Skip to main content

कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 04/01/2016 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
तू तरी कोठे तशी हसतेस आता बोलक्या मौनासही जपतेस आता पालखी माथ्यावरी रुतलीच आहे जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता कुंकवाचा भार ना होतो कपाळी 'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने का स्वतःची वंचना करतेस आता दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे तूच दुर्गा, कालिका असतेस आता विशाल
लेखनविषय:

वाचने 3306
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

संपादक मंडळी, शेवटच्या द्वीपदीत अर्ध्वयूंचे दंभ तू नाकार वेडे अर्ध्वयूंचे हा शब्द चुकला आहे, तो 'अध्व र्यू' असा हवा, पण त्यामुळे वृत्तभंग होतोय, त्याऐवजी 'दांभिकांचे'हा शब्द टाकाल का? धन्यवाद.

का कुणास ठाऊक पण खालील ओळी आठवल्या - पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी । आपुल्या घरीच हाल सोसते मराठी । हे असे कित्येक खेळ पाहते मराठी । शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।

मस्त कविता

काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह गृहीत असावे असे वाटते तसे 'कुंकवाचा भार ना होतो कपाळी' या ओळीनंतरही प्रश्नचिन्ह अभिप्रेत आहे का ?

सुरेख!