SLB चा बाजीराव-मस्तानी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अगदी बालपणापासून चित्रपटाचे संस्कार प्यालेला असल्याने, लोकांनी कितीही चिखलफेक केली तरीही, SLB चा "बाजीराव-मस्तानी" पाहायला जाणार ह्यात काही तिळमात्रदेखील शंका नव्हती. पण काही इतर कामात व्यग्र असले कारणाने पंधरा दिवस लागले. एकतर चित्रपटाचा फ्यान अन त्यात प्रेमरंगमहर्षी SLB म्हणजे आनंदाला पारावर उरला नाही माझ्या. आजही रामलीला-देवदास थेटरात लागल्यास ५ वेळा पाहून यीन इतकं प्रेम केलंय ह्याच्या कलाकृतीवर.
(डिस्क्लेमर : आमचा इतिहास SLB पेक्षाही कच्चा आहे, कृपया आम्ही बोललेल्यात/लिहिलेल्यात काही ऐतिहासिक/तार्किक संबंध लागले नाहीत तर फासावर लटकवू नये.)
तर भव्य हा शब्द जणू SLB साठीच बनवला आहे ह्या(च) समजात जगणारा माणूस मी. अशीच एका भव्य दरबारात सुरवात होते कथानकाची. पुढला पेशवा ठरवण्यासाठी. अप्रतिम संवाद, घटना अन चित्रीकरण यांचा मिलाफ घडवून आणलाय. त्यात बाजीरावाची मुहूर्तमेढ निश्चित तर होतेच पण तो किती खोलपर्यंत विचार करणारा व दृढनिश्चयी आहे ह्याची प्रचीती सुद्धा येते. पुढच्या वाटचालीत मस्तानी-बाजीरावाची भेट अन त्यानंतरच्या लढाईतले बाजीरावाचे वेगवान निर्णय, हालचाली व त्यांची अंमलबजावणी, तसेच शत्रूला विचार करू न देता हल्ला घडवून त्याची दैना हे अगदी परिणामकारक रीतीने दाखविलेले आहे. इथे त्यांची (BM) एकमेकासोबत जी गुंफण होते तिच्या जोरावर मस्तानी अखंड आयुष्यभर अव्याहतपणे बाजीरावावर निर्व्याज प्रेम करायला तयार होते.
हे सगळ घडता-घडता अर्धा-पाऊण तास कुठे निघून जातो काही समजत नाही. आता सुरु होते एका योध्याच्या प्रेमाची फरफट. मस्तानीची बोळवण. चिमाजी-आईसाहेबांचा मस्तानी तिरस्कार खेळ. इथेच बाजीराव हरला अन SLB सुद्धा.
BM एकमेकात गुंतत जातात, काशीकडे दुर्लक्ष होते असं दाखवण्याऐवजी अर्धा-अधिक वेळ कौटुंबिक/भावनिक कारस्थान दाखवण्यात खर्ची घातला आहे असं वाटत राहत. ती कथेची गरज आहे हे जरी मान्य असलं तरीही कथा सैल होत जाते. नाही म्हणायला ब्राह्मणभोज - नामकरण - मस्तानी हमला वेग्रे प्रेक्षकाला हरवू देत नाहीत.
काही प्रसंग फारच लक्षवेधी किंवा चित्तथरारक आहेत. जसे भर वादळात नाव घेऊन मस्तानीला भेटायला जाणे. चिमाजीअप्पा-बाजीरावाचा मस्तानीवरून कचेरीत झालेला वाद. मस्तानीला नर्तकी बोलणाऱ्या सेवकाची कानउघडणी. पंतप्रतीनिधींची तलवारीने तसेच जिव्हेच्या धारेने माळ कापणे. निजामभेट तर विशेष. तिथले दोहोंचे संवाद अन त्यात आवाजाची जरब असलेला रजा मुराद तर चौदवीका चांद. त्यालाही फिका पाडलाय रणवीरने.
पण तद्नंतर लागलीच मल्हारी गाण्याची गरज नव्हतीच. नपेक्षा ते अस्थानी आहे. तसेच पिंगासुद्धा. इतका भावनिक प्रसंग (काशीबाई अन मस्तानीचं बाजीरावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण) सुंदररित्या हाताळून नंतर त्यादोघींनी एकत्र फेर धरला असता तर ठीक. पण त्या उंच मस्तानीला लुगड काही शोभत नाही. त्यावर त्यांचा ड्यांस जरा अतीच. म्हणजे पेशव्यांच्या बायका नाचत असोत व नसोत. हा भाग अलाहिदा. पण "डोला रे डोला"ची पुनरावृत्ती करणे टाळू शकले असते. शेवट थोडा 'कल-हो-न-हो' प्रमाणे लांबवत नेला आहे असे वाटते. पण त्यातही दोघांची आर्त साद ऐकू येत राहते.
असो. इतिहास म्हणून तर पहायला जाणारच नव्हतो कारण गोवारीकर अन SLB ह्यांच्यामधलं अंतर संपलं नसत का? पर्वा आलो होतो अन बोर्डावर धागापण पाहिला सोत्रिचा. पण दुसर्याचे विचार घेऊन थेटरात नाही जात मी. काल पाहून आलो आणि आज तो वाचला. मी अगदीच विरोधात आहे असं नाही पण बर झालं मी तो धागा न वाचता सिनेमा पाहून आलो. अन्यथा विचार पूर्वग्रहदुषित झाले असते.
पण एक फ्यान म्हणून माझ्या ज्या अपेक्षा होत्या, BM चं हळूवार फुलत जाणारं प्रेम, त्यांचा विरह अन शेवटी मनोमिलन. त्या काही सिनेमात दिसल्या नाहीत. ती सिझलिंग केमिस्ट्री (???) काही जमून आली नाही. पण कथेचा आवाका खूप मोठा असल्याने SLB ला बरंच आवरत घ्यावं लागलंय.
चित्रपटाच्या जमेच्या बाजू :
१- रणवीरचा अभिनय. (१ गुण)
२- प्रियांका-दीपिका-मिलिंद-वैभव-तन्वी ह्यांचा अभिनय (१ गुण)
३- SLB चे प्रसंग सादरीकरण/चित्रीकरण अन सेटची भव्यता/नाजूकता/अचूकता व संवाद (१ गुण)
असे एकंदरीत पाचपैकी तीन गुण (३/५)
-
SLB कडून याहीपेक्षा उत्कट प्रेमाच्या गुंतागुंतीची साकारणी, रंगाची उधळण व चितरकथेच्या अपेक्षेत असलेला डाय हार्ड SLB फ्यान.
प्रतिक्रिया
वप्या (एकदाचा) लिहिता झाला. ;
ओह माय माय, कोण लिहीतंय बघा!!
ओके.
तुम्हाला गुण कापल्याशिवाय चैन
पेपर
बरं
वा.. सवड मिळाली? स्वागतम!!
अरे वा, बर्याच दिवसांनी आलात
काय म्हणतोस वपा? कसा आहेस? लै
ऑ???
हा ना राव.
होय...
तद्दन फालतू, गल्लाभरू अन
कुठी होता बे ?
काय रे वप्या?
आताच बघून आले. मला आवडला
गाण्यांबद्दल प्रचंड सहमत…
चित्रपट बघितला. सविस्तर नंतर