये? ;-) (ह. घे रे बाबा ) भासमान कविता आवडली.. काही संबद्ध विषयावर सुद्धा लिहु शकतोस ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

'झेल्या ची कविता झेला !!' हे तर फारच युनिव्हर्सल नाव आहे...माझ्या कुठ्ल्याही कवितेला चालेल... खुमासदार प्रतिक्रियेबद्द्ल मनापासून आभार..! -झेल्या

हे आवडले तर द्या. वेताळ

आभास- हे आवडले का?

मला काहि न कळे झेल्या हे घे आणखी एक नाव मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

गैरसमजाने मिळालेली समज ! अनिरुध

आपण विचारलेच आहे तर झेल्याराव आपण तुमच्या कवितेचे बारसे करूया 'न कळे ' हे नाव तुमच्या कानात सांगतो ऐकले ना!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...! सध्या दिलेलं नाव कसं आहे? -झेल्या

मला वाटते, सध्या दिलेले नाव चपखल आहे! कवितेत परस्पर-विरोधी शब्द वापरलेत एकाच वाक्यात! जसे, १. भास सत्य अन भास भासही २. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... नावात तसाच विरोधाभास दिसतोय आत्ताच्या! त्यामुळे हे छानच आहे.

मस्त! :)