Skip to main content

खरीच गरज आहे का?

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 29/12/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज. प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.

वाचने 26453
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

प्रश्न : `मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही.' असा नाही. तो कायम स्वतःशी संलग्न असण्याचा आहे. कारण मुळात तुम्हीच आनंद आहात. तस्मात, सुख किंवा आनंद बाहेरून येतं असं सकृद्दर्शनी जरी भासलं तरी ते तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे आलेलं असतं. उदाहरणार्थ, एव्हरेस्ट सर करून जर हिलरी कायमचा आनंदी झाला असता तर बहुतेक सगळे एवरेस्ट चढायच्याच मागे लागले असते. एवरेस्ट सर केल्यावर तो सुखी होतो कारण काही क्षण का होईना त्याच्या सगळ्या इच्छा संपल्यासारख्या वाटतात आणि त्या शांत मनःस्थितीत तो स्वतःशी कनेक्ट होतो. अर्थात, ही कनेक्टीविटी न कळल्यानं, एवरेस्टवरून खाली उतरल्यावर नव्या व्यावधानानं तो पुन्हा दु:खी होऊ शकतो कारण एवरेस्टवर किती वेळ थांबणार ? तस्मात, सुख वस्तूत नाही, तुम्ही सुख आहात. मग काम काहीही करा कारण कामाला अर्थ तुमच्यामुळे प्राप्त होतो. एकदा तुम्ही स्वतःपासून विलग झाला नाही की परिस्थिती तुम्हाला दु:खी करू शकत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

गुरूदेव! _/\_ - (संक्षीना मिस करणारा) सोकाजी

In reply to by विवेक ठाकूर

तस्मात, सुख वस्तूत नाही, तुम्ही सुख आहात. मग काम काहीही करा कारण कामाला अर्थ तुमच्यामुळे प्राप्त होतो. एकदा तुम्ही स्वतःपासून विलग झाला नाही की परिस्थिती तुम्हाला दु:खी करू शकत नाही.
चायला एकदम नवी थिअरी पोइंत हय

In reply to by स्पा

इथे बहुतेकांचा वस्तुसुखावर किंवा कार्यमौलिकतेवर भर आहे पण वस्तु किंवा कार्य हे व्यक्तीनिरपेक्ष आहेत. फ्लॅट सुखी करत नाही, तुम्ही सुखी होता. कार्य दु:ख देत नाही, त्याचा दुस्वास करुन आपण दु:खी होतो. त्यामुळे वस्तुप्राप्ती किंवा कार्यबदल व्यक्तीला सुखी अथवा आनंदी करु शकत नाही, कारण पुन्हा नवी वस्तुकांक्षा किंवा कार्याकांक्षा दु:ख निर्माण करु शकते. त्यामुळे जो आनंदी होतो त्याच्याशी (म्हणजे स्वतःशी) अनुसंधान असण्यात आनंद आहे. मग वस्तू असो की नसो आणि कार्य कोणतेही असो, त्यानं काही फरक पडत नाही.

In reply to by स्पा

आम्ही "शरद तळवलकर" सारखे आहोत. कान्हा मात्र नसलेली सरळ माणसं. आमची पट्टी काळी दोन पांढरी पाच आम्हाला झेपत नाही. तेंव्हा पास

In reply to by सुबोध खरे

बायकोने कांद्याची भजी किंवा भाजणीचे थालीपीठ केले कि तो दिवस किंवा सणावाराला छान साडी बिडी नेसून चार दागिने घालून सुहास्य मुद्रेने स्वागत केले तरी आमचे चार दिवस समाधानात आणि आनंदात जातात. एवढे उच्च विचार झेपत नाहीत.

In reply to by मोदक

अहो काही झेपत नाही म्हणून जीवशास्त्र घेऊन घोकंपट्टी करून डॉक्टर झालो. आता तुम्ही ते अकौंटस वगैरे सांगता कसं झेपणार.

