कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...
तू तरी कोठे तशी हसतेस आता
बोलक्या मौनासही जपतेस आता
पालखी माथ्यावरी रुतलीच आहे
जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता
कुंकवाचा भार ना होतो कपाळी
'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता
कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने
का स्वतःची वंचना करतेस आता
दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे
तूच दुर्गा, कालिका असतेस आता
विशाल
वाह.... मस्तच आहे!! आवडले!!
वाह.... मस्तच
लोडेड आहे बे!!
धन्यवाद __/!\__
संपादक मंडळी, शेवटच्या
अर्ध्वयूंचे दंभ तू नाकार वेडेअर्ध्वयूंचे हा शब्द चुकला आहे, तो 'अध्व र्यू' असा हवा, पण त्यामुळे वृत्तभंग होतोय, त्याऐवजी 'दांभिकांचे'हा शब्द टाकाल का? धन्यवाद.संपादक नाही पण साहित्य
धन्यवाद :)
सुंदर.
क्या बात!!
झकास हो विकुभौ!
धन्यवाद देवा, मेहनत सार्थकी
मस्त, खल्लास कविता
झकास
काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह
ते वाचकांवर सोडलेले आहे ...
सुंदर कविता.
सुंदर कविता!
वा!
छान कविता!