माझ्या आठवणीत
लेखनविषय:
काव्यरस
गेलो कधी सोडून तरी
मला कधी विसरु नकोस
सदैव तुझ्या सोबत असेन
आठवणीत माझ्या रडू नकोस ।।
हाती हात तुझाच होता
आता कोणती आस
प्रीत माझी अखंड राहील
थांबेल जरी श्वास
नाही दिली जन्माची साथ
म्हणून राग मनी धरू नकोस
सदैव तुझ्या सोबत असेन
आठवणीत माझ्या रडू नकोस ।।
जीवन होते माझे तरी
आधार तु जगण्याचा
प्रश्नच आता उरत नाही
मी तुला विसरण्याचा
जीवन माझे संपले तरी
नाते आपुले तोडू नकोस ..
सदैव तुझ्या सोबत असेन
आठवणीत माझ्या रडू नकोस ।।
वाचने
1956
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मी महाविद्यालयात असताना लिहिलेल्या माझ्या कविता आठवल्या मला!!
छान् च
कविता भारिय
मी ही सद्ध्या महाविद्यालयातच शिकत आहे. वाणिज्य वर्ष दूसरे. ..
अजुन लेखन क्षेत्रात नविन आहे . तूर्तास हे फक्त प्रयत्न. .
In reply to मी ही सद्ध्या महाविद्यालयातच by माहीराज
छान लिहिताय....
सुरेख!!!
धन्यवाद. ..
छान....