In reply to by सुबोध खरे

आपणच आनंद आहोत हा फंडा आहे. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला स्वतःपासून दूर नेते ती दु:ख देते. आनंदाला प्रमाण नाही कारण तो सदैव एकसारखा आहे. तस्मात, मोठी गाडी म्हणजे मोठा आनंद असं नाही किंवा लहान फ्लॅट म्हणजे दु:ख असंही नाही. हे एकदा लक्षात आलं की आपण स्वतःपासून दुरावत नाही. आणि अशी एकदा स्वतःशी कनेक्टेड असण्यातली खुमारी कळली की मग मन कायम प्रसन्न राहातं.

In reply to by विवेक ठाकूर

कधी कधी एखाद्या टुकार गोष्टीतून काही अनमोल हाती लागतं ते असं. हेमंत लाटकरांचा हा धागा एकदम टुकार आणि भंगार आहे. अगदी "रिकामा सलुनवाला, पोचला दिल्लीला" पठडीतला. मात्र त्या निमित्ताने विवेक सरांचे या धाग्यावरील प्रतिसाद ही विचारी मनासाठी अक्शरशः मेजवानी आहे. त्यांच्या विचारांची सघनता, खोली लाजवाब. अध्यात्मविषयक साहित्यात उल्लेख होणारे आत्मज्ञान नेमके काय असू शकेल याचा अंदाज सरांच्या प्रतिसादातून येतोय. विचारांची ईतकी सुस्पष्टता आत्मप्रचितीशिवाय शक्य नाही. आज खुप दिवसांनी मिपावर लॉगिन केले त्याचे चिज झाले. असेच लिहित रहा विवेक सर.

In reply to by म्हसोबा

हेमंत लाटकरांचा हा धागा एकदम टुकार व भंगार आहे.
काही वेळा भंगारातून सोने मिळू शकते. पण ते कळण्यासाठी ज्ञानदेवांचा रेडा असून चालत नाही तर स्वतः मध्ये तशी विचार क्षमता असावी लागते. महाराज लोक सतसंगामध्ये बर्याच गोष्टी सांगतात पण ते स्वत:च ढोंगी असतात. उदा. आसाराम बापू अनिरूद्ध बापू.

In reply to by हेमंत लाटकर

ज्ञानदेवांच्या रेडयाने पैठणच्या ब्रम्हसभेत वेद म्हटले हो. तुम्हाला साधूवाण्याची कथा तरी सांगता येते का?

In reply to by म्हसोबा

ज्ञानदेवांच्या रेडयाने पैठणच्या ब्रम्हसभेत वेद म्हटले हो.
ही एक कवीकल्पना आहे. ज्ञानेश्वर हे प्रगाढ पंडीत होते यात वाद नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली. म्हणून रेडा पंडीत असू शकत नाही.

In reply to by हेमंत लाटकर

धाग्याविषयी त्यांची कमेंट खटकणारी आहे तरी त्यावर मी दिलेले प्रतिसाद अनुभवातून आलेले आहेत. मुळात आनंद काय आहे याविषयी उहापोह आहे, आणि धाग्यातल्या नेमक्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे, कदाचित तुम्हाला उपयोगी होऊ शकतील.

आस्तिक नास्तिक शांत झाले आता गरीब -श्रीमंत =)) असेही निरीक्षण आहे कि आस्तिक हे गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात आणि श्रीमंत नास्तिक

In reply to by स्पा

स्पा एकदम चूक . शिर्डी, सिद्धिविनायक, लालबागचा राजा या देवस्थानांना मिळणाऱ्या देणग्या पाहिल्यास तर तुझे डोळे पांढरेच काय सप्तरंगी होतील. या देणग्या देणारे काय गरीब किंवा मध्यम वर्गीय असतात? मध्यमवर्गीय म्हणजे देवळात गेल्यावर खिशात सुटे पैसे मिळाले नाही म्हणून दहा रुपयाची नोट टाकावी लागली म्हणून अर्धा तास हळहळणारा माणूस.

हेला काकांसारखे हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती असले विचार असलेले खूप लोक भारतात आहेत.
मला गरीबीत खितपतच पडावे, स्वतःची प्रगती करूच नये, पैसा जमवूच नये असे म्हणायचे नाहीच. माझ्याकडेही चार रूमचा फ्लॅट, बाईक, काॅम्युटर, स्मार्टफोन (₹ 5000), साधा सोफा, crt tv अश्या गोष्टी आहेत. आता यापेक्षा जास्तीची काय गरज आहे यात व्यवस्थित चालते. काही जण याबाबतीत फारच हव्यास (महत्वाकांक्षा) करतात. मारूती कार असली तरी सेदान कारसाठी आटापिटा करतात (बर्याच जणाकडील कार सोम-शनि धुळ खात पडलेल्या असतात, ट्रॅफिकचा प्राॅब्लेम, नौकरीमुळे वेळ नसणे). बिल गेटस् दाम्पत्य स्वत: जवळील सर्व संपत्ती दान करणार आहेत. मग आपण, जास्तीचा हव्यास, दोन पिढ्याची संपत्ती जमविण्याची काय गरज आहे. मुलांमध्ये धमक असली तर ते स्वत: आपली प्रगती करतील.

In reply to by संदीप डांगे

आता तुम्ही चर्चेचा सांधा बदलत आहात.
मी सांधा बदलला नाही. आमटे दाम्पत्याचे उदा. समाधानी जीवन जगणे कसे असते हे सांगण्यासाठी दिले.

In reply to by हेमंत लाटकर

आमटे दांपत्यानी अनेक वेळेला जाहीर रित्या सांगितले आहे की आम्ही जे करतो ते करतो कारण आम्हाला तसे करायला आवडते. आम्हाला कोणताही मोठेपणा देऊ नका. तसेच प्रत्येकाला जे आवडेत ते त्यानी करावे आणि समाधानी रहावे. कोणाला १० रुम चा बंगला आवडत असेल तर त्याची तुलना आमटे दांपत्याशी करायची काही गरज नाही. लोकांनी संपत्ती निर्माण करण्याचे कमी केले तर गरजवंत भुके मरतील. कोणी तरी ३ खोल्यातुन ५ खोल्यात गेले तर अनेक गवंडी, सुतार वगैरेंची २-३ महीन्याची सोय होते.

In reply to by हेमंत लाटकर

हो पण त्या आधी त्यांनी कित्येक वर्षे मेहनत करून एवढी संपत्ती कमावून आपण आणि आपल्या घरच्यांना जगातल्या सर्व सुख सुविधा मिळवून दिल्या . आणि त्यांची मुले आता स्वतः कमवू शकतात असं समजल्या वर त्यांनी हे पूल उचललंय .

In reply to by हेमंत लाटकर

काही जण याबाबतीत फारच हव्यास (महत्वाकांक्षा) करतात. मारूती कार असली तरी सेदान कारसाठी आटापिटा करतात (बर्याच जणाकडील कार सोम-शनि धुळ खात पडलेल्या असतात, ट्रॅफिकचा प्राॅब्लेम, नौकरीमुळे वेळ नसणे).
भारतातल्या ९५% लोकांच्या साठी ४ रूम चा फ्लॅट आणी बाईक ही मोठीच चैन आहे. आणि हेला काका, ती चैन तुम्ही करता आहात. तुम्हाला सेदान कार घेणार्‍यांवर बोट दाखवायचा काहीही अधिकार नाही. माझा पूर्वीचा जॉब च लोकां नी कार विकत घेण्यावर अवलंबुन होता. लोकांनी मारुती वरुन सेदान कडे वाट केली नसती तर मला बेरोजगार व्हावे लागले असते.

वरील लेखामध्ये तुम्हीच मांडलेले विचार तुम्ही स्वतः अंमलात आणले आहेत का? असल्यास "कसे अंमलात आणले" ते वाचायला आवडेल. ..आणि तुमच्या फ्लॅट, टीव्ही, कार वगैरे गरजा पूर्ण झाल्यानंतर वरील विचार मनात आले असतील तर तसेही सांगा..! :)

जो तो आपाअपल्या परीने सुख शोधत असतो. शेवटी अरुन-फिरून माझे मन एकाच विचारावर येते. ''आपले सौख्य आपल्या विचारावर अवलंबून आसते

भारतातल्या ९५% लोकांच्या साठी ४ रूम चा फ्लॅट आणी बाईक ही मोठीच चैन आहे.
माझे म्हणने फक्त मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे. मी पुणे मुंबईला राहत नाही त्यामुळे चार रूमचा फ्लॅट म्हणजे 1 कोटीचा नाही.

In reply to by अभ्या..

पण वापरू नका हट्टाने सगळीकडे चालत जा आणि सगळीकडे त्याची (मिपावर जास्तच) जाहीरात करा......की मी सेदान असूनही अजूनही चालतच जातो म्हणून... दोन ठळक फायदे:तुम्हाला भारतातल्या गाडी नसलेल्या गरीबांबद्दल कळवळा आहे,पेट्रोल दरवाढीच्या काळजीतून मुक्ती. इअतर फायद्यांसाठी बॅट्न मोदक आणि अभ्याकडे देत आहे. वाचनमात्र नाखु

"शक्ती का पासमे होना जरूरी है । सवाल शक्तीके इस्तेमाल का है। " हा डायलॉग आठवला . कुणी जर प्रचंड पैसे कमाई करून दान केले व निष्कांचन अवस्था चांगली आहे असे म्हणत असेल तर तो मे बी बरोबर असेल. (त्याच्या दृष्टीने!) पण ज्याला लहानपणापासूनच दोन वेळेसचे अन्नच व्यवस्थित मिळू शकत नाही अशा व्यक्तीने जर गरीबीतच सुख आहे असं म्हटलं तर काय फायदा ? त्याला श्रीमंतीत काय सुख आहे ते काय माहीत ! (याला काही सन्माननीय अपवाद असू शकतात)

डाॅ खरेंचे प्रतिसाद आवडले. समाधान व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे.त्याला कोणा एकाचे निकष लावून कसे चालेल.त्यापेक्षा कुटुंबाचा किंवा त्या व्यक्तीचा हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा नाही का?

In reply to by अजया

अहो अजयाताई, जर ती व्यक्तीच मुळात हॅपीनेस असेल तर हॅपीनेसचा हॅपीनेस इंडेक्स कसा काढता येईल?

याची गरज आहे का? याची माझ्यापरीने उत्तरे: पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट - घरात किती मंडळी आहेत त्यावर हे आवश्यक आहे का सांगता यावे महागडी कार - ऑफिस किती लांब आहे, पर्यटनाची किती आवड आहे त्यावर याचे उत्तर देता यावे 40 इंची एलईडी टिव्ही - चित्रपट पाइत्याडीदीच्ग इत्यादी किती आवडते त्यावर सांगता यावे एेसी - हे एसी आहे असे समजतो. घर कोणत्या प्रदेशात आहे त्यावर सांगता यावे मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन - मुलांनी काय व्हावेआअहे त्यावरून सांगता यावे हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी - करा सगळे साध्य करायचे तर याची खरच गरज आहे बायकोची नौकरी - काहीही साध्य करायचे नसले तरीही स्त्रियांना स्वतंत्र मिळकत असावी असे माझे मत आहे. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. - मुपाळणागह्रातघरात पाठवणे उपयुक्त आहे. माझे एकत्र कुटुंब असूनही मुले पाळणाघरात जातात.वृद्ध आई-वडिलांना त्यामुळे दुपारची झोप मिळते व त्यांचेही आरोग्य चांगले रहाते. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे - हे फिरायची आवड आहे की नाही त्यावरून सांगता यावे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड.- याची गरज वाटत नाही पण कोणत्याही दोन व्यक्तीत थोड्या कुरबुरी होणारच मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे.- याची गरज वाटत नाही. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. कॉलेज घरापासून किती लांब आहे त्यावर सांगता यावे वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे - याची गरज वाटत नाही मग त्यावर डाॅक्टरी इलाज. - आजार झाल्यास याची मात्र नितांत गरज आहे आशा आहे उत्तरे पटतील

गरज आणि चैन ह्यात सीमारेषा कशी आखावी आणि कुणी ओळखावी? माझ्यासाठी जी चैन आहे त्याकडे अंबानी ढुंकूनही पाहत नसेल. तसेच, माझ्याकडे जे आहे त्याचा अजून कुणाला हेवा वाटत असेलही. कुणाला सर्व त्यागण्यात सूख, तर कुणाला सगळं भोगण्यात सूख. ज्याचं त्याने ठरवावं आणि मजा करावी.

प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे.. असं सगळ्यांसाठी एकच उत्तर असलेलं नवनीत गाईड थोडीच असतं.. एक मित्र आहे.. शिकलाय आणि कमावतोय न्युयॉर्कमध्ये.. बदाबदा कमावतोय.. साऊथचा आहे.. तिकडेच मोठ्या शहरात स्वतःचा "मॉल" आहे.. सिंगापुर का असंच कुठेतरी घर आहे. पुण्यातही घर घेतोय.. इतकं कमावतोय.. रिलेशनशिप्मध्ये मार खालेल्ला आहे. पण जस्ट तीसचा आकडा गाठलाय.. लग्न होऊन लागेल मार्गी.. अजुन वय गेलेलं नाही.. तर मला वाटायचं इतकं सगळं आहे.. हा माणुस किती सुखी असेल?!! कळालं की त्याची महात्वाकांक्षा ही न्युयॉर्कमध्ये "हेलिकॉप्टर" बाळगण्याची आहे. त्याच्यामते अजुन तर खुप काही करणं बाकी आहे.. आपण असंही म्हणु शकतो की काय हा हव्यास.. आहे त्यात सुखी रहावं.. पण मग असं केलं तर ह्या मोठमोठ्या कंपन्या.. उद्योगधंदे कुठुन उभे राहिले असते.. ही खुप काही मिळवण्याची काहींची आस त्यांच्याच नाही तर इतरांच्याही आयुष्यात फार घडामोडी घडवत असते. ती आवश्यक आहेच की.. आनंद मानणं एक गोष्ट झाली.. आहे त्यात समाधान मानुन स्वस्थ बसणं दुसरी.. सतत काही तरी मिळवत जाणारे आनंदी नसतातच असं काही नाही..

मला वाटत समाधानी राहण्यासाठी एक "ध्येय" सगळ्यात महत्वाचे असते. मग ते एक TV घेण्याच असो वा एखादे पेटंट फ़ाइल करण्याचे असो. ध्येय माणसाला आळशी होऊ देत नाही आणि कामात गुंतवून ठेऊन निराशही होऊ देत नाही. पण गम्मत म्हणजे सतत नव-नवी ध्येय येत रहाणे देखील महत्वाचे आहे. नाहीतर जे मिळवायचे होते ते मिळवल्यानंतर आता आयुष्यात काय करायचे हि भली मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे Megamind हा सिनेमा मला फार आवडतो. हिरोला मारल्यानंतर खलनायक कसा आळशी आणि सैरभैर होतो हे त्यात गमतीशीर रित्या दाखवलं आहे. पण शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच! म्हणून समाधानाची व्याख्या ज्याने त्याने स्वतःच ठरवावी. सगळ्यांसाठी समान व्याख्या असू शकेल असे मला तर वाटत नाही.

सुख हवे ते मिळण्यात नाही, तर मिळालेले हवेहेवेसे वाटण्यात आहे. हे बरोबर आहेच, पण अजून एक सत्य आहे... "जर मिळालेल्या गोष्टींत सर्व माणसांना सुख मिळाले असते तर, आजपर्यंत मानवी जीवन जेवढे विकसित झाले आहे, त्याच्या निम्मेही झाले असते की नाही यात संशय आहे."

सगळ्याच प्रकारचे लोकं या जगात लागतात. पै पै साठवून कोणीतरी बचत करणारे लागतात तसंच रिस्क घेऊन कर्ज काढून बिसनेस करणारे पण लागतात. जर सगळेच आहे त्यातंच समाधानी असते तर अजूनही आपण पायी फिरत असतो, जात्यावर दळत असतो (किंवा रोज शिकार करून अन्न मिळवत असतो ). कोणाला पोळी भाजी खाऊन समाधान मिळेल कोणाला पुरणपोळी कोणाला चिकन बिर्याणी. कोणाच समाधान आनंद बरोबर किंवा चूक हे मी कोण ठरवणार. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे असं मला वाटणं महत्वाचा. मग ती झोपडी असो ५ बेडरूम चा flat असो अथवा अजून काही.

जगी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी मना तुच शोधोनी पाहे गरीब बी नाय आन श्रीमंत बी नाय! सुखी वा दु:खी या जीवनात असलेल्या अवस्था आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम सुखी वा दु:खी कोणी नसते.

काही चांगले, खोचक, बोचक, सतसंगी प्रतिसाद आवडले. डाॅ. खरेचे प्रतिसाद परखड असले तरी मनाला लागणारे नसतात. डाॅ. आडनावा प्रमाणे खरे बोलणारे, लष्करी नौकरीत काॅपरेटिव्ह व पाॅप्युलर असावेत असे वाटते. हा धागा टाकण्यामागे गरीब सुखी व श्रीमंत दुखी:, गरीबीतच राहावे, प्रगती करूच नये, आहे त्या परिस्थितीत राहावे हा उद्देश नसून जास्तीच्या हव्यासापायी मनुष्य आनंदी व समाधानी जीवन जगणेच विसरून जाईल. प्रत्येक गोष्टीत इतरांशी तुलना करून इतराकडे असलेले आपल्याकडे असावे याचा आटापिटा करेल. हा धागा मध्यमवर्गीय नौकरदारांना उद्देशून आहे. उद्योजक लोकांकडे सर्व काही असले तरी ते साधे राहतात (नारायण मुर्ती) आमटे दाम्पत्यांचे उदा. देण्यामागे आपण त्यांच्या सारखे करावे असा नाही तर आनंदी व समाधानी राहण्यासाठी जास्तीचा हव्यास करण्याची गरज नाही हे सांगणे आहे.

In reply to by हेमंत लाटकर

जितका धागा पोकळ होता त्याच्या दुप्पट हा प्रतिसाद पोकळ आहे. स्व्गतः सोक्य, ठाकूरांचे प्रतिसाद वाचले नसल्याचाच परिणाम असावा का हा वरचा प्रतिसाद - (५ रूमच्या घरात राहून, SUV चालवूनही सुखी व समाधानी असलेला) सोकाजी

लाटकर काकांच्या धाग्याचे शंभर झाले, इसी खुशी के मोके पर बॅटमॅन आणी टवाळ कार्टा यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.


In reply to by कपिलमुनी

एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं की काय म्हणतात ते.. ;) पण कै का असेना.. बॅटमॅन नि टका परत आलाच पायजे. (नैतर आमी सामुहिक जालीय उपोषण करु आता.!!)

=))

"तुझे आहे तुजपाशी" या नाटकात काकाजींनी असेच सांगितले आहे . आमटे परिवार , गांधीजी , विवेकानंद , सावरकर हि सारी लोकोत्तर , महान माणसे आहेत . सर्वसामान्य माणसांनी सोसत नसेल तर उगाचच त्यांचे अनुकरण करु नये . नाहितर मग , न झेपणारया पट्टीत गायला गेले तर जसे गाणे बेसुरे होते , तसेच जीवनही अर्थहिन होउन जाते . हि महान माणसे म्हणजे जणू सागरातील दिपस्तंभ आहेत . सर्वसामान्य मनुष्यरुपी जहाजांनी त्यांच्याकडुन प्रकाश घेउन जीवनरुपी सागरात मार्गक्रमण करावे , परंतु स्वता: क्षमता नसताना दिपस्तंभ बनण्याचा अट्टाहास बाळगू नये. अन्यथा हे मार्गक्रमण दिशाहिन होऊन जाते .

+१ . अगदी बरोबर खरे सर . तुमच्या प्रतिक्रिया वाचूनच मला "तुझे आहे तुजपाशी"ची आणी काकाजीं ची आठवण झाली .

लेखाचा उद्देशच कुणाला कळला नाही. सर्वांनी प्रकाश आमटेंचेे अनुकरण करावे किंवा गरीबच राहावे असे माझे म्हणने नव्हते तर अति हव्यासामुळे माणूस आनंदी व समाधानी जीवन जगणे विसरून जाईल हे सुचवायचे होते.

In reply to by मोगा

त्यांनी पहिल्याने स्वकष्टाने समाजकार्य उभे केले आणी मग लोकांनी त्यांना मदत दिली. पहिल्या दिवसापासून जनतेचा पैसा वापरायला ते राजकारणी नव्हेत. एवढे तरी लक्षात घ्या. जिथे तिथे पिंक टाकणे सोडा